गेवराई बायपासवर पहाटे वाळू तस्करीवर कारवाई; भारत बेंझ हायवासह 20.36 लाखांचा मुद्देमाल जप्त

गेवराई — गेवराई बायपास रोडवरून बीडकडे विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या भारत बेंझ हायवावर गेवराई पोलिसांनी पहाटे कारवाई केली. या कारवाईत हायवासह 5 ब्रास वाळू असा एकूण सुमारे 20 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हायवा चालकाविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे सुमारे 4.15 वाजता गेवराई बायपास रोडवरून बीडकडे जाणारा वाळूने भरलेला भारत बेंझ हायवा क्रमांक MH-15-EG-8883 पोलिसांच्या निदर्शनास आला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये परवानगीशिवाय वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

त्यानंतर पोलिसांनी हायवा आणि चालक भारत आसाराम मुगुटराव (रा. बागपिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड) याला ताब्यात घेतले. वाहनातील 5 ब्रास वाळूसह हायवा असा एकूण ₹20,36,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 580/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अमोल सोनवणे करत आहेत. तसेच गौण खनिज अधिनियमांतर्गत पुढील कायदेशीर कारवाईसाठी महसूल विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत, अपर पोलीस अधीक्षक समीर  आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान दौड, पोलीस हवालदार अमोल सोनवणे, पोलीस कर्मचारी गोरख डोके, ऋषीकेष पोटे, नितीन बहिरवाळ, आरेफ बागवान तसेच चालक ईसाक शेख यांच्या पथकाने केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles