बीड — गुन्हेगारीच्या घटनांनी बीड जिल्हा चर्चेत राहत असल्याचं चित्र आहे. अशातच आणखी एक खळबळजनक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काम देण्याची भुलथाप देत एका तृतीय पंथीयानं (transgender)भयानक कृत्य केलं. एका २० वर्षीय तरूणीला आपल्या साथीदारांच्या हवाली केलं. नंतर आळीपाळीने तिघांनी तिच्यावर बलात्कार (rape case)केला. या प्रकरणी पोलिसांनी तृतीय पंथीयासह चौघांवर अंबाजोगाई (ambajogai)ग्रामीण पोलीस (rural police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना शनिवारी पहाटे घडली.या घटनेतील पीडिता (वय २०) मुळची हैद्राबाद येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. ती मुंबईत (Mumbai)घरगुती साफसफाईच्या कामावर होती. पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ती मुंबईहून हैद्राबादला (Hyderabad)जाण्यासाठी रेल्वेने(railway) निघाली होती. भूक लागल्याने ती परळीत (railway station)उतरून एका हॉटेलमध्ये जेवत असताना तृतीयपंथी पूजा गुट्टे हिची नजर तिच्यावर पडली.
पुजाने तिच्याकडून तिचीच माहिती काढून घेत तिची गरज जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तृतीय पंथीयानं तिला काम देण्याची भुलथाप दिली. त्यानंतर पूजाने सतीश अण्णासाहेब मुंडे (रा. डाबी, ता. परळी) आणि मोहसीन सरदार पठाण (रा. शिवाजीनगर, परळी) या दोघा साथीदारांना बोलावून घेतले.
त्यानंतर ते तिघे पिडीतेला मोटारसायकलवर बसवून अस्वलआंबा येथील भागवत अंगद कांदे या चौथ्या साथीदाराकडे घेऊन गेले. तिथे एका मंदिराशेजारी असलेल्या भागवत कांदे याच्या मालकीच्या खोलीमध्ये घेऊन गेले. नंतर जीवे मारण्याची धमकी देत तिला मारहाण केली. नंतर तिघांनी तिच्यावर आळीपाळीने जबरदस्ती करत बलात्कार (rape)केला.
दरम्यान, गावात सुरु असलेल्या या घृणास्पद प्रकाराची माहिती एका सजग नागरिकाने शनिवारी पहाटे डायल 112 वर कॉल करून पोलिसांना दिली. या माहितीची गांभीर्याने दखल घेत परळी ग्रामीण ठाण्याचे सहा. फौजदार टोले यांनी अस्वलआंबा गाठले आणि पिडीतेची सुटका केली. यावेळी पोलिसांना पाहताच पूजाने घटनास्थळाहून पळ काढला. मात्र सतीश मुंडे, मोहसीन पठाण आणि भागवत कांदे यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

