बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची बदली; धाराशिवची नवी जबाबदारी

बीड — मागील तीन वर्षांपासून बीड जिल्ह्यात कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले  सचिन पांडकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांची धाराशिव येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी बीडमध्ये कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बीडमध्ये रुजू होण्यापूर्वी सचिन पांडकर यांनी मुंबई येथे मानवी हक्क अभियान विभागात पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्यांची बीड जिल्ह्यात बदली झाली होती. या काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनेक संवेदनशील घटनांमध्ये त्यांनी संयमाने आणि प्रभावीपणे परिस्थिती हाताळत प्रशासनाला स्थैर्य दिले.


शांत ,संयमी, मितभाषी आणि लोकाभिमुख अधिकारी अशी ओळख असलेल्या पांडकर यांनी बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचा जनतेशी संवाद अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी घटनांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका आणि प्रशासनातील समन्वय यामुळे त्यांना नागरिकांमध्ये विशेष लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान करण्याचं कसब त्यांनी बीडमध्ये पणाला लावलं होतं. त्यामुळे त्यांची बीड मधील कार्य सेवा कायम संस्मरणीय राहणार आहे.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या अप्पर पोलीस अधीक्षकांपैकी एक म्हणून त्यांची नोंद घेतली जात आहे. त्यांच्या बदलीनंतर आता बीडमध्ये नवीन अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles