बीड — जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथून दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींना 5 एप्रिल 2026 रोजी पळवून नेल्याची घटना घडली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर प्रकरणाचा तपास करताना आरोपी विजय महादेव कव्हळे (रा. पळशी, ता. मुदखेड, जि. नांदेड) ह.मू. उमापूर ता. गेवराई याने मुलींना अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचे समोर आले. पोलिसांसमोर आरोपीसह मुलींचा शोध घेणे हे मोठे आव्हान होते.
तांत्रिक तपासाने दिला मोठा धागा
तपासादरम्यान आरोपी पूर्वी भिवंडी (जि. ठाणे) येथे काम करत असल्याची माहिती मिळाली. परंतु तेथे शोध घेतला असता आरोपी व मुली सापडल्या नाहीत. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे मुली बिहार-उत्तर प्रदेश सीमाभागात असल्याचे स्पष्ट झाले.
उत्तर प्रदेशात धाडसी कारवाई
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार चकलांबा पोलिसांचे विशेष पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. बलीया जिल्ह्यातील शिवपुर दियार येथे शोध घेतल्यानंतर आरोपी सिकंदरपुर येथे असल्याची माहिती मिळाली. दरम्यान स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या संयुक्त कारवाईत
आरोपी विजय कव्हळे याला अटक करण्यात आली. यावेळी दोन्ही अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली.
महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी मुलींना पुढील काही दिवसांत छत्तीसगड येथे घेऊन जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी मोठी कारवाई करत हा कट उधळून लावला.
४ दिवसांच्या सलग प्रवासानंतर यश
चकलांबा पोलिसांच्या पथकाने सलग चार दिवस प्रवास करून ही मोहीम यशस्वी केली. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,
अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर
उपविभागीय पोलीस अधिकारीअनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, कल्याण पवार, हनुमान इंगोले आणि टेक्निकल अॅनालिसिस सेलचे शेखर औटे व विकी सुरवसे यांनी ही कारवाई पार पाडली.

