Home Blog Page 125

धनगरांना आदिवासींच्या प्रवर्गातून आरक्षण मिळण्यात असलेला सर्वात मोठा अडथळा दूर

0

मुंबई — राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या भटक्या जमातीत समावेश असलेल्या धनगर समाजाकडून अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच धनगर आरक्षणासंदर्भात मोठं पाऊल उचललं आहे.

धनगरांना आरक्षण मिळण्यात असलेला सर्वात मोठा अडथळा दूर करण्यात आला आहे. राज्यात धनगड असा उल्लेख असलेली ७ प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली आहेत. यामुळे धनगरांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोललं जात आहे.

मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला असतानाच धनगर समाजाने आदिवासीमधून आरक्षण देण्याची मागणी केली होती. आता महायुती सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेत धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यात असलेला सर्वात मोठा अडथळा दूर करण्यात आला आहे. राज्यात धनगड असा उल्लेख असलेली ७ प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली आहेत.

काय आहे सरकारचा निर्णय —  जात पडताळणी समितीने एकदा दिलेला जात वैधता दाखला रद्द करण्याचा अधिकार जात पडताळणी समितीला नव्हता. सरकारने तो अधिकार जात

पडताळणी समितीला दिला आहे. जे बोगस धनगडांचे दाखले काढले होते. ते ७ दाखले रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. यामुळे धनगर एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

काय आहे धनगर समाजाची मागणी?

सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त संवर्गातून (NT) आरक्षण आहे. मात्र आम्हाला अनुसूचित जमाती संवर्गातून (एसटी) आरक्षण द्यावं, अशी धनगर समाजाची जुनी मागणी आहे. अनुसूचित जमातीच्या यादी समाविष्ट धनगड आणि धनगर हे एकच असून इंग्रजीमध्ये R ऐवजी D असा शब्द वापरण्यात आला आहे. ‘ड’ ऐवजी ‘र’ असा उल्लेख आल्याने धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नाही, असा दावा धनगर समाजातर्फे करण्यात येतो.धनगर किंवा धनगड यापैकी कोणताही उच्चार असला तरी त्याचा अर्थ समान असल्याचा दावाही धनगर समाजाकडून केला जात आहे.

मृताच्या आईला अंधारात ठेवून मिळविलेल्या वारस प्रमाणपत्राला स्थगिती

0

केज — पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून धारूर तालुक्यातील एका शिक्षकांने गळफास घेऊन एक वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. त्याच्या पश्चात दोन मुले व वृद्ध आई असताना खोट्या कागदपत्र आधारे मृत शिक्षकाच्या पत्नीने पतीच्या आईला अंधारात ठेवत वारस प्रमाणपत्र काढले. याला मृत शिक्षकाच्या आईने न्यायालयात आव्हान दिल्यानंतर वारस प्रमाणपत्र स्थगित ठेवण्याचा आदेश देत चपराक दिली आहे.

धारूर तालुक्यातील एका गावातील चंद्रकांत सुरवसे हे जि. प. शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. त्यांनी पत्नीच्या अनैतिक संबंधाला व
पत्नीच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून 5 एप्रिल 2023 ला गळफास घेवून आत्महत्या केली.
त्यानंतर मयत शिक्षकाच्या पत्नीने 19 एप्रिल 2023 रोजी धारूर न्यायालयात वारस प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करून 27 जून 2023 रोजी ती स्वतः व त्यांची दोन मुले ही वारस असल्याचे वारस प्रमाणपत्र क स्तर दिवाणी न्यायालय धारूर येथून प्राप्त केले होते. वास्तविक मयत शिक्षकाच्या पश्चात त्यांची आईदेखील वारस आहे. मात्र मयताच्या आईचा उल्लेख वारस प्रमाण पत्र मिळविताना त्या शिक्षिकेने केला नव्हता. त्या वारस प्रमाणपत्रा विरोधात मयत शिक्षकाच्या वृद्ध आईने 26 नोव्हेंबर 2023 रोजी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला धारूर न्यायालयाने सदर मयत शिक्षकाला जीवन संपविण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असतानाही मयताच्या पत्नीने त्याच्या आईला आणि न्यायालयाला अंधारात ठेवून व खोटे पुरावे आणि दस्ताऐवज सादर करून मिळविलेल्या वारस प्रमाणपत्राला 5 सप्टेंबर 2024 रोजी दिलेल्या आदेशाद्वारे मूळ अर्जाचा निकाल लागेपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दिला आहे.

नेकनूर:बस प्रवासात सराफा व्यापाऱ्याची अडीच किलो सोने असलेली बॅग लंपास

0

बीड — नांदेड मुंबई गाडीतून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्याची दोन कोटी रुपयाचं सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास केल्याची घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

नांदेडहून मुंबईकडे जात असलेल्या बस मध्ये मुंबईचा सराफ व्यापारी प्रवास करत होता.दरम्यान बस नेकनूर मांजरसुंबा महामार्गावर असलेल्या एका धाब्यावर जेवणासाठी थांबली. याच बसमध्ये मुंबईचे सराफा व्यापारी रमेश जैन देखील होते. त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या अज्ञात इसमाने बस थांबलेली असताना त्यांची बॅग लंपास केली. ही बाब लक्षात आल्याबरोबर जैन यांनी नेकनूर पोलिसांशी संपर्क साधला त्या बॅगमध्ये अडीच किलो पेक्षा अधिकचे सोने असल्याचा दावा संबंधित व्यक्तीने केला आहे. पोलिसांनी धाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका अज्ञात व्यक्तीने बॅग पसार केली असल्याचं स्पष्ट झाले आहे. नेकनूर पोलीस या चोरीचा तपास करत आहेत.

साखर हंगाम 1 नोव्हेंबरला सुरू करण्याची कारखानदारांची मागणी

0

मुंबई — विधानसभा निवडणुकीत कामगार आपल्याला मतदान करतील अशी अपेक्षा ठेवून सरकार 15 नोव्हेंबर पासून ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचा डाव असल्याचा आरोप करत साखर कारखानदारांनी एक नोव्हेंबर पासून कारखाने सुरू करण्याची मागणी केली आहे. गळीत हंगाम लांबल्याने आडसाली उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मजूर आपल्याला मतदान करतील असे महायुतीतील काही नेत्यांना वाटते. त्यामुळे कर्नाटकच्या बरोबरीने हंगाम सुरू करण्याचे कारण देवून हंगाम लांबवण्यात आला आहे. यातून शेतकऱ्यांचा आडसाली ऊस 17 महिन्यांहून अधिक काळ गाळपा विना राहून नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कारखाने 1 नोव्हेंबर रोजी सुरू करावेत, अशी मागणी केली जात आहे.
ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्यातील अवर्षणग्रस्त भागातील दहा ते पंधरा लाख मजूर तीन चार महिने पश्चिम महाराष्ट्रासह ऊस पट्ट्यात राहतात. यांच्या कामाचे पैसे ॲडव्हान्स म्हणजेच “उचल” स्वरूपात असल्याने त्या मोबदल्यात काम करून ते पैसे फेडले जातात. राज्यात 2020-21 पासून राज्यातील साखर हंगाम 15 नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आला. मात्र हंगाम लांबल्याने मजूर उन्हाळ्यात काम करत नसल्याचे समोर आले होते. अनेक शेतकऱ्यांनी ऊस पेटवून साखर कारखान्यांना घातले. शेतकऱ्यांना स्वतः ऊसतोड करून कारखान्याला पाठवावा लागला.
याबाबत जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरेकर म्हणाले की, कारखाने ऑक्टोबर 15 किंवा1 नोव्हेंबरला कारखाना सुरू होणे गरजेचे होते. आमच्याकडे आडसाली उसाचे प्रमाण आमच्याकडे जास्त आहे. हंगाम लांबेल तसे उतारा आणि वजनावर मोठा परिणाम होतो. सरकारचे हे धोरण चुकीचे आहे. कुणाच्यातरी सोयीसाठी हंगाम लांबवला जात असल्याचा आरोप केला आहे. तर शिरुरचे आमदार अशोक पवार म्हणाले की, मजुरांची मते आपल्यालाच मिळतील असे सरकारला वाटते. त्यामुळे हंगाम लांबवण्यात आला आहे. खरेतर हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच गाळपाला गेला पाहिजे. यंदा पाऊस चांगला असल्याने उसाचे उत्पादन वाढणार आहे. उशीर झाला तर पुणे, शिरूर, दौंड, जुन्नर आदी भागांत आडसाली उसाचे गाळप वेळेत होणार नाही.

बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार — अर्जुनराव खोतकर

0
बीड — शिवसेना नेते संसदरत्न खासदार  डॉ श्रीकांत शिंदे यांचा बीड विधानसभा संवाद दौरा विजयाकडे घेऊन जाणारा ठरला पाहिजे. बीड मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि सध्या सर्वात जास्त अनुकूल परिस्थिती आहे त्यामुळे बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार यात शंका नाही.जिल्हा प्रमुखामध्ये अनिलदादा जगताप मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू आहेत. दादांच्या कार्य पद्धतीवर शिंदे साहेबांचा विश्वास आहे. दादांना शिंदे साहेबांकडे विशेष आदर सन्मान आहे. आपल्याकडे दोन माहीने राहिलेत. येणारे दोन माहीने पक्षाला द्या. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करा. बीड मतदार संघावर आपली चांगली पकड आहे, आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे येणारी निवडणुका आपल्याला मोठ्या ताकदीने लढावी लागणार आहे असे प्रतिपादन शिवसेना उपनेते तथा मराठवाडा संपर्कनेते अर्जुन खोतकर यांनी केले.
 संसदरत्न खा. डॉ श्रीकांत शिंदे  यांचा येत्या 8 ऑक्टोबर रोजी बीड विधानसभा संवाद दौरा मेळावा संपन्न होणार आहे. याच अनुषंगाने काल दि. 5 ऑक्टोबर 2024 रोजी दु. 3.00 वाजता दरम्यान बीड शहरातील हॉटेल ग्रँड यशोदा येथे शिवसेना उपनेते तथा मराठवाडा संपर्कनेते अर्जुनजी खोतकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी बैठक पडली.
या बैठकीमध्ये अर्जुनजी खोतकर साहेब यांनी खा. डॉ श्रीकांत शिंदे साहेब बीड मतदार संघात पहिल्यांदा येत असून त्यांच्या संवाद दौरा मेळाव्या बाबत महत्वपूर्ण सूचना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, येणारा काळ शिवसेनेचा आणि शिवसैनिकांच्या भगव्याचा असून महाराष्ट्रावर भगवा फडकविण्यासाठी एकजूट होऊन ताकदीने विधानसभा निवडणूक लढवायची असल्याचे सांगितले. बीडची जागा ही शिवसेनेची आहे व ती शिवसेनेलाच सुटेल यात शंका नाही असे त्यांनी सांगितले.
          या दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख  अनिलदादा जगताप आणि जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले व दोघांनी मिळून बीड मतदार संघात शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी समस्या अर्जुनराव खोतकर यांच्यासमोर मांडल्या. या बैठकीसाठी बीड जिल्हा शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, सर्व अंगीकृत संघटनेचे आजी- माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी घेणाऱ्या नाही देणाऱ्या पक्षात आहे- अनिलदादा जगताप
 खूप दिवसांपासून अन्याय सहन करतोय. प्रत्येकवेळी मला थांबवण्यात आले व माझा पाय ओढण्यात आला. मात्र आता मी आता घेणाऱ्या नाही देणाऱ्या पक्षात आहे.
बीड मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. कार्यकर्त्याला मोठं करण्यची, त्यांना ताकद देण्याची दानत मुख्यमंत्री शिंदे साहेबांमध्ये आहे व शिंदे साहेबांचा आशीर्वाद, विश्वास आणि पाठबळ माझ्यासोबत आहे म्हणून मला यावेळी कसलीच चिंता राहिली नाही. शिवसैनिकांनो, अफवांवर विश्वास ठेऊ नका बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार आहे. त्यामुळे कामाला लागा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांनी बीड विधानसभा संवाद दौरा पूर्व नियोजन बैठकीत आपल्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना केले.

आरक्षणासाठी जीवन संपविणाऱ्या तरुणाच्या कुटुंबाचे जरांगेंनी केले सांत्वन

0

बीड — सरकार आरक्षण देत नाही म्हणून बीड येथील एका तरुणाने आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण सरकार देत नाही सरकार शब्द पाळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून अर्जुन कवठेकर या तरुणाने गळफास घेतला आहे.

या घटनेने खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी तरुणाच्या पीडीत कुटुंबियांची मनोज जरांगे यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे. आणि असे आततायी पाऊल न उचलण्याच आवाहन केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत आहे. या संदर्भात मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण केलेले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. परंतू सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारच्या चालढकलीला कंठाळून मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नाही, सरकार शब्द पाळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून अर्जुन कवठेकर या तरुणांना आज गळफास घेऊन जीवन संपविले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या पीडीत कुटुंबाचे मनोज जरांगे पाटील यांनी आज भेट घेऊन त्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.

मराठा आरक्षणासाठी जीवन संपविणाऱ्या कवठेकर यांच्या कुटुंबाचे मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत सांत्वन केले. यावेळी पीडीत कुटुंबाल अश्रु अनावर झाले. यावेळी जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले की बाबांनो आत्महत्या करू नका मी आरक्षण देईन, असे आवाहन तरुणांना केले. कोणीही आत्महत्या करू नका मी आरक्षण देण्यास समर्थ आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. अर्जुन कवठेकर या तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही जबाबदार आहेत. आता मी त्यांना सोडणार नाही.आता आरक्षण देत कसे नाहीत हे मी पाहतो.मात्र तरुणांनी आत्महत्या करून कुटुंब उघड्यावर आणू नये असे आवाहन म्हणून जरांगे पाटील यांनी केले आहे.

चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम शिक्षक पकडला; माजलगाव बंद

0

माजलगाव — शहरातील अंगणवाडीत पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केलेला शिक्षक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला असून चार दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे. दरम्यान उद्या माजलगाव शहर बंद ठेवून मोर्चा काढण्यात येणार आहे.

माजलगाव मधील एका शाळेच्या आवारात भरणाऱ्या अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. पीडित चिमुकली घटना घडल्यानंतर आजारी पडली तिला दवाखान्यात नेले असता उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या ही बाब लक्षात आली होती. त्यांनी याची कल्पना पालकांना दिल्यानंतर पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. ज्याने हे नीच कृत्य केले आहे त्याला ओळखत असल्याचे तिने सांगितले. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पीडित चिमुकलीला फोटो दाखवल्यानंतर तिने आरोपीस ओळखले. दरम्यान पोलिसांनी फरार आरोपी राहुल वायखिंडे (मूळ रा. ब्रह्मगाव ता.कोपरगाव जि.अहील्यानगर)याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य जनतेत रोष व्यक्त केला जात असून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी माजलगाव शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी कडकडीत बंद पाळून शहर पोलीस ठाणे व तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुकबधीर,गतीमंद पंचवीस वर्षीय मुलीवर चौघांचा बलात्कार; दोघांना अटक

0

आष्टी — मूकबधिर व गतिमंद 25 वर्षीय मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून दोन जण अद्याप फरार आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सपोनि मंगेश साळवे यांना 25 वर्षीय गतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याची गोपनीय माहिती फोनवरुन मिळाली. सपोनि साळवे यांनी तात्काळ पोउपनि देवदास सातव, पोलीस अंमलदार सुदाम पोकळे यांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी पीडित मुलीसह तिच्या आई वडीलांना पोलिस ठाण्यात आणून घडलेल्या घटनेची माहिती देऊन तक्रार नोंदवणे बाबत सांगीतले. मात्र पीडितेच्या आई-वडीलांनी तक्रार देण्यास नकार दिला. या घटनेची माहिती सपोनि साळवे यांनी पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मिना यांना दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिडीतेची वैद्यकीय तपासणी करुन सरकार तर्फे पोउपनि देवीदास सातव यांच्या फिर्यादीवरुन अंभोरा पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून अवघ्या दोन तासात दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळून गजाआड केले. उर्वरित फरार दोघांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याची माहिती अंभोरा पोलिसांनी दिली आहे.

पावसाची परतीच्या दिशेने वाटचाल — हवामान विभाग

0

पुणे — राजस्थानमधून सरासरीपेक्षा सात दिवस उशिराने परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या मोसमी पावसाने महाराष्ट्रातून मात्र नियोजित वेळेत परतीचा प्रवास सुरू केला आहे. शनिवारी (५ ऑक्टोबर) नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पाऊस माघारी फिरला आहे.

हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेत म्हणजे १० ऑक्टोबरपर्यंत मोसमी वारे राज्यातून माघारी परतण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण राजस्थानमधून सरासरी १७ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाचा माघारीचा प्रवास सुरू होतो. मात्र यंदा सात दिवस उशिराने २४ सप्टेंबरपासून माघारीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर एक दिवस २४ सप्टेंबरपर्यंत माघारीचा प्रवास सुरू राहिला. राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून मोसमी पाऊस माघारी फिरला होता. त्यानंतर मोसमी पावसाचा परतीचा प्रवास रेंगाळला. त्यानंतर दोन तारखेला पुन्हा काही भागांतून मोसमी पाऊस माघारी फिरला, दोन ऑक्टोबरपर्यंत मोसमी पावसाने लेह, लडाख, जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांतून माघार घेतली होती. चार ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मोसमी पावसाचा परतीचा प्रवास रेंगाळला. आज, शनिवारी (५ ऑक्टोबर) रोजी आणखी काही भागातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे. संपूर्ण गुजरात,

उत्तराखंडसह मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधून मोसमी पावसाने माघार घेतली आहे. राज्यातील नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे.

महाराष्ट्रातून माघारीचा प्रवास सुरू झाला आहे. राज्यातून सरासरी पाच ऑक्टोबर रोजी मोसमी पावसाची माघारीची प्रक्रिया सुरू होते आणि १० ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मोसमी वारे पूर्णपणे माघारी जातात. यंदा नियोजित वेळेत मोसमी पावसाचा माघारीचा प्रवास सुरू झाला आहे. पोषक हवामान राहिल्यास १० ऑक्टोबरपर्यंत माघारीचा प्रवास पूर्ण होण्याचा अंदाज आहे. अगदीच माघारीचा प्रवास लांबला तर १५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मोसमी पाऊस पूर्णपणे माघारी जाण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, हवामान विभागाने रविवारी (६ ऑक्टोबर) संपूर्ण कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.

ऐतिहासिक, प्राचीन वास्तूंचे नुकसान केल्यास मिळणार “ही” शिक्षा

0

मुंबई — राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांच्या तुरूंगवासाची तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अशा वास्तूंना हानी पोहचवून त्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात येत आहे.

सध्या, महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पूराण वस्तूशास्त्र विषयक स्थळे व अवशेष नियम १९६० (१९६१चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१२) मधील तरतुदींनुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगावस किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. १९६० सालापासून या दंडात वाढ झालेली नाही. या कायद्यात कठोर तरतुदींचा आवश्यकता आहे. केंद्र शासनाच्या १९५८च्या अधिनियमातील सुधारणांशी सुसंगत अशा तरतूदी करणे आवश्यक असल्याने हा वाढीव शिक्षेचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.