शालार्थ आयडी घोटाळा: मी तर एसआयटीचा भावड्या; पैसे गोळा करण्यासाठी बबड्याच्या अशाही वावड्या

बीड — राज्यात सध्या गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” खणून काढण्याचं काम एस आय टी करत आहे. समितीमध्ये प्रामाणिक अधिकाऱ्यांची शासनाने नियुक्ती केलेली असताना देखील आरएसएस विचारधारेने मांडीवर घेतलेल्या बबड्या अर्थात “चंद्रा” (अती शहाणा) ने यामध्ये देखील कसे “कांत” आहोत याचा परिचय दिला एसआयटीतील अधिकाऱ्यांशी माझे संबंध असून ती मॅनेज करण्यासाठी पैसा द्यावाच लागेल अशा वावड्या उडवत अनेक शिक्षकांना गंडा घातल्याचं सांगितलं जात आहे.
भाशिप्र संस्थेच्या माध्यमातून देश हित ,संस्कार यासारख्या कथित गप्पा मारणाऱ्या आरएसएस विचारधारेने मांडीवर घेतलेला “बबड्या” ने आपली गुण उधळायला सुरुवात केली. “वाण नाही पण गुण लागला” याच म्हणीचा प्रत्यय इथे देखील संचालक मंडळातील सदस्यांच्या बाबतीत खरा ठरला. मग काय “एकमेका साह्य करू अवघे धरू कुपंथ” असं म्हणत “चंद्रा“च्या कलेप्रमाणे भ्रष्टाचार पोसण्यास मदत केली. वेतन घोटाळा असो की शालार्थ आयडी घोटाळा, जमीन घोटाळा अथवा संस्थेच्या नावाखाली मान्यता नसताना बोगस इंग्रजी शाळा सुरू करत पालकांना लुटत देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ मांडला.
यासारख्या गोष्टीवरच हे प्रकरण थांबलं नाही तर शासनाने शालार्थ आयडी घोटाळ्यात नियुक्त केलेल्या एसआयटीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल? एसआयटी कडे संशयाने पाहिले जाईल अशी कृती करण्यास देखील त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपूर विभागात एस आय टी ने केलेल्या कारवायांनी अनेक भ्रष्टाचारी शिक्षण संस्था चालकासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, मुख्याध्यापक शिक्षक यांना जेलची हवा खावी लागत आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे तपासाला लागणारा विलंब बीडच्या शिक्षण संस्थांमध्ये पाळे”मुळे” पसरवत भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या सध्या तरी फायद्याचा ठरला. आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. कुणातच तितका दम नाही. असं म्हणत एस आय टी बाबत अनेक वावड्या (अफवा) पसरवण्याच काम भ्रष्टाचारी टोळीचा “कांत” बनलेल्या “बबड्या” ने केलं. बरं एसआयटीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित देखील केलेलं आहे.अशावेळी एस आय टी चे कारवाई झाकोळून टाकण्याच काम केलं गेलं.

यामध्ये एस आय टी आपण मॅनेज केली. त्यासाठी मोठी रक्कम मोजली अशी वावडी उठवत भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवणाऱ्या “प्रसार माध्यमांची” देखील दिशाभूल केली. त्यामुळे पाहिजे तितका आवाज प्रसार माध्यम उठवताना सध्या तरी दिसत नाहीत.
सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये एसआयटी शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करत आहे. चौकशीला सामोरे जाताना अनेकांना छ.संभाजीनगरच्या चकरा माराव्या लागत आहेत. हे वास्तव चित्र असताना एस आय टी ला बदनाम करताना “बबड्या” ने मात्र वावडीच्या जीवावर प्रत्येक शिक्षकाकडून पैसा उकळत कोट्यावधी रुपयाची कमाई केल्याचं सांगितलं जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles