Home Blog Page 121

ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 उमेदवारांची यादी जाहीर; गेवराईतून बदामराव पंडित

0

मुंबई — राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी कडून विधानसभा निडणुकीसाठी उमेद्वारांची यादी जाहीर करण्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आघाडी घेतली आहे. शिवसेनेने (उबाठा) जाहीर केलेल्या पहिल्या यादीत गेवराईतून बदामराव पंडित, धाराशिव मधून कैलास पाटील, परंडातून राहुल ज्ञानेश्वर पाटील तर बार्शीतून दिलीप सोपल यांच्यासह 65 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

यापूर्वी, 40 पेक्षा जास्त उमेदवारांना शिवसेना यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर, आता उर्वरीत बहुतांश मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यांना मिळाली संधी
चाळीसगाव- उन्मेश पाटील

पाचोरा- वैशाली सुर्यवंशी

मेहकर- सिद्धार्थ खरात

बाळापूर- नितीन देशमुख

अकोला पूर्व- गोपाल दातकर

वाशिम- डॉ. सिद्धार्थ देवळे

बडनेरा- सुनील खराटे

रामटेक- विशाल बरबटे

वणी- संजय देरकर

लोहा- एकनाथ पवार

कळमनुरी- डॉ. संतोष टारफे

परभणी- डॉ. राहुल पाटील

गंगाखेड- विशाल कदम

सिल्लोड- सुरेश बनकर

कन्नड- उदयसिंह राजपूत

संभाजीनगर मध्य- किशनचंद तनवाणी

संभाजीनगर प.- राजू शिंदे

वैजापूर – दिनेश परदेशी

नांदगाव- गणेश धात्रक

मालेगाव बाह्य- अद्वय हिरे

निफाड- अनिल कदम

नाशिक मध्य- वसंत गिते

नाशिक पश्चिम- सुधाकर बडगुजर

पालघर- जयेंद्र दुबळा

बोईसर- डॉ. विश्वास वळवी

भिवंडी ग्रामीण- महादेव घाटळ

अंबरनाथ- राजेश वानखेडे

डोंबिवली- दिपेश म्हात्रे

कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर

ओवळा – माजीवडा – नरेश मनेरा
कोपरी पाचखडी – केदार दिघे
ठाणे – राजन विचारे
ऐरोली – एम के मढवी
मागाठाणे — उद्देश पाटेकर
विक्रोळी — सुनील राऊत
भांडुप पश्चिम — रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नर
दिंडोशी — सुनील प्रभू
गोरेगाव — समीर देसाई
अंधेरी पूर्व — ऋतुजा लटके
चेंबूर — प्रकाश फातर्पेकर
कुर्ला — प्रवीणा मोरजकर
कलिना — संजय पोतनिस
वांद्रे पूर्व — वरुण सरदेसाई
माहीम — महेश सावंत
वरळी — आदित्य ठाकरे
कर्जत — नितीन सावंत
उरण — मनोहर भोईर
महाड — स्नेहल जगताप
नेवासा — शंकरराव गडाख

गेवराई — बदामराव पंडित
धाराशिव — कैलास पाटील
परंडा — राहुल ज्ञानेश्वर पाटील
बार्शी — दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण — अमर रविकांत पाटील
सांगोले — दीपक आबा साळुंखे
पाटण — हर्षद कदम
दापोली — संजय कदम
गुहागर –भास्कर जाधव
रत्नागिरी –सुरेंद्र (बाळ) माने
राजापूर — राजन साळवी
कुडाळ — वैभव नाईक
सावंतवाडी — राजन तेली
राधानगरी — के पी पाटील
शाहूवाडी — सत्यजित आबा पाटील

पिंपळनेर चा ठाणे अंमलदार व न.प.च्या कनिष्ठ अभियंत्यासह त्यांचे सोबती एसीबीने लाच घेताना पकडले

0

बीड — वाळूचा ट्रॅक्टर चालू देण्यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्याचा अंमलदार रामप्रसाद कडूळे व होमगार्ड ईश्वर जामकर लाच घेताना एसीबीच्या तावडीत सापडले तर दुसरीकडे बीड नगरपालिकेत बांधकाम परवाना घेण्यासाठी नऊ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यासह खाजगी इसम लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई बीड व जालनाच्या पथकाने केली.

पिंपळनेर पोलीस ठाण्यातले अमलदार रामप्रसाद शिवनाथ कडूळे वय 36 वर्ष व होमगार्ड ईश्वर बाबासाहेब जामकर वय 44 वर्ष या दोघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूचा टॅक्टर चालू देण्यासाठी 5 हजारांच्या लाच प्रकरणात हे गुन्हे दाखल करण्यात आले. होमगार्डला ताब्यात घेण्यात आले असून रामप्रसाद कडूळे हा फरार झाला आहे. जालन्याच्या पथकाने बीडमध्ये येऊन ही कारवाई केली. तर दुसरीकडे बीडच्या नगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता फारुकी अखिल आहेमद वकील आहेमद याने बांधकाम परवान्यासाठी बारा लाखांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती 9 लाख तक्रारदार यांना खाजगी इसम किशोर खुरमुरे यांचेकडे देण्यास सांगून प्रोत्साहन दिले. म्हणून दोन्ही आरोपींना एसीबीने ताब्यात घेतले आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून लाचलुचपत विभागाच्या करवाईमुळं चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. एकाच दिवशी पोलीस आणि नगर पालिकेतील लाचखोरांवर कारवाई झाल्यामुळे बीडमध्ये मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीच्या चर्चा सुरू होत्या..

स्थानिक गुन्हे शाखेच्या छापेमारीत 2 लाखाचा गुटखा जप्त

0

बीड – पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या वेगवेगळ्या कारवायात 1 लाख 92 हजार रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे यांच्या पथकाने कॅनॉल रोड वरील शिंदे नगर येथील प्रितम निवृत्ती मोहळकर, याच्याकडून 57 हजार पाचशे रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला. पोउपनि हनुमान खेडकर यांचे पथकाने शहरातील हत्तीखाना येथील फशी किराणा दुकानात अवैधरित्या गुटखा असल्याची माहिती मिळाल्यावरून केलेल्या कारवाईत पानमसाला ,गुटख्याचा 1 लाख33हजार 760 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी मोमीन फासीयोद्दीन मोमीन फाजलोद्दीन रा. हत्तीखाना बीड याच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दोन कारवायात एकूण एक लाख 91 हजार 260 रुपयाचा पान मसाला गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक उस्मान शेख, पोउपनि सिध्देश्वर मुरकुटे, श्रेणी पोउपनि खेडकर, सफौ/तुळशिराम जगताप, पोह. ठोंबरे, मनोज वाघ, पोह देविदास जमदाडे, राहुल शिंदे, विकास वाघमारे, राजु पठाण, महेश जोगदंड, तुषार गायकवाड, बप्पासाहेब घोडके, चालक गणेश मराडे, सुनिल राठोड यांनी केली आहे.

राजेंद्र मस्केंचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

0

बीड — भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे.

राजेंद्र मस्के यांनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेटही घेतली होती. राजेंद्र मस्के हे भाजपा आमदार पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आज झालेल्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जिल्ह्यात आणखी बळ मिळाले आहे. नुकताच डॉ. ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यानंतर राजेंद्र मस्के यांनी केलेला प्रवेश बीडच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार असल्याचं जाणकाराकडून सांगितलं जात आहे.

3 लोकसभा व 5 विधानसभा मतदारसंघाची नावे बदलणार ?

0

मुंबई – राज्यातील 5 विधानसभा मतदारसंघाची नावं बदलणार असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यातील तीन लोकसभा मतदारसंघाची नावे बदलणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मतदार पूनर्रचने नंतर केंद्रीय निवडणूक आयोग मतदारसंघाची नावे बदलणार आहे.

छ.संभाजीनगर जिन्ह्यातील नऊपैकी तीन विधानसभा मतदार संघांच्या नावामध्ये बदल होणार आहे. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व या मतदारसंघाची नावे बदणार आहे. डिलिमिटेशन नंतर ही नावे बदलण्यात येणार आहेत.

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ असे नाव होणार आहे. उस्मानाबाद मतदारसंघाचे नाव धाराशिव विधानसभा मतदारसंघ असे होणार आहे. त्याचप्रमाणे लोकसभेच्या तीन मतदारसंघाची नावे देखील बदलली जाणार आहेत.अहमदनगरचे अहिल्यानगर, औरंगाबादचे छत्रपत्री संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव लोकसभा मतदारसंघ असे नामकरण होणार आहे.मतदारसंघांच्या नावात बदल करण्याचा अधिकार हा फक्त मतदारसंघ पुनर्रचना आयोगाला (डिलिमिटेशन कमिशन)असतो.डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच निवडणूक आयोग मतदारसंघांची नावे बदलणार आहे.
लोकसभा निवडणुकी नंतर मतदारनोंदणी मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे, याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्टीकरण केले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर 2024 मसुदा मतदार यादी 6 ऑगस्ट 2024 रोजी दुसर्‍या संक्षिप्त पुनर्निक्षण कार्यक्रमांतर्गत प्रकाशित केली आहे. वेळापत्रकानुसार दावे आणि हरकती सादर करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. दावे आणि हरकतींचा योग्य विचार केल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे, निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

सकाळी नांदेड हिंगोली भूकंपाने हादरले

0

नांदेड — हिंगोली आणि नांदेडमध्ये आज सकाळीच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. साखर झोपेत असताना भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील 2 गावांना भूकंपाचे धक्के बसले. तर हिंगोलीच्या कळमनुरी, औंढा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. नांदेडमध्ये 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नांदेडमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. मागील 3 महिन्यातील हा तिसरा भूकंपाचा धक्का आहे. आज सकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव आणि मनाठा या गावांच्या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी नोंद भारतीय भूकंप मापण केंद्रावर झाली आहे.

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पश्चिमेस असलेल्या सावरगाव हे या भूकंपाचे केंद्र बिंदू दाखवत आहे. या भूकंपाच्या धक्क्याने या परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. हे भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही
जण साखर झोपेत असताना हे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली.

तर दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यात देखील पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले. हिंगोलीच्या कळमनुरी, औंढा तालुक्यात 6 वाजून 52 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हिंगोलीच्या कळमनुरीसह औढा तालुक्यातील 15 गावांमध्ये भूकंपेचा धक्के बसले.

पिंपळदरी पांगरा शिंदे, बोल्डा, सिनगी, वापटी या गावांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे दरम्यान प्रशासनानं नागरिकांना घाबरून न जाता काळजी घ्यावी आणि सतर्क रहावे असे आवाहन केले आहे. सध्या हिंगोलीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी देखील हिंगोलीमध्ये भूकंपाची अनेक वेळा नोंद झाली होती.

राजेंद्र मस्केंनी घेतली मनोज जरांगेंची भेट

0

बीड — राजेंद्र मस्के यांनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोमवारी त्यांनी मनोज जरांगे यांची अंतरवली सराटी येथे भेट घेतली.
राजेंद्र मस्के यांनी समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भारतीय जनता पार्टीचा त्याग करून जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. २०१९ पासून बीड विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी राजेंद्र मस्के तयारी करत आहेत.आगामी बीड विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष नेतृत्वाकडे मागणी केली होती. परंतु प्रतिसाद नसल्याने अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. यापूर्वी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच जरांगे पाटलांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे.

सावऽऽधान! सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास ऍडमिन सह पोस्ट करणाऱ्यावर होणार कारवाई

0

बीड — निवडणूकीच्या अनुषंगाने बीड जिल्हा पोलीस दल अधिक सतर्क झाले असून व्हॉट्स अॅप ग्रुप, सोशल मिडियावर पोलीसांचे विशेष लक्ष असणार आहे. कोणत्याही उमेदवाराशी संबधित,निवडणूकीबाबत किंवा धार्मिक भाषिक तसेच जातीय द्वेष पसरवणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट व्हॉट्स अॅप किंवा सोशल मिडियातून व्हयरल झाल्या तर त्यास संबंधित व्यक्तीसह ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरण्यात येईल.व त्याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई होईल असा इशारा शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारूती खेडकर यांनी दिला आहे.
शिवाजी नगर पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,सर्व व्हॉट्स अॅप ग्रुप अॅडमिन, सदस्यांसह सोशल मिडिया वापरणाऱ्यांना सोमवारी एक नोटीस बजावली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू आहे. त्या अनुषंगाने सोशल मिडियावर काही निबंध घालण्यात आले आहेत. कोणत्याही उमेदवाराशी संबंधित त्याचे वैयक्तिक,कौटूंबिक,सामाजिक स्तरावर अवहेलना होईल अशा आक्षेपार्ह टिका-टिप्पनी करणे, मजकुर, फोटो (एडिट / मार्किंग),प्रसारीत करणे अथवा आलेल्या एखाद्या पोस्टवर आपले आक्षेपार्ह मत पोस्ट करणे आणि ते पुन्हा फॉरवर्ड करणे त्याचबरोबर मतदाराचे मन वळविण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक, भाषिक तसेच जातीत द्वेष पसरविणारे आक्षेपार्ह मजकुर, फोटो, व्हिडीओ (एडिट / मार्किंग)) करून प्रसारीत करणे.निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे स्वतंत्र सोशल मिडिया ग्रुप निर्माण करून त्याद्वारे आक्षेपार्ह मजकुर, फोटो,व्हिडीओ (एडिट मार्किंग) करून प्रसारित करणे. कुठल्याही व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये आचारसंहितेचा भंग होईल अथवा दोन गटात वाद होईल अशी पोस्ट अथवा मजकुर, फोटो, व्हिडीओ टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत व्यक्तीसह ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरण्यात येण्यात असल्याचे पोलीसांनी म्हटले आहे. सर्व व्हॉट्सग्ग्रुप अॅडमिन, सदस्यांनी या सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक असुन या संदर्भात आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास ग्रुप अॅडमिन व संबंधितास जबाबदार धरून त्यांच्याविरूध्द कडक कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. सदरील नोटीस संबंधीत ग्रुप अॅडमिन, सदस्य यांच्याविरूध्द पुरावा म्हणून सदरील नोटीस न्यायालयासमोर सादर करण्यात येईल अशी तंबी देखील बीडच्या पोलीस प्रशासनाने दिली आहे.

12 हजारांची लाच घेताना बाल कल्याण समितीचा सदस्य पकडला

0

बीड – शहरातील बाल कल्याण समितीतील सदस्याला सापळा रचून 12 हजारांची लाच घेताना एसीबी ने रंगेहात पकडले‌

बाल कल्याण समितीतील सदस्य असलेल्या सुरेश प्रभाकर राजहंस वय-40 वर्ष यास सोमवारी लाच घेताना रंगेहात पकडले
तक्रारदार यांची मैत्रीण महिला बाल स्वाधार गृहात दाखल असून तिला तक्रारदार यांनी सोडवण्याकरिता दि.10 ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता.त्यावरून सदरील मुलीला तक्रारदार यांचे ताब्यात देण्यासाठी बालकल्याण समितीचे सदस्य सुरेश राजहंस याने स्वतः करिता व समितीतील इतर सदस्य करिता 50 हजारांची लाच मागणी करून तडजोडी अंती 12 हजार रुपये घेण्याचे पंचा समक्ष मान्य केले . लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाई दरम्यान 12 हजार रुपये लाच रक्कम स्वतःघेताना सुरेश राजहंस यास बाल कल्याण समितीचे कार्यालयात लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले.सध्या शिवाजी नगर ,बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,अप्पर पोलीस अधिक्षक मुकुंद आघाव,पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस अंमलदार, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे यांनी केली.

दुचाकी विक्रीसाठी आलेला चोर पकडला; शहर डीबी पथकाची कारवाई

0

बीड – चोरलेल्या दुचाकी विक्री करण्यासाठी सासरवाडीत आलेल्या मोटारसायकल चोराला शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने सापळा रचून पडकले

शेख रहीम शेख राजू असे त्या दुचाकी चोराचे नाव असून त्याच्याकडून पाच मोटसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या.पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दिवाळी सण तोंडावर आल्याने दुचाकी चोरांची टोळी जिल्ह्यात सक्रिय होत असतानाच पोलिसांनी मोठ्या कारवाई करण्यास सुरुवात केली. मोटर सायकल चोर शेख रहीम शेख राजू बीडच्या खासबागमध्ये आला होता. याची माहिती शहर पोलिसांना मिळाली त्यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.यावेळी आरोपीने पोलिसांना पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून सदर दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत.ही कारवाई पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बाबा राठोड,डीबी पथकातील मनोज परजने,अशपाक सय्यद,श्री.वायभसे यांनी केली.

चार दुचाकींचा लागला शोध
शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच मोटारसायकल जप्त केल्या आहेत.यातील चार मोटारसायकलचा शोध लागला असून दोन मोटारसायकल शिवाजी नगर हद्दीतून तर दोन मोटारसायकल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्या होत्या.अन्य एक मोटारसायकल कोणाची आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.