बीड: एसपींच्या जवळचा म्हणून ‘बाजार’ मांडणारा पीआय अखेर एसीबी चौकशीच्या फेऱ्यात; लाखोंच्या तडजोडीचे ऑडिओ-स्क्रीनशॉट एसपींच्या हातात

Spread the love

बीड पीआय लाच प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे. बीड: एसपींच्या जवळचा म्हणून ‘बाजार’ मांडणारा पीआय अखेर एसीबी चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे.

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा युवा सेना बीड जिल्हा

- जाहिरात -

बीड – पोलीस अधीक्षकांच्या पुढे पुढे करायचे, कर्तव्यदक्षतेचा रुबाब गोरगरिबावर झाडायचा मोठं प्रकरण आलं की “शितल”डोक्याने मलिदा लाटायचा टप्प्यात कार्यक्रम करायचा यासाठी मधुर वाणीच्या अस्त्राचा वापर करत. टपकणारी ‘लाळ’ “ब”ळेच झाकायचा प्रयत्न करायचा अशा करामती पी आय च्या भानगडी एसपींच्या समोर पुराव्यानिशी आल्या मग काय एसीबी चौकशीच्या फेऱ्यात तो अखेर अडकला
जालना जिल्ह्यातल्या गोंदी पोलीस ठाण्यात विनयभंग प्रकरणातून चर्चेत राहिलेलं हे पी आय च व्यक्तिमत्व सातत्याने बीड जिल्ह्यात ठाण मांडून बसलं.वाणीत असलेली मधुरता टप्प्यात कार्यक्रम करायचा यासाठी आवश्यक असणारी “शीतल”ता वेळ पडली तर पुढे पुढे करण्याचा अंगी असलेल्या गुणांच्या जोरावरच बदली झाली तरी तो दोन दिवसातच बीड मधील खुर्चीवर जागेवर बसला पोलीस अधीक्षकांच्या राजकारण्यांच्या पुढे पुढे करण्याच्या गुणांचा फायदा यावेळी झाला. पोलीस अधीक्षकांच्या जवळचा माणूस म्हणून जनमानसात निर्माण झालेली प्रतिमा याचा त्याने “बाजार” मांडला. यातूनच धमक्या देण्याचे प्रकार देखील घडलेले आहेत. खाकीचा धाक दाखवल्याच्या तक्रारी देखील पोलीस दप्तरी नोंद आहेत.

पोलीस अधीक्षक नवनीत कांवत सारख्या प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिमेचा बाजार उठतो की काय अशी शंका निर्माण झाली तशी कुजबुजही ऐकायला मिळत होती.हे वास्तव चित्र निर्माण झालं होतं.

 बीड पीआय लाच प्रकरण कसं उघडकीस आलं?

आपल्यात असलेल्या उपजत गुणाच्या जोरावर पिंडीवरचा विंचू बनू पाहणाऱ्या या पी आय च्या पापाच्या घड्याला अखेर तडा गेला. एका खूप मोठ्या गंभीर प्रकरणांमध्ये “शितल” डोक्याने मधुर वाणीने “ब”ळेच टपकणारी “लाळ” हाताने पुसताना कर्म उघडकीस आलं. आरोपीच्या कुटुंबीयांना मदत करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची तडजोड केली. याचे पुरावे देखील समोर आले. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी गंभीर दखल घेत कारणे दाखवा नोटीस बजावली. गंभीर प्रकरणातील तक्रारदाराने तसेच आरोपीच्या कुटुंबीयांनी तोडपाणी करताना झालेल्या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग पोलीस अधीक्षकांच्या हाती सुपूर्द केले. एवढ्यावरही हे प्रकरण इथेच थांबले नाही. आणखी एका प्रकरणात पोलीस अधीक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेत होते. दरम्यान कॉन्फरन्स चालू असतानाच पोलीस अधीक्षकांच्या फोनवर आर्थिक व्यवहाराचे स्क्रीन शॉट मेसेज आले. या मध्ये देखील या पी आय ने आरोपीच्या कुटुंबीयांकडून स्वतःच्या पत्नीच्या अथवा नातेवाईकाच्या बँक खात्यावर ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याच्या पुराव्याचा तो स्क्रीन शॉट होता. दरम्यान संतापलेल्या पोलीस अधीक्षकांनी कोणाचेही नाव न घेता व्हॉइस कॉन्फरन्स मध्येच झापले त्यावेळी अनेकांना हा काय प्रकार पण आहे. हे समजले नाही पण याची चर्चा पोलीस वर्तुळात मोठ्या प्रमाणावर झाली

बीड पीआय लाच प्रकरण

 बीड पीआय लाच प्रकरण: एसीबी मार्फत होणार चौकशी?

या पी आय च्या तडजोडीचे समोर आलेले पुरावे. नातेवाईकांच्या खात्यावर झालेले व्यवहार याची सगळी चौकशी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.या बीड पीआय लाच प्रकरणाची चौकशी आता एसीबी मार्फत होणार आहे.

या चौकशीतून मोठमोठ्या प्रकरणांमध्ये किती तडजोड झाली. किती माल ढापला. पदाचा खाकीचा दुरुपयोग किती झाला याचा सगळा काला चिट्ठा जनतेसमोर येणार आहे.
हे प्रकरण पोलीस अधीक्षकांच्या लक्षात पुराव्यानिशी आलं हे खूप चांगलं झालं. या पोलिस अधिकाऱ्याच्या कर्तबगारी पोलीस अधीक्षकांच्या प्रतिमेला कलंकित करणारी होती. दरम्यान येणाऱ्या काळात या पोलिस अधिकाऱ्यावर काय कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षक नवनीत कांवत कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाबद्दल अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

बीड जिल्ह्यातील अशाच इतर महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी सह्याद्री माझा च्या मुख्य पानाला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *