30 हजारांची लाच घेताना अधीक्षक रंगेहात पकडला

बीड —  शहरातील पालवण चौक परिसरात सोमवारी (दि. 13) संध्याकाळी मोठी कारवाई करत जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शासकीय निरीक्षणगृहाचा प्रभारी अधीक्षक कपिल भीमराव कांबळे याला 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

तक्रारदार हा शासकीय निरीक्षणगृहात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याची हजेरी नियमितपणे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी आणि आवश्यक आदेश काढण्यासाठी आरोपी अधीक्षक कांबळे याने सुरुवातीला 45 हजार रुपयांची लाच मागितली होती.त्यानंतर दोघांमध्ये तडजोड होऊन 30 हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले.
रविवारी (दि. 12) या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर जालना ACBने तत्काळ पडताळणी केली. खात्री झाल्यानंतर सोमवारी पालवण चौक परिसरात सापळा रचण्यात आला.
यावेळी आरोपी कांबळे लाचेची 30 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडला गेला. त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपीच्या घराची झडती घेण्यासाठी बीड ACBचे स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले असून अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सतत उघडकीस येत असलेल्या लाचखोरीच्या प्रकरणांमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles