Home क्राईम बीड जेलमध्ये कराड गँगची दहशत? ऑडिओ क्लिप व्हायरल 

बीड जेलमध्ये कराड गँगची दहशत? ऑडिओ क्लिप व्हायरल 

0
11

बीड —  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपींची दहशत आता जेलमध्येही सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार कथित व्हायरल ऑडिओ क्लिप मुळे समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगमधील सदस्यांविरोधात यामधून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

 काय आहे संपूर्ण प्रकरण?

बीड जिल्हा कारागृहात कैद असलेल्या सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या साथीदारांनी एका कैद्याला बेदम मारहाण केल्याचा दावा एका कथित ऑडिओ क्लिपमधून करण्यात आला आहे.

ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असली तरी तिची अधिकृत पडताळणी अद्याप झालेली नाही.

व्हायरल ऑडिओ क्लिपमधील धक्कादायक दावा

कथित ऑडिओमध्ये संबंधित कैदी आपल्या नातेवाईकाशी बोलताना सांगतो की,सहा नंबरच्या बराकमध्ये त्याला निर्दयपणे मारहाण करण्यात आली या मारहाणीत त्याचा हात मोडला असून गंभीर दुखापत झाली आहे ‌
जेलमधील काही पोलिस आरोपींशी संगनमत करून तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहेत
तसेच, “आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही” अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

प्रशासनावरही गंभीर आरोप

संबंधित कैद्याने जेल प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत पोलिसांनी आरोपींकडून पैसे घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून
तक्रार केल्यानंतर उलट धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला गेला आहे.जेल अधीक्षकांकडूनही दुर्लक्ष होत असल्याचा दावा

 जेल प्रशासनाचे स्पष्टीकरण

या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देताना कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी सांगितले:
कैद्यांमध्ये केवळ शाब्दिक वाद झाला होता
मारहाणीचा कोणताही प्रकार घडलेला नाही
दोन्ही गटांनी लेखी स्वरूपात तक्रार नसल्याचे दिले आहे
सध्या या प्रकरणात दोन वेगवेगळे दावे समोर येत आहेत.एकीकडे गंभीर मारहाणीचे आरोप, तर दुसरीकडे प्रशासनाचा इन्कार.व्हायरल ऑडिओ क्लिपची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच सत्य समोर येणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here