आष्टी — तालुक्यातील धामणगाव शिवारातील शेतामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी police raid छापा मारून बारा जुगारी ताब्यात घेतले तर तब्बल नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल अंभोरा पोलीसांनी जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या धामणगाव येथील शेतामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना सोमवारी मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा police raid मारला. यावेळी पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले. यावेळी जुगाऱ्या कडून रोख रक्कम, दुचाकी,मोबाईल व जुगारीचे साहित्य असा एकूण 8 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये gambling prevention act अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा पोलिसांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय सोपान येवले करीत आहे.
शेतातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 9 लाखाचा मुद्देमाल जप्त
गेवराईतील राडा : लक्ष्मण हाकेसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल
गेवराई — ओबीसी OBC नेते लक्ष्मण हाके व आ. विजयसिंह पंडीत समर्थकांमध्ये झालेल्या गोंधळामुळे कायदा सुव्यवस्थेचा law and order प्रश्न निर्माण झाला. हाके यांनी शहरात येऊ नये यासाठी पोलिसांनी नोटीस बजावून देखील जाणीवपूर्वक राडा घालण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान या प्रकरणी लक्ष्मण हाके सह 14 जनाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आ.विजयसिंह पंडित व आ.प्रकाश सोळंके यांच्याविरोधात मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) प्रश्नावरून केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. या वक्तव्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी प्रा. हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जाळून संताप व्यक्त केला.या संदर्भात मी गेवराईला gevrai येणारच अस आव्हान लक्ष्मण हाके यांनी दिलं. पोलिसांनी तात्काळ गेवराई शहरात हाके यांनी येऊ नये यासाठी प्रतिबंधक नोटीस Prohibited notice बजावली. मात्र लक्ष्मण हाके यांनी पोलिसांच्या police आदेशाला न जुमानता आपल्या कार्यकर्त्यासह शहरात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबून माध्यमांचे संवाद साधला. यावेळी त्याच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या. चप्पल फेक दगडफेक यासारखे अनुचित प्रकार घडले गेले. हा प्रकार घडत असताना पोलिसांनी हाके यांना पुढील प्रवासासाठी निघून जाण्याची सूचना केली मात्र त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन 14 जणांविरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता बीएनएस 2023 कलम 189(2), 190, 191(2), 191(3), 285, 223 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला. यामध्ये लक्ष्मण हाके सुनील ढाकणे, बजरंग सानप बळीराम खटके पवन कारवार सिद्धू पघळ, मुक्ताराम आव्हाड शिवाजी गवारे दत्ता दाभाडे अशोक बोरकर वसीम फारुकी शाहरुख पठाण संतोष सुतार आणि मोईन ख्वाजा शेख यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेत बाधा आणणाऱ्या लोकांची गळ केली जाणार नाही. कायदा हातात घेणारा वर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कावत SP Navneet Kanvat यांनी दिला आहे.
Maratha reservation:आझाद मैदानात उपोषण करण्यास हायकोर्टाची मनाई; सरकारला निर्देश
मुंबई — मराठा आरक्षणप्रश्नी Maratha reservation मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांना मुंबईतील आझाद मैदान Azad maidan येथे उपोषण आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाने High court मंगळवारी मनाई केली. तसेच नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे Manoj jarange यांची डोकेदुखी वाढली असून ते पुढे काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सव Ganesh festival काळात मुंबईत उपोषणाला येणं टाळावं, अशी विनंती करण्यासाठी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र साबळे हे अंतरवाली सराटी इथं दाखल झाले होते. राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत याबाबत चर्चाही केली. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण OBC reservation मिळाल्याशिवाय आता माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका या भेटीनंतर जरांगेंनी मांडली. आम्ही मुंबईला निघण्याआधी सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, तरंच आम्ही माघार घेऊ, असं जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. परंतु आता हायकोर्टानेच मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केल्याने मनोज जरांगेंची कोंडी होणार आहे.
मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मोठ्या संख्येने मुंबईला चला-आ.संदीप क्षीरसागर
वाढदिवस साजरा न करण्याचे आ.क्षीरसागरांकडून आवाहन
बीड — संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) होत असलेल्या अंतिम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा न करता आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईला चला, याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर Sandeep kshirsagar यांनी केले आहे.
२७ ऑगस्ट रोजी आ.संदीप क्षीरसागर यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आणि कार्यक्रम घेऊन कार्यकर्ते वाढदिवस साजरा करत असतात. परंतु यावर्षी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठीची ही शेवटची लढाई आहे. त्यामुळे माझा वाढदिवस साजरा न करता, सध्या संपूर्ण लक्ष आंदोलनावर ठेवून त्यासाठी जोमाने परिपूर्ण तयारी करा आणि संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांच्या नेतृत्वाखाली दि.२९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई Mumbai येथे होत असलेल्या ऐतिहासिक आंदोलनास बहुसंख्येने, एकजूटीने मुंबईला चला. याच माझ्या वाढदिवसाच्या मला शुभेच्छा असतील. असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
“आई” हॉस्पिटलमध्ये उपचारासाठीआलेल्या महिलेचा मृत्यू; डॉक्टरावर कारवाईची मागणी
बीड — मांजरसुंबा येथील एक महिला उपचारासाठी बीडच्या आई हॉस्पिटलमध्ये आज सकाळी आली असता डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदरील महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. केवळ आई हॉस्पिटलच्या दुर्लक्षपणामुळे आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू.झाला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
मांजरसुंबा येथील नाझमीन शकील सय्यद वय 21 वर्ष या महिलेला आईव्हीएफ करण्यासाठी बीड येथील आई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांकडून मोठा हलगर्जीपणा झाला. विशेष
म्हणजे या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग नसल्याचे सांगण्यात येते. महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आई हॉस्पिटलमध्ये नाझमीन यांचा दुर्देवी मृत्यू झाला.त्यानंतर त्या महिलेला बीडच्या दीप हॉस्पिटलमध्ये आई हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने दाखल केले. मात्र ती आधीच मृत्यू पावल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी आई हॉस्पिटल व्यवस्थापन आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचे सांगत मृतदेह घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. या ठिकाणी नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन करून डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्राप्त अहवालानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
किराण्याची उधारी मागितली दुकानदाराला बेदम मारहाण
गेवराई — किराण्याची उधारी मागितल्याच्या कारणावरून दुकानदाराला धारदार शास्त्राने मारहाण केल्याची घटना बंगालीपिंपळा गावात घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी दुकानदार याच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
बंगाली पिंपळा दादासाहेब बबनराव तळतकर हे रविवारी सकाळी साडेआठ सुमारास आपल्या किराणा दुकानात असताना सिद्धार्थ बंडु माने हा तेथे आला. त्याने पाण्याची बाटली मागितली असता दुकानदार तळतकर यांनी ‘तुझ्या चुलत्याकडे माझी 900 रुपयांची उधारी आहे, ती आधी जमा कर.’ असे म्हणताच सिद्धार्थ माने संतापला.त्याने दुकानदार तळतकर यांना शिवीगाळ करून दुकानाबाहेर खेचले व चापट मारली. इतक्यात त्याचा चुलता सुधीर माने हा हातात धारदार `कत्ती घेऊन आला. दादासाहेब तळतकर यांच्या मानेवर व कानामागे कत्तीने वार करून गंभीर दुखापत केली.या वेळी तळतकर यांचा भाऊ गणेश तळतकर याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याही उजवा हातावर कत्तीचा वार करून जखमी केले. भगवान माने याने लाकडी काठीने तळतकरच्या पाठीवर मारहाण केली, तर मधुकर (बंडु) माने हा लोखंडी कोयता घेऊन आला आणि शिवीगाळ करू लागला.गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करून दुकानदार तळतकर व त्याचा भाऊ यांना सोडवले. जखमींना तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी सिद्धार्थ बंडु माने, सुधीर भगवान माने, भगवान बापुराव माने आणि मधुकर उर्फ बंडू माने सर्व रा. बंगाली पिंपळा यांच्याविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
गेवराईत लक्ष्मण हाके च्या गाडीवर दगडफेक; पुतळा जाळला” नेमकं काय घडलं?
गेवराई — राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विजय राजे पंडीत आणि
ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी समोरासमोर येऊन एकमेका विरूद्ध घोषणाबाजी केल्याने, गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी चौकात तणाव निर्माण झाला. हा सगळा गोंधळ सोमवार ता. 25 रोजी साडेचार वाजता अचानक घडल्याने पोलीसांची दमछाक झाली. दरम्यान, दोन्ही गटाला पोलीसांनी बाजुला केल्याने अनर्थ टळला गेला.

दोन दिवसांपापूर्वी प्रा. हाके यांनी आमदार पंडीत यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर, दोन्ही गटात सोशल नेटवर्किंग साईटवर शाब्दिक हल्ले करण्यात आले होते. रविवार ता.24 रोजी शास्त्री चौकात आ. पंडीत समर्थकांनी हाके यांचा पुतळा जाळून निषेध केला. सोमवारी काळे नावाच्या युवा नेत्याला गेवराई पोलीसांनी ताब्यात घेतल्याने पून्हा वाद झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
गेवराई पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून, गजानन काळे यांना सोडण्याची मागणी केली. त्यानंतर काही वेळाने स्वतः प्रा. हाके यांचा ताफा गेवराई च्या दिशेने आल्याने, दोन्ही गट समोरासमोर आले. एकमेकांवर धाऊन जाण्याचा प्रयत्न झाला. एकमेका विरूद्ध घोषणाबाजी झाल्याने, तणाव निर्माण झाला. अज्ञातांनी हाके यांच्या गाडीच्या दिशेने दगडफेक केल्याने, तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाशराव सोळंके यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद रविवारी गेवराई शहरात उमटले. संतप्त झालेल्या मराठा आणि ओबीसी समाजातील युवकांनी प्रा.हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आधी दंडुकाने मारहाण केली. पुतळा पायाखाली तुडवून जाळला. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले होते. तसेच आमदार समर्थकांनी हाके यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. दरम्यान सोमवारी लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान देत ज्या ठिकाणी माझा पुतळा जाळला. त्याच ठिकाणी दुग्धाभिषेक करून चहा पिणार असल्याचे चॅलेंज दिले होते. यावरून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गटातील समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. लक्ष्मण हाके या ठिकाणी येताच विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करून, चप्पल फेकल्या. दरम्यान परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. तसेच गेवराई पोलिसांच्या लक्ष्मण हाके यांच्या गाडीला घेराव घालत शहराबाहेर काढले, यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. गेवराई शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीसांनी प्रकरण व्यवस्थित हाताळल्याने तणाव आटोक्यात आला आहे.
अन्यथा लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार नाही
मुंबई — राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सध्या जोरदार गदारोळ सुरू आहे. योजनेच्या लाभार्थी महिलांची कसून छाननी सुरू असताना दररोज नवीन बोगस लाभार्थी समोर येत आहेत.अलीकडेच, लाडकी बहीण योजनेतून 26 लाख 34 हजार बोगस महिलांनी लाभ घेतला असल्याचे समोर आले होते. यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र लाडक्या बहिणींचे नियम डावलून जे लाभ घेतात त्यांचे धाबे दणाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आता फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे. ई-केवायसी करुन फेरपडताळणी केली जाणार आहे. यामुळे आणखी काही बोगस लाभार्थींची माहिती समोर येईल. जर तुम्ही हे वेळेत केलं नाही तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत.
त्यामुळे आता सर्व महिलांना ई-केवायसी करावे लागणार आहे. ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच योजनेत पुढचा लाभ मिळणार आहे, लवकरच ही प्रोसेस सुरु केली जाईल. राज्य सरकारकडून ई-केवायसीच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याची कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.
दरम्यान, जून महिन्यापासून जवळपास 26 लाख महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत 2 कोटी 63 लाख महिलांनी लाभ घेतला आहे. त्यापैकी आता फक्त 2 कोटी 41 लाख महिलांना लाभ मिळणार आहे.
दरम्यान वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त आहे.कुटुंबात सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी आहेत
कुटुंबात आयकर भरतात, माजी/सध्याच्या आमदार-सांसद किंवा उच्चपदस्थ सरकारचे अधिकारी आहेत.
कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे. (ट्रॅक्टर वगळता)
ज्या महिलांना इतर योजनांअंतर्गत दरमहा लाभ उपलब्ध आहे, अशा महिलांना वगळणार.
ज्या महिला लग्नानंतर महाराष्ट्र सोडून इतर राज्यात स्थलांतरीत झाल्या त्यांना योजनेतून वगळलं जाईल.
निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांना लाभ देणाऱ्या सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आता छाननीच्या नावाखाली लाखो महिलांना योजनेतून वगळण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, बोगस माहिती देऊन लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी महिलांवर होणारी कारवाई आणि योजनेची पुढील दिशा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. .
आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याची संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
परळी — तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. केज येथील एका शैक्षणिक संस्थेत अनुकंप तत्त्वावर हा तरुण पूर्वी कार्यरत होता. याच संस्थेतील संस्थाचालकांनी त्रास दिल्याच्या कारणावरून संबंधित तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललं अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी श्रीनाथ गोविंद कराड 25 वर्ष याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो परळी तालुक्यातील वसंत नगर येथील प्राथमिक आश्रमशाळेत अनुकंपा तत्त्वावर सेवक म्हणून एक महिन्यापूर्वीच सेवेत रुजू झाला होता. यापूर्वी तो केज येथील एका निवासी शाळेत चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होता. त्या ठिकाणी 12 वर्ष झाले. तरी त्याला संस्थाचालकांनी कायमस्वरूपी करून घेतलं नव्हतं. यामुळे तो आर्थिक आणि मानसिक संकटात असल्याचं देखील बोललं जात आहे. केज येथील याच संस्थेत त्याच्या वडिलांनीही शिक्षक म्हणून अनेक वर्ष सेवा दिल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, एक
महिन्यापूर्वी तो परळी तालुक्यातील वसंत नगर येथील प्राथमिक आश्रम शाळेत सेवक म्हणून लागला होता. दरम्यान, श्रीनाथ याने नंदागौळ येथे आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेमुळे
परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये संस्थाचालक संजय राठोड व उद्धव कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करीत असल्याचं सांगण्यात आलं आहे.










