Home क्राईम वडिलांच्या मित्राकडूनच मुलीवर 4 महिने लैंगिक अत्याचार; माजी सरपंचा विरुद्ध गुन्हा दाखल

वडिलांच्या मित्राकडूनच मुलीवर 4 महिने लैंगिक अत्याचार; माजी सरपंचा विरुद्ध गुन्हा दाखल

0
9

आष्टी — तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. वडिलांचाच मित्र असलेल्या माजी सरपंच नवनाथ आयंदे याने अल्पवयीन मुलीवर चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडितेला दिवस गेल्याने हे प्रकरण समोर आले. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ आयंदे आणि पीडितेचे वडील मित्र आहेत. त्यामुळे आरोपीचे पीडितेच्या घरी व शेतात सतत येणे-जाणे होते. पीडित तरुणी 12 वी झालेली असून वडिलांना शेतीकामात मदत करत होती.

साधारण चार महिन्यांपूर्वी पीडिता शेतात केळीला पाणी देत असताना आरोपीने तिच्या शेतात येऊन पैशाचे आमिष दाखवले व जबरदस्तीने अत्याचार केला. नकार देऊनही आरोपीने वारंवार अत्याचार केल्याने पीडितेच्या पोटात दुखू लागले. वडील व मावस भावाने तिला माजलगाव येथील खासगी दवाखान्यात नेले. सोनोग्राफीत ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी तिला तात्काळ सरकारी दवाखान्यात पाठवले.

वडिलांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडितेने नवनाथ आयंदे याने जबरदस्ती केल्याचे सांगितले. या प्रकरणी प्रथम माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी आष्टी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. आष्टी पोलीस अधिक तपास करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here