शारदा क्रीडा महोत्सवात बुद्धीबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

बुद्धिबळ स्पर्धेत प्राथमिक गटातून अथर्व शिंदे तर माध्यमिक गटातून सिद्धांत निकम प्रथम

गेवराई — शारदा क्रीडा महोत्सवात आयोजित केलेल्या बुद्धीबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत प्राथमिक गटातून शारदा विद्या मंदिरच्या अथर्व शिंदे याने तर माध्यमिक गटातून विशारदा पब्लिक स्कूलच्या सिद्धांत निकमने प्रथम क्रमांक पटकावलाअसून सर्व विजेत्यांचे शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांनी अभिनंदन केले आहे.

क्रीडा महोत्सवात आयोजित केलेल्या बुद्धीबळ स्पर्धेत जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेतील १८ शाळेचे प्रत्येकी दोन स्पर्धक सहभागी झाले होते होते. अंतिम स्पर्धेत प्राथमिक गटातून शारदा विद्या मंदिर गेवराईच्या शिंदे अथर्व याने प्रथम तसेच शारदा विद्या मंदिरच्याच कु. लाड ज्ञानेश्वरी हिने द्वितीय तर माध्यमिक विद्यालय सिरसदेवीच्या कादे जगननीवास याने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात शिवशारदा पब्लिक स्कूल शिवाजीनगरच्या निकम सिद्धांत याने प्रथम व शारदा विद्या मंदिर गेवराईच्या खकाळ यश याने द्वितीय तर शारदा विद्या मंदिर गेवराईच्या कु. वेताळ सई हीने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत आर्बिटर म्हणून शेंडगे आर. एस. आणि
क्षिरसागर डी.के. यांनी काम पाहिले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांनी अभिनंदन केले असून लवकरच एका कार्यक्रमात सर्व विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी क्रीडा शिक्षकांसह, मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी खेळाडू आणि क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles