Home Blog Page 36

स्व. काकूंच्या विचारांना मुठ माती देणाऱ्या योगेश क्षीरसागरांना बीडच्या जनतेन का स्वीकारायच?

0

बीड — स्व. केशरबाई क्षीरसागर यांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेला डाॅ. योगेश क्षीरसागर यांनी मूठ माती देत भाजपची कास धरली. क्षीरसागर कुटुंबाच्या इतिहासाचा विचार केला तर राजकीय तडजोड म्हणून देखील काकूंच्या विचारांशी फारकत आज पर्यंत कोणीच घेण्याचं धाडस केलं नव्हतं. त्यामुळेच बीड करांनी या घराण्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. पण त्याच विचारांना तिलांजली देणाऱ्या डॉ.योगेश क्षीरसागरांच्या मतलबी राजकारणाला जनता थारा देत नसल्याचं चित्र सध्यातरी न प निवडणुकीत दिसत आहे.
स्व. केशरबाई क्षीरसागर यांनी कधीच जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं नाही. विरोधकांनाही आपलंसं करत बीडच्या विकासाला चालना दिली. अगदी त्याच धर्मनिरपेक्ष जात विरहित राजकारणाचा वसा पुढच्या पिढीने देखील घेतला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत डॉ.भारतभूषण क्षीरसागर असोत की जयदत्त क्षीरसागर असोत. पुढच्या पिढीत संदीप क्षीरसागर असोत यांनी कधीच मतलबी राजकारणासाठी स्व. काकूंच्या विचारधारेशी तडजोड अत्यंत बिकट परिस्थितीत देखील कधीच केली नाही. त्याच विचारधारेवर चालत असताना जयदत्त क्षीरसागर यांनी देखील कधीच विशिष्ट धर्माची विचारधारा बाळगणाऱ्या पक्षाचा हात स्वतःच्या सोयीसाठी धरला नाही. त्यामुळेच जयदत्त क्षीरसागर यांनी जातीयवादी पक्षात प्रवेश करण्याची भूमिका घेतली नाही. त्यामुळेच आजही बीडच्या राजकारणामध्ये त्यांची ताकद पूर्वी इतकीच टिकून आहे.डाॅ. भारतभूषण क्षीरसागर आणि नगरपालिका निवडणूक इतकं समीकरण पक्क होतं की “अध्यक्ष” म्हणून कायम त्यांचा गौरव बीडच्या जनतेने केला. त्यांच्याही विचारधारेपासून योगेश क्षीरसागर दूर गेले.संदीप क्षीरसागर देखील तोच राजकीय वसा घेऊन पुढे चालत आहेत. काकूंच्या विचार धारेवरच चालायचं कुठल्याही परिस्थितीत तडजोड करायची नाही हाच विचार स्वीकारत संदीप क्षीरसागरांनी कुटुंबातील वादाने तोंड काढल्यानंतर देखील मागच्या न‌.प. निवडणुकीत काकू – नाना विकास आघाडी स्थापन करून चांगलं यश मिळवलं. त्याचाच फायदा पुढे त्यांना कायम होत आला. त्यामुळेच प्रत्येक समस्येचे समाधान “बंगला”हेच आहे. असं सांगितलं जायचं. प्रत्येक जाती धर्मातील लोक हक्काने बंगल्यावर जाऊन आपली कैफियत मांडत काम करावंच लागेल म्हणून भांडायला देखील मागेपुढे पाहत नसल्याचं आज पर्यंतच चित्र कायम राहिलं गेलं.

मात्र जनतेत निवडणुकीपुरतचं मिसळायचं काकूंच्या नावावर मत मागायची त्यानंतर जनतेला विसरून जायचं. हा फंडा कायम ठेवत डॉ. योगेश क्षीरसागर यांनी जनतेच्या तोंडाला आजपर्यंत फक्त पानच पुसली. योगेश क्षीरसागर कडून आश्वासनांची खैरातच जनतेच्या वाट्याला आली. आता तर जातीयवादी चेहऱ्याच्या पक्षाशी हात मिळवणी करत बीडच्या जनतेला स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपाच्या दावणीला बांधण्याच काम डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सुरू केलं आहे. त्यांनाही राष्ट्रवादी अजित पवार गटाशी जमेनासं झाल्यानंतर या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांच्यासारखीच आघाडी करता आली असती.जनतेला काकूंच्या विचारधारेवर मत मागता आली असती. त्यात मोठ्या प्रमाणावर देखील यश निश्चित मिळालं असतं. मात्र स्वार्थाची पट्टी डोळ्यावर बांधली की कुटुंबाच्या वारसाने चालत आलेल्या विचारांची राख रांगोळी होते आणि तिथेच अध:पतनाला सुरुवात होते हा आजपर्यंतचा इतिहास आहे. मुस्लिम,दलित, मराठा इतर छोट्या छोट्या जाती धर्माच्या लोकांनी भाजपचा झेंडा हातात घेतलेल्या योगेश क्षीरसागर यांना का साथ द्यावी? जे स्वतःच्या कुटुंबाने जपलेल्या संस्कार, विचारधारेला मूठ माती स्वार्थासाठी देऊ शकतात ते प्रसंगी जनतेला मुठ माती द्यायला का मागे पुढे पाहणार नाहीत? असा प्रश्न बीडच्या जनतेतून विचारला जात आहे. जे काकूंचे ,डाॅ. भारत भूषण क्षीरसागर यांच्या विचारांचे झाले नाहीत ते बीडकरांचे कसे होणार? उद्या योगेश क्षीरसागर ज्या पक्षात गेले आहेत त्या पक्षाच्या विचारधारेनूरुप गरळ ओकणार नाहीत याची शाश्वती काय? असे एक ना अनेक प्रश्न योगेश क्षीरसागरांबाबत बीडच्या जनतेच्या डोक्यात घोंगावत आहेत.बीडकर स्वार्थी राजकारणाला नक्कीच बळी पडणार नाहीत असं सध्याचं तरी चित्र बीड नगरपालिकेत पाहायला मिळत आहे.

6 वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीही अल्पवयीनच

0

शिरूर (का‌)-— आई-वडील शेतामध्ये गेल्याचा फायदा घेत सोळा वर्षीय तरुणाने सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शिरूर कासार तालुक्यातील वारणी या गावांमध्ये शुक्रवार दि.७-नोव्हेंबर रोजी घडली आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी संभाजी ज्ञानेश्वर केदार (१६) याच्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संभाजी केदार याला पोलिसांकडून अटक ही करण्यात आली आहे.

शिरूर कासार तालुक्यातील वारणी या गावातील पीडित मुलीचे आई-वडील घरातील बाजार संपला म्हणून शुक्रवार दि. 7 नोव्हेंबर रोजी बाजाराचे सामान आणण्यासाठी शिरूरमध्ये आले होते. यावेळी त्यांचा सतरा वर्षीय मुलगा सुरज शेतामध्ये कापूस वेचणी करण्यासाठी गेला होता, तर – सहा वर्षाची पहिलीच्या वर्गात शिकत अस-लेली चिमुकली मुलगी शाळेमध्ये सकाळी 10 वाजता गेली होती.

दुपारी 1.30 वाजता शिरूर येथून बाजार करून आलेले आई-वडील पुन्हा शेतामध्ये कापूस वेचणीसाठी गेले होते. पीडित मुलीच्या आजीजवळ आई वडिलांने जेवण डब्बा ठेवून आजी साडेचार वाजता मुलगी घरी येईल तिला जेवण द्या व तिच्याकडे लक्ष द्या असे सांगून आई वडील कामासाठी शेताकडे गेली होती. आई वडील घरी नसल्याचा फायदा घेत आरोपी संभाजी ज्ञानेश्वर केदार वय सोळा वर्षे याने या चिमुरडीला उचलून नेऊन रिकाम्या पाण्याच्या हौदा मध्ये लैगिक अत्याचार करून त्या ठिकाणहून पळ काढला होता.सायंकाळी  वाजता आई-वडील घरी आल्यानंतर त्या चिमुरडीने सर्व हकिगत रडत रडत आपल्या आईला सांगितली. परंतु या घटनेबद्दल तक्रार केली तर अब्रू जाईल आणि आम्हांला मारतील या भीतीपोटी या घटनेची तक्रार केली नव्हती. मात्र पीडित आईच्या तक्रारीवरून गुरुवार दि. 13 नोव्हेंबर रोजी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये पोक्सो कायद्यांतर्गत आरोपी संभाजी ज्ञानेश्वर केदार  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसावर चौघींचा हल्ला; गुन्हा दाखल

0

केज — शेतातील अतिक्रमण हटवून ताबा देण्यासाठी स:शुल्क पोलीस संरक्षण मागितल्याच्या कारणावरून शेतात गेलेल्या महिला पोलिसावर चार महिलांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
या बाबत मिळालेल्या माहिती नुसार केज तालुक्यातील टाकळी रोड लगत असलेल्या सर्व्हे नंबर 371 मधील वसीम साबेर कुरेशी यांच्या मालकी हक्कातील जमीन आहे. या जमिनीत केलेले अतिक्रमण हटवून त्याचा ताबा देण्यासाठी वसीम कुरेशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सशुल्क पोलीस बंदोबस्ताची मागणी केली हहोती.त्या नुसार दि. 21 नोव्हेंबर रोजी सिंधूबाई कदम यांना त्यांनी केलेले अतिक्रमण काढून घेण्या संदर्भात नोटीस बजावली होती. 24 नोव्हेंबर रोजी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, पोलिस हवालदार फुलचंद सानप, महिला पोलिस पूजा माके, महिला पोलीस भाग्यश्री भालेराव यांच्यासह मंडळ अधिकारी दयानंद मस्के, मंडळ अधिकारी नितीन भालेराव यांच्यासह गेले होते.
यावेळी वसीम कुरेशी यांच्या मालकी हक्कातील सर्व्हे नंबर 371 मधील 7 गुंठे मध्ये सिंधू कदम यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यासंदर्भात पथक कारवाई करीत होते. सिंधू कदम यांना अतिक्रमण तुम्ही आतापर्यत का हाटविले नाही? असे विचारले असता सिंधू कदम यांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. त्यांना समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिची मुलगी मिराबाई लक्ष्मण देटे व नातेवाईक भाग्यश्री रामेश्वर गायकवाड, रुक्मीनी गोपाळ फावडे हे आले. त्यांनी आल्या नंतर त्या सर्वानी कर्तव्यावरील महिला पोलीस अंमलदार यांच्या अंगाशी झोंबाझोंबी करण्यास सूरुवात केली. आरडा ओरड करून गोंधळ सुरू केला. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत असतांना सिंधुबाई कदम ही महिला पोलीस अंमलदार यांच्या अंगावर दगड घेऊन धाऊन गेली.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे यांनी 24 नोव्हेंबरला रात्री 10 वाजण्याच्या सुमारे दिलेल्या तक्रारी वरून सिंधुबाई रतन कदम, मिराबाई लक्ष्मण देटे, भाग्यश्री रामेश्वर गायकवाड रा. कदमवाडी ता. केज रुक्मीनी गोपाळ फावडे रा. वैष्णवी देवी मंदीरा समोर बीड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता हणवते या तपास करीत आहेत.

अजित दादा पुण्याच्या वैष्णवीला न्याय देता आला नाही निदान प्रेमलता पारवेंच्या सुनेला तरी द्या!

0

सुनेवर अन्याय करणाऱ्या प्रेमलता पारवे बीड शहराला न्याय काय देणार?

बीड — अजित दादा..! विकासाच्या गप्पा बीडकरांनी भरपूर ऐकल्या तुमच्या पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणेंची सून वैष्णवी हगवणे हिने कौटुंबिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. तशीच घटना बीडमध्ये देखील तुमच्या नगरपालिकेच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांच्या बाबतीतही होत आहे. ज्या स्वतःच्या सुनांना न्याय देऊ शकत नाही त्या बीडच्या जनतेचं भलं काय करणार? त्यांना न्याय काय देणार? असा प्रश्न विचारला जात आहे. तुमच्याच नशिबाला अशी लोक का येतात? असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने यावेळी बीड नगरपालिकेत प्रेमलता पारवे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. प्रचारही जोरात सुरू आहे. पारवेंच्या जीवावर क्षीरसागरांची नगरपालिकेतली मक्तेदारी मोडून काढायची याचा चंग बांधला गेला. त्यासाठी दलित चळवळीत काम करणारे समाजाप्रती निष्ठावान असलेले तरुण पप्पू कागदे यांना सुरुवातीला उमेदवारीची गळ घातली. ऐनवेळी त्यांना धोका देऊन प्रेमलता पारवे यांना उमेदवारी दिली.डाॅ. योगेश क्षीरसागर यांना देखील पक्षातून बाहेर पडावं लागलं. एवढा खेळ खंडोबा करत असताना उमेदवार तितका दर्जाचा आणि तोला मोलाचा असावा याचा विचार मात्र केला गेला नाही. यातूनच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची आठवण ताजी झाली. बीडचे धडाडीचे पत्रकार “संग्राम धन्वे” यांनी “मराठी महाराष्ट्र”च्या ( youtube) माध्यमातून प्रेमलता पारवे यांनी सुनेवर केलेल्या अत्याचाराची घटना  जनतेसमोर आणली. सुनेवर केलेल्या अत्याचाराच प्रकरण समोर आल्यानंतर बीडमध्ये खळबळ माजली. नेमके याचवेळी अजितदादा बीडमध्ये जनतेला प्रेमलता पारवे यांच्या माध्यमातून बीडची बारामती करण्याचे स्वप्न दाखवत भाषण ठोकत आहेत. व्हायरल झालेल्या युट्युब चॅनेल मध्ये सुनेने मांडलेली कैफियत हृदयाला पाझर फोडणारी आहे. प्रेमलता पारवे यांनी आपला मुलगा सत्यजित पारवे यांचा विवाह 2012 मध्ये करून दिला. विवाह झाल्यानंतर घरात आलेल्या नव्या सूनेवर थोडाफार अत्याचार सुरूच होता. मुलगा झाल्यानंतर तरी परिस्थिती सुधारेल त्रासातून सुटका होईल अशी अपेक्षा होती पण ती फोल ठरली. सुनेने आपल्या पतीला ड्रिंक सह बाहेरचे नाद आहेत. यामुळे त्यांना किडनी विकार सुरू झाला. याच्यावर उपचार करण्यासाठी लागणारा खर्च तुझ्या आईकडून घेऊन ये असं सांगून मारहाण करण्यात आली. माझी आई गरीब टेलर काम करुन पोट भरणारी असल्याने पैसा देणं शक्य नव्हतं. एक दिवस मला घरातून बाहेर काढलं. याप्रकरणी न्यायालयात पाच वर्षापासून न्यायासाठी लढा देत आहे. प्रेमलता पारवे न्यायालयाने वॉरंट काढलं असलं तरी एकदाही न्यायालयात फिरकल्या नाहीत. आश्रयासाठी मामाच्या घरी राहात होते. मात्र कोरोना काळात मामांचं निधन झालं. त्यानंतर माझ्यापासून मुलाला मारहाण करून घेऊन गेले. न्यायालयाने मुलाची जबाबदारी माझ्यावर सोपवली असली तरी तो माझ्याकडे सोपवायला प्रेमलता पारवे तयार नाहीत अशी करुण कहानी सांगितली. तुझे तुकडे करून मारून टाकू
अशा धमक्या एका स्थानिक सायं दैनिकाच्या संपादकाच्या जीवावर करत असल्याचा आरोप देखील प्रेमलता पारवेंच्या सुनेने केला आहे.
कोरोना पासून मी माझ्या मुलाला पाहिलं देखील नाही असं म्हणून हृदय पिळवटल जाईल असा आक्रोश देखील या सुनेने केला. एवढेच नाही तर प्रेमलता पारवे यांच्या मोठ्या मुलाचे देखील दोन लग्न झालेली आहेत. या सुनांना देखील असाच त्रास दिला जात असल्याचे देखील तिने सांगितलं.

विशेष म्हणजे प्रकरण एवढं मोठं असून देखील पेठ बीड पोलिसांनी या पिडीत सुनेची तक्रार घेण्याची तसदी वाटली नाही. हे बीडच्या पोलीस दलाचं कार्य कर्तुत्व आहे.

माध्यमांमध्ये हे प्रकरण गाजत असताना अजित पवार मात्र बीडच्या जनतेला विकासाची स्वप्न अशा लोकांच्या जीवावर दाखवत आहेत. अजित दादा…! ज्या प्रेमलता पारवे स्वतःच्या सुनेला छळत असतील त्या बीडच्या जनतेला न्याय वागणूक कशा देतील? विकास स्वतःचा करतील की जनतेचा? राजेंद्र हगवणेच्या सुनेने देखील कौटुंबिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती ते प्रकरण अजूनही जनता विसरलेली नाही तो तुमच्याच पक्षाचा होता. प्रेमलता पारवे देखील तुमच्याच पक्षाच्या उमेदवार आहेत. अशी माणसं निवडून बीडकरांच्या माथी तुम्ही मारणार आहात का? प्रेमलता पारवे निवडून आल्यानंतर माझ जगणं अवघड करतील. जीवे मारण्याच्या धमक्या यापूर्वी देखील त्यांनी दिल्या आहेत. धमक्याप्रमाणेच माझं जगणं देखील अवघड केलं आहे.मग अजित दादा वैष्णवी जिवानिशी गेली. पारवेंची सून जिवंत आहे. दोन्ही प्रकरणामधला फरक एवढाच आहे. मग पारवेंच्या सुनेच्या जीवाचं बरं वाईट होण्यासाठी बीडकरांनी तुमच्या पक्षातील लोकांच्या पापात का सहभागी व्हायचं?
बीडचा गुन्हेगारीचा आलेख आणखी वाढवायचा आहे का? तुमच्या पक्षाला वारंवार बीडच्या जनतेने साथ दिली.ती बीडकारांची चूक आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. दादांच्या आजच्या भाषणातील हवा वाफे सारखी हे प्रकरण पुढे आल्यानंतर विरून गेली आहे.

नात्यातील मुलाने साडेपाच वर्षीय मुलीवर केला अत्याचार; गुन्हा दडपण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न

0

बीड — बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. साडेपाच वर्षाच्या चिमुरडीवर नात्यातीलच एका मुलाने लैंगिक अत्याचार केल्याच उघड झालं असून या घटनेने खळबळ उडाली आहे. त्याहूनही आणखी धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांनी बदनामीच्या भीतीने पीडितेच्या आईवर गुन्हा दडपण्याचा दबाव आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
11 नोव्हेंबर रोजी ही अत्याचाराची घटना घडली. परंतु, घटनेनंतर तब्बल चार दिवस गावातील लोकांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात जाऊ दिले नाही. बदनामी होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी चक्क बैठका घेऊन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत चिमुरडी अतोनात वेदना सहन करत होती. तिच्या नात्यातील काही व्यक्तींना ही गंभीर बाब समजल्यानंतर त्यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शिरूर कासार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.

चार दिवसांच्या विलंबानंतर अखेर मुलीच्या आईने सर्व दबाव झुगारून उपचारासाठी बीड येथील सरकारी रुग्णालयात धाव घेतली. पीडित चिमुरडीवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणातील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे अत्याचार करणारा व्यक्ती हा पीडित मुलीचाच नात्यातील असल्याचे समोर आले. गावकऱ्यांनी बदनामी टाळण्यासाठी पीडित कुटुंबाला धमकावले. ही आपबीती सांगताना मुलीची आई हृदयविदारक अवस्थेत रडू लागली.
बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, पोस्को कायद्यानुसार गुन्हा तात्काळ नोंदवणे अत्यावश्यक आहे. गुन्हा नोंद करण्यात विलंब करणे हीसुद्धा कायदेशीर गुन्हा ठरतो. त्यामुळे शिरूर कासार पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कांबळे यांनी पुढे हेही सांगितले की, नातेवाईक आणि गावकरी दोघांनीही गुन्हा न दाखल करण्यासाठी आईवर प्रचंड दबाव टाकला होता, परंतु आईने हार न मानता तक्रार नोंदवली. त्यांनी एक वास्तवही सांगितले-“अशा 90 टक्के प्रकरणांत दबावामुळे पीडित कुटुंबांना पोलीस स्टेशनपर्यंत येऊ दिले जात नसल्याचही कांबळे यांनी स्पष्ट केलं.

ऊसाला 4 हजार रुपये भाव द्या बीडमध्ये शेतकरी संघटना आक्रमक

0

24 नोव्हेंबर पासून बेमुदत चक्काजाम

बीड — पश्चिम महाराष्ट्रानंतर बीड जिल्ह्यातही ऊस दरवाढ करावी यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून 24 नोव्हेंबर पासून बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 4000 रुपये प्रति टन असा भाव देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
माजलगाव येथील बाजार समितीत जिल्हाभरातील सर्व शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांची व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी आंदोलनातील विविध टप्प्यांचा आढावा घेण्यात आला.याबाबत शेतकरी नेते अजित नवले म्हणाले की, साखर उतारा हाच अंतिम ऊस दराचा निकष न राहाता रेव्हन्यू शेअरिंग फॉर्मुल्यानुसार साखर उताऱ्यासाठी 70:30 व इतर उपपदार्थावर 75:25 हा शेतकरी व कारखानदारांचा वाटा लक्षात घेऊन उसाला किमान चार हजार रुपये अंतिम ऊस दर मिळायलाच हवा. अशी मागणी करण्यात आली आहे. साखर संचालकांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची गंभीर दखल न घेतल्यास 24 नोव्हेंबर पासून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाची व्याप्ती पूर्ण जिल्हाभर करण्यात येणार असून महसूल प्रशासन, साखर कारखानदार, साखर संचालक यांनी सकारात्मक पहावं अन्यथा उग्र आंदोलन करण्यासाठी शेतकरी कारखान्यावर चालून जाणार असल्याचं शेतकरी संघटनांनी सांगितला आहे.या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट, ॲड. अजय बुरांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ॲड. ढगे, युवा शेतकरी संघर्ष समितीचे अजय राऊत, जगदीश फडताळे उतरणार आहेत.

अधिकाऱ्यांना गोठ्यातलं शेण ही पुरेना; हजार रुपयाची लाच घेताना अभियंता पकडला

0

बीड — गाय गोठ्याची फाईल करण्यासाठी गेवराई पंचायत समितीतील अभियंत्याने शेतकऱ्याकडे हजार रुपयाची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या अभियंत्यास जाळ्यात पकडले. विनायक राठोड असं या लाचखोर  अभियंत्याचं नाव आहे.
अधिकाऱ्यांनी किती खालचा दर्जा गाठला आहे याचं उदाहरण पुढे आला आहे.विनायक राठोड या अभियंत्याने बुधवार दि. 19 नोव्हेंबर रोजी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्याच्या बीड शहरातील अंबिका चौकातील एका प्रायव्हेट कार्यालयात केली होती. संबंधीत तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीडच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची खात्री पटल्यानंतर एसीबीने त्याच्याविरोधात सापळा लावला. परंतु राठोडला संशय आल्यानंतर त्यानं तक्रारदाराला टाळायला सुरूवात केली. मात्र लाचेची मागणी केल्यावरून विनायक राठोड यास एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी सोपान चित्तमपल्ले यांनी शनिवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक, पती-पत्नीसह दोन मुली जखमी

0

बीड — उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा परभणीवरून धारूर मार्गे केज कडे जात असताना ताफ्यातील वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये एकाच कुटुंबातील चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना धुनकवड फाट्याजवळ घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उपमुख्यमंत्री अजित पवार धारूरवरून केजकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाडी क्र. MH 02 GH 5732 या गाडीच्या चालकाने धूनकवड फाटा परिसरात निष्काळजी पण एक गाडी चालवत दुचाकी स्वाराला जोराची धडक दिली. ताफा मार्गक्रमण करत असताना दुचाकीला धडक बसल्याने मोटार सायकल स्वारासह त्याची पत्नी व दोन मुली गंभीररित्या जखमी झाल्या.भोगलवाडी येथील विष्णू सुदे यांच्या दुचाकी क्र. MH 44 V 1518 ला ही धडक बसली.अपघात एवढा जबरदस्त होता की दुचाकी चुरुडा झाली आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून सर्व जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.या भीषण अपघातात विष्णू सुदे त्यांची पत्नी कुसुम सुदे त्यांच्या दोन लहान मुली हे गंभीर जखमी झाले मात्र,दोघांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

केज मध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण; कॉफी शॉप मध्ये नेऊन केला अत्याचार

0

केज — केज मध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसून येत आहे. दररोज घडणाऱ्या घटनांनी खळबळ माजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान केज मध्ये तरुणाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला कॉफी शॉप मध्ये घेऊन गेला. या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना केज शहरात घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तरुणाने २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एका चौदा वर्षीय मुलीचे अपहरण केले. यानंतर शहरातील एका कॉफी शॉपमध्ये घेवून जात तिच्यावर अत्याचार केले.
दरम्यान, हा प्रकार कुटूंबीयांना समाजताच त्यांनी तातडीने केज पोलीस ठाण्यात धाव घेवून घडलेला प्रकार सांगितला. केज पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तसेच या प्रकरणाचा आधीक तपास केज पोलीस करत आहे. मात्र या घटनेनंतर पोलिसांनी केज शहरातील कॉफी शॉपवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे.

महावितरण: मद्यधुंद ऑपरेटरचे महिला अभियंत्याशी गैरवर्तन, गुन्हा दाखल

0

केज — महावितरणच्या महिला अभियंत्यासोबत मद्यधुंद ऑपरेटरने हुज्जत घालून गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कानडी माळी येथील उपकेंद्रात घडली. तपासणीसाठी ही महिला अभियंता या ठिकाणी गेली होती.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता सौ. शीतल वाजेद अली सय्यद या 14 नोव्हेंबर रोजी रोजी रात्री 10.45 वा. च्या सुमारास कानडी माळी येथे महावितरण उपकेंद्र तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी तेथे कर्तव्यावर असलेले ऑपरेटर शंकर ठोंबरे वय 46 वर्षे यांनी त्यांच्या अधिकारी तथा कनिष्ठ अभियंता सौ. शितल सय्यद या महिला अधिकाऱ्या सोबत विनाकारण विनाआवश्यक गोष्टींसाठी वाद घालून जोरजोरात ओरडू लागले. ऑपरेटरने दारू पिल्याचा वास येवू लागला. त्यामुळे श्रीमती सय्यद यांनी त्यांना दारू पिले आहात का ? असे विचारले असता ते मला म्हणाले की, मी दारू पिलेलो नाही. त्यांना दारू पिण्याच्या संशया वरून वैद्यकीय तपासणी करून घेण्याबाबत सांगितले असता वैद्यकीय तपासणी करण्यास त्यांनी विरोध केला. ही माहिती कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांनी त्यांचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता यांना दिली.त्या नंतर दि.15 नोव्हेंबर रोजी शंकर ठोंबरे यांना दारु पिल्याच्या संशयावरुन वैद्यकीय तपासणीचे पत्र दिले. त्यांचे उपजिल्हा रुग्णालय केज येथे रक्त नमुने घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणी अहवाल 20 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला. त्या अहवालानुसार ते नशेच्या अमंलाखाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्या नुसार सय्यद यांनी केज पोलिस ठाण्यात शंकर ठोंबरे यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारी नुसार त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाचे कलम 85 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.