Home Blog Page 119

भाजपाची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आष्टीत सुरेश धस

0

नवी दिल्ली –भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 25 उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत भाजपानं 146 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. आष्टी मतदार संघातून सुरेश धस तर लातूर मधून अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

तिसऱ्या यादीत कुणाला संधी?

मूर्तिजापूर – हरिश पिंपळे
कारंजा – सई प्रकाश डहाके
तिवसा – राजेश वानखडे
मोर्शी – उमेश यावलकर
आर्वी – सुमित वानखेडे
काटोल – चरणसिंग ठाकूर
सावनेर – आशिष देशमुख
नागपूर मध्य – प्रवीण दटके
नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले
नागपूर उत्तर – मिलिंद माने
साकोली – अविनाश ब्राह्मणकर
चंद्रपूर – किशोर जोरगेवार
आर्णी – राजू तोडसाम
उमरखेड – किशन वानखेडे
देगळूर – जितेश अंतापूरकर
डहाणू – विनोद मेढा
वसई – स्नेहा दुबे
बोरिवली – संजय उपाध्याय
वर्सोवा – भारती लव्हेकर
घाटकोपर पूर्व – पराग शाह
आष्टी – सुरेश धस
लातूर शहर – अर्चना पाटील चाकूरकर
माळशिरस – राम सातपुते
कराड उत्तर – मनोज घोरपडे
पलूस कडेगाव – संग्राम देशमुख

ठरले! आज संदीपभैय्या उमेदवारी अर्ज भरणार

0
साध्या पद्धतीनेच, महापुरूषांना अभिवादन करून दाखल करणार अर्ज
बीड — बीड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आ.संदीप क्षीरसारांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच दुसर्‍या दिवशी आ.संदीप क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला. परंतु या बैठकीचे रूपांतर सभेतच झाले. यावेळी, सोमवारी (दि.२८) रोजी साध्या पद्धतीने महापुरूषांना अभिवादन करून अर्ज भरण्याचे ठरले आहे.
                 शनिवारी (दि.२६) रोजी बीड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांच्या नावाची घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली. त्यानंतर आ.क्षीरसागर यांनी रविवारी (दि.२७) रोजी राष्ट्रवादी भवन येथे मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याबाबत चर्चा करण्यात आली. या मध्ये सोमवारी (दि.२८) रोजी साध्या पद्धतीने, सणासुदीचा विचार करून सर्व कार्यकर्त्यांच्या मतानुसार लोकसभा निवडणुकीत खा.बजरंग सोनवणे यांचा अर्ज ज्याप्रकारे भरला होता अगदी त्याचप्रमाणे सर्व महापुरुषांना अभिवादन करून अर्ज भरण्याचे ठरले आहे. आ.क्षीरसागरांना उमेदवारी मिळाल्याने एकनिष्ठतेचा विजय झाला असून त्यामुळे कार्यकर्ते आणि सामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आ.क्षीरसागर यांच्या बैठकीला प्रामुख्याने माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.उषाताई दराडे यांच्यासह बीड विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदार मायबापांनी अर्ज भरतेवेळी उपस्थित राहून आशिर्वाद द्यावेत- आ.संदीप क्षीरसागर
सोमवारी (दि.२८) रोजी मी, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा अधिकृत उमेदवार म्हणून साध्या पध्दतीने अर्ज भरणार आहे. तरी बीड मतदारसंघातील मतदार मायबाप, बंधु-भगिनिंनी उद्या सकाळी १०:०० वाजता उमेदवारी अर्ज भरतेवेळी उपस्थित राहून शुभाशिर्वाद द्यावेत असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले.
आ.क्षीरसागरांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट
दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला आणि लगेचच अंतरवाली सराटी येथे जाऊन क्रांतीकारी नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली.

आपण स्वयंपूर्ण आहोत सर्वांनी साथ दिली तर हा डाव देखील जिंकता येईल-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

0

बीड — बढता बढता कारवा बन गया अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, स्वर्गीय काकु नाना हे आपल्यासाठी शक्तीपीठ आहे आपण एवढा मोठा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आता आपण स्वयंपूर्ण आहोत सर्वांनी साथ दिली तरच पुढचा डाव जिंकता येईल असे भावनिक आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.

आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे आगमन होणार असल्याची माहिती मिळतात तरुण कार्यकर्त्यांनी पाडळसिंगी टोल नाक्यापासून ते बीड शहरापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढून भव्य स्वागत केले 2000 गाड्यांचा ताफा जेव्हा शहरातून जात होता तेव्हा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर देखील भारावून गेले होते रस्त्यात ठीक ठिकाणी लोकांचा समुदाय त्यांच्या स्वागतासाठी उभा होता अनेक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी तोफांची सलामी देत आपल्या लाडक्या नेत्याचे स्वागत केले स्वर्गीय काकू नाना यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची मनमोकळेपणाने संवाद साधला ते म्हणाले स्वर्गीय काकू नाना हे आपल्यासाठी शक्तीपीठ आहे आपला एवढा मोठा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मला प्रेरणा देणार आहे सगळ्याला फाटा देऊन स्वयंपूर्ण होत पुढे जातोय नातेगोते तुटतात काळाच्या ओघात दुरावा निर्माण होऊ लागला आहे सामाजिक वेन विस्कटू लागली आहे आपण आज मला मोठा प्रतिसाद दिला उतणार नाही मातणार नाही घेतला वासा टाकणार नाही हे मी आज सर्वांसमोर जाहीर करतो अनेक चढउतार अनेक वळणे बघितली अनेकांनी मला आग्रह केला आपण सहा महिन्यापासून आपल्या तयारीला लागलो आहोत वाट लावणारे पुढे येत आहेत पण वाट दाखवणारा असावा लागतो याची जाण आणि भान या मतदारसंघातील लोकांना आहे सगळा बाजार भरलाय डिजिटल सारेच दिसू लागले आहेत परंतु वस्तुस्थिती काय असा प्रश्न निर्माण होतो कोण कुणीकडे जातोय याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे करता करविता परमेश्वर आहे नियती सर्वांचा हिशोब करत असते लोकशाहीत असेच आहे लोक संधी देऊन बघतात आपण आपला वसा आणि वारसा नुसार चालावं लागतं पण आज कुणाचा आदर्श घ्यावा असा कोणी आहे का असा प्रश्न आहे समरसतेचे वातावरण निर्माण झाले आहे लोकशाहीत कुठलातरी निर्णय घ्यावा लागतो आता आपण स्वयंपूर्ण आहोत सर्वांनी साथ दिली तर पुढचा डाव जिंकता येईल जात-पात बाजूला ठेवून आपण सर्वजण पुढे जाऊया आपला आरसा स्पष्ट आहे वास्तव आणि वस्तुस्थिती सर्वांसमोर आहे आपण आपला अधिकार यासाठी वापरण्याची वेळ आली आहे 20 तारखेला आपली ताकद दाखवावी लागेल मी सेवेचे व्रत घेतले आहे माझ्याकडून सेवा करून घेणे हे आपले काम आहे तुम्ही पोटतिडकीने बोलता तसे काम करा आपण वाट बघितली थांबलो देखील पण आपलं मूळ आपल्याला विसरता येणार नाही आपला विश्वासाचा धागा आहे तो कधीही तुटू देणार नाही माझ्या जागी आपणच आहात असे समजून तुम्ही चमत्कार करा उद्या दिनांक 29 तारखेला अर्ज भरणार आहोत हे निवडणूक भाग्यरेषा बनवणारी आहे आपल्याला जे साध्य करायचे यासाठी समर्थ साथ द्या लोकशक्ती हीच माझी शिदोरी आहे आता दिवाळी आहे फटाके तर वाजत असतात परंतु आपले फटाके हे विजयाचे फटाके वाजले पाहिजेत असा दृढ निश्चय करा असे आवाहन करून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित जनसमुदायास भावनिक आवाहन केले
यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे सर्व प्रमुख समर्थक कार्यकर्ते महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते

बीडचे जिल्हाधिकारी व परळीचे तहसीलदार यांच्या बदलीची  मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली!

0

परळी मतदारसंघात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केलेल्या त्या 122 मतदान केंद्राच्या बाबतीत निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाला केले आश्वस्त

याचिकाकर्त्यांनी अमुक पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून उच्च न्यायालयाची केली दिशाभूल?

छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणुकीपासून चर्चेत असलेल्या 233-परळी विधानसभा मतदारसंघात 122 मतदान केंद्रांना अति संवेदनशील घोषित करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक व परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांची बदली करावी, अशी मागणी करणारी याचिका काही स्थानिक नेत्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती, त्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने जिल्हाधिकारी व परळीचे तहसीलदार यांची बदली करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे ताशेरे याचिकाकर्त्यांवरती ओढले आहेत.

संबंधित याचिकाकर्ते माधव जाधव व इतरांनी मतदारसंघातील 122 मतदान केंद्रांना अतिसंवेदनशील घोषित करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व मतदानाची संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली व्हावी अशी मागणी केली होती. मात्र त्या केंद्रावरील लोकसभा निवडणुकीतील निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने पार पडली असल्याचा खुलासा यापूर्वीच निवडणूक आयोगाने केला होता तसेच पुढील विधानसभा निवडणूक प्रक्रिया देखील शांततेत व निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाला आश्वस्त केले असल्यामुळे विरोधकांची तीही मागणी आता धुळीला मिळाली असल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान याचिकाकर्त्यांनी आपण अमुक पक्षाचे संभाव्य उमेदवार असल्याचे भासवून उच्च न्यायालयाला सदर प्रक्रिया वेगाने पार पाडून निर्णय द्यायला लावले, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचे 5 दिवस उलटूनही संबंधित याचिकाकर्त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अजूनही भरलेला नाही, त्यामुळे संबंधितांनी उच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन अवमान केला असून न्यायालयाची दिशाभूल केली असल्याचीही चर्चा जाणकारांमध्ये होत आहे. मा.उच्च न्यायालयाच्या समोर याचिकाकर्त्यांनी वस्तुस्थितीच्या विरुद्ध माहिती अर्जाद्वारे सादर करून न्यालायकडून आदेश प्राप्त करून घेण्याचा डाव मा.उच्च न्यायालयाने हणून पाडला आहे. तसेच या याचिकाकर्त्यांच्या विरोधात आता उच्च न्यायालय काही कार्यवाही करणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार गटातून परळीत राजेसाहेब देशमुख तर माजलगावात मोहन जगताप लढणार

0

मुंबई — राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी च्या लढती निश्चित होत असून राजकीय पक्षांकडून शेवटच्या उमेदवार याद्या जाहीर होत आहेत.कारण, विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवार 29 ऑक्टोबर पर्यंतच आहे.

त्यामुळे, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यास वेळ मिळावा, कार्यकर्ते व पदाधिकारी यांची राजी, नाराजी व बंडखोरी टाळली जावी, म्हणून पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना युबीटी पक्षाने आत्तापर्यंत 80 उमेदवारांची घोषणा केली असून काँग्रेसनेही उमेदवारांच्या नावांच्या 3 याद्या जाहीर केल्या आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेदेखील (NCP) उमेदवारांच्या दोन याद्या यापूर्वीच जाहीर केल्या असून आता तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या दोन यादीत राष्ट्रवादीने 67 उमेदवारांची घोषणा केली होती. आता, तिसऱ्या यादीतून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर माजलगाव मतदार संघातून मोहनराव जगताप यांचे नाव निश्चित केले गेले आहे. तत्पूर्वी जयंत पाटील यांनी वांद्र रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेवरुन राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीची घोषणा केली. त्यामध्ये, राज्याचं लक्ष लागलेल्या माढ्यातून यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडसह, परळी मतदारसंघातही राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. तत्पूर्वी शनिवारी जयंत पाटील यांनी 22 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादीने माजी आमदार राहुल मोटेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे. आता, तिसऱ्या यादीतून या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. दरम्यान, माण खटाव विधानसभा मतदारसंघासाठी यांंचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. येथील उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्यापूर्वीच प्रभाकर देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं पाहायला मिळालंआहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत माळशिरसमधून अखेर उत्तम जानकर यांचे नावं घोषित करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. महायुतीकडून उत्तम जानकर विरोधात कोण रिंगणात असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच, माढ्यातून आणि करमाळ्यातूनही महायुतीचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी

1. करंजा – ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट – अतुल वांदिले
3. हिंगणा – रमेश बंग
4. अणुशक्तीनगर – फहाद अहमद
5. चिंचवड – राहुल कलाटे
6. भोसरी – अजित गव्हाणे
7. माजलगाव – मोहन बाजीराव जगताप
8. परळी – राजेसाहेब देशमुख
9. मोहोळ – सिद्धी रमेश कदम

गेवराईतून विजयसिंह पंडित मैदानात; पवार लढतीत रंग भरणार का?

0

बीड — गेवराई विधानसभेची जागा महायुतीतील कोणत्या पक्षाला सुटेल असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाने आज जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत उमदा चेहरा असलेल्या विजयसिंह पंडित यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

गेवराईतील लढतीचे चित्र आज स्पष्ट झाले असून शिवसेना ठाकरे गटाचे बदामराव पंडित मैदानात उतरलेले आहेत. त्याबरोबरच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून विजयसिंह पंडित यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही लढाई तुल्यबळ पंडितांमध्ये होणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. दरम्यान भाजपाला राम राम केल्यानंतर आमदार लक्ष्मण पवार यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र ते देखील निवडणुकीच्या मैदानात अपक्ष उतरून लढतीत रंग भरण्याच काम करतील का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तिसरी यादी जाहीर केली असून गेवराईतून विजयसिंह पंडित तर फलटण मधून सचिन सुधाकर पाटील, निफाड मधून दिलीप काका बनकर तसेच पारनेर मधून काशिनाथ दाते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

जखमेला मलमपट्टी करण्याऐवजी कृत्रिम त्वचा लावता येणार !

0

नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांना यश

नागपूर — जखम झाली की मलम लावत पट्टी बांधायची असा उपचार वर्षानुवर्षेपासून केला जात आहे. मात्र आता अशी मलमपट्टी करण्यापेक्षा जखमेच्या ठिकाणी दुसरी त्वचाच लावण्याचे संशाेधन नागपूर विद्यापीठाच्या संशाेधकांनी केले आहे.
अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली कृत्रिम त्वचा लावल्याने जखम वेगाने बरी हाेईल आणि संक्रमणही वाढणार नाही, असा दावा संशाेधकांनी केला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मॉलिक्युलर बायोलॉजी विभागातील संशोधकांनी अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली कृत्रिम त्वचा शोधून तयार केली आहे. मॉलिक्युलर बायोलॉजी विभाग प्रमुख डॉ. दयानंद गोगले आणि लिटूच्या बायोटेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. आरती शनवारे यांनी प्रकल्प प्रमुख डॉ. बिपिन लाडे यांच्या मदतीने हे संशोधनकार्य पूर्ण केले आहे. बायोटेक्नोलॉजीचे विद्यार्थी आकाश कांदी यांचाही सहभाग आहे. राजीव गांधी जैविक तंत्रज्ञान (आरजीबीसी) प्रकल्पाअंतर्गत विद्यापीठातील पदव्युत्तर वनस्पती विभागाने जखमांमुळे हाेणारे संक्रमण रोखण्यासाठी व बरे होण्यासाठी अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली नवीन कृत्रिम त्वचा विकसित करण्याबाबत २०१९-२०२० मध्ये संशोधनास सुरुवात केली. यात विद्यापीठाच्या संशाेधकांना क्रांतिकारी यश मिळाले आहे.
कसा करायचा उपयाेग?

जखम झालेल्या जागेवर पट्टीच्या ऐवजी या कृत्रिम त्वचेचा तुकडा लावल्याने जखम सुकेल आणि बरी होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या औषधीय घटकांचा वापर या कृत्रिम त्वचेत करण्यात आला आहे. या त्वचेमुळे जखम झाकली जाईल आणि बरीही होईल. जखम झालेल्या ठिकाणी कमी वेळात नैसर्गिक त्वचा येण्यासही या संशोधनामुळे शक्य होणार आहे. ही त्वचा जैवविघटनशील असल्याने जखमेवरून काढून टाकल्यानंतरही ती आपोआप विघटित होईल आणि त्यातून दीर्घकाळ टिकणाऱ्या कचऱ्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही.

काेणते घटक वापरले?
या नाविन्यपूर्ण संशोधनात सोडियम अल्जिनेट, जिलेटिन, किटोसन आणि अँटीमायक्रोबियल एजंट यांचा वापर करून कृत्रिम त्वचा तयार केली. ज्यामुळे उच्च दर्जाच्या जखमा लवकर बरी होण्याकरिता मदत मिळेल.
नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये
जखमांवर मलमपट्टी करण्याची वर्षानुवर्षीची पद्धत अनेकदा संक्रमण रोखण्यात अपयशी ठरते. कृत्रिम त्वचेमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असून ज्यामध्ये गॅलिक ॲसिड आणि थायमॉल यांचा समावेश आहे. यातील नैसर्गिक गुणधर्म जंतूंना मारत संक्रमण रोखण्यास मदत करते. कृत्रिम त्वचा ही नैसर्गिक त्वचेसारखी दिसू शकते. संशोधकांनी निर्माण केलेली कृत्रिम त्वचा ही नैसर्गिक त्वचे करिता हानिकारक नसल्याचे विविध चाचण्यांमधून दिसून आले.

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नातून परळीत अल्ट्राटेक सिमेंट कंपनी उभारणार 600 कोटींचा अतिरिक्त प्रकल्प

0

स्थानिकांना मोठ्या प्रमाणात मिळणार रोजगार

परळी — बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अल्ट्राटेक कंपनीला दिलेल्या विश्वासामुळे कंपनीने त्यांच्या परळी येथील सिमेंट ग्रायडिंग युनिटच्या उत्पादन क्षमतेमध्ये पाच पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून याठिकाणी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीने दोन टप्प्यात करणार असल्याचे जाहीर केले आहे.

या उद्योगामुळे अल्ट्राटेक या जागतिक दर्जाच्या कंपनीचे अतिरिक्त युनिट परळीत उभा राहणार असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांचे शिष्टमंडळ परळी येथे धनंजय मुंडे यांच्या भेटीला आले होते, यावेळी झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, कंपनीने क्षमता वाढीसाठी दि.24 रोजी संपन्न झालेली पर्यावरण जनसुनावणी पार पडल्यानंतर परळी येथील युनिट साठी दोन टप्प्यांत अतिरिक्त 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मान्यता दिली असल्याचे कंपनीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

या आधी देखील धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी वैजनाथ शहरालगत इंडिया सिमेंट कंपनीने सदरील युनिट सुरू केले होते. त्याद्वारे देखील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झालेली आहे.

त्यानंतर आता जागतिक दर्जा प्राप्त असलेली अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या या मोठ्या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात विविध इतर पूरक उद्योगांना चालना मिळणार असून स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे. या गुंतवणुकीसाठी मान्यता दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी अल्ट्राटेक कंपनीच्या संचालक मंडळाचे आभार मानले आहेत.

संदीप क्षीरसागर यांच्या एकनिष्ठतेची तुतारी वाजली

0

बीड— राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करतानाच बीडच्या सस्पेन्स वर अखेर पडदा टाकला. संदीप क्षीरसागर यांच्या एकनिष्ठतेचे फळ म्हणून बीडची उमेदवारी जाहीर केली. परंड्यातून राहुल मोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

बीड विधानसभा मतदार संघात उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स कायम ठेवत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बीडचा बालेकिल्ला मजबूत कसा होईल यासाठी प्रयत्न केले. डॉ .ज्योती मेटे यांना पक्षप्रवेश देऊन जातीय समीकरणे जुळवण्याच काम केलं. याबरोबरच राजेंद्र मस्के यांना सोबत घेत बीडच्या बालेकिल्ल्याची तटबंदी मजबूत केली. त्यानंतर आज शनिवारी दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये संदीप क्षीरसागर बीड मधून फायनल झाले आहे.जयंत पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमधून २२ नावांची घोषणा केली

एरंडोल- सतीश पाटील

परंडा- राहुल मोटे

बीड- संदीप क्षीरसागर

आर्वी- मयुरा काळे

बागलाण- दीपिका चव्हाण

येवला- माणिकराव शिंदे

सिन्नर- उदय सांगले

एस पीं च्या पथकाची कामगिरी:कोट्यावधींचा घोटाळा करणारा रामकृष्ण बांगर पकडला; सपोनि दराडेंची कामगिरी

0

बीड — महात्मा फुले बँकेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील आरोपी रामकृष्ण मारोतराव बांगर यांना वाशिम येथून अटक करण्यात आली आहे. एस पी च्या आदेशावरून सपोनी बाळराजे दराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

रामकृष्ण मारोतराव बांगर वय 70 वर्ष यांनी शैक्षणिक संस्था, दूध डेरी, महात्मा फुले अर्बन बँक यासारख्या संस्था स्थापन करून राजकारणात देखील आपली छाप उमटवली होती.मात्र आपल्या राजकीय हितसंबंधाचा वापर करून सहकारी संस्थांमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला. त्यांचे वेगवेगळे कारनामे उजेडात येऊ लागले. महात्मा फुले अर्बन बँकेच्या माध्यमातून 14 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा गुन्हा देखील त्यांच्यासह 41 जणांवर दाखल झाला होता.
गेल्या 30 ते 40 वर्षापासून अनभिषिक्त सम्राट बनलेल्या रामकृष्ण बांगर यांचे कुटुंब फरार झाले होते. रामकृष्ण बांगर यांच्यावर कलम 420, 409, 467, 468, 471, 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांना सपोनी बाळराजे दराडे यांनी सापळा रचून तुळजापूर येथे देवीचे दर्शन घेऊन घरी आलेल्या असताना मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी घरातून पकडले होते.
दरम्यान पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशावरून सपोनी बाळराजे दराडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उ.निरीक्षक महेश विघ्ने, पो.ह. दुबाले जायभाये यांना सोबत घेऊन मिळालेल्या माहितीवरून वाशीम येथे सापळा रचला. रामकृष्ण बांगर हॉटेल गुलाटी समोर आले असताना त्यांना जेरबंद करण्यात आले. पुढील कारवाईसाठी पाटोदा पोलीस ठाणे याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.