केज — तालुक्यातील होळ येथील गौळणबाई नानाभाऊ चाटे यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (दि.११) मध्यरात्री निधन झाले.
मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ वर्षे होते. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. उपचारादरम्यान राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर होळ येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. होळ येथील ग्रामपंचायत अधिकारी संजय चाटे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

