एस पी. कांवत समोर नव “नीत” आव्हानं
पिंपळनेर — शेतात राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण करत मोटार सायकल जाळून टाकल्याची घटना पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील लिंबारूई देवी येथे रविवारी रात्री घडली.

मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं जगन्नाथ ज्ञानोबा नांदे वय 57 वर्ष असं नाव आहे. पिंपळनेर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे दरम्यान शेतकरी दि.22 रोजी वार राञी 8 वाजण्याच्या सुमारास शेतात गहू ,हरभरा , भुईमूग पिकासाठी पाणी देणे, वन्यप्राण्यांपासून बचाव करण्यासाठी पिकांची राखन करण्यासाठी शेतातच बाज टाकून शेतात बाजावर बसलेले असताना अचानक अज्ञात दोन तीन व्यक्ती आले आणि काठी ने बेदम मारहाण करून प्राणघातक हल्ला चढवला आणी बेशुद्ध होई पर्यंत मारहाण करण्यात आली तसेच रस्त्यावर लावण्यात आलेली मोटार सायकल MH 13BW3293मोटार सायकल जाळली असल्याची माहिती मारहाण झालेल्या शेतकरी नांदे यांचे बंधू भास्कर नांदे यांनी दिली आहे. सदरील घटना गंभीर असल्याने शेतकऱ्यांना शेतात बेदम मारहाण झाल्यामुळे शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे मारहाण करणाऱ्यांना आरोपींना तात्काळ शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

