Home Blog Page 34

दलित व मुस्लिमाचा द्वेष करणाऱ्या भाजपला पराभूत करा – किशोर कांडेकर

0

विकासाचे टायमिंग साधणाऱ्या घड्याळाला मतदान करा

गेवराई —  गेवराई चे पवार हे दलित व मुस्लिम समाजाचा द्वेष करणारे आहे. मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी समाजला ४ जागा सुटल्या असताना या दलित द्वेषी पवारांनी आंबेडकरी समाजाला प्रतिनिधित्व दिले नव्हते. तसेच आता ही सौ. वैशाली किशोर कांडेकर यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी या पवारांनी पप्पू कागदे यांचे पाय धरले आशा या दलित आणि मुस्लिम यांचा द्वेष करणाऱ्या पंडित-पवार युतीला पराभूत करा व माजी आ. अमरसिंह पंडित व आ. विजायसिंह पंडित यांचे हात बळकट करण्यासाठी विकासाचे टायमिंग साधण्यासाठी घड्याळाला मतदान करा असे आवाहन आरपीआयचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर यांनी केले.

गेवराई नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षा व नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, या पवारांनी नेहमीच दलित व मुस्लिम द्वेषाची भुमिका घेतलेली आहे. याचा प्रत्यय मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आला होता. यांनी ४ जागा दलित समाजाला सुटल्या असताना एका ही जागेवर आंबेडकरी समाजाला प्रतिनिधित्व दिले नव्हते. तसेच नगराध्यक्ष पदावर मुस्लिम उमेदवार निवडून येऊ नये यासाठी ही प्रयत्न केले होते. हेच पवार आता १० वर्ष आमदारकी भोगून स्वतः च्या भावजयीला नगराध्यक्षा करण्यासाठी विकासाचे ढोंग करत आहेत. यांचा विकास म्हणजे नगरपरिषद चा निधी स्वतः च्या शेतात वापरून स्वतः च्या जमीनीचे भाव वाढवणे होय.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गेवराई शहराची निवडून असताना पवार मात्र केलेल्या विकास कामावर व शहराच्या विकासाच्या व्हिजन वर बोलण्या ऐवजी पोथी-पुराण व ग्रामीण भागातील गप्पा मारत भाषण ठोकत आहेत. ही निवडणूक शहरातील मुद्द्यांची असल्याचे भान पवारांनी ठेवले पाहिजे. असे प्रतिपादन त्यांनी केले.

याउलट माजी आमदार अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांनी नेहमीच सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण केलेले आहे. भैय्यासाहेब यांनीच आरक्षित जागेवर बंजारा उमेदवार देऊन निवडून ही आणलेला आहे. मुजीब भाई सारख्या अल्पसंख्याक समाजातील तरुणाना बाजार समितीचे सभापती केले. कुमारराव ढाकणे, जगन पाटील काळे व जगन्नाथराव काळे यांसारख्यांना पदे देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.त्यामुळे या स्वार्थ व ढोंगी पवारांना पराभूत करण्यासाठी व शहराचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी घड्याळाला मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षा व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. असे आवाहन त्यांनी केले.

धनंजय मुंडे समर्थक’ नावाने फेसबुकवर फेक अकाउंट अन् अजितदादांची बदनामी; तक्रार दाखल

0

बीड — नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना “धनंजय मुंडे समर्थक” या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट खोलून  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्याची चर्चा आहे.धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून याबाबत दखल घेण्यात आली आहे. संबंधित फेक अकाउंट विरोधात धनंजय मुंडे यांच्या वतीने अक्षय तिडके यांच्यामार्फत बीड सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

धनंजय मुंडेंचे समर्थक असल्याचे सांगून अजितदादांच्या बदनामीकारक पोस्ट करणे आक्षेपार्ह आहे. यामुळे अनेकदा संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती केली जात आहे. या एकूण तक्रारीची दखल घेत तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशा सूचना सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश केळे यांनी दिल्या. तसेच धनंजय मुंडे यांच्या वतीने कारवाई केली जात असल्याची माहिती समोर आली. तर सदर प्रकरणात तातडीने माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक  निलेश केळे यांनी सांगितले आहे.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांचे 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन व मोर्चा

0

मुंबई — राज्यातील शाळांच्या संच मान्यतेसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयातून राज्यातील बहुसंख्य अनुदानित आणि सरकारी शाळा संकटात सापडल्या आहेत.
त्यात 5 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या संच मान्यतेनंतर शेकडाे शिक्षक अतिरिक्त ठरून राज्यातील कमी पटसंख्येच्या सुमारे 18 हजारांहून अधिक शाळा बंद पडतील. त्यामुळे राज्यातील सरकारी अनुदानित शिक्षण व्यवस्थाच धोक्यात येईल, अशी शिक्षक संघटनांनी भीती व्‍यक्त केली. सरकारच्या या धोरणाविरोधात राज्यातील तब्बल 12 हून अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी 5 डिसेंबरला राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष व शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी राज्यातील शाळा, शिक्षण संस्थाचालक आदींना पत्र लिहून 5 डिसेंबरला सरकारच्या धोरणाविरोधात सर्व शाळांनी बंद करून सरकारपर्यंत आपला निषेध पोहोचवावा, असे आवाहन केले आहे. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयामुळे राज्यातील 5 डिसेंबर 2025 पर्यंत नववी-दहावीच्या वर्गावरील सुमारे 10 हजार शाळांसाठी शिक्षक अथवा शिक्षिका कार्यरत ठेवल्या जातील आणि इतरांना अतिरिक्त ठरविले जाईल.

इयत्ता सहावी ते आठवीच्या कार्यरत शिक्षकांपैकी सुमारे सात ते आठ हजार शाळांमध्ये केवळ एक अथवा दोन शिक्षक शिल्लक राहतील. इतर अर्थात अतिरिक्त होतील. पाचवीचा वर्ग शिक्षकाविना चालविण्याची स्थिती किमान चार ते पाच हजार शाळांमध्ये निर्माण होईल. याशिवाय मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांसह शिक्षकांची 20 ते 25 हजार पदे अतिरिक्त ठरतील. राज्यातील 25 ते 30 रात्रशाळा आणि गावतांड्यावरील 18 हजार शाळा बंद होतील.

अशा तऱ्हेने मराठी माध्यमाच्या आणि हिंदी, उर्दू व इतर मातृ‌भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा दरवर्षी कमी होतील आणि समाजातील कमकुवत घटकांच्या खिशाला न परवडणारे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण त्यांच्या माथी मारले जाईल. यामुळे राज्यातील सरकारी अनुदानित शाळा वाचवण्यासाठी केवळ शाळा, संस्थाचालक, शिक्षक संघटनांनीच नव्हे तर राज्यातील पालक, विद्यार्थी संघटनांनीही यामध्ये सहभाग घ्यावा आणि 5 डिसेंबरला पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहनदेखील शिक्षक आमदार अभ्यंकर यांनी केले आहे.

संचमान्यता आणि त्याचे धोरण हे शाळा बंद करण्याच्या दिशेने नेणारे सूत्र आहे. यामुळेच निवृत्त होण्याच्या मार्गावर आलेल्या शिक्षकांवर टीईटी लादली गेली. अवाजवी अशैक्षणिक कामाच्या ओझ्याबाबत सरकार कोणताही धोरणात्मक बदल करीत नाही. ती कामे कमी करण्याऐवजी वाढवत आहे. यामुळे 5 डिसेंबरला शाळा बंद ठेवल्या जाणार आहेत.

– जालिंदर सरोदे, राज्य कार्याध्यक्ष, शिक्षक सेना

योगेश भैया…! रुग्णांच्या नातेवाईकांना फारसा चांगला अनुभव नसलेल्या डॉक्टर लाॅबीतला उमेदवार का स्वीकारायचा?

0

बीड — नगरपालिका निवडणुकीत कधी नव्हे ती डॉक्टर लॉबी सक्रिय झाली आहे. काही अपवाद वगळता डॉक्टरांचा बीडकरांना चांगला अनुभव नाही.गोरगरीबांना आजारी असताना मदतीचा हात मिळावा यासाठी शासनाने सुरू केलेल्या योजना हडपण्याचा तसेच रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा धंदा नावारूपाला आलेला आहे. मग अशा डॉक्टर लॉबीतील उमेदवाराला जनतेच्या मानगुटीवर बसवण्याचा धंदा योगेश क्षीरसागरांनी केला आहे. जनतेला लुटणाऱ्या डॉक्टरांच्या लॉबीतील उमेदवाराला लोकांनी का स्वीकारायचं असा मोठा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
बीड शहरात बोटावर मोजण्या इतकेच चांगले डॉक्टर आहेत. बाकी रुग्णांना कसं लुटायचं याचे वेगवेगळे हातखंडे अवलंबणाऱ्या डॉक्टरांची संख्या लक्षणीय आहे. वारंवार प्रसारमाध्यम यावर आवाज उठवित आले आहेत. सर्वसामान्य जनता डॉक्टरांच्या लॉबी पुढे हवालदिल झालेली आहे. जनतेच्या जीवाची बीडच्या नागरिकांच्या सुरक्षेची त्यांच्या विकासाची एवढीच काळजी आहे तर आज पर्यंत जनतेसाठी या लॉबी विरोधात योगेश क्षीरसागर यांनी दंड का थोपटले नाहीत. याच डॉक्टर लॉबीच्या सुपिक डोक्यातून नगरपालिकेला उमेदवार देऊन निवडून आणायचा अशी कल्पना आली. ती मूर्त रूपात देखील आणली गेली. डॉ. लॉबीतील उमेदवाराला योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाच्या रणांगणात उतरवण्यात आलं. याच डॉक्टर लॉबीचा बीडच्या जनतेला फारसा चांगला अनुभव नाही. कमी पैशात चांगले उपचार घ्यायचे असतील तर आजही औरंगाबाद पुणे सारख्या ठिकाणी लोकांना जावं लागतं हे दुर्दैव आहे. लॉबीतील उमेदवारच जनतेच्या माथी मारण्यासाठी स्व. काकूंची धर्मनिरपेक्षतेची शाल अक्षरशः पायदळी तुडवली.धर्मांध पक्षाची साथ घेत नगरपालिका आपलीच जहागिरी आहे. कसं ही जनतेला वेड्यात काढलं तरी ती जनता आपल्याच हातात देणार हा आत्मविश्वास असल्याने हे सगळं महाभारत घडलं.
राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने रुग्णांना चांगले उपचार मिळावेत त्यांना अशा संकटाच्या काळात मदतीचा हात मिळावा यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,बांधकाम कामगार आरोग्य योजना यासारख्या अनेक योजना चालू केलेल्या आहेत. या योजना हडप करायचा मोठा धंदा बीडमध्ये चालू आहे. एवढ्यावरच भागत नाही तर लाखो रुपयांची बिल रुग्णांच्या नातेवाईकांच्या माती मारून पैसे उकळण्याचा धंदा देखील राजरोस केला जात आहे. या संदर्भात अनेक तक्रारी सरकार दरबारी पडून आहेत. डॉक्टर लाॅबी विरोधात जनतेची असलेली नाराजी
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात समोर येऊ लागली आहे. योगेश क्षीरसागर यांना जनसेवेचा एवढा पुळका आहे. निवडणूक लढवून जनहिताचा विचार करायचा आहे तर मग या गोरगरिबांची लूट करणाऱ्या लॉबीच्या विरोधात त्यांनी आजपर्यंत आवाज का उठवला नाही. मग नगरपालिकेच्या माध्यमातून जनहित ते काय साध्य करणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
या निवडणुकीत डॉक्टर लॉबीच्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याची संधी या वेळेला हातची जाऊ द्यायची नाही असं बीडची जनता उघड उघड बोलून दाखवू लागली आहे.

शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो;एकवेळ मला संधी द्या — अजितदादा पवार

0

राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बीडच्या बशीरगंजमध्ये विराट जाहिर सभा

बीड — मी तुम्हाला समजून सांगायला आलोय, तुम्हाला ऐकायचे असेल तर एैका, मी बारामतीत करून दाखवले आहे, मी पिंपरी चिंचवडमध्ये करून दाखवले आहे ते मला बीडमध्ये करायचे आहे. तुमची साथ असेल तर मी बीडमध्ये विकास करून दाखवेन, हा अजित पवारचा शब्द आहे आणि मी शब्दाला पक्का आहे, मी करून दाखवतो, मला फक्त संधी द्या. इथल्या सत्ताधाऱ्यांनी 35 वर्षे आपल्या लोकांना वाऱ्यावर सोडून इथले मुलभूत प्रश्न रखडत ठेवले, आत्मपरिक्षण करा, डोळे उघडा, आता चांगली संधी आलेली आहे. माझ्या विचाराच्या माणसाला निवडून द्या, काळजी करू नका स्वतः उभे आहात असे समजून सद्सद्‌‍ विवेक बुध्दीने मतदान करून मला बीडचा चेहरा-मोहरा बदलण्याची संधी मला द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-शिवसंग्राम-सपा व मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी विराट संख्येने उपस्थिती असल्यामुळे राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे.

बीड नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना-शिवसंग्राम-सपा मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह नगरसेवक पदाच्या 52 उमेदवारांच्या प्रचारार्थ ना.अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बशीरगंज चौक येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजीमंत्री नवाब मलिक, आ. विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक संजय दौड, शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती ज्योतीताई मेटे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष बळीराम गवते, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, अल्पसंख्यांक आघाडीचे शेख निजाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर नाईकवाडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत, माजी नगरसेवक फारुक पटेल, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.प्रज्ञाताई खोसरे, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा प्रिया डोईफोडे, रेखा फड, माजी नगराध्यक्ष मोईन मास्टर, दिलीप गोरे, झुंजार धांडे, सुहास पाटील, भागवत तावरे, पांडुरंग आवारे, सुनिल मगरे, गोरक्ष लोखंडे यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. अजितदादा पवार म्हणाले की, बीड शहरात अनेक प्रश्न रखडत पडलेले आहेत. रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब आहेत, मुला-मुलींना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही, उद्यान नाही, आलेला निधी खर्च केलेला नाही, रस्त्याच्या बाजूला झाडे लावलेली नाहीत असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विरोधकांनी 35 वर्षे बीडची अवस्था बकाल करून टाकली, बारामती, पिंपरी चिंचवडचा विकास होवू शकतो मग बीडचा का नाही होवू शकत नाही ? असा प्रश्न उपस्थत करून तिकडे व्हिजन असणारे लोक आहेत आणि इकडे लोकांना वाऱ्यावर सोडून स्वतःचे घर भरणारे लोक असल्यामुळे आपली अवस्था अशी झालेली आहे. या भागातील खासदार झाले, आमदार झाले यांनी आत्तापर्यंत काय केले ? झोपा काढल्या का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ज्ञानराधा, साईराम, माँसाहेब आणि छत्रपती अशा पतसंस्थांच्या कुटे, परभणे, शिंदे आणि भंडारी या लोकांनी सामान्य लोकांचा पैसा लुटला. त्यातल्या तिघांना आम्ही जेलमध्ये पाठवले, एक फरार आहे. चुकीला माफी नाही, काम करत असताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तेंव्हा सुधारणा होतील आणि सुधारणा करण्यासाठी आपल्या विचाराची माणसं नगर परिषदेत पाठवावी लागतील. तुम्ही कचरा निर्माण करणाऱ्या माणसाला निवडून द्याल तर या बीडचा कचरा होईल स्वच्छता करणाऱ्या स्वच्छ विचाराच्या माझ्या माणसांना विजयी करा असे सांगून हावसे-नवसे-गवसे येतील, रात्रीतून गडबड करतील त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, येणाऱ्या 2 तारखेला घडी आणि धनुष्यबाण या चिन्हासमोरचे बटन दाबून मला काम करण्याची संधी द्या असे कळकळीचे आवाहन ना. अजितदादा पवार यांनी केले.
यावेळी बोलताना माजीमंत्री नवाब मलिक म्हणाले की, ही निवडणुक बीडचे भविष्य बदलणारी निवडणुक आहे, मनात किंतु-परंतु न ठेवता, प्रशासकीय अनुभव असणाऱ्या प्रेमलता पारवे यांच्यासह मित्रपक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करा. ना. अजितदादा पवार यांच्यासारखा विकास पुरुष आपल्या पाठिशी आहे, त्यांच्या माध्यमातून बीडची बारामती करा, सर्व धर्म समभाव विचार घेऊन आम्ही, सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करत आहोत, तेंव्हा आपल्या विचाराची माणसं सत्तेत पाठवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना डॉ.ज्यातीताई मेटे म्हणाल्या की, विरोधकाने नगर पालिकेचा वापर स्वार्थी राजकारण करण्यासाठी केला, अटल अमृत योजनेचा निधी कुठे गेला ? याचा जबाब तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. विकासाचा ताळेबंद घेऊन चर्चा करा, बीड नगर परिषदेमध्ये परिवर्तन करण्याची संधी चालून आलेली आहे. त्यासाठी घड्याळ चिन्हासमोरचे बटन दाबून सर्व उमेदवारांना विजय करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी दिलीप गोरे व भागवत तावरे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच सतिष क्षीरसागर, गौतम मोरे, आरेफ खान, फेरोज खान यांनी ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.

अजित पवार यांच्या माजलगाव, धारुर येथील जाहिर सभा झाल्यानंतर त्यांनी बशीरगंज चौकात जाहिर सभेच्या ठिकाणी आगमन होताच लगेच भाषणाला सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी बीडमध्ये काय करायचे आहे याचा विकास आराखडाच मांडला. त्यांच्या या सभेला महिला, पुरुष मतदार व कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सभास्थळी मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद आणि उत्साह राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाच्या सर्व उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे.

पोकरा आणि महाडीबीटी दोन्ही योजनांना आता समान अनुदान

0

मुंबई — राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. पोकरा आणि महाडीबीटी पोर्टलवरील सर्व कृषी योजनांना आता समान 50 टक्के अनुदान मिळणार आहे. यामुळे दोन्ही योजनांतील अनुदानातील फरक संपुष्टात येत असून सर्वच शेतकऱ्यांना समान लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

आतापर्यंत पोकरा योजनेत शेडनेट, पॅक हाऊस, सामूहिक शेततळे, कांदा चाळ, भाजीपाला नर्सरी, ट्रॅक्टर तसेच विविध कृषी उपकरणांवर 75 टक्क्यांहून अधिक अनुदान देण्यात येत होते. त्यामुळे या योजनेकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला होता. परंतु ही योजना फक्त निवडक गावांपुरती मर्यादित असल्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी या फायद्यापासून दूर राहिले. दुसरीकडे, महाडीबीटी पोर्टलवर तेच प्रकल्प घेतल्यास केवळ 50 टक्के अनुदान उपलब्ध होते.

या विसंगतीमुळे दोन योजनांमध्ये मोठा तफावत निर्माण झाला आणि अन्य भागातील शेतकरी असमाधानी होते. विविध शेतकरी संघटनांनी याबाबत शासनाचे लक्ष वेधल्यानंतर, सरकारने पोकरा टप्पा 2 लागू करताना दोन्ही योजनांना समान 50% अनुदान देण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या मते, हा बदल अधिक पारदर्शक, समतोल आणि सर्वसमावेशक लाभ देण्यासाठी अत्यावश्यक होता.

दोन्ही योजनांतील अनुदानातील असमानता संपणार

पोकरा योजनेची निवडक गावांपुरती मर्यादा कमी होणार

अधिकाधिक शेतकऱ्यांना योजनांचा प्रत्यक्ष फायदा मिळणार

प्रकल्प खर्च वाढल्यामुळे अनुदानाची रक्कमही वाढण्याची शक्यता

शेडनेट, पॅक हाऊस, नर्सरी, शेततळे अशा आधुनिक सुविधांचा वेगाने विस्तार

राज्यातील कृषी क्षेत्र अधिक आधुनिक बनवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे या दोन उद्दिष्टांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. समान अनुदानामुळे कृषी उपकरणे, सिंचन साधने, अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पिक प्रक्रिया सुविधा गावागावांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

शासनाने या बदलांची अंमलबजावणी तातडीने सुरू केली असून लवकरच जिल्हा स्तरावर अनुदान मंजुरीची प्रक्रिया गती घेणार आहे. त्यामुळे हजारो शेतकरी आगामी हंगामात नव्या योजनांचा लाभ घेऊन उत्पादन खर्च कमी करू शकतील.

ऊस दर वाढीसाठी शेतकरी आंदोलन पेटले; कारखान्यांचे गाळप ठप्प

0

बीड — ऊसदर वाढवून देण्याच्या मागणीसाठी बीड सह परभणी जिल्ह्यात शेतकरी आंदोलने होत असून, शनिवारी पाथरीमध्ये रास्तारोको तर आंदोलनाला पाठिंबा म्हणून ऊसतोड कामगारांनी कोयता बंद ठेवला असून, वाहनधारकांनी वाहतूक करण्यास नकार दिल्याने हंगामाच्या नमनालाच अनेक साखर कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील असंख्य गावातील शेतकरी यांनी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीला पाठींबा देत शेतकऱ्यांनी आपली ऊस तोड व ऊस वाहतूक थांबवली आहे. यातच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने समितीत सामील होऊल पेक्षा अधिक वाहनाद्वारे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदारांना भेटी देत आपल्या मागण्याचे निवेदन दिले.

ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कारखानदारांनी कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली. ऊस दर बाबत कोणताही निष्कर्ष निघाला नसल्याने ऊस आंदोलन चिघळले आहे. बीड जिल्ह्यात शुक्रवारी शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वाहनांच्या ताफ्याद्वारे जिल्ह्यातील ओंकार शुगर्स पांगरी, अंबा साखर अंबाजोगाई, येडेश्वरी शुगर्स केज, गंगा माऊली शुगर्स केज या ठिकाणी ल शेतकरी समितीने भेटी देऊन सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने ऊसासाठी प्रत्येक टनासाठी ३ हजार ५५५ रुपये दर १०.२५ रिकव्हरीला जाहीर केला आहे. आपणाकडे ११ किंवा त्यापेक्षा जास्त सरासरी रिकव्हरी लागत आहे, असे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अजय बुरांडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च लक्षात घेता प्रती टन ३ हजार रू. पहिली उचल तर ४ हजार रु. अंतिम दर मिळाला पाहीजे ही मागणी निवेदने करून केली. याबाबत जिल्हाधिकारी, बीड व साखर सहसंचालक छ. संभाजीनगर विभाग यांना देखील कळवण्यात आले आहे, असे ॲड. बुरांडे म्हणाले.

ऊस उत्पादक संयुक्त कृती समितीने सुरू केलेल्या या आंदोलनास विविध ऊस तोड कामगार संघटना, विविध गावातील ग्राम पंचायत, सेवा सहकारी सोसायटी यांनी ठराव मंजूर करत पाठिंबा दिला असून ऊस प्रश्नी पेटलेले हे आंदोलनाबाबत साखर कारखानदारांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास हे आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र स्वरूप घेऊन जन आंदोलन होईल असे कृती समितीकडून सांगण्यात येत आहे.

आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होणार !

0

मुंबई — आगामी जिल्हा परिषद निवडणुका २ टप्प्यात होण्याची शक्यता आहे. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या १५ जिल्हा परिषदांमध्ये आधी निवडणुका होतील. तर ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या १७ जिल्हा परिषदांमध्ये दुसऱ्या टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या १७ जिल्हा परिषदांमध्ये नव्यानं सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कोणत्याही प्रकारची स्थगिती नाही. निवडणुका दिलेल्या वेळेत होतील, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. यावेळी मात्र ५० टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडण्याची अट सरन्यायाधीशांनी घातली. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा पार केलेल्या १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचे प्रमाण कमी करूनच निवडणुका घेण्यावर निवडणूक आयोग विचार सध्या करत असल्याची माहिती समोर आली आहे.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ५० टक्के आरक्षणाचा प्रश्न नसलेल्या १५ जिल्हा परिषदांमध्ये आधी निवडणुका घेण्यात येतील. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये नंतर अशा दोन टप्प्यांमध्ये निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भातील सरन्यायाधीश सूर्य कांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने अधिसूचना काढलेल्या २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती न दिल्यामुळे ठरल्याप्रमाणे या निवडणुका होतील.

निवडणुका अडचणीत आलेल्या १७ जिल्हा परिषदांमध्ये नंदूरबार, पालघर, गडचिरोली, धुळे, नाशिक, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अकोला, ठाणे, वाशिम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा आणि बुलडाणा यांचा समावेश आहे. या सर्व जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्पात होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्या व २९ महापालिकांमधील निवडणुकीची अधिसूचना अजून काढलेली नाही. मात्र त्याबाबत निवडणूक आयोगानेच निर्णय घ्यावा, अशी मोकळीक सरन्यायाधीशांनी दिली.

योगेश भैया…!बीडची जनता दुधखुळी ? गृहीतकाच्या “पप्पू” राजकारणाला कशी पडणार बळी ?

0

बीड — मुस्लिम मतांमध्ये फूट, ब्राह्मण मारवाडी दावणीलाच बांधलेला, ओबीसी तर आपलाच, मराठा समाज दोन्ही राष्ट्रवादीत विभक्त होणार गल्ली ते दिल्ली आपलीच सत्ता, बीडची जनता निव्वळ दूधखुळीच, उगाच 35 वर्ष सत्ता आपल्याला दिली नाही. या अशाच गृहीतकाच्या “पप्पू” राजकारणामुळे विधानसभेत जनतेने फटका देऊनही पुन्हा नगरपालिका आपलीच असं म्हणत “राष्ट्रीय पक्षाच धरलं बोट तिथेच दिसली नियतीतली खोट” असं म्हणताना जनतेने देखील योगेश क्षीरसागर कडे पाठ फिरवत आहे.
धर्मनिरपेक्षतेची कौटुंबिक परंपरा चालवणारे योगेश क्षीरसागर अचानक धार्मिक राजकारण करणाऱ्या पक्षात जाऊन भविष्यात पक्ष धोरणानुसार गरळ ओकणार नाहीत याची शाश्वती कोणीच देणार नाही. शेवटी स्वार्थाच राजकारण महत्त्वाचं बीडची जनता दुधखूळीच ती आपल्या मागे येणारच उगाच 35 वर्ष जनतेने नगरपालिकेचे सत्ता दिली नव्हती. ती आताही देणारच याचा ठाम विश्वास बीडकरांचा बळी गेला तर गेला. आपण भले आपलं स्वार्थी राजकारण भले एवढाच फंडा योगेश क्षीरसागरांनी वापरला. स्वार्थासाठी एका क्षणात धर्मांध पक्षाचं बोट धरताना गणित ही विजय मिळणारच अशी मांडली. बीडच्या राजकारणात एमआयएमच्या प्रवेशाने मुस्लिम मतं एम आय एम कडेच जाणार , ब्राह्मण मारवाडी तर भाजपच्या दावणीला बांधलेला आपल्याही तो हक्काचाच! ओबीसी मतं देखील आपलीच मराठा समाजाची मतं दोन्ही राष्ट्रवादीत विभक्त होणार तोडा फोडा राज्य करा या नीतीचा फायदा आपल्याला नक्कीच होणार? बीडच्या जनतेला कळतचं काय? आपण नगरपालिकेचे राजकुमार जनता आपल्यालाच कौल देणार! जनता लोकशाहीत नाही तर आपल्याच राजेशाहीची मांडलिक आहे.असं मांडलेलं गृहीतक बीडच्या जनतेला मात्र रुचलं नाही. ब्राह्मण आपलेच ते कुठेच जाणार नाहीत असं ग्राह्य धरून त्यांना रामराम घालायची देखील गरज नाही. असं म्हणत योगेश क्षीरसागरांची प्रचाराची मोहीम अगदी जोरात सुरू आहे.तीच स्थिती मारवाडी समाजाची देखील आहे. भाजपचा मूळचा कार्यकर्ता तर सतरंज्या उचलायला जन्माला आला आहे. त्यामुळे मिळत असलेली हीन भावना असंतोषाला कारणीभूत ठरत आहे.
मुस्लिम परिसरात सभा घेतली की ते आपोआपच एम आय एम कडे जाणार यासारखी गणित मांडून बुद्धिबळाचा “पप्पू” पट योगेश क्षीरसागरांनी खेळायला सुरुवात केली आहे.
बीडची जनता देखील “वस्ताद” आहे. डोक्यावर घेण्याची जनतेची ताकत आहे तर पायाखाली घेण्याची देखील तयारी ठेवली जाते. हा कौटुंबिक इतिहास गृहीतकाच्या राजकारणात योगेश क्षीरसागर पार विसरले. त्यांचेच काका जयदत्त क्षीरसागर या इतिहासाचे ज्वलंत साक्षीदार आहेत. त्यांना मानणारा वर्ग मोठा असला तरी धर्मांध पक्षाला जयदत्त क्षीरसागर देत असलेली साथ त्यांच्या सहकार्यांना देखील पटलेली नाही. जन्मभर भाजपच्या नावाने खडे फोडले आता कुठल्या तोंडाने भाजपला मत मागायची असा प्रश्न त्यांच्या पुढे पडला आहे. तो सहाजिकच आहे.
जनतेने दिलेल्या फटक्यामुळे राजकारणाचा सूर आजही त्यांना गवसण अवघड चालल आहे. हे मात्र लक्षात घेतलं गेलं नाही. विधानसभेत बीडच्या जनतेने योगेश क्षीरसागर यांना याची चुणूक दाखविली. मात्र नगरपालिका आपली जहागिरी आहे ती आपल्याच ताब्यात जनता देणार हा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरच योगेश क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशानंतर आलेली उत्साहाची लाट ओसरली आहे. जनतेमध्ये नाराजीचा उमटत असलेला सूर बडवायला लावणार आहे उर असं म्हणण्याची वेळ आली आहे.

अजित पवार यांची बीडमध्ये  जाहीर सभा

0

श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ

बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

बीड — राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना-शिवसंग्राम-सपा व मित्रपक्ष आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलताताई पारवे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या जाहिर सभेचे आयोजन बीड येथे करण्यात आले असून यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना-शिवसंग्राम-सपा व मित्रपक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलताताई पारवे यांच्यासह सर्व उमेदवारांनी आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार दुसऱ्यांदा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ना. अजितदादा पवार यांनी आपल्या जाहिर सभेत विकासाचे व्हिजन मांडल्यामुळे बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यासह मतदारांमध्ये उत्साह भरला होता. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ना. अजितदादा पवार यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बीड शहरातील बशीरगंज चौक येथे आज सायं. ५.३० वाजता होणाऱ्या या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून या सभेने राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष पदासह सर्व ५२ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या विजयावर शिक्का मोर्तब होणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असून या जाहिर सभेस बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित, डॉ.ज्योतीताई मेटे, अनिलदादा जगताप, खमरूल इमान यांच्यासह कल्याणराव आखाडे, दिलीप गोरे, शेख मुजीब, अमर नाईकवाडे, फारुक पटेल, बळीराम गवते, अशफाक इनामदार, झुंजार धांडे, शेख निजाम, भिमराव वाघचौरे, विनोद मुळूक, बाळासाहेब गुंजाळ, रामसिंग टाक, विनोद हातागळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-शिवेसना-शिवसंग्राम-सपा आणि मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यानी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.