केज — एका विवाहित महिलेने पतीकडून इच्छेविरुद्ध अनैसर्गिक संबंध करण्यास भाग पाडले जात आहे. तसेच दहा लाख रुपयांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत असल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पीडित महिलेचा पती तिला वारंवार जबरदस्तीने अनैसर्गिक पद्धतीने संबंध करण्यास भाग पाडत असून फ्लॅट खरेदीसाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करीत होता. यास नकार दिल्यास तिच्यावर मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तसेच सासरच्या कुटुंबातील इतर सदस्यही पैशाच्या मागणीसाठी तिचा छळ करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी पतीसह सासू, सासरे, दोन नंदा व इतर अशा सात जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ८५, ६४, ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

