मुंबई — महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाने Election Commission of India विधानपरिषदेतील रिक्त जागांबाबत हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. येत्या तीन महिन्यांत तब्बल 27 जागांसाठी निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काय आहे संपूर्ण घडामोड?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या 17 जागा गेल्या तीन वर्षांपासून रिक्त होत्या. मतदारसंख्या उपलब्ध नसल्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे आता परिस्थिती बदलली आहे.
निवडणूक आयोगाने संबंधित मतदारांची माहिती मागवली असून 75% पेक्षा जास्त मतदार उपलब्ध असल्यास निवडणूक घेण्याचा नियम लागू होणार आहे.यामुळे लवकरच या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
आणखी 10 जागांवरही निवडणुका
विधानसभेतील सदस्यांकडून निवडल्या जाणाऱ्या 9 जागांची मुदत 17 मे रोजी संपत आहे. काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव Pragya Satav यांच्या राजीनाम्यामुळे 1 जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे एकूण 27 जागांवर निवडणुका निश्चित होण्याची शक्यता
राजकीय समीकरण काय सांगते?
सध्याच्या परिस्थितीनुसार सत्ताधारी महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे तर विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

