Home Blog Page 129

बीडच्या रेल्वे स्थानकाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव

0
बीड — भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बीड रेल्वे स्थानकाला नाव देण्यात यावे. त्या अनुषंगाने बीड आंबेडकरी समूहाने एकत्रित येवून गुरुवार (दि.26) सप्टेंबर रोजी बीड रेल्वे स्थानकाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे नाव दिले आहे. त्यानंतर आंबेडकरी समूहांने बीड जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन नावाची नोंद घ्यावी असे निवेदन दिले.
आंबेडकरी समूहाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड रेल्वे स्थानकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर अवघा देश चालतो आहे. त्या व्यक्तीच्या नावाला कोणीही विरोध करता कामा नये. तसेच रेल्वे आल्याचे श्रेय लोकप्रतिनिधींनी घेऊ नये कारण प्रत्येक नागरिकाच्या टॅक्समधून बीड रेल्वेचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. परळी तालुक्यापर्यंत रेल्वे होती. मात्र सदरील रेल्वे बीडपर्यंत येण्यास प्रदीर्घकाळ लागला आहे. बीड जिल्ह्याच्या मागासलेपणाला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत.त्यामुळे बीड जिल्ह्याचा विकास म्हणावा तेवढा झालेला नाही.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असंही म्हटलं आहे की,आबेडकरी समूहाचे एक शिष्टमंडळ लवकरच केंद्र सरकारला प्रत्येक्ष भेटणार आहे. या निवेदनावर शेकडो आंबेडकरी जनतेच्या स्वाक्षरी आहेत.
पोलिसांनाही दिलेले निवेदन
बीड रेल्वे स्थानकास आंबेडकरी समूहांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देऊन तसा नाम फलक लावला आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने या नाम फलकाचा अवमान होणार नाही, याची खबरदारी आणि काळजी घ्यावी.त्याकरीता पोलीस संरक्षण द्यावे अशा मागणीचा निवेदन आंबेडकरी समूहाने पोलीस प्रशासनास दिलं आहे.

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार !

0

वडवणी — नवऱ्याने टाकून दिल्यानंतर दोन अपत्यांसह वडवणी मध्ये राहणाऱ्या महिलेवर ओळखीच्या व्यक्तीने अश्लील व्हिडिओ काढून समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडीच्या तक्रारीवरून वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवऱ्याने सोडून दिल्यानंतर आपल्या दोन मुलांसह एक महिला वडवणी मध्ये राहते खाजगी दवाखान्यात काम करून – ती आपला उदरनिर्वाह चालवत आहे..५ फेब्रुवारी २०२४
रोजी सकाळी ही महिला कामावरून घरी जात असताना तिच्या ओळखीचा असणारा व्यक्ती स्कार्पिओ गाडी घेऊन आला व या महिलेला चहा पिऊ या असे म्हणत वडवणी शहरातील एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी घेऊन गेला दोघांनीही चहा घेतल्यानंतर थोड्याच वेळात महिलेला चक्कर येऊ लागली महिलेने घरी जाण्यासाठी विनंती केली.मात्र महिला थोड्यावेळाने बेशुद्ध पडल्याचा फायदा घेत आरोपीने वडवणी बीड रोडवरील असलेल्या एच पी पेट्रोल पंपाजवळच्या शेतात नेले महिला बेशुद्ध असताना आरोपीने त्या महिलेवर बलात्कार केला तसेच तिचे अश्लील फोटो काढले. जेव्हा महिला शुद्धीवर आली असता ती नग्न अवस्थेत होती झालेल्या प्रकार तिने आरोपीला विचारला असता आरोपीने तुझे मोबाईल मध्ये अश्लील फोटो काढले आहेत तू मला वारंवार भेट नाही भेटल्यास हे अश्लील फोटो फेसबुक इंस्टाग्राम वर वायरल करण्याची धमक्या दिल्या भयभीत झालेल्या महिलेने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही या महिलेच्या मोबाईलवर आरोपीच्या मित्राने चार दिवसा पूर्वीच अश्लील भाषेत चॅटिंग केली व यापूर्वी झालेला प्रकार या महिलेला सांगितला तसेच अश्लील फोटो पुन्हा वायरल करण्याच्या धमक्या पुन्हा ब्लॅकमेल करत असल्याने महीलेने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध कलम ३७६ भादवी सह कलम ७५ (२), ३०८ (२) भा. न्या.सं. सह कलम ६७ आयटी अॅक्ट सह कलम ३(१) (ई), ३(१) (डब्ल्यु) (आयआय), ३(२) (व्ही) अ.जा. ज.अ.प्र.अं.गुन्हा नोंद केला आहे.

अब्रुनुकसान प्रकरणी संजय राऊतांची जेलवारी टळली;अटकपूर्व जामीन मंजूर

0

मुंबई — किरीट सोमय्याच्या पत्नी मेधा सोमय्या वरील आरोपानंतर संजय राऊत विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. शिवडी कोर्टाने या प्रकरणी राऊतांना दोषी मानत १५ दिवसांची कैद आणि २५ हजारांचा दंड ठोठावला.यानंतर संजय राऊतांच्या वतीने जामिनासाठी आणि शिक्षेवरील स्थगितीसाठी वरच्या कोर्टात अर्ज करण्यात आला. यात संजय राऊतांना मोठा दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.१५ हजारांच्या जात मुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. ३० दिवसांच्या आत वरच्या कोर्टात अपील करून दाद मागण्याची मुभा कोर्टाकडून देण्यात आली आहे.

देशाच्या सर न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीचे मोदक खाण्यासाठी जातात, मग आमच्यासारखे लोक भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलतात त्यांना न्याय कुठून मिळणार. हे अपेक्षितच आहे असं सांगत संजय राऊतांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आम्ही कोर्टाचा आदर करतो. युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मीरा भाईंदरमध्ये काही काम झाले होते त्यात काही बेकायदेशीर घडले, हे मी बोललो नाही तर मीरा भाईंदरचे विरोधी पक्षनेते प्रविण पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते. त्यावर तिथले आमदार प्रताप सरनाईक यांनीही तपास व्हावा, त्यात भ्रष्टाचार झालाय म्हटलं होते. त्यावर विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर कायदेशीर कारवाई व्हायला हवी यावर विधानसभेत चर्चा होऊन कायदेशीर आदेश पारित केला. हे जर मी बोललो असेल तर माझ्याकडून अब्रुनुकसानी कशी झाली, हे सगळे ऑन रेकॉर्ड आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अस आहे प्रकरण !

मीरा-भाईंदर महापालिकेकडून मीरा-भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यापैकी १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्र सादर करुन मेधा सोमय्या यांनी मीरा-भाईंदर पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना कोर्टात आव्हान दिले होते. या प्रकरणात दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर यात संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या प्रकरणात १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

श्रेयवादासाठी शहरातील अक्षरशः चाळण झालेल्या रस्त्यांना मंजुरी दिली नाही !

0

पालकमंत्री साहेब बीड शहरातील विकास कामात भेदभाव करू नका- खुर्शीद आलम

बीड — बीड शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेंतर्गत जालना रोड ते अमरधाम स्मशानभूमी (बिंदुसरा नदीवरील पूल) पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण व पक्की नालीबांधकाम करण्यास मंजुरी मिळून या कामाला सुरुवात होणार असल्याचे समजते. हे समजल्यानंतर आनंद झाला. मात्र सोबतच दुःख झाले. दुःख याचे कि, केवळ श्रेयवादासाठी म्हणजे जे काही केलं ते आम्हीच केलं असे दिसावे म्हणून बीड शहरातील अक्षरशः चाळण झालेल्या इतर रस्त्यांना मात्र अनेक प्रयत्न केल्यानंतरही मंजुरी मिळाली नाही.
बीड शहरात विविध ठिकाणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तरीय महाअभियान योजनेंतर्गत रस्ता व नालीबांधकाम करण्यासाठी एकूण 17 कामे प्रस्तावित होती. यामधीलच एक प्रस्तावि असलेल्या रस्त्यापैकी जालना रोड ते अमरधाम स्मशानभूमी (बिंदुसरा नदीवरील) पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत मंजुरी मिळून येत्या 8 ते 10 दिवसात मा.पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचे उदघाटन होऊन सुरुवात होणार असल्याचे समजले आहे. परंतु या 17 कामांपैकी बीड शहरात सध्यस्थीतीला अत्यावश्यक असलेल्या गावठाणमधील धोंडीपुरा येथील बलभीम चौक-माळीवेस चौक-राजुरी वेस येथील पोस्ट ऑफिस-कबाड गल्ली वेस-माळीवेस पोलीस चौकी पर्यंतचा रस्ता, तसेच राजुरी वेस येथील बलभीम चौक-माळीवेस चांदणी चौकापर्यंत व अजिजपूर येथील नुरी मस्जिद ते कागदी वेस येथील पोस्ट ऑफिस-कबाडगल्ली वेस-माळीवेस पोलीस चौकीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्स्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. ही बाब लक्षात घेवून आ.संदीप क्षीरसागर दि.12 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेवून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) नगर परिषद अंतर्गत टप्पा क्र.2 मधील बचत खर्चातुन सदरील कामे करण्याचे मागणी केली होती. यावर मा.जिल्हाधिकारी यांनी मा.मुख्याधिकारी यांना रितसर प्रस्ताव दाखल करण्याचे सुचविले होते. यावर मा.मुख्याधिकारी यांनी दि.26.08.2024 रोजी मा.जिल्हा सह आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. परंतु पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना सांगुन सदरील प्रस्ताव प्रलंबित ठेवला व या कामांची मंजुरी अडवली. अशा प्रकारे बीड शहरातील अत्यावश्यक असलेल्या कामांमध्ये खोडा आणला. जालना रोड ते अमरधामपर्यंतच्या रस्त्याला तातडीने मंजुरी मिळाली याचे खरोखरच समाधान आहे. कारण हा रस्ता करणे खुप आवश्यक होते. परंतु या सोबतच आ.संदिप क्षीरसागर यांनी मागणी केलेले रस्तेही आवश्यकच आहेत. मग केवळ श्रेयवादासाठीच लोकांसाठी आवश्यक असलेली कामे अडवुण बीड शहरातील विकास कामामध्ये पालकमंत्र्यांनी अन्यायकारक भेदभाव करू नये असे न.प.चे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष खुर्शिद आलम यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

सावधान!जिल्ह्यात कायद्याचं “अविनाशी”राज्य; हवाला रॅकेटचं कंबरड मोडलं

0

बीड — पोलीस अधीक्षक बारगळ यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यात कायद्याचं “अविनाशी“राज्य असल्याचं दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. आज पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून 26 लाखाची रोकड जप्त करत हवाला रॅकेटचं कंबरड मोडण्यात यश मिळवलं.

बीड शहरात मोठ्या प्रमाणात हवाला व्यवहार चालत असून मोठी आर्थिक उलाढाल या मार्फत होत असते अशी खात्रीशीर माहिती पोलीसांना मिळाली होती. यामुळे अशा व्यवहारांना चाप लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचे आदेशावरून खास पथक तयार करण्यात आले. पथकाने तीन ठिकाणी छापेमारी केली.यामध्ये छापा कबाड गल्लीमध्ये पहिला तर दुसरा छापा सारडा कॅपिटल येथे, तर तिसरा छापा जालना रोड येथील वीर हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या ठिकाणावर मारण्यात आला. तिन्ही ठिकाणाहून एकूण 26 लाख रुपये जप्त केले असून सदर पैसे कुठून आले याची सखोल चौकशी बीड शहर पोलीस करित आहेत.
पैशाची कुठलीही खात्रीशीर सुरक्षितता नसतांना, यामध्ये काही जर गैरव्यवहार झाला किंवा पैशांची चोरी झाली याबद्दल सुरक्षा नसताना अशा प्रकारचे व्यवहार होत आहे आणि यामध्ये शासनाचा महसूल बुडवणे आदी कामामुळे शासनाचे नुकसान होत आहे. यासाठी सदरील छापा हा महत्त्वाचा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी दिली.
सदरील शहरात हवाला व्यवहारावर तीन ठिकाणी छापे टाकून 26 लाखाची रोकड जप्त केली पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक,सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाळराजे दराडे, बाबा राठोड, पोलीस उपनिरीक्षक काकरवाल, कुकलारे, राठोड, शेख, निर्धार म्हेत्रे कांबळे, परजणे, शिरसाठ यांनी केली आहे.

शाळांना नव्या नियमांचे सक्तीने करावे लागणार पालन;अध्यादेश जारी

0

मुंबई — बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे जागे झालेल्या राज्य सरकारने राज्यातील सर्वच शाळांवर नव्या नियमांचा बडगा उगारला आहे. प्रत्येक शाळांना हे नवीन नियम अनिवार्य केले आहेत.

शाळांना राज्याची मान्यता, नवीन वर्गांना मान्यता, अतिरिक्त विभाग, सर्व मंडळांना शाळा सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र, राज्य अनुदानासाठी मान्यता, अध्यापन माध्यमांमध्ये बदल आदीसाठी हे नियम बंधनकारक केले आहेत. राज्य सरकारने २४ सप्टेंबर रोजी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे.

हे आहेत नवीन नियम

सीसीटीव्ही बसवणे, तक्रार पेटी बसवणे, दर आठवड्याला तक्रार पेटी उघडणे, विद्यार्थी दक्षता समिती, प्रत्येक कर्मचाऱ्याचे चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे, शिशुवर्ग, प्राथमिक, माध्यमिक व नववीपर्यंत विद्यार्थिनींच्या प्रसाधनगृहात महिला कर्मचाऱ्यांची मदतनीस म्हणून नियुक्ती, सखी-सावित्री समितीच्या नवीन बैठका, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी बैठका घेतात का?, विद्यार्थ्यांसाठी शाळेची स्वत:ची वाहतूक व्यवस्था,वाहनांना जीपीएस नेटवर्क व पॅनिक बटण आहे का?, खासगी बसमध्ये महिला सहाय्यक शाळेने ठेवल्या का?, शाळेच्या वाहतूक समितीच्या बैठका नियमित होतात का? शाळांकडे आधार कार्डवर आधारित वर्गनिहाय यादी आहे का?, स्कूलबसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी ठेवू नयेत, असे सरकारने शाळांना बजावले आहे. शाळांनी चालक व त्यांच्या सहाय्यकांमध्ये जनजागृती करावी, आदी विविध नियमांची यादीच सरकारने जारी केली आहे.

आ.क्षीरसागरांनी घेतली जलसंधारण, जलसंपदा, जलजीवन व पाटबंधारे विभागाची बैठक

0

प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

बीड — बीड मतदारसंघात जलसंधारण, जलसंपदा, जलजीवन मिशन विभागाशी संबंधित कामांच्या बाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी सदरील विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या. तसेच फुलसांगवी येथील आंदोलनच्या अनुषंगाने जिल्हा जलसंधारण अधिकारी व जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निर्देश दिले.
बीड मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. परंतु ही कामे अनेक ठिकाणी प्रलंबित आहेत. तसेच मतदारसंघात जलसंधारण, जलसंपदा विभाग यांच्याशी संबंधित नागरीकांच्या काही अडचणी आणि मागण्या होत्या याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.२४) रोजी बीडमध्ये शासकीय विश्रामगृह येथे जलसंधारण, जलसंपदा, पाटबंधारे विभाग, जलजीवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी नागरिकांच्या समोरच अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यासोबतच बीड मतदारसंघ क्षेत्रात शिरूर-कासार तालुक्यातील फुलसांगवी व इतर गावातील ग्रामस्थांचे काही दिवसांपूर्वी जलसंधारण विभागाशी संबंधित कामांच्या अनुषंगाने आंदोलन सुरू होते. या आंदोलनातील मागण्या मार्गी लावण्यासाठी आ.क्षीरसागर यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी‌ व जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प कार्यकारी अभियंता तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना सूचना दिल्या. या बैठकीसाठी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित नागरिक, शेतकरी बांधव उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण नवव्या दिवशी स्थगित !

0

अंतरवली सराटी — आरक्षणाची मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून उपोषणाला सुरूवात केलं होतं. मात्र, नवव्या दिवशी कोर्टानं उपचार घेण्याचे आदेश दिल्यामुळे जरांगेंनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली.

गावातील महिला आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत जरांगे यांनी पाणी पित उपोषण सोडलं. ‘त्यांच्या हाताने त्यांनी सरकार पाडून घेऊ नये, मी त्यांना जाहीरपणे सांगतो’ असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला. जर आरक्षण दिलं नाही, सगळ्या मागण्या मंजूर नाही केल्या तर माझ्या नावाने बोंबलत बसायचं नाही आणि मला विचारायचं नाही की 2024 ला पाडापाडी कशामुळे ही झाली हे मला विचारायचं नाही. आता सत्तेत बसून आरक्षण घेणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान; राजाभाऊ फड करणार शरद पवार गटात प्रवेश

0

बीड – लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार दणका दिला. त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सिद्ध झाले आहेत.

महायुतीत परळी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अजित पवार यांचे अतिशय जवळचे आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार याची कित्येक दिवसांपासून उत्सूकता आहे.

अजित पवार गटाकडून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे परळीत मोठे आव्हान शरद पवार गटासमोर असणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यामुळे शरद पवार गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र धनंजय मुंडेंना टक्कर देणारा उमेदवार मैदानात उतरवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

बीड मधील परळीच्या जागेसाठी अनेक जण इच्छूक आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. राजाभाऊ फड उद्या (बुधवार) मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. राजाभाऊ हे परळीचे आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. परळी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ते इच्छूक आहेत. शरद पवारांनी पाठीवर हात ठेवण्याची फक्त ते वाट पाहात असल्याचे सांगितले जाते. राजाभाऊ फड यांचा परळी विधानसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. रासपच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची फळीही त्यांची तयार आहे.

लोकसभा निवडणूक निकालाने महाविकास आघाडीमध्ये इच्छूकांची भाऊगर्दी आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, बबन गित्ते, सुदामती गुट्टे यांची देखील निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यामुळे उद्या प्रवेश होणारे राजाभाऊ फड हे उमेदवार असणार की, महाविकास आघाडीतील जुण्या नेत्यांना संधी मिळणार,यासंबंधी शरद पवार काय उलटफेर करतात ते पाहावे लागेल.

मल्टीस्टेट घोटाळ्याचा आरोपी बबन शिंदे ची मथुरा पाण्यात; वृंदावन मध्ये पकडला

0

बीड — जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेटच्या घोटाळ्याचा प्रमुख आरोपी असलेला बबन शिंदे यास बीड पोलिसांना पकडण्यात यश आले आहे.उत्तर प्रदेशमधील मथुरा वृंदावन परिसरातून बबन शिंदेला अटक करण्यात आली आहे. जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून बबन शिंदे पोलिसांना चकमा देत फरार होता.

बीडमध्ये जिजाऊ मॉ साहेब मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी बीड जिल्ह्यात 3 तर धाराशिव जिल्ह्यात 2 गुन्हे बबन शिंदे याच्या विरोधात दाखल आहेत. मुख्य आरोपी असलेला बबन शिंदे गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून फरार झाला होता. गुन्हे दाखल असल्यापासून पोलीस त्याचा ठिकठिकाणी शोध घेत होते. सिम कार्ड बदलत राहण्याची ठिकाणे देखील बदलल्याने पोलिसांना त्याला पकडण्यात अपयश येत होते.मात्र पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावरून पडताळणी केल्यानंतर बबन शिंदे हा मथुरा वृंदावन भागामध्ये वेश बदलून राहत असल्याचे दिसून आले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफिने शिंदे ला पकडले.