जुन्या वादातून पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण; न्यायालयात ॲड. दीपक कुलकर्णी यांचा युक्तिवाद
बीड — जुन्या वादातून लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याच्या प्रकरणातील आरोपी कैलास रामचंद्र हावळे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. दीपक कुलकर्णी यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. यशवंत नवनाथ मुंढे यांनी सहकार्य केले.

काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बीड तालुक्यातील पोत्रा येथे ही घटना घडली. तक्रारदार जयश्री बालाजी हावळे या घरी चहा बनवत असताना जुन्या वादातून भावकीतील व्यक्तींनी शिवीगाळ करत वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या वादादरम्यान लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. यात जयश्री हावळे यांच्या पतीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख आहे.
नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी जयश्री हावळे यांच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात कैलास रामचंद्र हावळे, अशोक रामचंद्र हावळे, ओमकार कैलास हावळे आणि स्वाती अशोक हावळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), ११८(२), ३(५), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ०३१४/२०२६ अशी नोंद आहे.
न्यायालयाकडून जामीन मंजूर
प्रकरणातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तसेच उपलब्ध कागदपत्रे आणि वस्तुस्थितीचा विचार करून न्यायालयाने कैलास रामचंद्र हावळे यांचा जामीन अर्ज मंजूर केला. आरोपीच्या वतीने ॲड. दीपक कुलकर्णी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. यशवंत नवनाथ मुंढे यांनी सहकार्य केले.