पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल 14 मे रोजी; पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींचे भविष्य ठरणार ?

धाराशिव — राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा बहुप्रतीक्षित निकाल येत्या 14 मे रोजी लागणार आहे. तब्बल वीस वर्षांनंतर या प्रकरणाचा शेवट जवळ आला असून, राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील दिवंगत पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची 2006 मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जणांवर गंभीर आरोप आहेत.

 काय आहे प्रकरण?

3 जून 2006 रोजी कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांच्या गाडीवर गोळीबार करून त्यांची आणि चालक समद काझी यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यामागे सुपारी किलिंगचा कट असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.
सीबीआयच्या तपासानुसार, या हत्येसाठी सुमारे 25 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. अनेक महिन्यांच्या कटानंतर हा हल्ला घडवून आणण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

 सुनावणीची स्थिती

या प्रकरणाची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात सुरू आहे न्यायाधीश एस. आर. नावंदर  यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरू आहे 4 जुलै 2011 पासून सुनावणी केली जाणार आहे.
🕳️ साक्षीदार 128 (यात समाजसेवक अण्णा हजारे यांचा समावेश)
🕳️  माफीचा साक्षीदार: पारसमल जैन बादला
दरम्यान, अलीकडील सुनावणीला डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह 7 आरोपी हजर होते.
बचाव पक्षाची भूमिका
डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वतीने तब्बल 1250 पानांचे लेखी म्हणणे सादर करण्यात आले आहे. या निवेदनात निंबाळकर कुटुंबावरच गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
तपासाची व्याप्ती
या प्रकरणाचा तपास तीन प्रमुख यंत्रणांनी केला आहे पोलीस,सीआयडी,सीबीआय
हत्या प्रकरणात 2009 मध्ये सीबीआयने डॉ. पद्मसिंह पाटील यांना अटक केली होती, तेव्हा ते खासदार होते.
आता पुढे काय?
14 मे रोजी होणारा निकाल हा केवळ एका हत्येचा निकाल नसून, महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय प्रकरणाचा शेवट मानला जात आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles