आ.संदीप क्षीरसागरांकडून डीपीडीसी बैठकीत केले महत्वाचे लोकप्रश्न उपस्थित
मतदारसंघातील विविध कामांसाठी केली विशेष अतिरिक्त निधीची मागणी
बीड — राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी (दि.३०) रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघातील लोकांच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले लोकप्रश्न मांडले. तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी विशेष अतिरिक्त निधीची मागणीही आ.क्षीरसागर यांनी यावेळी केली.

गुरुवारी (दि.३०) रोजी बीड जिल्हा नियोजन समितीची, पहिली बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न मांडले.
आ.संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या मागण्या
– बीडच्या पंचायत समिती आवारामध्ये स्व.आण्णासाहेब पाटील व स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांचा पुतळा बसविणे.
– ३० खाटाचे आयुष रूग्णालय NRHMअंतर्गत २०१९ ला बीडसाठी मंजुर आहे. त्यासाठी शासकीय जमीन बीड शहरातील इमामपुर रोडवरील गट नं.३४-३५ व पारगाव जप्ती या शिवारात उपलब्ध आहे.यासाठी कार्यवाही व्हावी.
– नगर परिषदेकडे महावितरणची ३६ कोटी जास्त रूपयांची थकबाकी आहे. त्या संदर्भात जनहित याचिका देखील दाखल आहे. नगरपरिषदेच्या सोलार प्रकल्पाची विद्युत निर्मिती होते ती विद्युत विभागाला द्यायची आणि त्यांच्याकडून आपणास हवा असणारा विद्युत पुरवठा घ्यायचा. तसेच ३६ कोटी रुपये थकबाकी भरण्यास मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी तत्वतः मंजूरी दिली आहे. त्याबाबत मा.दादांचे आभार व्यक्त केले.
– बीड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतःळ्याची उंची वाढवणे याबाबतीत तात्काळ पुढील कार्यवाही बाबत संबंधितास आदेशीत व्हावे.
– अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृह मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून बीड शहरात उपलब्ध असलेल्या शासकीय आवारामध्ये सहन जागा उपलब्ध करून देणे.
– जिल्हा नियोजन अंतर्गत बीड नगर परिषदेला नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत १० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध व्हावा.
– बीड नगर परिषद हद्दीतील सिटी सर्व्हे नं.७४५४ मधील जुने तहसील कार्यालय जागेत दुकान केंद्रासाठी व उर्दु घरासाठी बीड नगर परिषदेकडे हस्तांतरण व तसेच सुभाष रोड येथील जनावरांचा दवाखानाची जागा नगर परिषद, बीडला हस्तांतरण करणेेसाठी बैठकीचे आयोजन बाबत संबंधितास आदेश व्हावे असे झाल्या नगर परिषद, बीडच्या स्वउत्पन्नामध्ये वाढ होईल.
– बीड येथील जनावरांचा दवाखाना, सुभाष रोड येथील जागा नगर परिषद, बीड ला हस्तांतरण करणेसाठी बैठकीचे आयोजन करणे.
– बीड नगर परिषद हद्दीतील जुने तहसील कार्यालय जागेत दुकान केंद्रासाठी व उर्दू घरासाठी बीड नगर परिषदेकडे हस्तांतरण करणेबाबत
– सन २०२० चा रखडलेला पीक विमा राज्य तक्रार समितीने डिसेंबर २०२२ मध्ये बीड,वडवणी,गेवराई तालुक्यातील शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याचे सांगितले होते. मात्र एक वर्ष उलटले तरी अद्याप तरी अंमलबजावणी झाली नाही.
– महाडीबीटी अंतर्गत लाभार्थी असलेल्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेले नाही. या बाबत विभागाकडून निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे.
– श्री क्षेत्र कपिलधार 100 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजुर असून त्यास मान्यता देण्यात यावी.
– शिवणी ता.बीड येथील महाविहार धम्मभुमी बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण केंद्रास ‘क’ दर्जा तीर्थक्षेत्र दर्जा देण्यात यावा.
– श्री क्षेत्र उजव्या सोंडीचा गणपती मंदिर देवस्थान मन्यारवाडी, श्री क्षेत्र बेलखंडेश्वर महादेव संस्थान बेलखंडी पाटोदा ता.जि.बीड या तिर्थक्षेत्रास ‘क’ दर्जा प्राप्त करण्यात यावा.
– खंडेश्वरी मंदिरासमोरील तालुका क्रीडा संकुलासाठी आपल्या विभागाकडून ५ कोटी रूपयांच्या विविध क्रीडा सुविधा निर्मितीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्यापैकी १ कोटी रूपयांच्या निधी प्राप्त असून उर्वरित ४ कोटी रूपयांच्या विकास कामांचा आराखडा सादर केलेला असून त्या निधी उपलब्ध होणे बाबत.
– बीड जिल्हा संकुलाची निर्मिती व सर्व क्रीडा सुविधांचे काम २५ वर्षापुर्वी झालेले आहे. सदर क्रीडा संकुलासाठी ८ कोटी रूपयांची तरतुद झालेली आहे. संकुलाची इमारत दुरूस्तीचे व क्रीडा सुविधांच्या दुरूस्तीचे काम करणे गरजेचे असून नवीन क्रीडा संकुलाच्या निर्मितीप्रमाणे संकुल व क्रीडा सुविधांच्या दुरूस्तीसाठी विशेष बाब अंतर्गत १७ कोटी रूपयांची तरतुद करण्यात यावी.
– बोरफडी, मौज, जेबापिंप्री दगडी शहाजानपुर, मन्यारवाडी, मांजरसुंबा ता.बीड येथील उपकेंद्र इमारत बांधकामास निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
– बीड शहरातील अंकुशनगर उपकेंद्रावरून अर्ध्यापेक्षा जास्त बीड शहराला वीज पुरवठा आहे. सर्व सरकारी कार्यालय व वाढीव वस्त्या सदर उपकेंद्रावर असून ओव्हरलोड होत असून नवीन अतिरिक्त उपकेंद्र पोलीस कॉलनी येथे झाल्यास सोयीस्कर होईल व लाईटची अडचण मार्गी लागेल.
– बीड जिल्हा वसुलीमध्ये एक नंबर असून शहरातील दुरुस्तीच्या कामांना निधी उपलब्ध व्हावा.
– डीपीडीसीमध्ये बीड तालुक्यातील एकही प्रस्ताव मंजुर झालेला नाही.
– गावठाण अंतर्गत वस्ती येथील डी.पी.देणे बाबत नियम व अटी शिथील करण्यात यावे.
– बीड शहर अंतर्गत जुने पोल बदलणे व केबलद्वारे काम करणेसाठी आदेशीत व्हावे.
– पाली येथील 33 के.व्ही.चे काम सुरू करणे बाबत आदेशीत व्हावे.
– निवारणबीड व शिरूर का.तालुक्यातील कृषी व सिंगल फेज डी.पी.देण्यात यावे.
– ताडसोन्ना, लिंबारुई, चर्हाटा, आहेरधानोर, बोरखेड, मोरगाव ता.बीड येथे वीजवितरण उपकेंद्र करण्यासाठी मंजुरीसह देण्यात यावा.
– बीड व शिरूर कासार तालुक्यात शाळा खोली बांधकाम, दुरूस्ती आणि कंपाऊंड वॉल बांधकाम करणे.
– बीड १ व २ ,बीड नागरी,शिरूर कासार येथील प्रकल्पातील व प्रकल्पांतर्गत अंगणवाडीतील रिक्तपदे भरणे.
– युवा शांतीवन पाली येथील उर्वरित कामे करणेसाठी निधी उपलब्ध करण्यात यावा.
– देवराई येथील आराखडा तयार करून कामे करणेसाठी निधी उपलब्ध होणे बाबत.
– शिरूर तालुक्यातील हिवरसिंगा, जवळागिरी, बरगवाडी या गावातील वाहतुकीसाठी रेल्वे ब्रिज नसल्यामुळे गावात नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. याबाबत रेल्वे विभागाकडे प्रस्ताव सादर करून या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी विनंती केली.