बीड — शहरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ३५ वर्षीय पोलीस अंमलदार बाळकृष्ण जायभाये यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस दलात आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

🚨 नेमके काय घडले ?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण जायभाये हे ६ एप्रिल रोजी एका बेपत्ता मुलीच्या तपासासाठी पुण्याला गेले होते. ७ एप्रिल रोजी रात्री उशिरा ते घरी परतले आणि काही तासांतच ही दुर्दैवी घटना घडली.मध्यरात्री सुमारे २ वाजता ही घटना घडल्याचा अंदाज आहे घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याच्या लोखंडी गजाला दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले.
घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावलेली असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले.
घटनास्थळावरील संशयास्पद बाबी
घटनास्थळी आढळलेल्या काही गोष्टींमुळे या प्रकरणाबाबत विविध चर्चा सुरू आहेत:
🕳️ दरवाजाजवळ एक बॅट आढळली
🕳️ जिन्याजवळ दोन पायऱ्याचा (स्टूल) सापडला
🕳️ मृतावस्थेत एक पाय जमिनीवर तर दुसरा वाकड्या अवस्थेत
या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर नेमके काय घडले याचा तपास सुरू आहे.
👮♂️ तपासाला वेग
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
शवविच्छेदनानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या कामाच्या ताणामुळे केली गेली की व्यक्तिगत काही कारण आहे पोलिसांकडून सर्व अंगांनी याची चौकशी केली जात आहे.
पोलीस दलात शोककळा
बाळकृष्ण जायभाये यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

