महिला आरक्षण आणि परिसीमनासाठी केंद्राची पुन्हा तयारी; 30 नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष कामकाज

Spread the love

महिला आरक्षण आणि परिसीमनमहिला आरक्षण आणि परिसीमन साठी केंद्र सरकारने पुन्हा तयारी सुरू केली आहे.

नवी दिल्ली — महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघांच्या परिसीमनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संसदेचे कामकाज पुन्हा सुरू करण्याची तयारी केली असून, 30 नोव्हेंबरपासून लोकसभेचे, तर 2 डिसेंबरपासून राज्यसभेचे अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज 3 डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. आवश्यक शासकीय कामकाज पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

रिजिजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या. लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांना सरकारकडून अधिवेशन पुन्हा सुरू करण्याची विनंती करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऑगस्ट 2026 मध्ये पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होणार आहे.

महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयकावर लक्ष

या अधिवेशनात महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयके मांडली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मात्र, या विधेयकांबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

महिलांना लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सप्टेंबर 2023 मध्ये संसदेने घेतला होता. ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ या नावाने हा कायदा मंजूर करण्यात आला. मात्र, कायदा मंजूर झाला असला तरी प्रत्यक्ष आरक्षण लागू होण्यासाठी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.

 महिला आरक्षण आणि परिसीमन कधी लागू होणार?

राज्यघटनेतील कलम 334-A नुसार, संबंधित जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे महिला आरक्षणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग जनगणनेशी जोडला गेला आहे.

देशाची पुढील जनगणना 2027 मध्ये होणे अपेक्षित आहे. जनगणनेची आकडेवारी अंतिम झाल्यानंतर परिसीमन आयोगाची स्थापना, मतदारसंघांच्या सीमांची नव्याने निश्चिती आणि आरक्षित जागांचे निर्धारण अशा प्रक्रिया पार पाडाव्या लागतील. या सर्व टप्प्यांना वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण लागू करण्याचे उद्दिष्ट साध्य करणे हे सरकारसमोर मोठे आव्हान ठरू शकते.

लोकसभेच्या जागा 543 वरून 816 करण्याचा प्रस्ताव

यापूर्वी 2026 मध्ये केंद्र सरकारने महिला आरक्षण आणि परिसीमनाच्या अनुषंगाने तीन कायदेविषयक प्रस्ताव पुढे आणले होते. त्यामध्ये संविधानाची 131 वी घटनादुरुस्ती आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित प्रस्तावांचा समावेश होता.

2011 च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचनेचा मार्ग मोकळा करणे आणि लोकसभेतील विद्यमान 543 जागांची संख्या वाढवून 816 करण्याचा प्रस्ताव या आराखड्यात होता. त्यानुसार महिलांसाठी 273 जागा राखीव ठेवण्याची योजना मांडण्यात आली होती.

दोन-तृतीयांश बहुमताचे आव्हान

मात्र, 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत मांडण्यात आलेले घटनादुरुस्ती विधेयक आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत मिळवू शकले नाही. त्यामुळे संबंधित परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित प्रस्तावांवरील पुढील कार्यवाही रखडली.

घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी लोकसभेत आणि राज्यसभेत विशेष बहुमताची आवश्यकता असते. त्यामुळे सरकारला विरोधी पक्षांचे समर्थन मिळवणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

आता 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या कामकाजाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण आणि परिसीमनाबाबत सरकार नेमकी कोणती भूमिका मांडते, तसेच पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी कोणती पावले उचलली जातात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

महिला आरक्षण आणि परिसीमन या मुद्द्यावर देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. महिला आरक्षण आणि परिसीमन लागू झाल्यानंतर लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या लोकसभेत महिलांचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे 33 टक्के आरक्षण हा महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. मात्र या आरक्षणासाठी परिसीमनाची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. परिसीमना शिवाय आरक्षित जागा ठरवता येणार नाहीत.

महिला आरक्षण आणि परिसीमन बाबत सरकारने 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात काय भूमिका मांडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनगणना 2027 मध्ये झाल्यानंतर मतदारसंघांची नव्याने रचना होणार आहे. त्यानंतरच महिलांसाठी कोणत्या जागा राखीव असतील हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे 2029 च्या निवडणुकीपूर्वी हा कायदा लागू होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विरोधी पक्षांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.

हे देखील वाचा: चंपावती शिक्षण संस्थेतील भ्रष्टाचाराचे नवे प्रकरण; चार शिक्षकांच्या दुहेरी वेतनाचे पुरावे समोर

अधिकृत माहितीसाठी: संसदेच्या अधिकृत वेबसाईटवर महिला आरक्षण आणि परिसीमन संदर्भातील माहिती पहा

📲

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवायच्या आहेत का?

बीड सह राज्यातील ताज्या बातम्या, थेट तुमच्या WhatsApp वर - अगदी फ्री

WhatsApp चॅनल Follow करा →

✓ 100% फ्री   •   ✓ रोज अपडेट   •   ✓ कधीही Unfollow करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *