Home Blog Page 33

मैत्रिणीने ब्लॅकमेल केले अन् डॉक्टरने शेवटचे टोक गाठले; डॉ. दाभाडे आत्महत्येचे गुढ उकलले

0

अंबाजोगाई — येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले डॉ.मंदार उमेश दाभाडे (वय-२९) यांनी अंबाजोगाईतील चनई रोड भागातील संत रोहिदास नगर येथील भाड्याच्या खोलीत ६ एप्रिल रोजी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा नाट्यमय उलगडा झाला आहे. मरण्यापूर्वी मंदार यांनी आपल्या भावाच्या मोबाईलवर पाठवलेल्या एका पासवर्डमुळे या प्रकरणातील धक्कादायक वास्तव उघड झाले असून एका महिला सहकाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मृत डॉक्टरच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा उलगडा अतिशय नाट्यमयरीत्या झाला असून मंदार यांनी आत्महत्येपूर्वी त्यांचे भाऊ लौकिक दाभाडे यांना त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड पाठवला होता.अंत्यविधी आटोपल्यानंतर लौकिक यांनी तो पासवर्ड वापरून मंदार यांचा मोबाईल उघडला असता, त्यामध्ये एक सविस्तर सुसाईड नोट आढळून आली.त्यात मंदार यांनी ‘सॉरी पप्पा व भैया’ असे म्हणत आपल्या वडिलांची आणि भावाची माफी मागितली असून स्वतःवर ओढवलेल्या प्रसंगाचे वर्णन केले आहे. त्यांच्याच एका सहकाऱ्याच्या घटस्फोटित बहिणीसोबत (मूळ रा. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. रोहिदास नगर, चनई रोड, अंबाजोगाई ) डॉ. मंदार यांची ओळख होती. तिने मंदार यांना स्वतःचे अश्लील व्हिडिओ आणि चॅट्स पाठवून शरीरसंबंधांसाठी प्रवृत्त केले होते. त्यानंतर तिने ‘मी गर्भवती असून माझ्याशी लग्न कर,नाहीतर मी विष पिऊन आत्महत्या करेन आणि सुसाईड नोटमध्ये तुझे नाव लिहीन,’ अशी धमकी देत त्याला सातत्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि बदनामीच्या भीतीने डॉक्टर मंदार दाभाडे खचून गेले होते आणि त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
या धक्कादायक खुलास्यानंतर लौकिक दाभाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी १० एप्रिल रोजी रात्री आरोपी महिले विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०८ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ससाणे करत आहेत.

लग्नासाठी दबाव आणला अन् डॉक्टरचा शेवट झाला. 

डॉ.मंदार दाभाडेच्या आत्महत्यानंतर यात पोलीस तपासातून धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.मंदारची मैत्रिण असलेल्या घटस्फोटित महिलेने त्याच्याशी जवळीक साधत प्रेम संबंध निर्माण केले.यातून नंतर आपण गर्भवती असल्याचे सांगत लग्नासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला.मात्र हा सर्व प्रकार मंदारसाठी धक्कादायक असल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलून स्वतःची जीवनयात्रा संपविल्याने खळबळ उडाली आहे

बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला नोटीस; १३ कोटींच्या कामावर प्रश्नचिन्ह, गुन्हा दाखल होणार का?

0

बीड — अवकाळी पावसात गळती लागलेल्या बीड मध्यवर्ती बसस्थानक प्रकरणात अखेर प्रशासन हलले असून संबंधित कंत्राटदार काझी संघाणी ग्रुप यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सुमारे १३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात उद्घाटनापूर्वीच गळती झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रसारमाध्यमांनी यावर सातत्याने आवाज उठवला. त्यानंतरच प्रशासनाने हालचाल करत कंत्राटदारावर प्राथमिक कारवाई सुरू केली.

तक्रारीनंतर प्रशासनाची कारवाई

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार दाखल करून आंदोलनाचा इशारा दिला होता. वाढत्या जनक्षोभामुळे अखेर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला नोटीस बजावली.
नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की,
👉 “बसस्थानकातील गळती ही कंत्राटदाराची चूक असून दंडात्मक कारवाई का करू नये?”
👉 काम तातडीने पूर्ण करून इमारत हस्तांतरित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
⚠️ सुरुवातीला कंत्राटदाराची पाठराखण?
प्रारंभी राज्य परिवहन विभागाने गळतीसाठी छतावरील कचरा आणि पाइप चोकअप कारणीभूत असल्याचा खुलासा केला होता. काम तांत्रिक मानकांनुसार अंतिम टप्प्यात असल्याचेही सांगण्यात आले होते.
मात्र, वाढत्या दबावानंतर भूमिकेत बदल दिसून आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ का?

६४ लाखांच्या हायटेक सिग्नल कोसळण्याच्या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल झाला होता. मात्र,
🕳️ १३ कोटींच्या बसस्थानकातील निकृष्ट कामावर अजूनही गुन्हा नाही
🕳️ राजकीय वरदहस्तामुळे कारवाईला विलंब?
असा थेट सवाल डॉ. ढवळे यांनी उपस्थित केला आहे.

निष्कर्ष

बीड बसस्थानक गळती प्रकरणात नोटीस देऊन कारवाईची सुरुवात झाली असली तरी
🕳️दोषींवर कठोर कारवाई होणार का?
🕳️ गुन्हा नोंद होणार का?
याकडे आता बीडकरांचे लक्ष लागले आहे.

मस्साजोग मध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी; ७-८ ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

0

बीड — केज तालुक्यातील मस्साजोग गावात मध्यरात्री चोरट्यांनी घरफोड्या करत एकाच रात्रीत तब्बल ७ ते ८ ठिकाणी धुडगूस घातला. यामधून संतोष देशमुख यांचे घर देखील सुटले नाही. शेतातील विद्युत मोटार पंपाचे कॉपर केबल देखील चोरी करण्यात आले. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कॉपर केबलसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

गावातील दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या घरातही ही चोरी घडली. विशेष म्हणजे, घरात धनंजय देशमुख, अश्विनी देशमुख आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित असतानाही चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घरात प्रवेश करून चोरी केली. सर्व सदस्य गाढ झोपेत असल्याने कोणालाही या घटनेचा सुगावा लागला नाही.
सकाळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त आढळल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने आरडाओरडा करत पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून बीड स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींना लवकरच अटक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या कॉपर केबलची मोठ्या प्रमाणावर चोरी केली असून सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करावा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

केजमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एक आरोपी ताब्यात, दुसरा फरार; पीडितेची प्रकृती गंभीर

0

केज —  तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून  संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन आरोपींनी मुलीवर बळजबरी करत गंभीर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

या घटनेनंतर मानसिक धक्क्यात गेलेल्या पीडितेने विषारी औषध प्राशन केल्याची माहिती मिळाली असून तिला तातडीने छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने केज ग्रामीण पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला असून त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. विविध ठिकाणी शोध सुरू असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकरणाच्या तपासासाठी बीड येथील विशेष पिंक पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. वैद्यकीय अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपास अधिक गतीने पुढे नेला जात आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. प्रशासनाकडून पीडितेच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून न्यायालयात उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेने राज्यभरात संतापाची भावना निर्माण झाली असून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

पेन्शन थकली, ‘लाडकी बहीण योजना’वर खर्च; न्यायालयाचा सरकारला झटका

0

मुंबई — मुंबई उच्च न्यायालय यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणावर सुनावणीदरम्यान मुंबई महापालिका आणि राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन व अन्य लाभ देण्यासाठी निधी नसल्याचे कारण देणाऱ्या महापालिकेला न्यायालयाने कडक शब्दांत सुनावले.
प्रकरण एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याशी संबंधित आहे. मुंबई महानगरपालिका च्या शिक्षण विभागातील या कर्मचाऱ्याला सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन मिळत नसल्याने त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

⚖️ न्यायालयाने उपस्थित केले प्रश्न

मागील सुनावणीत महापालिकेने सहाव्या वेतन आयोगानुसार लाभ देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र न्यायालयाने सातव्या वेतन आयोगाचा लाभ का दिला जात नाही, याचे स्पष्ट कारण विचारले.
महापालिकेच्या वकिलांनी राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याचे सांगितल्यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला.
“लाडकी बहीण योजनेसाठी ४० हजार कोटी रुपये खर्च होतात, मग शिक्षकांच्या पेन्शनसाठी पैसे कसे नाहीत?” असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

गरज पडल्यास टेबल-खुर्च्या विकून पैसे द्या

न्यायालयाने कठोर निरीक्षण करत म्हटले की
कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यासाठी निधी नसल्यास महापालिकेची मालमत्ता विकावी
टेबल, खुर्च्या, AC आणि गाड्याही विकण्याची वेळ आली तरी चालेल.पण कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे द्यायलाच हवेत तसेच, “गरज पडल्यास ‘लाडकी बहीण’ योजना बंद करा,” असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

 प्रतिज्ञापत्रावर नाराजी

महापालिकेकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावरही न्यायालयाने आक्षेप घेतला. उपशिक्षणाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यास नकार देत न्यायालयाने अतिरिक्त आयुक्तांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

बीडमध्ये मोठी कारवाई! चोरीच्या वीज तारांसह टेम्पो पकडला; 9.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

बीड – वीज वितरण कंपनीच्या चोरीच्या अॅल्युमिनियम तारांची विक्री करण्यासाठी नेण्यात येणारा आयशर टेम्पो पोलिसांनी पकडत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 9 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदुर फाट्याजवळ सापळा रचण्यात आला. बीड-नेकनूर मार्गे केजकडे जाणाऱ्या संशयित टेम्पोची झडती घेतली असता, त्यामध्ये 1500 किलो वजनाचे अॅल्युमिनियम तारचे 12 बंडल आढळून आले.
या प्रकरणात पोलिसांनी टेम्पो चालक सुखदेव सुभाष गायके (वय 31, रा. धारूर) याला ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 4.50 लाखांची अॅल्युमिनियम तार आणि टेम्पो मिळून एकूण 9.50 लाखांचा माल समाविष्ट आहे.
दरम्यान, या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात श्रीराम खटावकर, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, अशफाक सय्यद, मनोज परझणे, सिद्धेश्वर मांजरे आणि विकास राठोड यांचा समावेश होता.

इंटरनेटशिवाय चालणार गूगल चे नवे ॲप! ‘AI Edge Eloquent’ मुळे व्हाईस टायपिंग मध्ये क्रांती

0

नवी दिल्ली — टेक क्षेत्रात मोठी झेप घेत गुगल ने ‘AI Edge Eloquent’ हे नवे डिक्टेशन ॲप सादर केले आहे. विशेष म्हणजे, हे ॲप पूर्णपणे Offline Voice Typing App (इंटरनेट शिवाय )म्हणून काम करत असल्याने याची मोठी चर्चा रंगली आहे.

📌 काय आहे हे ॲप?

AI Edge Eloquent हे एक स्मार्ट व्हॉइस टायपिंग (Voice Typing) टूल आहे, जे तुमचा आवाज थेट अचूक आणि नैसर्गिक मजकुरात रूपांतरित करते. पारंपरिक स्पीच-टू-टेक्स्ट टूल्सपेक्षा हे अधिक प्रगत आहे.

🚀 कसे काम करते?

या ॲपमध्ये Gemma आधारित On-device AI तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे सर्व प्रोसेसिंग मोबाइलवरच होते आणि इंटरनेटची गरज लागत नाही. यामुळे ए आय स्पीच टू टेक्स्ट (AI Speech to Text)अनुभव अधिक वेगवान आणि अचूक होतो.

✨ मुख्य वैशिष्ट्ये

इंटरनेटशिवाय सहज डिक्टेशन
बोलण्यामागचा अर्थ समजून मजकूर तयार
अनावश्यक शब्द (उम, अह) आपोआप हटवते
व्याकरण व वाक्यरचना सुधारते
वैयक्तिक शब्दकोश (Personal Dictionary)
कोणत्याही ॲपमध्ये वापरण्यासाठी फ्लोटिंग बटण

🔒 डेटा सुरक्षिततेला प्राधान्य

AI Edge Eloquent मध्ये यूजर्सचा डेटा क्लाउडवर पाठवला जात नाही. सर्व माहिती डिव्हाइसवरच प्रक्रिया होत असल्याने गोपनीयता सुरक्षित राहते.
⚔️ स्पर्धेत आघाडी
हे ॲप Whisper Flow, Superwhisper आणि Willow यांसारख्या टूल्सना थेट टक्कर देत आहे.
📱 उपलब्धता
हे ॲप सुरुवातीला Apple App Store वर दिसून आले असून, लवकरच Android यूजर्ससाठीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
AI Edge Eloquent हे Offline Voice Typing App आणि AI Speech to Text या क्षेत्रात मोठा बदल घडवू शकणारे तंत्रज्ञान आहे. भविष्यात Edge AI मुळे अशी साधने दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनणार आहेत.

बीड शहर विकासाला गती: आ. विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नातून रस्त्यांसाठी ₹4.12 कोटींचा निधी मंजूर

0

बीड — शहरातील प्रलंबित रस्ते व नाल्यांच्या कामांना अखेर गती मिळणार आहे. आमदार विजयसिंह पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रावहिणी पवार यांनी ₹4 कोटी 12 लाखांचा निधी मंजूर केला आहे.
हा निधी जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत मंजूर करण्यात आला असून, शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकासकामांना यामुळे चालना मिळणार आहे.

यापूर्वीही स्व. अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून बीड शहरासाठी ₹22 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. आता नव्या निधीसह एकूण ₹26.12 कोटींचा विकास निधी बीडसाठी उपलब्ध झाला आहे.

🛣️ कोणत्या कामांसाठी निधी?

🔴.    राजुरीवेस ते कबाड गल्ली रस्ता व नाली – ₹50 लाख
🔴.    सुभाष रोड ते अहिल्यादेवी होळकर पुतळा – ₹1 कोटी
🔴.     प्रभाग 3 मध्ये काँक्रीट नाली – ₹1.19 कोटी
🔴.   रामतिर्थ भागात रस्ता व नाली – ₹80 लाख
🔴.    शिंदे वस्ती (प्रभाग 4) – ₹63 लाख

🏙️ शहर विकासाला नवी दिशा

बीड नगरपालिकेत नवीन नेतृत्व आल्यानंतर शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. गल्लोगल्ली कचरा व्यवस्थापन सुधारले जात असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
विकासकामांमध्ये राजकारण न करता शहराच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात असल्याने नागरिकांचा विश्वास वाढत आहे.

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात मृत्यू

0

केज (बीड) — केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाटाजवळ घडली. या घटनेमुळे महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

🚨 कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार राकेश गिड्डे हे आज सकाळी आपल्या कारने प्रवास करत होते. रेणापूरजवळील पिंपळ फाट्यावर त्यांच्या कारवरचा अचानक ताबा सुटला आणि वाहन पलटी झाले.कारने 2 ते 3 वेळा पलटी मारली. या भीषण अपघातामध्ये
गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला
अपघातावेळी ते कारमध्ये एकटेच होते
अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

🚓 पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
तहसीलदार राकेश गिड्डे हे अभ्यासू, संवेदनशील आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जात होते.सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले
महसूल विभागातील गुंतागुंतीच्या समस्या मार्गी लावल्या अल्पावधीतच लोकांमध्ये लोकप्रिय
त्यांच्या अचानक जाण्याने प्रशासनात हळहळ व्यक्त होत आहे. “प्रशासन चालवणारा एक संवेदनशील माणूस गेला…” अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्रात ACB ची मोठी कारवाई! 6.63 कोटींची मालमत्ता जप्तीची तयारी; 208 भ्रष्ट अधिकारी अजूनही सेवेत”

0

मुंबई — महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरोधात मोठी मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने राज्य सरकारकडे तीन महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये आरोपी लोकसेवकांची तब्बल 6.63 कोटींची मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे.

📍 कोणत्या विभागांवर कारवाई?

या कारवाईत तीन महत्त्वाचे शासकीय विभाग समाविष्ट आहेत:
जलसंपदा विभाग – 2.82 कोटींची मालमत्ता
सार्वजनिक बांधकाम विभाग – 2.48 कोटी
नगर विकास विभाग – 1.32 कोटी
यामध्ये सर्वाधिक मालमत्ता जलसंपदा विभागातील अधिकाऱ्याची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

📊 पुणे आघाडीवर, संभाजीनगरमध्येही प्रकरण
ACB च्या आकडेवारीनुसार:

सर्वाधिक प्रकरणे पुणे येथे (2 प्रकरणे)
एक प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथे
⚠️ 208 अधिकारी अद्याप निलंबित नाहीत!
धक्कादायक बाब म्हणजे:208 अधिकारी भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आरोपी असूनही अद्याप सेवेत हे अधिकारी 20 वेगवेगळ्या विभागांमधील आहेत

अधिकारी वर्गनिहाय आकडे:

🕳️.    वर्ग-1 : 39 अधिकारी
🕳️.      वर्ग-2 : 41 अधिकारी
🕳️.     वर्ग-3 : 117 अधिकारी
🕳️.   वर्ग-4 : 11 अधिकारी

🏙️ कोणत्या जिल्ह्यात जास्त कारवाई होण्याची शक्यता?

ठाणे – 44
मुंबई – 43
छत्रपती संभाजीनगर – 29
नाशिक – 24
पुणे – 23
अमरावती – 17
नागपूर – 17
नांदेड – 17 (टीप: आकडेवारीत सुधारणा शक्य)

🏢 कोणते विभाग आघाडीवर?
भ्रष्टाचार असूनही निलंबन न झालेल्या अधिकाऱ्यांचे विभाग:

शिक्षण/क्रीडा – 49
महानगरपालिका/नगरविकास – 34
महसूल/नोंदणी/भूमी अभिलेख – 26
पोलीस/कारागृह/होमगार्ड – 26
ग्रामविकास – 14
⏳ काही प्रकरणे 2014 पासून प्रलंबित!
काही भ्रष्टाचार प्रकरणे 2014 पासून प्रलंबित असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.