Home Blog Page 4

राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळया रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

0

नवी दिल्ली — साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे. देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून मराठी भाषेतील ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त राष्ट्रीय संस्था असून भारतीय भाषांमधील साहित्याच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. दरवर्षी अकादमीकडून विविध भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करून त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

मराठी साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेत लेखकाने आपल्या आयुष्यातील अनुभव, सामाजिक वास्तव, संघर्ष आणि वैचारिक प्रवास यांचे प्रभावी चित्रण केले आहे. या साहित्यकृतीला मिळालेल्या पुरस्कारामुळे मराठी साहित्यविश्वाचा गौरव वाढला आहे.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये काव्यसंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, निबंध, साहित्यिक समीक्षा, आत्मकथा आणि संस्मरण अशा विविध साहित्य प्रकारांतील विविध पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. देशातील विविध भाषांमधील साहित्यिक परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या साहित्यकृतींना तज्ज्ञांच्या समितीद्वारे निवडण्यात आले आहे. मराठी भाषेच्या पुरस्कारासाठी नियुक्त परीक्षक मंडळामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले, नागोराव तम्माजी उटकर आणि राजन गवस यांचा समावेश होता.

साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते. सन २०२५ च्या साहित्य अकादमी पुरस्कारांचे वितरण ३१ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे.

अकादमी पुरस्कार २०२५-भाषा, पुस्तक व लेखक पुढीलप्रमाणे :

🕳️  असमिया – कड़ि खेलर साहित्यसाधु (उपन्यास) – देवब्रत दास

🕳️   बाङ्ला – श्रेष्ठ कबिता (कविता) -प्रसून बंद्योपाध्याय

🕳️  बोडो दोंनै लामाः मोनसे गाथोन (उपन्यास) – सहायसुलि ब्रह्म

🕳️  डोगरी -‘ठाकुर’ सतसई (कविता, दोहे) – खजूर सिंह ‘ठाकुर’

🕳️   अंग्रेजी – क्रिमसन स्प्रिंग (उपन्यास) -नवतेज सरना

*🕳️ गुजराती – भट्टखडकी (कविता) – योगेश वैद्य

*🕳️ हिंदी – जीते जी इलाहाबाद (संस्मरण) -ममता कालिया

*🕳️ कन्नड -दडा सेरिसु तंदे* (कहानी) – अमरेश नुगडोणी

*🕳️ कश्मीरी – नजदावनेकी पॉट अलाव (कविता) -अली शैदा

*🕳️  कोंकणी – कोंकणी काव्यें: रुपां आनी रूपकां (आलोचनात्मक निबंध) -हेनरी मेंडोनका (एच. एम. पेरनाळ)

*🕳️ मैथिली – धात्री पात सन गाम (संस्मरण) -महेन्द्र

*🕳️ मलयाळम् – मायामानुष्यर (उपन्यास) – एन. प्रभाकरन

*🕳️ मणिपुरी – कंगलमद्रीब इफुत (कहानी) – हाओबम नलिनि

*🕳️ मराठी – काळयानिळया रेषा (आत्मकथा) – राजू बाविस्कर

*🕳️ नेपाली -नेपाली पारम्परिक संस्कृति र सभ्यताको ढुकुटी (निबंध) -प्रकाश भट्टराई

*🕳️ ओड़िआ – पदपुराण (कविता) – गिरिजाकुमार बलियारसिंह

*🕳️ पंजाबी – सेफ्टी किट (कहानी) -जिंदर

*🕳️ राजस्थानी -भरखमा (कहानी) – जितेंद्र कुमार सोनी

*🕳️ संस्कृत -प्रस्थानचतुष्टये ब्रह्मघोषः (कविता) – महामहोपाध्याय साधु भद्रेशदास

*🕳️ संताली – मिड बिर्ना चेनने साओन इनाग सागई (कहानी) -सुमित्रा सोरेन

*🕳️ सिंधी – वाघू (कहानी) – भगवान अटलानी

*🕳️ तमिळ – तमिळ सिरुकथैयिन थडंगल (साहित्यिक आलोचना) – सा. तमिळसेलवन

*🕳️ तेलुगु -अनिमेष (कविता) – नंदिनी सिद्धरेड्डी

*🕳️ उर्दू -सफ़र जारी है (कविता) -प्रितपाल सिंह बेताब

जमिनीच्या तुकड्यासाठी सासरच्या मंडळीसह लेकाचा बापावर प्राणघातक हल्ला

0

केज — शेती आणि ट्रॅक्टर नावावर करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मुलाने जन्मदात्या वडीलावर सासरच्या मंडळींच्या मदतीने प्राण घातक हल्ला केल्याची घटना नाहोली येथे घडली. यामध्ये वडील गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाईत उपचार सुरू आहेत

नाहोलीतील लक्ष्मण ठोंबरे हा आपले वडील सुभाष ठोंबरे यांच्याकडे जमीन व ट्रॅक्टर माझ्या नावावर करा म्हणून घरात वितंड वाद घालत होता. शेवटी १४ मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. गावातील चौकात लक्ष्मण ठोंबरे व त्याची पत्नी सारिका यांनी सुभाष ठोंबरे यांना गाठले. “जमीन आणि ट्रॅक्टर माझ्या नावावर का करत नाहीस?” असा जाब विचारत त्यांना काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण होत असताना सून सारिका हिचे माहेर त्याच गावात असल्याने तिचे आई-वडील, भाऊ आणि चुलते यांनीही घटनास्थळी धाव घेतली.आपल्या जावयाला साथ देत या सर्वांनी मिळून सुभाष ठोंबरे यांना अमानुषपणे मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून सुभाष ठोंबरे यांची मुलगी मीना बिक्कड आणि जावई दादा बिक्कड हे बचावासाठी धावून आले. मात्र, संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी त्यांनाही सोडले नाही. त्यांनाही मारहाण करत “मध्ये आलात तर जीवे मारू” अशी धमकी दिली.
या मारहाणीत सुभाष ठोंबरे हे रक्तबंबाळ झाले असून त्यांच्या तोंडावर, हातावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. मारहाणीमुळे त्यांचे शरीर काळे निळे पडले आहे. त्यांना तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.या प्रकरणी मुलगा लक्ष्मण ठोंबरे, सून सारिका ठोंबरे, यांच्यासह सासरच्या १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

ठाणे येथून अपहरण करून अल्पवयीन आदिवासी मुलीची लग्नासाठी पाटोद्यात विक्री;6 जणांवर गुन्हा दाखल

0

ठाणे — बीड तालुक्यातील हिवरा पहाडी येथे अल्पवयीन विवाहित महिलेवर उचलून नेत अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे.भिवंडीतून एका 15 वर्षीय आदिवासी मुलीचे कथितरित्या अपहरण करून तिला लग्नाचे आमिष दाखवले.तिला पाटोदा तालुक्यातील एका व्यक्तीला विकल्याचा प्रकार समोर आला आहे ‌ याप्रकरणी मुलीचा पती आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अत्यंत गरिबी आणि पालकांचा आधार नसल्याने या पीडित मुलीचे शोषण करण्यात आले. २६ फेब्रुवारी रोजी एका दलालाने आणि त्याच्या साथीदारांनी तिला लग्नाद्वारे चांगले आयुष्य देण्याचे वचन देऊन तिचे कथितरित्या अपहरण केले,

झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेले, अत्याचार केला चावडीच्या खांबाला बांधून आरोपी पळाला

मात्र प्रत्यक्षात त्यांनी तिला बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील एका वयस्कर व्यक्तीला विकून टाकले.२७ फेब्रुवारी रोजी धमक्या देऊन या अल्पवयीन मुलीला एका बेकायदेशीर लग्नासाठी भाग पाडण्यात आले. २७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत तिचा पती भाऊसाहेब तांबे याने तिला शेतातील एका खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर अत्याचार केला. तिच्या एका नातेवाईकाने तिला शोधून काढले. तिने तिच्यावर ओढवलेल्या संकटाची कहाणी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

85 लाखाच्या अपहार प्रकरणी खोकरमोहाचे सरपंच श्रीहरी मिसाळ वर अपात्रतेची कारवाई
याप्रकरणी पडघा पोलिसांनी मुख्य आरोपी भाऊसाहेब तांबे, मध्यस्थ विलास हिलम आणि इतरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही‌. या संदर्भात प्रभात  दैनिकाच्या न्यूज वेबसाईटने  वृत्त प्रकाशित केलं आहे.

लक्षवेधी ! खरवंडी — राजूरी महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाची अनियमितता ;आ.क्षीरसागर आक्रमक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; कार मधून 7 लाखाचा गुटखा जप्त

0

बीड — शहरातील फुलाई नगर परिसरात अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एका स्वीफ्ट कारमधून विविध कंपनींचा गुटखा जप्त केला. या कारवाईत एकूण ६ लाख ६८ हजार १८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षकांच्या आदेशा नुसार स्थानिक गुन्हे शाखा अवैध धंद्यावर कारवाई करत आहे. शहरातील फुलाईनगर भागात गुटखा येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यानंतर फुलाईनगर येथे एक स्वीफ्ट कार क्र. एम एच -४३आर-५७२५ मधून विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणला जात असतांना कारवाई करण्यात आली.

85 लाखाच्या अपहार प्रकरणी खोकरमोहाचे सरपंच श्रीहरी मिसाळ वर अपात्रतेची कारवाई

आज दि. १६ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कारची तपासणी केली. तपासणी दरम्यान कारमध्ये विविध कंपनींच्या गुटख्याचा साठा आढळून आला. यामध्ये एकूण ६ लाख ६८ हजार १८४ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी भाऊसाहेब राम पडुळे वय ३४ वर्ष, रा. औरंगपूर ता. बीड, ह.मु.स्वर्णनगरी, फुलाईनगर याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान हा गुटखा त्याने रेवन्नाथ चादर रा. भाटसांगवी, ता. बीड याच्याकडून घेवून आल्याचे समोर आले. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात दोन्हीही आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भाऊसाहेब पडुळे यास ताब्यात घेतले असून रेवन्नाथ चादर हा फरार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनखाली पोउपनिरीक्षक श्रीराम खडावकर, पो.ह. राहुल शिंदे, युनुस बागवान, महिला पोलीस कर्मचारी स्वाती मुंडे, पोलीस अंमलदार अशफाक सय्यद, पो.अं मनोज परजणे व चालक पोलीस नितीन वडमारे यांनी केली.

“मोदी टेक्नॉलॉजी वापरा, गॅस टंचाई दूर करा” : नाल्याच्या गॅसवर ‘चाय पे चर्चा

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन

बीड —  केंद्र सरकारच्या धोरणांमुळे गॅस टंचाई निर्माण झाली असून गॅस दरवाढ आणि व्यावसायिक गॅसवरील निर्बंधांमुळे खाणावळी बंद पडण्याच्या स्थितीत आल्या आहेत. तसेच घरगुती गॅस सिलेंडरसाठी ऑनलाईन बुकिंग बंद असल्याने ग्राहकांना रांगेत तासनतास उभे राहावे लागत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान समाधान शिबिर प्रमाणेच “मोदी टेक्नॉलॉजीचा प्रचार, प्रसार करून गॅस टंचाई दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनात “मोदी टेक्नॉलॉजी वापरा आणि गॅस टंचाई दूर करा” या घोषणेसह नाल्यातून निघणाऱ्या गॅसवर चहा बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. “नाल्याच्या गॅसवरील चाय पे चर्चा” या लक्ष्यवेधी आंदोलनाद्वारे केंद्र सरकार व जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

लक्षवेधी ! खरवंडी — राजूरी महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाची अनियमितता ;आ.क्षीरसागर आक्रमक

सरकार आणि जिल्हा प्रशासन गॅस टंचाई नसल्याचे सांगून ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी “मोदी टेक्नॉलॉजी वापरा, गॅस टंचाई दूर करा” तसेच “जिल्हा प्रशासनाचा मोदींवर भरोसा नाही का?” अशा घोषणाबाजी करण्यात आली.

या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, मुबीन शेख, सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड, बाळासाहेब मोरे पाटील (प्रदेशाध्यक्ष, शिवशक्ती भिमशक्ती विचारमंच), सादेक सय्यद (शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक), गणेश धोंडरे (शिवसंग्राम नेते), राजेंद्र आमटे शेतकरीपुत्र हक्क आंदोलक), प्राचार्य डी.जी.तांदळे ( मार्गदर्शक मराठवाडा शिक्षक संघ), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्वकल्याण सेवाभावी संस्था बीड)आदी सहभागी झाले.

जिल्हा प्रशासनाने गॅसच्या सुरळीत वितरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असुन पोलिस अधीक्षक सचिव आहेत.या समितीकडे नियंत्रण, सुरळीत पुरवठ्याची जबाबदारी दिली असुन साठेबाजी करणा-यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्याऐवजी जिल्हा प्रशासनाने मोदी टेक्नॉलॉजी द्वारे गॅस टंचाई दूर करावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान समाधान शिबिर प्रमाणे जिल्हाभरात अभियान राबवत गस टंचाई ग्राहकांचे समाधान करावे अशी उपरोधिक टीका डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.

तू रंगाने काळी म्हणत सासर कडून प्रचंड त्रास; विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

0

माजलगाव — “तू रंगाने काळी आहेस” असे म्हणत सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक छळ होत असल्याच्या कारणावरून विवाहितेने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना तालखेडा येथे घडली आहे.


तालखेडा गावातील ज्योती पवार या महिलेचा विवाह २०१८ मध्ये तळतांडा येथील कृष्णा पवार यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत होते. मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींकडून पतीच्या व्यवसायासाठी माहेरून पैसे आणण्याचा दबाव टाकत तिचा छळ सुरू झाल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.सासरच्या मंडळींकडून “तू रंगाने काळी आहेस, त्यामुळे आम्हाला आवडत नाहीस,” असे म्हणत ज्योतीचा सातत्याने मानसिक छळ केला जात होता. सततच्या छळाला कंटाळून ज्योतीने १२ जानेवारी २०२६ रोजी विष प्राशन केले. त्यानंतर तिला छत्रपती संभाजीनगर आणि नंतर पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान १८ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. दरम्यान दुःखाने कोसळलेल्या आई-वडिलांनी सुरुवातीला तक्रार दाखल केली नव्हती. मात्र १३ मार्च रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ज्योतीच्या सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिचा पती कृष्णा पवार, सासरा मनोहर पवार आणि सासू ताराबाई पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विवाहितेला उचलून नेत अत्याचार, चावडीला बांधून ठेवले; बालविवाह प्रकरणी पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवकावर होणार गुन्हे दाखल

0

बीड — अल्पवयीन महिलेस घरातून नेऊन तिच्यावर अत्याचार करुन बेशुद्ध अवस्थेत चावडीच्या खांबाला बांधल्याच प्रकरण घडलं होतं. या प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली असून पीडित महिला अल्पवयीन असून बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील हिवरा पहाडी येथे अल्पवयीन विवाहित महिलेला रात्री उचलून घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.पिडीता बेशुद्ध पडली असताना तिला गावच्या चावडीत खांबाला बांधून ठेवले

झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेले, अत्याचार केला चावडीच्या खांबाला बांधून आरोपी पळाला

. ही बात सकाळी गावकऱ्यांच्या नजरेस पडली. त्यानंतर खांबाला बांधलेल्या पीडीतेची सुटका करण्यात आली. सुटका करण्यापूर्वी तिचा व्हिडिओ देखील काढण्यात आला होता. ही घटना राज्यभर गाजली असून महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष घातले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी तपास अधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधला. आता, पीडित अल्पवयीन महिलेच्या विवाहावरुनही गुन्हा दाखल करण्याचे आदेश तपास अधिकारी अतुल कुमार लांडगे यांना दूरध्वनीवरून दिल्या आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 137(2),333,64(2)(i) आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वैभव पटेकर याला अटक करण्यात आली आरोपीला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तपासा दरम्यान पीडित मुलीचा गेल्याच वर्षी बालविवाह लावून देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या बालविवाहाच्या दृष्टीनेही गुन्हा दाखल करून लग्न लावून देणारे, लग्नास उपस्थित असणारे, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्षा अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीसह भारतातील 5 राज्यात निवडणुका जाहीर

0

नवी दिल्ली — निवडणूक आयोगाने चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशासह महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांची तारीख आज निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केली.
आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यात निवडणुका होणार आहेत. तर, महाराष्ट्रात पोटनिवडणूक होणार आहे. 5 राज्यामध्ये भारतातील पावरफुल नेत्यांची सत्ता आहे.

आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. तामिळनाडूमध्येही २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. याशिवाय, 9 एप्रिल आणि 23 एप्रिल रोजी आठ विधानसभा जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. यात महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बारामती आणि राहुरीत 23 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. पाचही राज्यांच्या विधानसभा जागांची आणि पोटनिवडणुकांची मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठी निवडणुका होत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सध्या सत्तेत आहे.आसाम विधानसभेत 126 जागा आहेत. सध्याचे सरकार भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे युती आहे, ज्याचे नेतृत्व हिमंता बिस्वा शर्मा करत आहेत.तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागा आहेत. एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) हा सत्ताधारी पक्ष आहे.केरळमध्ये 140 जगांसाठी निवडणूका होत आहेत. येथे सरकार पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीकडे आहे.पुद्दुचेरी विधानसभेत 30 जागा आहेत. येथील सध्याचे सरकार एन. रंगासामी यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय एनआर काँग्रेस आणि भाजपचे युती आहे.

झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेले, अत्याचार केला चावडीच्या खांबाला बांधून आरोपी पळाला

0

बीड — घरामध्ये झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून गावाबाहेर नेले.तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला गावामध्ये आणले व गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवल्याचा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी या विवाहितेची सुटका केली. या घटनेने खळबळ माजली आहे.
पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडलेल्या घटनेने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अल्पवयीन विवाहिता अकरा मार्च रोजी आपल्या घरात झोपलेली होती. यावेळी वैभव पटेकर याने तिला उचलून नेले. नदी कडील भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घरातून उचलून घेऊन जात असताना तिने विरोध देखील केला मात्र तिचं तोंड दाबून धरण्यात आल्यामुळे प्रतिकार कमी पडला गेला. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिला गावात आणून चावडीवरील खांबाला बांधून टाकले. ही घटना सकाळी ग्रामस्थांनी पीडीतेला खांबाला बांधल्याचं पाहिल्यानंतर घटना उघडकीस आली. गावचे सरपंच व पिडीतेच्या कुटुंबातील सदस्य चावडीवर आल्यानंतरच तिला सोडवण्यात आले.
दरम्यान या घटनेने विवाहिता प्रचंड घाबरलेली होती, त्यामुळे तिने पोलीसात तक्रार दिली नाही. त्यानंतर, आज कुटुंबीयांना ही घटना संपूर्ण घटना सांगितल्यानंतर पीडित अल्पवयीन विवाहितेने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपीला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसांसह पिंक पथकाकडून तपास केला जातोय. परंतु या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडिता ही अल्पवयीन असल्याने आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

21 वर्षानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मिळणार गती

0

मुंबई — खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत अखेर मोठी हालचाल सुरू झाली आहे. तब्बल २१ वर्षांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली असून त्यासाठी नवीन नियम आणि पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत.’महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०२६’ या नावाने ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमांच्या आधारेच राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

राज्यातील अनेक शाळांमध्ये २००५ नंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. त्यामुळे शाळांमधील प्रशासनिक कामकाज, ग्रंथालय व्यवस्था, प्रयोगशाळेचे व्यवस्थापन आणि इतर दैनंदिन कामांवर मोठा परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर विविध कर्मचारी संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील संघटनांनी सातत्याने शासनाकडे भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत २०१९ मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध जाहीर करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात झाली नव्हती.

आता २०२६ मध्ये शासनाने या विषयावर निर्णायक पाऊल उचलत नवीन नियमावली तयार केली आहे. या नियमांमध्ये शिक्षकेतर पदांसाठी आवश्यक पात्रता, पदांची रचना तसेच नियुक्ती प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या निर्णयामुळे दीर्घकाळापासून भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

नवीन आकृतीबंधानुसार राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे निर्माण होणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लिपिक पदांची संख्या १७ हजार ६९५ इतकी प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ लिपिक पदे ४ हजार ९१२ आणि मुख्य लिपिक पदे ९२३ इतकी असतील. याशिवाय शाळांमधील ग्रंथालय व्यवस्था सक्षम करण्यासाठी २ हजार ११८ ग्रंथपाल पदांची तर प्रयोगशाळेच्या कामकाजासाठी नववी-दहावी स्तरासाठी ४ हजार ६८५ आणि उच्च माध्यमिक स्तरासाठी २ हजार ४० प्रयोगशाळा सहाय्यक पदांची रचना करण्यात आली आहे. या सर्व पदांचा विचार करता राज्यात सुमारे ३० हजार शिक्षकेतर पदांची भरती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या भरती प्रक्रियेसाठी शासनाने विविध पदांसाठी आवश्यक पात्रता निकषही स्पष्ट केले आहेत. कनिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने समतुल्य घोषित केलेली अर्हता आवश्यक आहे. तसेच मराठी टंकलेखनाची गती प्रतिमिनिट किमान ३० शब्द किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती प्रतिमिनिट ४० शब्द असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राप्त असणे बंधनकारक राहील.

वरिष्ठ लिपिक पदासाठी नियमित वेतनश्रेणीवर कार्यरत असलेल्या कनिष्ठ लिपिकांमधून पदोन्नतीद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक असून ज्येष्ठता आणि गुणवत्ता यांचा विचार करून पदोन्नती दिली जाईल. त्याचप्रमाणे मुख्य लिपिक पदासाठी वरिष्ठ लिपिक पदावर किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांमधून पदोन्नती दिली जाणार आहे.

ग्रंथपाल पदासाठी उमेदवाराकडे सांविधिक विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदविका असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणत्याही शाखेतील पदवीही आवश्यक राहील. प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाकडून इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर शिपाई किंवा सेवक पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे ही पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

याशिवाय काही पदांवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्याची तरतूदही या नियमांमध्ये करण्यात आली आहे. शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या धोरणानुसार संबंधित विभागाकडून या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. एकूणच राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत शासनाने घेतलेला हा निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या पदांमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर होण्यास मदत होणार असून शाळांमधील प्रशासनिक आणि शैक्षणिक कामकाज अधिक सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच रोजगाराच्या संधींच्या दृष्टीनेही हा निर्णय राज्यातील हजारो तरुणांसाठी दिलासादायक ठरणार आहे.