Monday, February 3, 2025

भगवानगड संतोष देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी — महंत नामदेव शास्त्री

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकता सुद्धा तपासावी लागेल. धनंजय मुंडे यांना नाहक त्रास दिला जात आहे. असं वक्तव्य केल्यानंतर महंत नामदेवशास्त्री यांच्यावर राज्यभरातून टीकेची जोड उठली.आपली बाजू समजावून सांगण्यासाठी आज देशमुख कुटुंबिय गडावर पोहचले. त्यांनी महंतांची भेट घेतली. त्यांनी संतोष देशमुख यांच्या खूनामागील खरं कारण, आरोपींचा पूर्व इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, त्यांच्यावरील गुन्ह्यांचा कच्चाचिठ्ठाचा महाराजांपुढे मांडला. आरोपींच्या गुन्ह्याचा पाढा वाचून संतोष देशमुख यांचे काय चुकले असा प्रश्न केला. धनंजय देशमुख यांच्या आर्त हाक नामदेव शास्त्री यांनी ऐकली. त्यांनी लागलीच भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले.

महंतांच्या भेटीला गेलेल्या देशमुख कुटुंबाने कधीच जातीवाद केला नाही, असे धनंजय देशमुख यांनी सांगितले. देशमुख कुटुंबियांची जमीन मुंडे कुटुंब दोन पिढ्यांपासून कसत आहे, त्याची माहिती त्यांनी महंतांना दिली. प्रामाणिकपणे सांगतो. मनोहर मुंडेंचे चार मुले होते.दोन मुले पुण्यता होते. दोन मुले इथे. त्यांनी जे पिकवलं ते आम्ही खातो. देशमुख कुटुंबाने जातीवाद केला असता तर त्याच्या हत्येनंतर दिसलं असतं. दलित बांधावाला वाचवण्यासाठी गेला. असे धनंजय देशमुख म्हणाले.

आमची कोणतीही गुन्हेगारी नाही. १५ वर्ष सरपंच राहिलेल्या माणसाशी या लोकांनी संपर्क साधायला हवा होता. आरोपींवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आरोपींची मानसिकता तपासण्याची गरज आहे. ज्याला आरोपींची बाजू घ्यायची त्यालाच जातीयवादाचा अंश येत आहे. आम्ही सर्व दाखवलं आहे. यांच्या कार्यालयात बसायचे. त्यांच्या गाडीत फिरायचे, असे देशमुख म्हणाले.
संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर हत्या झाली
आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्यासोबत आहे. राजकीय नेते, संप्रदायाचे लोक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आमच्यासोबत आहेत. न्यायाच्या भूमिकेत आहेत. अशावेळी लोकप्रतिनिधींना जातीयवादी म्हणू नका. नाही तर ते कोणत्याच न्यायाच्या भूमिकेत येणार नाही. न्याय मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना चुकीचं ठरवू नका, ही न्याय ची लढाई आहे.अशी विनंती धनंजय देशमुख यांनी केली.
दरम्यान देशमुख कुटुंब भगवान बाबाला मानणारं आहे. जातीय सलोखा या गावात होतं. यापूर्वी किती वेळा गडावर आले हे त्यांनी दाखवलं. भगवान गड तुमच्या पाठी कायम राहील ही ग्वाही देतो, असे वक्तव्य नामदेव महाराजांनी केले. भगवान गडाला मानणारं कुटुंब आहे. यापूर्वी ते गडावर येत होते. आरोपींची पार्श्वभूमी असलेले पुरावे त्यांनी दिले आहेत. धनंजय यांचं म्हणणं आहे की, याला जातीयवादाचं स्वरुप देऊ नका,. भगवान गड कायम स्वरुपी देशमुख कुटुंबाच्या पाठी उभं राहील. आरोपींची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर गुन्हे किती आहे, ते त्यांनी दाखवलं.

संतोष अण्णाने किती काम केलं हे त्यांनी दाखवलं. ते मूळचे बाबाचे आहेत. हे आज कळालं. त्यांची जमीन तीन पिढ्यांपासून वंजारी कुटुंब करत आहे. जातीयवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे गादीवरून सांगणं आहे. आम्ही बसून बोलू. त्यांना दोन घास खाऊ घालू. त्यांना प्रसाद देऊ. संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळेल, असे महंत म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles