चंपावती विद्यार्थी खरेदी प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. विद्यार्थी खरेदी उघड झाली हेडमास्तर निलंबित झाला पण गुन्हा दाखल करताना सगळा गोलमाल झाला...
बीड — शहराच्या नावलौकिकात एकेकाळी भर घालणाऱ्या चंपावती शिक्षण संस्थेने भ्रष्टाचाराची “देशमुखी“व डॉक्टर की आपल्याकडेच आहे. त्याला कवि “कालिदासा“ची कुशाग्र बुद्धी जोडीला आहे.मग काय “काळे” धंदे करायला मोकळे रान आपलेच. त्यात पुन्हा भर म्हणून “पैसा फेकला की माडी वरची खाली येते” असं म्हणत भ्रष्टाचाराने डागाळलेल्या “चंद्रा“ची नेहमीची मुक्ताफळे व याच मुक्ताफळातून भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” खोलवर कशी रुजली आहेत याची प्रचिती देणारा प्रसंग आज घडला आहे. चंपावती शाळेत अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकाला वाचवण्यासाठी उत्तराखंड मधील विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखवून पटसंख्या दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. चंपावती विद्यार्थी खरेदी प्रकरण उजेडात आलं तपास झाला. सारंग जोशी नावाचा मुख्याध्यापक निलंबित झाला. या प्रकरणात गुन्हा दाखल करताना शिक्षण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी गोल गोल अर्ज पोलीसात दाखल केला. त्यामुळे एवढं मोठ प्रकरण घडून देखील पोलिसांनी प्रकरण तपासावर ठेवलं. दरम्यान या प्रकारात गोलमाल करत “पैसा फेकला की माडी वरची खाली येणारी कोण? ‘चंद्रा’ची तो अथवा ती “कांता” कोण? यातून सारंग जोशीला वाचवतोय कोण? पोलीस की शिक्षणाधिकारी? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

चंपावती विद्यार्थी खरेदी प्रकरण ही तर चिल्लर बाब आहे. बोगस शिक्षक भरती असो कि प्रशांत कुलकर्णी सारखे टीईटी परीक्षेत गुन्हे दाखल असलेले आरोपी असो वेतन घोटाळा असो प्रत्येक प्रकरणात शाळेचे संचालक मंडळ भ्रष्टाचाराचं कुरण समजून कोपरापासून ढोपरापर्यंत ओघळ येईपर्यंत वरपायचं काम करत असल्याचा चित्र पाहायला मिळतं. चंपावती विद्यार्थी खरेदी प्रकारण घडले या प्रकाराच्या सोबतीला शिक्षण विभागाची “भ्रष्टाचारी यंत्रणा”पाठराखणीचा खेळ करताना दिसून येतं. संस्थेच्या अनेक तक्रारी दाखल आहेत तरी देखील संचालकापासून ते शिक्षणाधिकारी शिपायापर्यंत खुर्ची उबवत तक्रारीच्या माध्यमातून मांडी आड “माल”गोळा करत अभय दानाचं काम करत असल्याचं अनेक वेळा स्पष्ट झाला आहे. याच कारणामुळे भ्रष्टाचाराचा कलंक लागलेला “चंद्र” “पैसा फेकला की माडीवरची खाली येते”अशी मुक्ताफळ वाहत असल्याचं सांगितलं जातं. कदाचित याच कारणामुळे भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” भाशिप्र पासून चंपावतीपर्यंतच्या अनेक संस्थांमध्ये पसरली आहेत.
याच डागाळलेल्या “चंद्रा”ने वाहिलेल्या मुक्ता फळाची प्रचिती पुन्हा एकदा येऊ लागली आहे.चंपावती प्राथमिक शाळेने तीन विद्यार्थी उत्तराखंड येथून 28 सप्टेंबर रोजी विकत घेतले त्यामध्ये प्रिन्स रामचंद्र विश्वकर्मा, अर्णव रामभवन वर्मा आणि आर्यन चंद्रशेखर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत असल्याचे दाखवून चंपावती शाळेने तसा अहवाल ऑनलाईन सादर केला आणि अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकाला वाचवण्याच काम केलं. पण शेवटी “पादलेला वास झाकत नाही व केलेलं पाप लपत नाही” हा वाक्प्रचार खरा ठरला. चंपावती विद्यार्थी खरेदी प्रकरणाचा हा गडबड घोटाळा उजेडात आला. या प्रकरणाचा माध्यमातून स्फोट झाल्यानंतर चौकशीचा आदेश देण्यात आला. बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी बळेच का होईना पण तपास करून चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला. झाकण्यासारख चिल्लर प्रकरण नसल्याने तपासात उत्तराखंडातून तीन नव्हे तर शाळेने 22 विद्यार्थी खरेदी केल्याचे उघडकिस आले. यामध्ये 295 विद्यार्थी कमी असल्याचे देखील निदर्शनास आले. या घोटाळ्यात अडकलेला बोगस शिक्षक भरती झालेला तसेच बोगस पदोन्नती भेटलेला सारंग जोशी याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मत या प्रकरणात मागवले त्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. इथेच पंचायत झाली. शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक सारंग जोशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतंत्र “खास” ठिकाणी बैठक भरली. या बैठकीत शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्यात भ्रष्टाचारात डागाळलेला “चंद्र” सहभागी झाला. मग काय चंद्राने आपली “मुळे“किती खोलवर रुजली आहेत याची चुणूक काही क्षणात दाखवून दिली. बैठक पार पडली बैठकीनंतर ज्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी दिली त्या अधिकाऱ्याने आपल्यातले सगळे शिक्षणातले गट्स दाखवून देत गोल गोल तक्रार पोलिसात दिली. स्पष्ट तक्रार नसल्यामुळे तपास करून चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल अशी भूमिका पोलिसांनी घेतली. मग चंपावतीच्या मुख्याध्यापकाला वाचवण्यासाठी धडपडणारी “चंद्रा”ची तो किंवा ती ‘कांता’ कोण? असा नवा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
कारवाईत “शितल”मधुर वाणी “बल्ले”ची इथेही “लाळ” टपकलीच
चंपावती शिक्षण संस्थेत सुरू असलेल्या भ्रष्टाचारासह जातीय भेदाभेद होत असल्याच्या तक्रारी राम शिंदे नावाच्या शिक्षकाने थेट पोलीस अधीक्षकांकडे दिल्या.या प्रकरणात चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी देखील शिवाजीनगर पोलिसांना दिले. शिवाजीनगर पोलिसांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रारींच्या अनुषंगाने अहवाल मागवला. तो देखील तसाच धुळखात पडला. या तक्रारीमध्ये देखील कुठलीच कारवाई झाली नाही. तशीच स्थिती विद्यार्थी खरेदी प्रकरणात देखील झाली गेली. या दोन्ही प्रकरणात शिक्षणाधिकारी व शिवाजीनगर पोलीस दोघांची भूमिका संशयस्पद बनली आहे. त्याला कारणही तसेच आहे. या ठाण्याचा कारभार ज्या व्यक्तीच्या हातात आहे. त्याला डिलिंग चा “मॅनेजमेंट गुरु” म्हटल्या जातं. डोक्यात “शीतल“ता वाणीत मधुरता व घबाडाचा “विषय” असला काय नसला काय “बळे“च लाळ टपकवत ठेवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या हातात आहे. या प्रकरणात देखील मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचं सांगितलं जात आहे.

