बारामती — महाराष्ट्रातील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवत देशातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी तब्बल २ लाख१८ हजार ९३० मतांनी विजय मिळवत आधीचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
यापूर्वी सुनील कुमार शर्मा (साहिबाबाद, उत्तरप्रदेश) यांच्या नावावर २,१४,८३५ मताधिक्याचा विक्रम होता, जो आता बारामतीत मोडला गेला आहे.

मतदान आणि मतमोजणीचा आढावा
बारामती पोटनिवडणुकीत एकूण ५८.१७% मतदान झाले.
एकूण मतदार: — ३लाख ,८४हजार ,५७९
मतदान करणारे: २,२३,७०५
मतमोजणी सोमवारी (४ मे) सकाळी ८ वाजता बारामती MIDC येथील गोदामात सुरू झाली. पहिल्याच फेरीपासून सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली.
18व्या फेरीतच जुना विक्रम मोडला
१८व्या फेरीतच सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांनी २०१९ मध्ये केलेला १ लाख ६५ हजार २६५ मताधिक्याचा विक्रम मोडला. त्यानंतर प्रत्येक फेरीत त्यांचे मताधिक्य वाढत गेले आणि अखेर त्यांनी नवा इतिहास घडवला.
2024 निवडणुकीचा संदर्भ
२० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत ७१.२७% मतदान झाले होते. त्या वेळी “पवार विरुद्ध पवार” अशी थेट लढत झाली होती: यावेळी अजित पवार यांना १ लाख ८१ हजार १३२ मते पडली होती. युगेंद्र पवार यांना ८० हजार २३३ मते
त्यात अजित पवार १लाख ,९०९ मतांनी विजयी झाले होते.
पोटनिवडणूक कशी लागली?
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र अपक्ष व छोट्या पक्षांमुळे निवडणूक झाली.
या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार रिंगणात होते, परंतु सुनेत्रा पवार यांच्या प्रचंड लाटेमुळे सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

