बीड — अवैध वाळू उपसा केल्या प्रकरणात आरोपींसोबत साटे लोटे करणाऱ्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांनी ही कारवाई केली आहे. गेवराई येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांच्यावर ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे या दोघांनी वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाईचे आदेश दिले होते. पण तरीही वाळूसह वाहन ताब्यात न घेता फक्त वाहन ठाण्यात आणून लावले. तसेच गुन्हा दाखल करण्यासही विलंब केला. या गोष्टी गुन्हेगारांना मदत करण्यासारखी आहे. यावर आता पोलीस अधिक्षक नवनीत कांवत यांनी सहाय्यक फौजदारासह हवालदारावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.