Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
पवनचक्की मजूर आत्महत्या : रोजगारासाठी उत्तर प्रदेशातून बीड जिल्ह्यात आलेल्या 23 वर्षीय तरुण मजुराने..
केज — रोजगारासाठी उत्तर प्रदेशातून बीड जिल्ह्यात आलेल्या 23 वर्षीय तरुण मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील नांदूरघाट परिसरात उघडकीस आली. वाघेबाभुळगाव शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. फैजान मोहम्मद असे मृत तरुणाचे नाव असून, तो टोरंटो कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पात मजूर म्हणून काम करत होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, 23 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास नांदूरघाटजवळील वाघेबाभुळगाव शिवारात ही घटना समोर आली. फैजान मोहम्मद (वय 23, रा. उत्तर प्रदेश) याने शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. ही माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.
घटनेची माहिती मिळताच नांदूरघाट पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
फैजान मोहम्मद याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. कामाच्या ठिकाणी काही अडचण होती का, वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणातून त्याने हे पाऊल उचलले का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याच्या सहकाऱ्यांकडूनही माहिती घेतली जात आहे.
उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला फैजान रोजगारासाठी बीड जिल्ह्यात आला होता. तरुण वयात त्याचा मृत्यू झाल्याने सहकाऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणी नांदूरघाट पोलीस दूरक्षेत्रात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे पुढील तपास करीत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि नातेवाईकांचे जबाब यानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवायच्या आहेत का?
बीड सह राज्यातील ताज्या बातम्या, थेट तुमच्या WhatsApp वर - अगदी फ्री
WhatsApp चॅनल Follow करा →✓ 100% फ्री • ✓ रोज अपडेट • ✓ कधीही Unfollow करू शकता