Home Blog Page 128

 रस्ते आणि विकास कामासंदर्भातील आ.क्षीरसागरांच्या मागण्यांना अजितदादांची (Ajit Pawar) सकारात्मकता

0

महामार्गासाठी (highway)भूसंपादन (Land acquisition) झालेल्या शेतकऱ्यांना मावेजा देण्याचीही केली मागणी

बीड — बीड (Beed)विधानसभा (Assembly) मतदारसंघातील रस्ते आणि इतर विकास कामांच्या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी अजित दादा पवार (Ajit Pawar)यांच्याकडे मागणी केली असता, ना.अजितदादांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना समोरासमोरच सूचना देऊन बीड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठीची सकारात्मकता स्पष्ट केली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार २ दिवस बीडमध्ये आलेले‌ आहेत. या दोन दिवसांत अजितदादांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक प्रश्न आणि बाबींकडे बैठकांच्या माध्यमातून नियोजन सुरू केले आहे. या अनुषंगाने गुरूवारी (दि.७) रोजी झालेल्या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील विकासाचे(development) विविध प्रश्न आणि प्रस्ताव बैठकीत ना.अजितदादांसमोर मांडले असता, ना.अजितदादांनी जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावांच्या संदर्भात सकारात्मक सूचना दिल्या.

ना.अजितदादांनी पुढील कामांबाबत दर्शवली सकारात्मकता

• राष्ट्रीय महामार्ग(National Highway) 211 (नवीन क्र.52) महालक्ष्मी चौक ते जालना रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता या दोन्ही साईडने सहा (6) लाईन रोडसाठी व दोन्ही साईडने ड्रेनेजसाठी मा.अजित दादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला PWD सूचना दिल्या.

• शिवशारदा ते अमरधाम स्मशानभुमी पर्यंत भुयारी गटारसाठी मा.दादांनी तत्त्वत: सूचना दिल्या.

• ग्रामीण भागातील मुख्य रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रे  (Primary Health Center) , उपकेंद्रे, शाळा खोली, अंगणवाडी बांधकाम, पाणी पुरवठा(water supply) व्यवस्था, जनसुविधे अंतर्गत स्मशानभुमी बांधकाम, पशु वैद्यकीय दवाखाने (Veterinary clinics) , वन विभागाचा विकास, कोल्हापुरी पद्धतीने बंधरे, सिमेंट नाला बंधारे या व इतर आवश्यक असलेले विकास कामे होणे बाबत आ.क्षीरसागरांनी निवेदनासह मागणी केली असता ना.अजितदादांनी सकारात्मकता दर्शविली.

बीड शहरातील जिव्हाळ्याचा असलेला रस्त्यांचा प्रश्नही मार्गी लावण्याची केली मागणी

बीड( Beed)शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहरातील रहदारीसाठी रस्त्यांच्या अवस्थेमुळे मोठी अडचण होत आहे‌. बीड शहरातील रस्त्यांचा प्रश्न हा नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा झाला आहे. त्यामुळे ना.अजितदादांकडे शहरातील रस्त्यांचा विकासासंदर्भात प्रस्ताव देऊन आ.क्षीरसागर यांनी बीड शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
आ.क्षीरसागर यांनी पालवण चौक ते नगर रोड (धानोरा रोड), मदर टेरेसा चौक ते कालिका नगर कमान (अंकुशनगर मुख्य रस्ता), बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र. 7 मध्ये बलभीम चौक ते धोंडीपुरा मार्गे माळीवेस सिमेंट रस्ता करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.8 छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजुरी वेस पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.08 मध्ये कारंजा टावर ते पिंगळे गल्ली ते बुंदेलपुरा मस्जिद रोड पर्यंत सी.सी. रस्ता व नाली बांधकाम करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.08 मध्ये राजुरी वेस ते बलभीम चौक व राजुरी वेस बुंदेलपुरा मार्ग कबाड गल्ली पर्यंत सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.8 मध्ये राजुरीवेस-बुंदेलपुरा-कबाडगल्ली मार्गे माळीवेस सिमेंट रस्ता करणे. या कामांना मंजुरी देण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग(National Highway) ३६१ एफ खरवंडी ते राजूरी (न.) रस्त्याच्या भूसंपादनचाही मांडला प्रश्न

बीड मतदारसंघातून राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ गेला आहे. या महामार्गासाठी खरवंडी ते राजूरी नवगण पर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. परंतु संपादनाचा शेतकऱ्यांना मावेजा मिळालेला नाही. विकास कामांसाठी शासनाला जमीन संपादित करूनही मावेजावाचून शेतकरी बांधवांचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने ना.अजितदादांनी हा प्रश्न मार्गी लावून जमीन संपादित झालेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याची मागणीही आ.संदीप क्षीरसागर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

हरवलेल्या विवेकाच हरित बीड (Beed)अभियान (Campaign)म्हणजे रातभर पाखडलं, काही नाही सापडलं;फसव्या षडयंत्रात दादाचं गाड अडलं

0

बीड — जिल्हा सध्या इव्हेंट(event) आणि स्टंटबाजीच्या विळख्यात सापडला आहे. हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत (Green Maharashtra Campaign )हरित बीडचा इव्हेंट साजरा केला जाणार आहे. एकाच दिवसात तीस लाख वृक्ष लागवड करून देश पातळीवर नवा विक्रम करण्याची विवेकी संकल्पना (Concept) मांडली गेली. उपक्रम (Activities)चांगला आहे प्रत्येक नागरिकाची वृक्ष लागवड ही जबाबदारी आहे. मात्र तुती(Mulberry tree) सारख्या झुडपाला वृक्षाचा दर्जा देऊन स्टंटबाजी केली जात असेल तर बेसरमालाही वृक्षाचा दर्जा दिला असता तर “दिसला खड्डा खव काटूक “मोहीम राबवता आली असती. यातून रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांना ही सहभागी होता आलं असतं. खड्डे खणण्याचा खर्चही वाचला असता. तीस लाखच काय तीस कोटी वृक्ष लागवड होऊन जिल्हा ॲमेझॉन (Amazon)जंगलासारखा झाला असता. तूतीला वृक्षाचा दर्जा देऊन केलेला हा इव्हेंट म्हणजे रातभर पाखडलं, काही नाही सापडलं आशाचं इव्हेंट च्या जाळ्यात अजित दादांचं गाड अडल असं म्हणण्याची वेळ आली आहे.जिल्ह्याच्या बदनामीचं हे नव षडयंत्र असल्याचं जनतेत बोललं जाऊ लागला आहे.


जिल्हाधिकारी (collector) विवेक जॉन्सन (Vivek Johnson) जिल्ह्यात आल्यानंतर ते तरुण असल्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेत (Administrative system) बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र इव्हेंट ची जॉन्सन मलमपट्टी करून रडतीचे डोळे पुसण्याचा प्रकार केला जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. प्रामाणिकपणाने वृक्ष संवर्धनाचाच काम करायचा आहे तर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध आरा गिरण्यांकडे (Illegal sawmills)त्यांनी दुर्लक्ष का केले आहे. वन विभागाला आतापर्यंत किती कारवाया केल्या अवैध वृक्षतोडीवर (Illegal logging) का आळा घातला नाही म्हणून धारेवर का धरले नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शेकडो वर्ष जगणारी वृक्षतोड करायला कायदे, चौकशी आदेशाचे लखोटे गुंडाळून बासनात बांधायचे अन दुसरीकडे स्टंटबाजी साठी तूतीला ही वृक्षाचा दर्जा देऊन इव्हेंट साजरा करायचा तोही अजित पवार सारख्या सुजाण नेत्यासमोर हे बीडच्या जनतेला मात्र पचणार नाही. अजित दादा या प्रकारावर जिल्हाधिकाऱ्यांना कानपीचक्या देतीलच अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात आजपर्यंतचा विकासाच्या नावाखाली होत असलेली वृक्षतोड आणि रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांचा विचार केला तर सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा या खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाड लावली. त्यातूनच अधिकाऱ्यांच्या कर्तबगारीने बोडखा झालेला जिल्हा हरित करण्यासाठी जॉन्सनची मलमपट्टी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी तुतीला जसा वृक्षाचा दर्जा दिला तसा बेसरमालाही दिला असता तर वेगळे खड्डे खांदून सरकारी तिजोरी रिकामी करायची वेळ आली नसती. आयत्या रस्त्यावरच्या खड्ड्यावरच बेशरमाचं काटुक खवून विक्रमाचा इव्हेंट साजरा करता आला असता. तीस लाख काय तीस कोटी वृक्ष लागवड देखील एकाच दिवसात पार पडली असती. महिना दीड महिन्यात ॲमेझॉन (Amazon)जंगलात स्वरूप जिल्ह्याला प्राप्त झालं असतं. हा एक नवा जागतिक विक्रम (world record)जिल्ह्याच्या नावावर नोंदला गेला असता. तीन वर्षानंतर तुतीची झाडं शेतकऱ्यांनी तोडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या विवेकी जॉन्सन मलमपट्टीने जिल्हा पुन्हा बोडखा होणार नाही काय? विक्रमासाठी तुतीची झाड, कापसाची झाड वृक्ष म्हणून गणतीत धरायची काय? जर ती धरायची तर बेसरमाच्या झाडांनीच काय घोडं मारलं? कमीत कमी अजितदादा (Ajit Pawar) आपल्यासारख्या जमिनीवर पाय असणाऱ्या नेत्यांनी तरी आशा इव्हेंटला बळी पडायला नको एवढीच जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अजित दादा..! महावितरणचे (mahavitran)कॉन्ट्रॅक्टर (contractor) जळूसारखं शोषण करू लागले; हक्काचा पगार मागताच कवठेकर सारखे कर्मचाऱ्यांना धमकावू लागले

0

बीड — जिल्ह्यातील महावितरण(mahavitran) ला कॉन्ट्रॅक्टर(contractor) चे जळू(leech) असे चिकटले आहेत की, सामान्य जनतेसह महावितरणचे शोषण ( Exploitation) करू लागले आहेत. याला महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसह अधिकारीही पांघरून घालत आहेत. यामध्ये मात्र जीवावर उदार होऊन काम करणारे बाह्य स्त्रोत कंत्राटी कर्मचारी चांगलेच भरडले जात आहेत. त्यांच्या मासिक वेतनावर कॉन्ट्रॅक्टर दरोडे तर घालत आहेतच शिवाय अन्यायाला वाचा फोडण्याच काम केलं तर कवठेकर सारखी मस्तवाल माणसं कंत्राटी कर्मचाऱ्यांना धमकावण्याचं काम करत गुन्हेगारी मनोवृत्तीचा प्रकाश पाडत आहेत.याची ऑडिओ क्लिप(audio clip) सध्या समाज माध्यमावर(social media) व्हायरल होत आहे ‌ आशा राजकीय अभय मिळालेल्या मस्तवाल गुत्तेदारांना अजित पवारांनी आळा घालावा अशी मागणी होऊ लागली आहे.
महावितरण ची ग्राहकापर्यंत वीज पुरवणारी यंत्रणा बाह्य स्त्रोत कंत्राटी कामगारां मार्फत राबवली जात आहे. कंत्राटी कामगार असले जीविताची व पोटाच्या भविष्याची काळजी न करता प्रामाणिकपणाने सेवा देण्याचं काम कंत्राटी कामगार करत आहेत. बऱ्यापैकी महावितरण (mahavitran)या कर्मचाऱ्यांना वेतनही देत. तुटपुंज्या रकमेत जगणं अवघड असलं तरी कमी मोबदल्याचा परिणाम कर्तव्यावर कधीच होऊ दिला नाही. मात्र जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच आर्थिक मानसिक शोषण कॉन्ट्रॅक्टर करू लागले आहेत. जळू नावाच्या किड्याचा तरी आयुर्वेदामध्ये (ayurved)फायदा होतो रक्त शोषण करणे या जळूचं (leech) काम असतं. पण महावितरण ला चिटकलेले जळू (leech)महावितरण (mahavitran)सहित सर्वसामान्य जनतेचे कर्मचाऱ्यांचं शोषण( Exploitation) करू लागले आहेत. बीड मधील तेजस इलेक्ट्रिकल सप्लायर्स(Tejas electrical suppliers)या कंपनीला मे महिन्यापासून बाह्य स्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच टेंडर(tender) देण्यात आला आहे. मे महिन्यामध्ये महावितरणच्या संपर्क पोर्टलनुसार 19 हजार 46 रुपये वेतन देण्यात आल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तेजस इलेक्ट्रिकल्स सप्लायर्सने कर्मचाऱ्यांना 16 हजार 995 इतकीच रक्कम कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवून दिली. प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मागे 2051 रुपयाचा दरोडा तेजस सप्लायर्स ने टाकला‌. मे, जून, जुलै असा तीन महिन्याचं वेतन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अजूनही थकीत आहे. तीन-तीन महिने उपाशीपोटी काम करायचं, संसारीक अडचणी सोडवायच्या कशा म्हणून हातबल झालेल्या कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. ही बाब कॉन्ट्रॅक्टर प्रकाश कवठेकर याला कळताच कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकावण्याचे काम त्याने केलं. याची ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. प्रकाश कवठेकर हा कॉन्ट्रॅक्टर सध्या गोरगरिबांचा अन्याय अत्याचार पीडितांचे कैवारी म्हणून राज्यभर आवाज उठवणाऱ्या आष्टीच्या (asthi)आमदाराच्या छत्रछायेखाली अशी काम करत आहे. आशा मस्तवाल गुत्तेदारांना पाठीशी घालण्याचे काम महावितरणचे वरिष्ठ अधिकारीही तितक्याच प्रामाणिकपणाने करत आहेत. अजित दादा जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात बाह्य स्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ( External source contract staff) हाकेला ओ देऊन त्यांच्या वेदना समजून घेत त्यांना न्याय द्यावा मुजोर कॉन्ट्रॅक्टर सह महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.

डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केलं अन् अंत्यसंस्कारा वेळी ते रडू लागल

0

अंबाजोगाई — जन्म घेताच नवजात बालकाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं दुःखी कुटुंब बाळाला घेऊन गावाकडे गेले अंत्यसंस्काराची तयारी केली. त्याचवेळी बाळाने अचानक टाहो फोडला. उपस्थितां मध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालं. ही घटना अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आली ‌पण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

केज तालुक्यातील होळ येथील रहिवासी घुगे कुटुंबाच्या नवजात बाळाला मृत घोषित केल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच बाळ अचानक रडू लागल्याने नातेवाईकही थरथर कापले.
मिळालेल्या माहितीनुसार,केज तालुक्यातील होळ येथील रहिवासी घुगे कुटुंबातील
महिलेला प्रसुतीसाठी अंबाजोगाई च्या स्वामी रामानंद वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रसुतीनंतर डॉक्टरांनी बाळ मरण पावल्याचं सांगितलं. कुटुंबीय बाळाला आपल्या गावी घेऊन गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.मात्र या तयारी दरम्यान बाळाने अचानक रडायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून नातेवाईक आश्चर्यचकित झाले. त्यांनी तत्काळ परत अंबाजोगाई येथील रुग्णालय गाठलं आणि बाळाला तातडीने अति दक्षता कक्षात दाखल केलं. ही घटना घडल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं बाळ जिवंत निघणं, ही बाब केवळ धक्कादायक नसून संतापजनकही आहे. हा अक्षम्य दुर्लक्षाचा प्रकार आहे की उपचार प्रक्रियेत काही चूक झाली होती, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. विशेष म्हणजे, बाळाच्या कुटुंबीयांनी अद्याप रुग्णालय प्रशासनाकडे कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही. या घटनेनंतर रुग्णालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नवजात बाळांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शिक्षण विभागातील अनेक गंभीर घोटाळे बाहेर काढल्यामुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला : इंजि. सादिक इनामदार

0

“प्रामाणिक समाजसेवकांवर खोटे गुन्हे ही लोकशाहीची शोकांतिका इंजि. सादेक इनामदार यांची पत्रकार परिषदेत भावनात्मक प्रतिक्रिया

बीड — भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि निस्वार्थ समाजसेवेसाठी ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर सादिक इनामदार यांच्यावर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा खोटा असून तो सूडबुद्धीने दाखल करण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

बीड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत इनामदार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मी आजवर अनेक भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी व उकल केली आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षक भरतीतील कथित गैरप्रकार उघडकीस आणल्यामुळेच माझ्यावर दबाव आणण्यासाठी व बदनाम करण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती प्रियाराणी पाटील यांच्या द्वारे खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. ते पुढे म्हणाले की, गुन्हा दाखल झाला तेव्हा मी धारूर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होतो, त्याचबरोबर, वैध शस्त्र परवाना असूनही कोणताही गैरवापर न करतानाही माझा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला, हे माझ्या सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर आहे.

माझ्या जीवाला काही धोका झाला, तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जबाबदार असतील,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेद्वारे इंजिनीयर सादिक इनामदार यांनी खालील मागण्या केल्या दाखल खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा. शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे.माझ्या जीवितास धोका असून मला तात्काळ शस्त्र परवाना परत बहाल करण्यात यावा जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही इनामदार यांनी दिला.

विनाअनुदानित शिक्षकांना दिलासा; सरकारने केल्या मागण्या मान्य

0

मुंबई — गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु आहे.
तर आता या आंदोलनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. विनाअनुदनित शिक्षकांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असल्याची घोषणा राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी केली आहे. यामुळे विनाअनुदानित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्री गिरीष महाजन यांनी आंदोलनस्थळाला भेट देत ही मोठी घोषणा केली आहे.
यावेळी मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, आमची जी भूमिका आहे ती सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि सरकारला तुमची काळजी आहे. आम्हाला माहिती आहे की, आपण सामन्य कुटुंबातील आहात. तुमची रोजीरोटी ही आहे. त्यामुळे धाडसी निर्णय फडणवीसांनी घेतला आहे. त्यानुसार 20 टक्के, 40 टक्के त्यानंतर 60 टक्के पगार खात्यात जमा केला जाणार आहे. सरकारी तिजोरीवरील आर्थिक संकटामुळे आमच्याकडून पुढचे टप्पे देण्यास उशीर झालेला आहे. मात्र आता तुमचा प्रश्न मार्गी लागला आहे. तुमच्या शिक्षकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे ठरलं की, आम्हाला तुमच्या खात्यात पगार टाकायचाच आहे. पण या दोन-तीन दिवसात सर्व तांत्रिक बाजू समाजावून घेऊन 18 जुलैला अधिवेशन संपेल तेव्हा तुमच्या खात्यात पैसे पडलेले असतील आणि यात कोणताही बदल होणार नाही. असं मंत्री गिरिष महाजन म्हणाले.तर दुसरीकडे विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी देखील शिक्षकांची भेट घेत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

ड्रीम 11, रमी ॲपमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी सहायक फौजदार बनला चोर

0

बीड –ड्रीम एलेव्हन व रमी ॲपमध्ये पैसे बुडाले. लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलिसच चोर बनल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्यासोबत आणखी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने उशिरा केली.पोलिस अधीक्षक कार्यालयातून 12 व्होल्टच्या 58 बॅटऱ्या चोरल्या. त्यात जामीन होताच पुन्हा सात दुचाकी या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने चाेरल्या.
अमित मधुकर सुतार वय 35 वर्ष, रा. खोकरमोहा, ता. शिरूर कासार अस सहाय्यक फौजदाराचं नाव आहे. ऑनलाइन जुगारात पैसे हरल्याने कर्ज फेडीसाठी त्याने हे कृत्य केल्याचे तपासातून समोर आले आहे. अमित सुतार हा पोलिस अधीक्षक कार्यालयात वायरलेस विभागात कार्यरत होता. त्याने डिसेंबर 2024 मध्ये कार्यालयातील 10 बॅटऱ्या चोरल्या होत्या.

अधिक तपासात त्याच्याकडे 58 बॅटऱ्या आढळल्या होत्या. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झाली. त्यानंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली.
पूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने स्वराज कोंडीराम बोबडे वय 26 वर्ष, रा. अंबिकानगर, बीड, हितोपदेश गणेश वडमारे 30 वर्ष, रा. अंकुशनगर, बीड या दोन साथीदारांसह सात दुचाकी चोरल्या. त्याला सोमवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.यातील दुचाकी चोरीचे दोन गुन्हे शहर पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने अमित सुतार याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिली. चार दुचाकी चोरीचे गुन्हे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद आहेत. त्यामुळे त्याला नंतर शिवाजीनगर पोलिसांकडेही तपासासाठी वर्ग करण्यात येणार आहे.

सरकारची दमदार कामगिरी:शेतकरी आत्महत्यांचा मराठवाडा हॉटस्पॉट बनलं; 520 पैकी 126 आत्महत्या बीडमध्ये

0

मुंबई — वाढते कर्ज, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला भाव नाही सरकारकडून ठोस उपाययोजना नाही परिणामी मराठवाडा आत्महत्यांचा हॉटस्पॉट बनत असल्याची धक्कादायक माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. विरोधी पक्षाच्या आमदाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यात 767 तर मराठवाड्यात 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक 126 आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या असल्याची आकडेवारी त्यांनी मांडली.
यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असल्याचं वास्तव सरकारने नुकतंच विधान परिषदेत मांडलेल्या आकडेवारीतून स्पष्ट केलं आहे.
या वर्षी जानेवारी ते मार्च 2025 या अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीत राज्यात तब्बल 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी वाढत्या शेतकरी आत्महत्यांबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत त्यांच्या लेखी उत्तरात ही आकडेवारी सादर केली.
राज्य महसूल विभागाच्या अहवालानुसार, 2025 च्या पहिल्या सहामाहीत (1 जानेवारी ते 26 जून) तब्बल 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. ही संख्या 2024 मधील याच कालावधीतील 430 आत्महत्यांपेक्षा 20 टक्क्यांनी जास्त आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी पीकविम्याची प्रतिक्षा, कधी बाजारभावाची अनिश्चितता अशा या संकटांच्या साखळीत अडकलेले शेतकरी शेवटी आयुष्यच संपवतात.

पीक नुकसान, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांकडून किंवा परवानाधारक सावकारांकडून कर्ज फेडण्यास असमर्थता, वाढत्या कर्जामुळे झालेल्या शेतकरी आत्महत्या आर्थिक मदतीसाठी पात्र मानल्या जातात. अशा शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपये दिले जातात. राज्यभरात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या 373 कुटुंबे आर्थिक भरपाईसाठी पात्र असल्याचे आढळून आले. तर 200 कुटुंबांना अपात्र घोषित करण्यात आले, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत शेतकरी आत्महत्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

बीडमध्ये सर्वाधिक आत्महत्या

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी बीड जिल्हा सर्वाधिक आत्महत्या नोंदवलेल्या जिल्ह्यांच्या यादीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे. जानेवारी ते जून 2025 दरम्यान बीडमध्ये तब्बल 126 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या 101 होती. तर मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते जून 2025 तब्बल 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

तब्बल 520 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर – 92,

नांदेड – 74,

परभणी – 64,

धाराशिव – 63,

लातूर – 38,

जालना – 32,

हिंगोली – 31

बीड – 126

भारत बंदची हाक..! बँकिंग, टपाल आणि वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता

0

नवी दिल्ली — देशभरातील 25 कोटींपेक्षा अधिक कामगार उद्या (बुधवार 9 जुलै) केंद्र सरकारच्या श्रमविषयक धोरणांच्या विरोधात ‘भारत बंद’मध्ये सहभागी होणार आहेत. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेससह (आयटक) 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने या बंदचे आयोजन केले आहे.
या आंदोलनात बँकिंग, विमा, टपाल सेवा, कोळसा खाणी, औद्योगिक कामगार आणि परिवहन कर्मचारी सहभागी होणार असून, ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजूर संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बंदचा परिणाम देशभरातील विविध सेवा व्यवस्थांवर जाणवण्याची शक्यता आहे.

कोणत्या सेवा ठप्प, कोणत्या सुरू?

संघटनांच्या माहितीनुसार, बँकिंग, विमा आणि टपाल सेवा ठप्प राहतील, तसेच अनेक राज्यांतील सरकारी वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत होऊ शकते.
दरम्यान, शेअर बाजार आणि सराफा बाजार मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहतील, अशी माहिती आहे.

मागण्या काय?

कामगार संघटनांनी केंद्र सरकारकडे 17 मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांमध्ये किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, स्थायी रोजगार, निवृत्तिवेतन, आणि कामाचे तास यासारख्या मूलभूत बाबींचा समावेश आहे.

हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंग सिद्धू यांनी सांगितले की, “सरकारने गेल्या 10 वर्षांत एकही वार्षिक श्रम संमेलन घेतले नाही. ही सरकारची कामगारांप्रती असलेली उदासीनता दाखवते.”

सरकारवर गंभीर आरोप

संयुक्त मंचाचा आरोप आहे की, सरकारने अमलात आणलेल्या चार नव्या श्रम कायद्यांमुळे कामगारांच्या हक्कांवर गदा आली आहे. या कायद्यांमुळे सामूहिक करार प्रक्रियेवर मर्यादा, संघटनांच्या कार्यक्षमतेवर बंधने, आणि संपाचा अधिकार निष्प्रभ करण्याचा प्रयत्न आहे.

संघटनांनी असेही म्हटले आहे की, सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खाजगीकरण, आउटसोर्सिंग, आणि कंत्राटी कामगार पद्धतीला प्रोत्साहन देत आहे. यामुळे कामगारांचे भविष्य अंधारात जाते आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेवर गदा येते.

आंदोलनाला शेतकरी संघटनांचा पाठिंबा

संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार संघटनांच्या मंचानेही या संपाला संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

संघटनांचे स्पष्ट मत आहे की, सरकारने केवळ भारतीय व विदेशी कॉर्पोरेट्सच्या हितासाठी काम केले असून, कामगार कल्याणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे हा संप म्हणजे केवळ मागण्यांचा लढा नाही, तर कामगारांच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष आहे.

आ. सुरेश धस च्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

0

याच अपघात स्थळी मृताचे वडील चुलत्यांचाही झाला होता अपघाती मृत्यू

बीड — आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाने सोमवारी (ता.7) कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. नितीन शेळके असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नितीन शेळके चा ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी वर्षभरापूर्वी त्यांचे वडील प्रकाश शेळके आणि काही वर्षांपूर्वी चुलते यांचाही अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.

सुपा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.नगर-पुणे महामार्गा ७ जुलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा येथे ही घटना घडली आहे. या अपघातात नितीन प्रकाश शेळके (वय ३४, रा. पळवे खुर्द ता.पारनेर) यांचा मृत्यू झाला आहे. आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस हा अपघातावेळी एम.जी. ग्लॉस्टर (क्र. MH 23 BG 2929) ही कार चालवत होता. सुपा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मृत नितीन शेळके हे सह्याद्री खादी हॉटेलवरून आपल्या गावाकडे मोटारसायकलने निघाले होते. जातेगाव फाटा येथे महामार्गावर यु-टर्न घेत असताना पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम. जी. ग्लॉस्टर कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात ते रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तातडीने सुपा येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारचालक सागर धस व त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राला ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. ८ जुलै रोजी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आणि पळवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत नितीन शेळके यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुले, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याच ठिकाणी वर्षभरापूर्वी त्यांचे वडील प्रकाश शेळके आणि काही वर्षांपूर्वी चुलते यांचाही अपघाती मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.