पत्नीच्या आक्षेपार्ह फोटोवरून मित्रांनीच केली मित्राची हत्या; होमगार्डही आरोपी

आरोपी 12 तासात जेरबंद

बीड — शिरूर कासार तालुक्यातील बेलुरा गावात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 19 वर्षीय तरुण सुमित सुशील ऊर्फ सुशांत गवते याची त्याच्याच मित्रांनी संगनमत करून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील एक मुख्य आरोपी होमगार्ड असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय घडली?

ही घटना 26 एप्रिल रोजी रात्री साडेसात ते साडेआठच्या दरम्यान घडली. फिर्यादी शहादेव गवते हे मोटारसायकलवरून जात असताना नारायणगड परिसरातील हॅलिपॅडजवळून ओरडण्याचा आवाज आला.
तेथे पाहिले असता, काही जणांनी सुमितला पकडून ठेवले होते आणि एक आरोपी त्याच्यावर वार करत होता. घटनेनंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

 हत्येचं कारण काय?

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींपैकी एकाच्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर दाखविल्याच्या संशयावरून हा वाद निर्माण झाला होता. या वादातूनच आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून सुमितची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणात रितेश सतीश बहिर,रुस्तुम गोवर्धन गवते,ज्ञानेश्वर दत्ता लाटे (पकडला),सूरज मच्छिंद्र नागरगोजे यातील एक आरोपी होमगार्ड असल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

पोलिसांची कारवाई

शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर दत्ता लाटे या आरोपीला अटक केली. इतर आरोपी फरार असून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. शिरूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने मोहीम राबवत बारा तासाच्या आत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळवला आहे. रुस्तुम गोवर्धन गवते वय 23 वर्ष रा. बेलुरा, सुरज मच्छिंद्र नागरगोजे वय 20 वर्ष रा. लिंबा ता. शिरूर कासार यांना जेरबंद केले. मात्र उर्वरित दोन आरोपी विधी संघर्षग्रस्त आहेत.या घटनेनंतर बेलुरा गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

आरोपींना जेरबंद करण्यासाठी राबविलेली मोहीम पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शिवाजी बंटेवाड , सपोनी प्रवीण जाधव,पोउपनि. खांडखोळे,पोह उबाळे, सानप, बहिरवाळ, कानडे यांनी पार पाडली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles