गुटखा माफियांवर आता थेट मकोका; संपूर्ण नेटवर्कवर एफ डी ए ची नजर

मुंबई — राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठ्या कारवाया सुरू असतानाच आता गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध व्यापाराविरोधात प्रशासनाने आणखी कठोर पाऊल उचलले आहे.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा व्यापार करणाऱ्या संघटित टोळ्यांवर आता थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) १९९९ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले असून, केवळ गुटखा विक्रेत्यांवरच नव्हे तर या संपूर्ण साखळीवर कारवाई केली जाणार आहे.

उत्पादकापासून विक्रेत्यापर्यंत सर्वांवर कारवाई

गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाला आणि इतर प्रतिबंधित पदार्थांचे:

🕳️.      उत्पादन करणारे

🕳️.      साठवणूक करणारे

🕳️.       वाहतूक करणारे

🕳️.       पुरवठादार

🕳️.        घाऊक विक्रेते

🕳️.         किरकोळ विक्रेते

🕳️.         गोदाम चालक

हे सर्व FDA च्या रडारवर असणार आहेत.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार जर संघटित पद्धतीने केला जात असेल तर तो संघटित गुन्हा मानला जाईल आणि पात्र प्रकरणांमध्ये मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल.

लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त

आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली FDA कडून विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त आणि प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे.

तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू

अवैध गुटखा विक्री, साठवणूक किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थांबाबत नागरिकांनी प्रशासनाला माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

FDA कडून स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रतिबंधित पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी आता कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles