आपला जिल्हा

निळेंच्या ‘गिळे ‘पणामूळे सिंदफणा ची लूट

बीड — एकीकडे जिल्हा प्रशासन कोविड महामारी विरोधात दोन हात करत असताना दुसरीकडे मात्र प्रशासनातील निळे सारखे अधिकारी परिस्थितीचा गैरफायदा घेत नैसर्गिक साधन संपत्तीची लुट करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खाजगी व्यक्तींची नियुक्ती करून त्यांनी वाळू चोरांशी संधान साधत सिंदफणा ची लूट सुरू केली आहे. प्रत्येक गाडीमागे पाच ते दहा हजार रुपये स्वतःच्या अधिकाराचा टॅक्स वापरत रोज दीड ते दोन लाख रुपयांचा ऐवज ते गोळा करत असल्याच सिंदफणा तीरावरील लोकांचं म्हणणं आहे.


सध्या जनतेचे लक्ष कोरोना महामारी कडे आहे. लाॅक डाऊन मुळे व्यापारी मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडलेले असताना स्वतःचा संसार सावरण्याकडेच त्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. याच स्थितीचा फायदा उठवत वाळू चोरांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. मग अशा स्थितीत अधिकाऱ्यांनी तरी मागे का राहावे हा प्रश्न निर्माण होतो आहे. वाहत्या गंगेत हात धुवून घेत अनेक जण आपलं उखळ पांढरं करून कसं घेता येईल याकडे लक्ष देत आहे. अशीच काहीशी स्थिती बीड मध्ये देखील आहे. तहसीलदार निळे यांनी तर वाळू चोरांशी हातमिळवणी करत सिंदफनाची लूट सुरू केली आहे.

तलाठी गिरदावर या सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या हाताशी धरून त्यांनी सिंदफणा तटावर दलालांची नियुक्ती केली आहे.हे दलाल प्रत्येक गाडीमागे पाच ते दहा हजार रुपये निळेंनी ठरवून दिलेला टॅक्स गोळा केला जात आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. अधिकाऱ्यांनीच वाळू माफियांशी संधान साधल्यामुळे सिंदफणा तटावरील नागरिक तक्रार करायला पुढे येण्यास धजावत नाहीत. या भागातील नागरिकांना वाळू तस्करी चा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असला तरी बुजगावणेच शेतातील कणसे खात असेल तर दाद, फिर्याद मागायची कुणाकडे असा प्रश्न जनतेकडून व्यक्त केला जात आहे. एकंदरच शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून एकाच अधिकाऱ्याची भरती होत असल्याच आता बोललं जातं आहे. परिणामी वाळूचे दर देखील गगनाला भिडले आहेत हायवा ची किंमत पन्नास ते साठ हजार रुपयापर्यंत जाऊन पोहोचली आहे.
निळेंच्या ‘गिळे ‘ पणामुळे सिंदफना मात्र हतबल झाल्याचे पहावयास मिळत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close