बीडच्या 51 लाखांच्या तेलाची चोरी! टँकर पलटीचा बनाव, धुळ्यात 30 लाखांचं तेल जप्त

Spread the love

बीड तेल चोरी - टँकर पलटीचा बनाव

बीड तेल चोरी करून टँकर अपघाताचा बनाव केल्याचा प्रकार उजेडात आणण्यात पोलिसांना यश आले आहे

बीड — गुजरातला पोहोचवण्यासाठी दिलेले तब्बल ५१ लाख ९० हजार रुपयांचे कॉटन वॉश ऑईल परस्पर विकून टँकर पलटी झाल्याचा बनाव रचण्यात आला. धुळे-सुरत महामार्गावरील अपघाताची खोटी कहाणी उभी करून तेलाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या टँकर चालकाचा प्रकार बीड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात धुळे येथील तेल खरेदीदाराकडून २९ लाख ९५ हजार ६९४ रुपयांचे २० टन तेल जप्त करण्यात आले आहे.

बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्यात या प्रकरणी २० नोव्हेंबर २०२६ रोजी अभिषेक जगदीश चरखा यांनी फिर्याद दिली होती. त्यांची बीड येथील माऊली अॅग्रो फूड अँड ऑईल इंडस्ट्रीज ही कंपनी असून, कंपनीतून ३५ हजार ३० किलो कॉटन वॉश ऑईल गुजरातमधील चांगोदर येथील अंबर प्रोटिन इंडस्ट्रीजमध्ये पाठविण्यात आले होते. या तेलाची किंमत ५१ लाख ९० हजार रुपये होती.

याआधीची बीड मधील अशीच मोठी कारवाई वाचा – नापास करण्याची धमकी देत ११ महिने लैंगिक छळ! बीडमध्ये प्राध्यापकाचे संतापजनक कृत्य उघड

मात्र, संबंधित तेल गुजरातमधील कंपनीपर्यंत पोहोचलेच नाही. टँकर चालक जसवंत सिंग गुरुचरन सिंग याने वाटेतच तेलाची परस्पर विक्री किंवा विल्हेवाट लावली. त्यानंतर धुळे-सुरत रस्त्यावरील व्यारा तालुक्यातील वीरपूर गावाजवळ रिकामा टँकर पलटी करून अपघात झाल्याचा बनाव रचला. या प्रकारातून फिर्यादीची फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

हे देखील बातमी वाचा – चंपावती शिक्षण संस्थेतील भ्रष्टाचाराचे नवे प्रकरण; चार शिक्षकांच्या दुहेरी वेतनाचे पुरावे समोर

या फिर्यादीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२) आणि ३१८(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

 बीड तेल चोरी : रिकामा टँकर पलटी करून रचला बनाव 

गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मन्सूर शहा यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त टँकरची पाहणी केली. यावेळी टँकर रिकामा असल्याचे आणि चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे समोर आले. त्यामुळे अपघाताबाबत संशय निर्माण झाला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करून पोलिसांनी धुळे आणि गुजरात परिसरात शोधमोहीम राबवली.

टँकर चालक जसवंत सिंग गुरुचरन सिंग (रा. तरनतारन, पंजाब) याचा शोध घेण्यात आला. मात्र, तो पोलिसांना मिळून आला नाही. त्याच्या संपर्कातील व्यक्ती, टँकर चालक आणि ऑईल मिलशी संबंधित लोकांकडे चौकशी सुरू करण्यात आली.

बीड तेल चोरी प्रकरणात धुळ्यातील तेल खरेदीदाराकडून ३० लाखांचे तेल जप्त

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी धुळे येथील मोहाडी उपनगरातील अनिल उत्तम तोटे याच्याकडे तपासाची दिशा वळवली. त्याच्याकडे चौकशी करून विश्वासात घेतल्यानंतर टँकरमधील तेलाच्या विक्रीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी २० टन कॉटन वॉश ऑईल, किंमत २९ लाख ९५ हजार ६९४ रुपये, जप्त केले. हे तेल संबंधित कंपनीचे मालक आणि फिर्यादी अभिषेक चरखा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

या प्रकरणातील मुख्य टँकर चालक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. तेल फसवणुकीच्या गुन्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्याची बीड पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बीड तेल चोरी प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक मन्सूर शहा, पोलीस हवालदार सुभाष मोठे, नितीन राठोड, पोलीस अंमलदार कल्याण जाधव, दीपक भोजे आणि तांत्रिक विश्लेषण शाखेचे अश्विन सुरवसे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

बीड तेल चोरी प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या बीड तेल चोरी प्रकरणात पोलिसांनी टँकर चालक आणि मालकाला ताब्यात घेतले आहे. सुरुवातीला टँकर पलटी झाल्याचा बनाव करण्यात आला होता, मात्र पोलिसांच्या चौकशीत हा बनाव उघड झाला. या चोरीमुळे तेल कंपनीचे 51 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणात आणखी कोण कोण सामील आहे, याचा पोलीस आता सखोल तपास करत आहेत. तसेच, या टोळीने याआधी देखील अशा प्रकारे चोरी केली आहे का, हे देखील तपासले जात आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे.

बीड पोलीस अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा – बीड पोलीस अधिकृत वेबसाईट

📲

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवायच्या आहेत का?

बीड सह राज्यातील ताज्या बातम्या, थेट तुमच्या WhatsApp वर - अगदी फ्री

WhatsApp चॅनल Follow करा →

✓ 100% फ्री   •   ✓ रोज अपडेट   •   ✓ कधीही Unfollow करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *