माजी न्यायमूर्ती, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचे निधन
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी सन 1961 ते 62 मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले. मराठवाडा, मराठवाड्यातील सामाजिक वास्तव उर्वरित महाराष्ट्रात पोहोचवण्यात नरेंद्र चपळगावकर यांचा मोठा सहभाग होता. नरेंद्र चपळगावकर यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या गेल्या काही पिढ्या बीड येथे गेल्यामुळे ते मूळचे बीडचेच झाले. बीडमधून केसरी, सकाळ, मराठवाडा, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांसाठी त्यांनी लेखन केलं आहे. 16 वर्षे वकिली केल्यानंतर मुंबईत काही काळ वकिली केली. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायपीठ स्थापन झाल्यावर त्यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
सरकारची अडचण वाढली! मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरू
जालना — ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेल, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील शनिवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.सगेसोयरे अध्यादेश काढून 26 जानेवारी रोजी एक वर्ष होत आहे. परंतु, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे. त्यामुळे आपण पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठ्यांना ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणत्र देण्याचा शासनादेश काढावा, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी, ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना मिळालेल्या सगे सोयऱ्यांच्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे, न्या. शिंदे यांच्या समितीला मुदतवाढ द्याची, प्रमाणपत्र वाटपासाठी कक्ष सुरू करावे, शिंदे समितीला उर्दू, फारशी, मोडीलिपीचे अभ्यासक द्यावेत, ज्यांच्या नोंदी असूनही प्रमाणपत्र दिलेले नाही त्यांना तातडीने प्रमाणपत्र द्यावे, आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत. हैदराबाद संस्थानचे गॅझेट, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी पुन्हा उपोषण सुरू केल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाल्मीक कराडची करोडो रुपयांची संपत्ती एसआयटी करणार जप्त
बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराडला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विशेष तपास पथकाने वाल्मिक कराडची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
वाल्मिक कराड यांच्या मालकीच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने एसआयटी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा संकलित करण्यात आला असून त्यांचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त केल्या जातील, असे सांगितले जात आहे. हा वाल्मिक कराडसाठी प्रचंड मोठा धक्का ठरु शकतो.
गेल्या काही दिवसांमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर पुणे, बीड यासह विविध भागांमध्ये जमीन, फ्लॅट अशा वेगवेगळ्या मालमत्ता असल्याची माहिती समोर आली होती. या संपत्तीचे आकडे डोके चक्रावणारे होते. वाल्मिक कराड याने बीड जिल्ह्यात दहशतीच्या जोरावर मोठे आर्थिक साम्राज्य उभे केल्याची चर्चा होती. याचे तपशील गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले होते. मात्र, आता एसआयटीने वाल्मिक कराडची ही सर्व मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी बीड येथील विशेष न्यायालयात एसआयटीकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 107 (मालमत्तेची जप्ती, जप्ती किंवा पुनर्संचयित करणे) अंतर्गत अर्ज आधीच न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला आहे.
वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांची हत्या आणि आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. वाल्मिक कराड याला या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी त्याच्यावर महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका लावण्यात आला होता. गेल्या सुनावणीवेळी एसआयटीने वाल्मिक कराड याने 2 कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा उल्लेख केला होता. या संपत्तीचा शोध घ्यायचा असल्याचे एसआयटीने न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार आता एसआयटीने वाल्मिक कराड याच्या संपत्तीची पाळेमुळे खणायला सुरुवात केली आहे. यापूर्वी सीआयडीने वाल्मिक कराड याची परदेशातही संपत्ती असू शकते, असा संशय व्यक्त केला होता.मात्र, आता एसआयटीने वाल्मिक कराडच्या मालकीच्या राज्यातील मालमत्तांवर टाच आणल्यास त्याच्या अडचणी वाढू शकतात. वाल्मिक कराड याच्यासोबत त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे असलेल्या जमिनी आणि फ्लॅटसवरही जप्तीची कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
वाल्मिक कराडच्या अडचणीत भर, महादेव मुंडे खून प्रकरणाची चौकशी होणार
महादेव मुंडे खून प्रकरण तपास परळी पोलीस ठाण्याकडून काढून अंबाजोगाई डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. 14 महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांचा खून झाला होता, अद्यापही याचे आरोपी पकडले गेले नाहीत. महादेव मुंडे यांच्यापत्नीने याबाबत सवाल उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनीही शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्याचे आदेश काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! अनेक अधिकारी येणार गोत्यात; हायकोर्टाच्या सुनावणीकडं लक्ष
- नागपूर — धनंजय मुंडे यांना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं झटका दिला आहे. यापूर्वीच्या मंत्रीमंडळाच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यामुळं ते गोत्यात आले आहेत.












