Home Blog Page 113

आ.संदीप क्षीरसागर विकासकामे मार्गी लावून स्वत:ला सिध्द केलेले नेतृत्व –दीपक कुलकर्णी

0

तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा –दीपक कुलकर्णी

बीड — आ.संदीप क्षीरसागर म्हणजे कसोटीच्या काळात स्वत:ला सिध्द करुन पुढे आलेले सर्वमान्य नेतृत्व असल्याचे पक्षाचे नेतेही मान्य करतात.त्यांचा हा बहुमान म्हणूनच आ.संदीप क्षीरसागर यांना मतदारसंघातील जनतेने आपला हक्काचा लोकप्रतिनिधी संबोधले आहे. म्हणूनच येत्या २० तारखेला पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर यांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देण्यासाठी मतदान करताना अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी त्यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाचे ऍड.दीपक कुलकर्णी यांनी केले आहे.

आ. संदीप क्षीरसागर यांचे
बीड मतदारसंघातील सर्वांसोबत असलेले आपुलकीचे नाते हीच त्यांची खरी राजकीय ताकद ठरली आहे. विकासकामांसाठी कायम आग्रही असलेल्या या नेतृत्वाला बीडमधून संधी मिळावी हीच भावना कार्यकर्ते अन् जनतेची असून सुज्ञ मतदारांनी पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर यांना निवडून देण्याचे आवाहन ऍड.दीपक कुलकर्णी यांनी मतदारांना केले आहे. मागील पाच वर्ष मतदारसंघाचा आमदार म्हणून जनसेवा करताना अनेक योजना मार्गी लावल्यानंतर आणि विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप झाल्यानंतरही आ.संदीप क्षीरसागर यांनी त्यांना उत्तर दिले नाही. बीड मतदारसंघातील जनता हे सर्व जाणून आहे असेही दीपक काका कुलकर्णी यांनी पत्रकात म्हटले असून येत्या २० नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आमदार संदीप क्षीरसागर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

विरोधकांच्या कामाची पाहिलीय मिळमिळ; नमिता मुंदडांच्या कामाला घालायचीय खिळ!

0

बीड — केज विधानसभा मतदारसंघ नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे वाटचाल करत असताना निवडणुकीतील विरोधकांना विकासाला खिळ घालायची असल्याचं जनतेतून सांगितलं जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. 2012 मध्ये त्यांची कर्तबगारी जनतेने अनुभवली आहे. त्यामुळे यापूर्वी अनुभवलेल्या उमेदवारावर डाव खेळून तो आंगलट आणण्याच्या मानसिकतेत केजकर नसल्याचं चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहे. लोकनेत्या  स्व. विमल मुंदडा यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून निघावी यासाठी 2012 मध्ये पृथ्वीराज साठे यांच्याकडे मतदार संघाची धुरा जनतेने सोपवली. मात्र त्यांना नेतृत्व देऊनही आपल्या कामाची चुनुक दाखवता आली नाही. शेवटी स्व.विमल मुंदडा यांनी लोकविकासाचा चालवलेल्या रथाची चाकं जागच्या जागीच रुतली गेली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत साठेंना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर देखील माजी लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेशी कधी नाळ जोडून ठेवली नाही. त्यांना तशी गरज वाटली नाही. जनतेच्या प्रश्नासाठी ते कधी रस्त्यावर उतरले नाहीत. कामातला मिळमिळीतपणा जनतेच्या अंगलट आला.शेवटी विकास रथाची चाक कायम रुतली गेलेलीच राहिली. त्याला गती मिळालीच नाही. अखेर केजच्या मतदारांनी स्व.विमल मुंदडा यांचा वारसा त्यांच्या सुनेकडे म्हणजेच नमिता मुंदडा यांच्याकडे 2019 साली पुन्हा सोपवला. जनतेच्या अपेक्षेला नमिता मुंदडा देखील बांधिलकी म्हणून खऱ्या उतरू लागल्या.लोकहिताची काम करताना त्यांनी जात धर्म पंथ यांना तसूभर देखील थारा दिला नाही. त्यामुळे मतदार संघामध्ये सांघिक भावना निर्माण होऊन विकासाला गती मिळणं सोपं गेलं. विकास निधी खेचून आणताना जनतेचे प्रश्न सोडवताना नमिता मुंदडा यांनी सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतलं. सातत्याने जन विकासाची तळमळ ठेवून पाठपुरावा केल्यामुळे वेळप्रसंगी सत्तेतील आपल्याच माणसाशी भांडून जेवढा निधी खेचून आणता येईल तेवढा निधी खेचून आणला. नुसता तो खेचून आणलाच नाही तर विकास करूनही दाखवला. विकासाची गंगा वाहती ठेवताना धार्मिक श्रद्धास्थाने असलेल्या मंदिरांचा कायापालट करण्यासाठी देखील निधी उपलब्ध करून दिला. साठेंच्या काळात झालेली साठमारी त्यांनी मोडीत काढून नव्या अशा जनतेमध्ये निर्माण केल्या. त्यामुळे केज मतदार संघात तरी नमिता मुंदडा यांच्यासाठी 2024 ची विधानसभा निवडणूक एकतर्फी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. निवडणुकीत विरोधका असलेल्या साठेंच्या कामाचा यापूर्वीच मिळमिळीतपणा  जनतेने पाहिला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत तरी सव्वा लाखांनी विजय त्यांच्या पदरात पडला होता. यावेळी हा विजय विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणारा ठरणार असल्याचा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे.

काकूंचा लोकसेवेचा वारसा डॉ. योगेश क्षीरसागरकडे सोपवला ; त्याला विजयी करा –जयदत्त क्षीरसागर

0

बीड — काकूंच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात पाऊल ठेवले आणि आयुष्यभर लोकसेवेचा वसा अखंडपणे चालविला. कधीही काकूच्या नावाला गालबोट लागेल असे काम केले नाही. जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवून लोकसेवा केली, असे सांगत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ‘आता हा लोकसेवेचा वारसा डॉ.योगेश क्षीरसागर यांच्याकडे सोपवत आहे’ असे जाहीर केले. सर्व जात-पात, धर्म, गट-तट, आपसातील मतभेद बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीत डॉ.योगेश क्षीरसागर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बीड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ नवगण राजुरी येथे रविवारी (दि.१७) आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी ह.भ.प.अमृत महाराज जोशी, ज्येष्ठ नेते रवींद्र क्षीरसागर, प्रा.जगदीश काळे, दिनकर कदम, नानासाहेब काकडे, माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अशोक हिंगे, विलास बडगे, रामचंद्र बहिर, सखाराम मस्के, मंदाताई गायकवाड यांच्यासह राजुरी ग्रामस्थ, युवक, युवती जेष्ठ नागरिक व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, सत्ता हे परिवर्तनाचे साधन आहे. आम्ही विना मोबदला घरपोच सेवा देणारी माणसं आहोत. आपला सालकरी कसा असावा हे ठरवण्याची जबाबदारी मतदारांची आहे. येत्या २३ तारखेला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून डॉ. योगेश क्षीरसागर यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. प्रत्येकाने गावोगावी जाऊन मतदान करून घ्यावे. आपला गाव, परिसर व मित्रमंडळी यांना जागृत करून मतदान केंद्रापर्यंत आणावे, आहे त्या साधनासह गट, तट बाजूला ठेवून डॉ.योगेश क्षीरसागर यांना विजयी करावे असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी केले. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, १५ वर्षांपूर्वीचे क्षीरसागर घराण्याचे वैभव पुन्हा राजुरीला प्राप्त करून देण्यासाठी, आणि काकूंचा वसा चालवण्यासाठी, मला तुमचे मतदान रुपी आशीर्वाद हवे आहेत. राजुरीकडे जायकवाडीच्या कालव्याचे पाणी आणण्याचे प्राथमिक प्राधान्य असेल आणि राजुरी सर्कलचा विकास पुन्हा सुरू करेन. माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी देखील मनोगत व्यक्त करून डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी दिलीप आहेर, मुकेश भोकरे, निलेश जगताप, गणेश जावळे, अशोक सोळुंके, विष्णू जाधव, शेषनारायण कोळेकर, पांडुरंग भोसकर, प्रा.सुदाम नवले, धनंजय जगताप, विश्‍वास आखाडे, सुरेश काशिद, राजाभाऊ सोळुंके, हनुमान जगताप, मारूती वाघ, बाबूराव जमदाडे, परमेश्‍वर सपकाळ, भाऊसाहेब जानवळे, जयराम गिते यांच्यासह परिसरातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप आहेर यांनी केले. सुत्रसंचालन नितीन गायकवाड यांनी केले. शेवटी अ‍ॅड.सदाशिव राहिंज यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आमदाराने पैसे गोळा करण्यापलिकडे दुसरे कुठले काम केले नाही -रविंद्र क्षीरसागर

ज्येष्ठ नेते रविंद्र क्षीरसागर म्हणाले की, मागच्या वेळी मी राजुरी सर्कलमधील मतदारांना, माझ्या झोळीत माप टाका असे म्हणालो होतो. परंतु आता माझीच झोळी फाटली आहे. ज्याने मला घराबाहेर काढले, माझ्यावर अन्याय केला, जो व्यक्ती बापावर एवढा अन्याय करतो, तो जनतेवर किती अन्याय करत असेल याचा अनुभव तुम्ही घेतला आहे. या आमदाराने ५ वर्ष टक्केवारीच्या माध्यमातून पैसे गोळा करण्यापलिकडे दुसरे कुठले काम केलं नाही. फक्त आपली दुकानदारी सुरू ठेवली. त्यामुळे काकू आणि अण्णांचा लोकसेवेचा वसा योगेशमध्ये आहे, आता त्याला आपला पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले.

संदीप भैय्यांचे तुफान…! तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही

0

मोमीनपुऱ्यातील कॉर्नर बैठकीने विधानसभेचे विजयावर शिक्कामोर्तब रेकॉर्डब्रेक गर्दी; आ. संदीप भैय्या मतदारांसमोर भावूक

बीड— नजर पोहोचेल तिथपर्यंत फक्त मतदारांची गर्दी… गर्दी… आणि गर्दीच… व्यासपीठाच्या चारही दिशेला पहावे तिकडे गर्दीच…गर्दी आणि ‘संदीप भैय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा एकमुखी घोषणा, अशा रेकॉर्डब्रेक गर्दीने बीड शहरातील मोमीनपुरा भागातील कॉर्नर बैठकीला अक्षरशः जाहीर सभेचे स्वरूप प्राप्त झाले. या बैठकीतील मतदारांच्या प्रचंड गर्दीने आ. संदीप क्षीरसागर यांच्या विधानसभेच्या विजयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. ही गर्दी पाहून बीड मतदारसंघात आ. संदीप क्षीरसागर यांचे तुफान असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

उपस्थित मतदारांसमोर आ. संदीप क्षीरसागर यांनी तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद मी कधीच विसरणार नाही. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे सांगत सर्वांनी येत्या २० तारखेला अनुक्रमांक ३, तूतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सर्वांची सेवा करण्याची पुन्हा संधी द्या, असे आपुलकीचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला.

बीड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष, महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. संदीप क्षीरसागर यांची मतदार संघात असलेली लोकप्रियता मोमीनपुरा येथील बैठकीला झालेल्या गर्दीतून दिसून आली. शनिवारी (दि.१६) रात्री आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, जावेद कुरेशी, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मोमीनपुरा भागात कॉर्नर बैठक संपन्न झाली. यावेळी आ. संदीप क्षीरसागर इतर मान्यवरांचे मोमीनपुरा भागातील युवकांनी जल्लोषात स्वागत केले. युवकांचा जोश आणि जल्लोष येणाऱ्या २० तारखेच्या मतदानातून नक्कीच दिसेल असा विश्वास आ. संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

उपस्थितांशी संवाद साधताना आ. संदीप क्षीरसागर म्हणाले, तुमच्या या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. बीड मतदारसंघातील जनता हीच माझी खरी ताकद आहे. आपण कायम आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने वाटचाल करणार असून आपल्या भूमिकेसोबत आज अनेक जण उभे राहत आहेत. आपला पक्ष अडचणीत असताना तुम्ही मला जी साथ दिली, त्यामुळेच आज आपण पुन्हा एकदा पक्षाची भूमिका घेऊन निवडणुकीत सामोरे जात आहोत.या निवडणुकीमध्ये मतदार संघाच्या विकासाचे मुद्दे घेऊन आपण प्रचार पुढे नेत आहोत. मागील पाच वर्षात मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना विकासाच्या अनेक योजना राबवल्या.अनेक प्रश्न मार्गी लागले. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि बीड मतदार संघाला सर्वांगीण विकसित करण्यासाठी आपण येत्या काळात काम करणार आहोत. मतदार संघातील काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मला हवे आहेत. आज या बैठकीच्या माध्यमातून तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला आशीर्वाद दिला आहे. या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. आपण सर्वांनी येत्या बुधवारी दि.२० नोव्हेंबरला आपण अनुक्रमांक ३ “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केले. याप्रसंगी माजी आ.सय्यद सलीम शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, जावेद कुरेशी यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करत हा संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी मतांची ताकद उभी करावी असे आवाहन मतदारांना केले.

नमिता मुंदडांना पायाभूत विकासासोबतच देवस्थानचा विकास ठरतोय जमेची बाजू

0

बीड — केज मतदार संघाचा सर्वांगीण विकास करताना धार्मिक श्रद्धास्थानांच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आ.नमिता मुंदडा यांनी आणला. त्यामुळे भाविकांमध्ये समाधान तर व्यक्त केले गेलेच शिवाय संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी याचा फायदा होणार आहे. एकंदरच विकासाची गंगोत्री वाहती ठेवल्याने ही निवडणूक नमिता मुंदडा यांच्यासाठी औपचारिकता बनली आहे.

राजकारणा सोबतच मतदारसंघाचा सर्वार्थाने परिपूर्ण विकास करायचा तर धार्मिक श्रद्धा स्थानांचा देखील विचार केला तरच पायाभूत विकासाला चालना मिळते. नेमकं पायाभूत विकासाचीच कास नमिता मुंदडा यांनी आपल्या कार्यकाळात धरली. धार्मिक परंपरेला देखील महत्त्व देत अकरा कोटी रुपयांच्या निधीतून विविध ठिकाणच्या मंदिरांचा विकास करण शक्य झालं. जनतेसाठी वीज, पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देतानाच धार्मिक महत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहिल्याने नमिता मुंदडा यांनी विकासाची नवी ओळख जनतेला करून दिली. मतदारसंघातील देवस्थान विकासासाठी पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत निधी आणला. यामध्ये बालाघाटाचं आराध्य दैवत व वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या नेकनुर येथील बंकट स्वामी संस्थान मंदिरासाठी 70 लाख रुपयांचा किर्तन मंडप, विड्यातील शिवरामपुरी मठ संस्थानासाठी 50 लाखाचा सभामंडप याबरोबरच वरपगाव येथील शिवराम मंदिर मठ संस्थान साठी एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी सभामंडपासाठी मिळवून दिला. आडस परिसरातील आराध्य दैवत आडकेश्वर महादेव मंदिरासाठी 25 लक्ष, हनुमान मंदिरासाठी 25 लक्ष, आवसगाव येथील श्रीराम मंदिरासाठी 50 लक्ष, युसुफ वडगाव येथील श्रीराम मंदिरासाठी 50 लक्ष रुपये, वाघे बाबुळगाव येथील वाघेश्वरी देवी मंदिरासाठी 50 लक्ष रुपये रामेश्वर वाडी (हंगेवाडी) मधील महादेव मंदिरासाठी 25 लक्ष रुपये, सासुराई येथील एकनाथ महाराज समाधी मंदिरासाठी 25 लक्ष रुपयांचा निधी देखील मिळवून दिला. एवढ्यावरच हे काम थांबलं नाही तर नांदूर घाटी येथील तळ्याच्या आई देवस्थान साठी 40 लक्ष रुपये, मौलाली पहाड येथे 50 लक्ष, देवळातील देवीच्या मंदिरासाठी 50 लक्ष रुपये, सनई येथील कोपर नाथ मंदिर पन्नास लक्ष, मा के गावच्या दत्त मंदिरासाठी 50 लक्ष, सोमनाथ महादेव मंदिर बोरगाव येथे 25 लक्ष, नामदेव महाराज मंदिर चिंचोली माळी येथे पन्नास लक्ष, धनेगाव मधील मोसाई देवी मंदिरासाठी 50 लक्ष, केज शहरातील भवानी आई मंदिरासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात यश मिळवलं.
एवढेच नाही तर मुस्लिम व हिंदू श्रद्धास्थान असलेल्या हजरत ख्वाजा महजबोद्दीन दर्गाह साठी 25 लक्ष रुपये, कुंबेफळ येथील सिद्धिविनायक मंदिरासाठी दोन कोटी रुपये याबरोबरच वडमाऊली येथील देवस्थानासाठी दोन कोटी रुपयांचा निधी आपल्या कार्यकाळात मंजूर केला. या निधीमधून अनेक देवस्थान ठिकाणी सभामंडप किचन शेड पालखी हॉल पेव्हर ब्लॉक सुशोभीकरणासारखी काम करण्यात आली किंवा ती सद्यस्थितीत सुरू आहेत.
यामुळे केज मतदार संघ आ.नमिता मुंदडा यांच्यासारखा विकासाची दृष्टी असणार नेतृत्व मिळाल्यामुळे विकास गंगा या मतदारसंघातून वाहण्यास सुरुवात झाली आहे. एकंदरच नमिता मुंदडा यांच्यासाठी केलेली विकास कामच त्यांच्या कर्तुत्वाची साक्ष देत असून कामाच्या माध्यमातून आपोआप प्रचार होऊ लागला आहे. मतदार संघात त्यामुळे नमिता मुंदडा यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी बनत चालली आहे. विकास त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारे ठरत आहे.

व्यापाऱ्यांना भेसळखोर म्हणणाऱ्यांना जागा दाखवा — उदय सामंत

0

बीड  — शेतकरी, व्यापारी, उद्योजकांमुळे महाराष्ट्र प्रगतशील राज्य आहे. महाविकास आघाडीच्या नेत्याने खालच्या पातळीवर जाऊन टीका करत राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना भेसळखोर म्हटले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अशा नेत्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवावी. आम्ही कायम व्यापारी, उद्योजकांचा सन्मान केला. बीडमधील व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांना विधिमंडळात पाठवा, असे आवाहन शिवसेना नेते, उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांनी केले.

महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शहरातील वैष्णव पॅलेस येथे शुक्रवारी (दि.१५) ना.उदय सामंत यांनी व्यापारी संघटनांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर, दिनकर कदम, विलास बडगे, लाडकी बहीण योजना समितीचे बीड विधानसभा अध्यक्ष अमर नाईकवाडे, राणासिंग चव्हाण, राजेंद्र क्षीरसागर, भास्कर जाधव, नानासाहेब काकडे, बबनराव गोरे, युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक अविनाश जाधव, सुमित कोळपे, अजय सुरवसे, सूरज चव्हाण, बीड जिल्हा व्यापारी महासंघ, शहर व तालुका असोसिएशनचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ना.उदय सामंत म्हणाले, माझे व डॉ.योगेश यांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांची निवडणुकीतील घड्याळ ही निशाणी जरी चार नंबरवर असली तरी डॉ.योगेश क्षीरसागर हा उमेदवार एक नंबर आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजकांमुळे महाराष्ट्र प्रगतशील राज्य आहे. महाविकास आघाडीच्या नेत्याने व्यापाऱ्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना भेसळखोर म्हणाला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अशा नेत्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवावी. मी देखील व्यावसायिक आहे, आमचा पारंपारिक व्यवसाय ठेकेदारी आहे. ठेकेदारी करणे चूक नाही, ठेकेदारांकडून वसुली करणे चुकीचे, असाच प्रकार बीडमध्ये घडला आहे, असे म्हणत आ.संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला. समोरचा उमेदवार नेमका कोणत्या पक्षात आहे? हे त्यालाच माहिती नसते. तो कधी म्हणतो शरद पवार, उध्दव ठाकरे तर कधी मनोज जरांगे पाटील यांचे नाव घेतो. आधी त्यांनी एकदा ठरवावे कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची आहे. निवडून आल्यास दंड थोपटून, दादागिरी करून चालत नसते, असेही ते म्हणाले. क्षीरसागर कुटुंबाचे सर्व क्षेत्रात मोठे कार्य आहे. कुटुंबाचा नावलौकिक करण्याऐवजी इथल्या समोरच्या उमेदवाराने नाव घालण्याचा प्रयत्न केला. परंतु जयदत्त क्षीरसागर, डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉ.योगेश क्षीरसागर हे काम करत आहेत. ते विधिमंडळात माझ्यासोबत येणारच आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या सर्वांच्या वतीने मी बीडचे विकासाचे प्रश्न सोडवतो, असा शब्द देतो, मात्र तुम्ही बीडकर डॉ.योगेश यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. बीडमध्ये व्यापार पेठ, एमआयडीसी पाहिली, यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी स्वतःसाठी काही मागितले नाही. तुमच्या प्रश्नांची मांडणी करत होते. अशी प्रश्नांची जाण असलेले डॉ.योगेश क्षीरसागर यांना विधिमंडळात पाठवा. यापूर्वी मी सुद्धा घड्याळाचा उमेदवार होतो. जेवताना, झोपताना, उठताना आपण घड्याळ पाहतो. त्यामुळे घड्याळाला अनन्यसाधारण महत्व आहे, अगदी तसेच महत्त्व बीडचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांना आहे. बीड विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहीण योजनेचा लाभ ९८ हजार महिलांना मिळाला. त्यामुळे आपल्या उमेदवाराला ९८ हजारच्या पुढे मते मोजायची आहेत. त्यामुळे डॉ.योगेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास ना.उदय सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बीडच्या व्यवसायाला गती देणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देऊ — डॉ.योगेश क्षीरसागर

बीडच्या आमदाराने काहीच काम केले नाही म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर त्यांची कायम उदासीनता राहिली. त्यांना व्यवसाय, उद्योग, एमआयडीसीसाठी विशेष काही करता आले नाही. या भागातील रस्ते होणे गरजेचे आहेत. एमआयडीसीतून नाळवंडीकडे जाणारा मुख्य रस्ता नवीन सरकार येताच करून घेतला जाईल. एमआयडीसीमध्ये रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रस्ताव दिलेले आहेत. रिंग रोडचा प्रश्न सोडवायचा आहे. व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी मी विशेष लक्ष देईल. शहरातील व्यवसायाला चालना देण्यासाठी आपण घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावे, असे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.

व्यापारी सुशिक्षित उमेदवाराच्या मागे — भास्कर जाधव

बीड शहर आणि मतदारसंघातील व्यापारी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासारख्या सुशिक्षित उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील. नवीन सरकार महायुतीचे येईल, तेव्हा बीडमध्ये व्यापारी भवन उभारावे, एमआयडीसीत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. व्यवसाय कर रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशा मागण्या जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर जाधव यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केल्या.

एस पी पथकाचा गेवराईत जुगार अड्डयावर छापा,48 लाखांचा मुद्देमाल जप्त‌

0

बीड — पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या पथकाने जुगार्‍यांना मोठा दणका दिला आहे, पोलीस अधीक्षक पथकाचे बाळराजे दराडे यांनी गेवराई परिसरातील हॉटेल तोरणा च्या पाठीमागे उदय पानखडे यांच्या मालकीच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर रात्री पावणे अकराच्या सुमारास छापेमारी केली, यावेळी जुगार खेळताना बाळूनाथ मोहन मोटे, दीपक वामनराव सोनवणे, अमोल दत्तात्रय गांडुळे, श्याम बाबुराव चव्हाण, बाळू पापा राठोड, वचिष्ठ भिमराव ठोसर, कपिल भास्कर मुंजे, ज्ञानेश्‍वर सूर्यकांत लांडगे, पोपट छगन दाभाडे, गणेश गोरख, दावडकर या दहा जणांना पकडले, यावेळी त्यांच्याकडील रोख रकमेसह मोबाईल, गाड्या असा एकूण 48 लाख 18 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले आहेत.

तरुण मित्रांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार-आ.संदीप क्षीरसागर

0

मैंदा व बेलुरा येथे शेकडो कार्यकर्त्यांचा आ.संदीपभैय्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

बीड — विधानसभा निवडणूकीची प्रचार अंतिम टप्प्याकडे सरकत असताना बीड मतदार संघात आ.संदीप क्षीरसागर यांची ताकद आणखी मजबूत झाली आहे. शुक्रवारी (दि.१५) दुपारी बीड मतदारसंघातील मैंदा व बेलुरा येथील युवकांनी मोठ्या संख्येने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला.या सर्वांचे बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि महाविकास आघाडीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांनी स्वागत केले. तसेच आपल्या सर्व युवक, तरुण मित्रांच्या खांद्याला खांद्या लावून मतदारसंघात काम करेल असा शब्द आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिला.

मैंदा व बेलुरा येथील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याशी आ.संदीप क्षीरसागर यांनी संवाद साधला. जेव्हा सर्वसामान्य नागरिक आणि युवक एकजुटीने उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहतो, तेव्हा त्या उमेदवाराचा विजय नक्कीच होतो. युवकांनी आणि नागरिकांनी माझी निवडणूक हातात घेतली आहे. विरोधकांच्या भूलथापांना व अमिषेला बळी न पडता मोठ्या संख्येने दररोज अनेकांचे जाहीर पक्षप्रवेश होत आहेत. आपल्या सर्वांच्या साक्षीने मी बीड मतदारसंघाच्या विकासासाठी आगामी काळात काम करेल असा शब्द आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिला. येथे वीस तारखेला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

यावेळी उत्तरेश्‍वर घुमरे (मा.उपसरपंच), पंजाबराव घुमरे (मा.सरपंच),गोरख घुमरे, अमोल मौंदेकर, अशोक कसबे, महारुद्र घुमरे, गणेश दुकानदार, गणु दादा, पोपट कसबे, परमेश्‍वर नाना घुमरे, लाला घुमरे, गंगाधर बाप्पा घुमरे, प्रदीप कसबे, नंदू राठोड, सतीश भोर, चंदू सगळे, दत्ता पाटील,नितीन घोटे,बळी कसबे, बाप्पा घुमरे, अमोल उपडे, एस.पी.घुमरे, दत्ता मोमीन मेंबर, अभिषेक घुमरे, महेश गडसिंग, दत्ता पाटील घुमरे, कैलास लांडे तसेच पांडुरंग गवते युवा सेना जिल्हाप्रमुख बीड, रामेश्‍वर गवते, बालाजी गवते, ज्ञानेश्‍वर लाटे, संपत ढवळे, कुमार भाऊ गवते, रावसाहेब जिजा गवते, गोपाल गवते, नंदू गवते, दत्ता गवते, बाळू गवते, मच्छिंद्र लाटे, सचिन गवते, विशाल गवते, भाऊसाहेब गवते, महादेव गवते, भारत गवते, गोरख गवते, तुकाराम गवते, पप्पू गवते, बजरंग गवते, अशोक लाटे, दादासाहेब गवते, अजय गवते, ज्ञानेश्वर ढवळे व इतर मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला.

माझ्या जनतेच्या एका-एका मताचा उपयोग बीड मतदारसंघाच्या विकासासाठी करणार

0
पाली,मांजरसुंबा येथील प्रचार बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त दिला विश्वास
बीड  — बीड मतदार संघातील जनता आमच्या पक्षासोबत आणि माझ्यासोबत आहे. जनता हीच खरी आमची ताकद असून विरोधकांच्या अपप्रचाराला सूज्ञ जनता कधीही थारा देणार नाही.बीड मतदार संघातील पाली असो की, बालाघाटावरील चौसाळा परिसर कायम येथील जनता खा.शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत राहिलेली आहे. त्यामुळे विरोधकांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कितीही आरोप केले तरी त्यांना थारा न देता येत्या २० तारखेला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी मला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी द्या.तुमच्या एका-एका मताचा उपयोग मी बीड मतदारसंघाच्या विकासासाठी करणार असल्याचा विश्वास आ. संदीप क्षीरसागर यांनी केले

बीड विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे जात असताना आता मतदारसंघातील गावोगावी बीड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्त्यांसह ठिकठिकाणी मतदार त्यांचे जोरदार स्वागत करत आहेत. गुरुवारी (दि.१४) आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील पाली, मांजरसुंबा या गावांचा दौरा करत कॉर्नर बैठकीत त्यांनी मतदारांना पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला मतदारांनी जोरदार प्रतिसाद देत आम्ही तुमच्या सोबत असल्याचे बोलून दाखवले.
पाली व मांजरसुंबा येथील संवाद बैठकीत बोलताना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, बालाघाटवरील जनता नेहमीच खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या भूमिकेसोबत राहिलेली आहे. जेंव्हा लोक एखाद्या भूमिकेसोबत एकनिष्ठ असतात तेंव्हा नक्कीच इतिहास घडतो. बालाघाटवरील जनता यावेळी नक्की इतिहास घडवतील असा विश्वास आहे.प्रलंबित विकासकामांसाठी सतत पाठपुरावा केला. सर्वांना विश्‍वासात घेवूनच विकासाची कामे पुर्णत्वास नेली. विरोधकांना आता स्वत:कडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते तथ्यहिन आरोप करत आहेत; मात्र माझ्या मतदारसंघातील जनता माझ्या कामाबद्दल समाधानी आहे. मी त्यांचा विश्‍वास कमावलायं,त्यामुळे विरोधकांकडे लक्ष देण्याची गरज नाही.यावेळी त्यांनी गत पाच वर्षात आमदारकीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.आम्ही विकासासाठी काम करतो असे सांगत येत्या २० तारखेला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी मला पुन्हा एकदा तुमचे सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले. सर्वसामान्य माणसाबद्दल कणव असणारे संदीपभैय्या गावी आल्याने मतदारांनी त्यांचे मोठ्या उत्साहात गळ्यात पुष्पहार घालून स्वागत केले. या स्वागताने आ. संदीप क्षीरसागर भारावून गेले.

कापसाच्या शेतातून 21 किलो गांजा जप्त

0

परळी — तालुक्यातील कापूस व तुरीच्या शेतातून पोलिसांनी 21 किलो गांजासह एकाला ताब्यात घेतले. ही कारवाई दि.14 नोव्हेंबर रोजी सकाळी दिंद्रुड व अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या केली.

परळी तालुक्यातील नागपिंपरी येथील शेतकरी विश्वास नामदेव बडे यांनी आपल्या शेतात कापूस व तुरीच्या झाडात गांजाची 32 झाडे लावली होती. गोपनीय माहितीच्या आधारे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक बारगड यांच्या मार्गदर्शनाखाली दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड व अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पडवळ यांनी नागपिंपरी येथे गुरुवारी छापा टाकत 4 लाख 17 हजार 400 रुपयांचा 21 किलो गांजा जप्त करत आरोपी विश्वास बडे यांना ताब्यात घेतले. ही कारवाई बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली दिंद्रुड व अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या पार पडली. जप्त केलेला सर्व माल व आरोपी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना स्वाधीन करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि अण्णाराव खोडेवाड, पो.हे.कॉं.श्रीपती चौरे, पो.कॉं.मुकेश शेळके, आत्माराम चामणर, महेश साळुंखे,पोटे यांनी केली.