Home Blog Page 87

सतीश भोसले उर्फ खोक्या प्रयागराज मधून पकडला

0

बीड — गेल्या काही दिवसांपासून मारहाणीच्या घटनांमुळे पोलिसांच्या रडारवर असलेला खोक्या म्हणजेच सतीश भोसले याला अटक करण्यात आली आहे. सतीश भोसले याला प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शिरुरमध्ये एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचप्रकरणी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि भाजप पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्या हा पोलिसांच्या रडारवर आला होता. या मारहाण प्रकरणानंतर सतीश भोसलेचे अनेक कारनामे समोर आले होते. त्यानंतर त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून सतीश भोसले हा फरार झाला होता. सतीश भोसले याने माध्यमातून मुलाखत दिली तो पत्रकारांना सापडला मात्र पोलिसांना का सापडत नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.मात्र पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. अखेर आता सतीश भोसलेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्या
हा शिरूर (का)
तालुक्यातील झापेवाडी येथील रहिवासी आहे. मागील पाच वर्षांपासून तो राजकारात सक्रिय असून भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. सतीश भोसलेने सामाजिक कार्यातून तसेच पारधी समाजासाठी केलेल्या कार्यातून ओळख निर्माण केली.

तसेच याआधीही सतीश भोसले वर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. अलिकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांच्या कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला.

सुपीक “डोके”चा नायब तहसीलदार असूनही; अपंग सवलतीवर डाका?

0

बीड — फुकटचं खायचं म्हणलं की कुठल्याही पदावर बसलेली व्यक्ती असो ती काळं बेरं करून कसं शासनाला लुटता येईल एवढ्याच विचार करते. ही बाब नायब तहसीलदाराच्या बाबतीत उघडकिस आली आहे. त्याच्या धडा वर असलेले सुपीक “डोके”चालवून त्याने चक्क अपंगांच्या सवलती लाटण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकिस आले आहे.

बीडचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोके तसे शेजारच्या जिल्ह्यातील असले तरी बीड मध्ये मात्र त्यांनी आपली पाळमूळ खोलवर रुजवली आहेत. “दिसायला नेक बंदा, काळबेर करण हाच आपला धंदा “हे ब्रीद धरून त्यांनी बीडमध्ये नायब तहसीलदार पदाचा अक्षरशः धंदा बनवला आहे. आता हेच पहा ना धडधाकट असलेल्या या नायब तहसीलदार पदावर बसलेल्या व्यक्तीने चक्क अपंगत्वाच सर्टिफिकेट मिळवलं. 19 जुलै 2019 रोजी त्यांनी ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांच्या समस्यांशी संबंधित पन्नास टक्के आलेलं असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं. विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील ते दिलं. त्यांनी मिळवलेल्या प्रमाणपत्राचा क्रमांक: MH 3130920000031944 हा आहे.तर नोंदणी क्रमांक 5731/00001/2192/624543 आहे.
वास्तविक पाहता 50% व्यंग या व्यक्तीत कुठे हि आढळत नाही. मग वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र कसं दिलं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे प्रमाणपत्र सत्य आहे की असत्य याची पडताळणी होणं गरजेचं आहे. हे प्रमाणपत्र‌ बनावट असेल तर नायब तहसीलदार सुरेंद्र डोके वर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. याबरोबरच या प्रमाणपत्राचा वापर करून अपंगांच्या सवलती पदोन्नतीसाठी मिळवल्या की आणखी दुसऱ्या काही सवलती मिळवल्या याची चौकशी होण देखील गरजेचे आहे. नायब तहसीलदार सारख्या जबाबदार पदावरील व्यक्ती भरमसाठ पगार असूनही जर असे अपंगाच्या सवलतीवर दरोडा टाकीत असेल तर गोरगरीब अपंगांनी जगायचं कसं? अपंगांचे अधिकार अशी माणसं लुबाडत असतील तर अशा व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे. या प्रकरणात पुन्हा एकदा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात यावी ते खरंच सवलतींच्या नियमात बसतात का? याची पडताळणी करावी. सवलतीत बसत नसतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घरचा रस्ता दाखवण्यात यावा. पदावरून हाकलून देत त्यांनी जो जो लाभ घेतला आहे त्याची भरपाई त्यांच्याकडून करून घ्यावी अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.

घरकुल योजनेत गैरप्रकार होता काम नये;आ.संदीप क्षीरसागरांकडून प्रशासनाला कडक निर्देश

0

बीड — सध्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना यांसह शासनाच्या विविध घरकुल योजनेची कामे प्रशासकीय स्तरावर सुरु आहेत. या योजनेतील लाभार्थी हे गरजू आणि वंचित असतात. गरजू आणि पात्र लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास कसल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये, तसेच या योजनांच्या प्रक्रियेत कुठल्याही स्तरावर आर्थिक मागणी अथवा इतर कसलाही गैरप्रकार होऊ नये याची पुरेपूर दक्षता घ्या. तसेच पात्र लाभार्थींना तातडीने घरकुल हप्ता वितरीत करा, असे कडक निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपालिका, बीड पंचायत समिती व शिरूर कासार पंचायत समिती व बीड नगरपालिका येथील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सध्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत नवीन उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्याबाबत ग्रामपंचायत स्तरावर सध्या प्रस्ताव दाखल करून घेणे सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरीचे ऑनलाईन अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया झाली आहे. रमाई आवास योजनेचे प्रस्ताव ग्रामपंचायत स्तरावरून दाखल करवून घेऊन पंचायत समितीमार्फत समाजकल्याण विभागाकडे दाखल करण्यात आले आहेत तसेच त्रुटी असलेले प्रस्तावांची पुर्तता करणे सुरू आहे.
बर्‍याचवेळा या योजनेतील लाभार्थ्यांकडून अधिकारी आर्थिक मागणी करत असल्याच्या तक्रारी येत असतात. जे नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत ते सर्व अतिसर्वसामान्य, गरीब आणि वंचित घटकातील असतात. त्यांची अडवणूक करणे, आर्थिक मागणी करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार या योजनेच्या कार्यवाहीत होता कामा नये. तसेच जे लाभार्थी पात्र आहेत त्यांचे हप्ते तातडीने वितरीत करा अशाप्रकारचे कडक निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड व शिरूर कासार तालुक्याचे गटविकास अधिकारी, बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बोगसगिरी आणि लाभार्थ्यांची पिळवणूक अजिबात खपवून घेणार नाही

दरम्यान, घरकूल योजनेचा लाभ घेऊन घर न बांधताच अधिकार्‍यांच्या संगनमताने रक्कम उचलल्याचे गैरप्रकार जिल्ह्यात समोर आले आहेत. असले प्रकार बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात अजिबात खपवून घेणार नाही. त्यासोबतच लाभार्थ्यांची अधिकार्‍यांकडून होणारी आर्थिक पिळवणूकही सहन केली जाणार नाही. अशी तंबीही आ.संदीप क्षीरसागरांनी अधिकार्‍यांना दिली आहे.

बीड तालुक्याने विशेष लक्ष देण्याची गरज, दिरंगाई चालणार नाही

घरकुलाचा पहिला हप्ता सोडविण्यात बीड तालुका मागे पडला आहे. बीड पंचायत समिती अंतर्गत एकूण २९२९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे बीड पंचायत समितीने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबतीत दिरंगाई चालणार नाही. यासोबतच घरकूल संदर्भात बीड नगरपालिकेच्याही अनेक तक्रारी नागरिकांमधून होत आहेत. त्याची तातडीने सोडवणू प्रशासनाने करावी. असेही आ.संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडें च्या जगमित्र कार्यालयातून वाल्मीक कराडने खंडणी मागितली; अडचणीत वाढ

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी 1400 पानांची चार्जशीट सीआयडीने दाखल केली आहे. या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे होत असून वाल्मिक कराड आणि गँगची क्रुरता समोर आली आहे धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करण्याची मागणी होऊ लागली आहे. अशातच आता वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातून खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणीच्या प्रकरणातूनच झाल्याचा मोठा आरोप सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून करण्यात आला आहे. वाल्मिक कराडने आवादा कंपनीला खंडणी मागितली आणि त्याला विरोध केल्यानेच देशमुख यांना संपवल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. अशातच आता ही खंडणी कुठून मागण्यात आली, याबाबतचा मोठा पुरावा समोर आला आहे.
वाल्मिक कराड याने धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयामधूनच आवादा कंपनीच्या मॅनेजरला खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबातून हे स्पष्ट करण्यात आले आहे. 8 ऑक्टोबर रोजी वाल्मिक कराडने जगमित्र कार्यालयामधून आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचे यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करा.. अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामधूनच खंडणीची मागणी झाल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांनाही संतोष देशमुखांच्या हत्येत सहआरोपी करा, अशी होत आहे. पहिल्यापासून धनंजय मुंडे हे या प्रकरणात आरोपी आहेत, असं आम्ही म्हणत आहोत. जगमित्र कार्यालयासह मुंडेंच्या सातपुडा या बंगल्यावरही खंडणीची बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना सहआरोपी करायला पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

खोक्या भोसले ने 200 हरीण, मोर मारून खाल्ले, वनविभागाने केली कारवाई

0

बीड — आ. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश उर्फ  खोक्या भोसले याच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. वन अधिकाऱ्यांनी आज खोक्या भाईच्या शिरूर तालुक्यातील घरी धाड टाकून झाडाझडती घेतली.

सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी वन्य प्राण्यांचे मांस आढळून आले. त्याशिवाय जाळ्या अन् गांजाही आढळला आहे. हरीण, काळवीट आणि मोर पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या जाळ्या देखील वन विभागाला मिळाल्या आहेत.

शिरूर तालुक्यातील बावी येथील अमानुष मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सतीश भोसले याचे नव नवे कारनामे समोर येत आहेत. सतीश भोसले याने अनेक वन प्राण्यांचा जीव घेतला आहे. त्याच्या मुसक्या आवळ्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या शिरूर येथील घराची आज वनविभाग व पोलिस विभागाकडून झडती घेण्यात आली.
वन विभागाने घेतलेल्या झडतीमध्ये सतीश भोसले याच्या घरी वन्य प्राणी पकडण्यासाठी वाघूर चित्र पकडण्याचे जाळे, एक सतुर, एक सुरी, एक जर्मनचा डब्बा या डब्यामध्ये चरबी आढळून आली आहे दोन पुड्या गांजा आढळून आला आहे. 400 ते 500 ग्राम गांजा असेल पुडी आढळली आहे. घरात वाळलेले मांस आढळून आले आहे. ही कार्यवाही वनविभागाने केली आहे.

ही कार्यवाही विभागीय व अधिकारी अमोल गरकळ, वन परिक्षेत्राधिकारी श्रीकांत काळे, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश धोक्रड, आष्टी वनपरिक्षेत्र विभागाचा संपूर्ण कर्मचाऱ्यांचा स्टाफ ते पथक सर्व स्टाफ त्यासोबत वन्य प्राणी मित्र सिद्धार्थ सोनवणे उपस्थित होते. भोसले याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता हे संपूर्ण मांस फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान बावी गावचे रहिवासी दिलिप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांच्या रानात सतीश उर्फ खोक्या भोसले याने हरणाची शिकार करण्यासाठी जाळ लावलं होतं. त्यात एक हरण अडकलं. ते हरण सोडवण्यासाठी तिथे ढाकणे कुटुंब पोहोचलं तर त्याने ढाकणे कुटुंबातील वडील आणि मुलाला बेदम मारहाण केली. मुलाचे दात पाडले, वडिलांच्या फासोळ्या मोडल्या. दिलीप ढाकणे यांच्या मुलाचा पाय मोडून तुकडे -तुकडे केले. आम्ही उद्या मोर्चा काढणार आहोत, पोलीस आरोपीला अटक करत नाहीत, नेमकी त्यांना काय अडचण आहे? असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ग्रामस्थ म्हणाले की, खोक्या आणि खोक्याच्या आकावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. खोक्याचे आका आष्टीत आहेत. हे प्रकरण दाबलं जात आहे. कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यात येत आहे, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

एस पी साहेब..! हा घ्या रजाकारीचा पुरावा; महिला दीन असताना पोलिसाचा महिलेवर बलात्कार !!

0

पाटोदा — एकीकडे पाटोदा पोलिसांनी पवन ऊर्जा कंपन्यांसाठी शेतकऱ्यांना डांबून ठेवले तर दुसरीकडे जग महिला दिन साजरा करत असताना उद्धव गडकर नावाच्या पोलीस कर्मचाऱ्यांने महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनेच तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेची ओळख करत बलात्कार केल्याची घटना घडली. उद्धव गडकर असे या नराधम आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे या प्रकरणात आज पाटोदा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
सामान्य नागरिकांचं संरक्षण करण्याची ज्याच्यावर जबाबदारी असते तो पोलीस खात्यातील कर्मचारीच भक्षक बनल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कालच पाटोदा पोलिसांनी मावेजा मिळावा अशी मागणी पवन ऊर्जा कंपनी कडे केली असताना त्यांच्या मुसक्या बांधून रात्रभर ठाण्यात डांबून ठेवले.पोलिसांचा वचक कमी होत चालला असला तरी महिला व शेतकरी सध्या भरडून निघत असल्याचे दिसत आहे. काही प्रकरणांत पोलिसांचीच गुन्हेगारांसोबत उठ-बस असते, त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रतिमा मलीन होत चालली आहे. त्यातच आता हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघू लागले!

पवन ऊर्जा कंपन्यांनी पाळलेले गुंड शेतकऱ्यांना अरेरावी करून धमकावत आहेत. शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार होत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच कंपन्यांना पाठबळ दिले जात आहे. एकीकडे कंपन्यांचे गुंड तर दुसरीकडे वाढत्या गुन्हेगारीमूळे पोलीस यंत्रणेचे धिंडवडे निघू लागले आहेत. सर्वसामान्य जनतेचे सुरक्षितता धोक्यात असताना पोलिसांकडूनच महिलांवर अत्याचार होत असतील तर बीडची परिस्थिती अजूनही जैसे थेच असल्याचं बोललं जाऊ लागला आहे.

सद्भावना यात्रेला प्रचंड प्रतिसाद, नेकनूर येथे पहिला मुक्काम…..!

0

बीड —  महाराष्ट्र काँग्रेसने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या सद्भावना यात्रेचा पहिला टप्पा बीड जिल्ह्यातून सुरू झाला. यामध्ये महिला दिना दिवशी केज तालुक्यातील मस्साजोग ते बीड अशा सद्भावना पद यात्रेला सुरुवात झाली. अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालेल्या या सद्भावना यात्रेचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला.

तालुक्यातील सकाळी नऊ वाजता सद्भावना पद यात्रेला सुरुवात झाली. यावेळी सर्वप्रथम स्वर्गीय संतोष देशमुख यांना आदरांजली वाहून छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर सेवा दलाचे ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर पदयात्रा बीड कडे मार्गस्थ झाली. यावेळी या पदयात्रेसाठी सुमारे पाच हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्यक्ष पद यात्रेमध्ये चालायला सुरुवात केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा सुरू झालेली आहे.तर सदरील पदयात्रा यशस्वी करण्यासाठी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी मोठ्या प्रमाणावर संघटन करू आणि परिश्रम घेऊन पदयात्रेतील अर्धा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पदयात्रे संबंधी असलेली संकल्पना यावेळी दिसून येत होती. यात्रेला सुरुवात झाल्यानंतर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पद यात्रेचे स्वागत झाले आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पद यात्रेमध्ये सहभाग नोंदवला. मस्साजोग पासून वीस किलोमीटर अंतरावर आल्यानंतर दुपारी ढोणे मंगल कार्यालयामध्ये सर्वांनी भोजन करून विसावा घेतला. नंतर पाच वाजता पदयात्रा मार्गस्थ झाली. नेकनुर येथे सदरील पद यात्रेचा मुक्काम असून रविवारी सकाळी साडेआठ वाजता सद्भावना पदयात्रा बीड कडे मार्गस्थ होणार आहे.
दरम्यान सदरील पद यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांनी कसल्याही प्रकारची तप्त उन्हाची तमा न बाळगता सामाजिक सलोखा निर्माण व्हावा या हेतूने मार्गक्रमण सुरू केलेली दिसून येत होते.

एस पी साहेब..! रजाकारी सुरू असताना माजलेले शेतकरी मोबदला मागताहेत यांची मुंडी मोडाच?

0

बीड — लोकशाही संपून रजाकारी राजवट सुरू झालेली आहे. लोकशाहीत शेतकरी वर्ग माजला होता.पवन ऊर्जा कंपन्यांच्या लोकांना पिकातून गाड्या नेऊ न देणे, अतिक्रमण करताना अडथळा आणणे, मावेजा मागणे यासारख्या गोष्टी करून शेतकरी न्याय अधिकाराच्या गप्पा मारून आडवे येत आहेत. जिल्ह्यातील चोर, दरोडेखोर माफिया, गुंड माजले तरी चालतील पण एस पी साहेब एकदा या शेतकऱ्यांना कायमचा धडा शिकवा. कंपन्यांच्या मिठाला जागणं काय असतं हे एकदा आपल्या कर्तव्यातून दाखवून द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे.

एस पी साहेब… मोगली राजवट शेकडो वर्ष गोरगरीब जनतेने सहन केली.त्यानंतर इंग्रज राजवटीत ही घराची होणारी धूळधाण गोरगरीब जनतेने अनूभवली एव्हाना गुलामगीरी अनेकांच्या रक्तात मूरली जायला पाहिजे होती.असं असताना अन्याय अत्याचार पिढ्यान् पिढ्या सहन करायची सवय रक्त सांडून घरावर तुळशीपत्र ठेवून मिळवलेल्या लोकशाहीत मोडली गेली शिक्षणामूळे न्याय अधिकार जनतेला कळू लागला. इथच सगळं अवघड झालं.

सध्या अघोषित मोगली राजवट सुरू आहे. कंपन्यांची गुलामगिरी ज्यांच्या रक्तात मुरली आहे ते पुन्हा कंपन्यांचे दलाल म्हणून काम करू लागले आहेत. मग हे करताना थोडाफार शेतकऱ्यांनी अन्याय अत्याचार सहन केला तर त्यांच्या बापाचं काय जातंय? उगाच अधिकार न्यायाच्या गप्पा मारून कंपन्यांच्या कामात अडथळा आणू लागले आहेत.

झाली एखाद्या शेतकऱ्याच्या घराची धूळधाण, पवन ऊर्जा कंपन्यांनी केल अतिक्रमण, उभ्या पिकातून कंपन्यांनी गाड्या घातल्या तर यांचा बिघडतं कुठं? काय फरक पडणार आहे यांची लेकरं बाळ उपाशी मेली नाही शिकली तर..‌‌ हा विचार का केला जात नाही शेवटी शेतकऱ्यांनी गुलामगिरी नाही करायची तर कोणी करायची अपयशी ठरली म्हणून काही शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या तर थोडाच फरक पडणार आहे. कंपन्यांना मावेजासाठी काम न करू देणे कुठल्या कायद्यात बसते हे तुम्ही सांगा. फरक फक्त वतनदार (नोकरदार), मनसबदार(लोकप्रतिनिधी) यांच्या लेकरा बाळांसाठी विनाकारण अन्न पिकवण्याचे काम हे करत आहेत. नाहीतरी दुसरं ते काय करणार? चौकीदारीचे काम करताना थोड्याफार चोरी, दरोडे, गुंडगिरी, माफियागिरी, महिलावर अत्याचार, झाले तरी त्यांच्यावर कधीही कारवाई करता येऊ शकते. कृष्णा आंधळे सारखे सतीश भोसले उर्फ खोक्यासारखी माणसं फरार झाली तरी ते कधीही पकडता येतील हो!
मात्र शेतकऱ्यांनी न्याय हक्काची मागणी करून माज दाखवला नाही पाहिजे हे महत्त्वाचं आहे. “जय जवान जय किसान”हा नारा लोकशाहीत दिला गेला. कुठेतरी भलं होईल अशी अपेक्षा त्यावेळी व्यक्त केली गेली. मात्र सध्याच्या रजाकारी जमान्यात असे नारे मातीमोल करण कर्तव्य नाही काय? कंपन्यांचा मीठ खाल्ल्यावर त्यांची रखवाली करायची नाही तर उपटसुंभ्यांची का करायची? हा मोठा प्रश्न आहे.


साहेब आता हेच बघा ना गेवराई तालुक्यातील महादेव तांड्यावरिल शेतकऱ्यांनी सेल रिपावर प्रायव्हेट लिमिटेड विरोधात उपोषण केलं. का तर म्हणे भाडे पत्र करून घेतलं पण भाडं देण्यास कंपनीने नकार दिला. अहो दिला नकार तर बिघडलं कुठं त्यांना धमकावलं तरी मुकाट गप्प बसायला हवं होतं. हो..! ना ..! एवढं सुद्धा शेतकऱ्यांना तसदी घ्यावी वाटत नाही हे व्यवस्थेच दुर्दैव नाही काय? रिन्यू कंपनी मुळूकवाडी शिवारात पवन चक्की उभारण्याचं काम करत आहे. रोहित ढास या शेतकऱ्याची गट नंबर 657 मध्ये जमीन आहे. या जमिनीतील उभ्या पिकातून कंपनीच्या लोकांनी गाड्या नेल्या. पीक उध्वस्त केलं. मला सांगा साहेब कंपनीच्या लोकांचं काय चुकलं? तरी तो शेतकरी माझं नुकसान झालं माझं नुकसान झालं म्हणून निवेदन देऊन हाकाटी मारीत बसला असं कुठे असतं का?

चौसाळ्याजवळील सुलतानपूर येथील शेतकऱ्यांने ओटू कंपनीने पोलीस संरक्षणात तारा ओढण्याचं काम सुरू केलं. यावेळी देखील शेतकऱ्यांनी असाच माज दाखवला. कंपनीने पोलिसांसोबत भाडोत्री गुंड देखील सोबत आणले होते. त्यांना न जुमानता पीक निघाल्यानंतर काम करा. मावेजा द्या असं म्हणून पंजाब अनुरथ नाईकवाडे या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी मात्र त्याला चांगलाच धडा शिकवला. पंजाब नाईकवाडे व त्यांचे वडील अनुरथ नाईकवाडे या दोघांनाही चौसाळ्याच्या चौकीत नेऊन गुन्हा दाखल करण्याचा धाकधपशा दाखवला. अहो तो दाखवण गरजेचंच आहे. मावेजा दिला नाही म्हणून कुणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करतो का? धनगर जवळका येथे पाझर तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीवर रेण्यू पावर कंपनीने 220 केव्हीचे उपकेंद्र बांधले. ते बांधलं म्हणून शेतकऱ्यांना संतापन्याची गरज काय होती. पण नाही यांना शेतीला पाणी पाहिजे म्हणे? अहो शेतीला पाणी मिळालं शेतकऱ्यांना समृद्धी आली. तर आत्महत्या करून मरणार कसे? लोकसंख्या कमी होणार कशी? शेवटी कुठेतरी याचा विचार करावाच लागेल ना? पाटोदा तालुक्यातील बेनसुर येथील शेतकरी बापू बंकट आर्सूळ तसेच मयूर भाऊसाहेब झोडगे या दोन शेतकऱ्यांनी देखील मावेजा मिळाल्यानंतर शेतातून काम करा असं सांगितल्यानंतर पाटोदा पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधून रात्रभर डांबून ठेवले. याच ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी मुस्तफा पठाण नावाचा पत्रकार गेला. काय गरज होती त्याला असले कुटाणे करण्याची शेतकऱ्यांची बाजू मांडल्याने कुठे पोट भरत असत का? एवढं सुद्धा त्याला कळालं नाही. ज्ञानी विद्वान समजले जाणारे अधिकारी कर्मचारी कंपन्यांपुढे लाळघोटेपणा करतात एवढं सुद्धा त्याला माहीत नसावं हे किती दुर्दैव म्हणावे लागेल या रजाकरी जमान्याचं हो ना? अहो अशाच देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांची मुलं येणाऱ्या काळात गुंड म्हणून कंपन्यांना वापरायला मिळणार नाहीत काय? त्यातून अर्थचक्र फिरणार नाही काय? हे का कळत नसावं या शेतकऱ्यांना?
त्यातच पुन्हा डॉक्टर असलेले गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ता म्हणून एकटेच लढत आहेत काय गरज आहे हो त्यांना असल्या गोष्टी करण्याची? थोडं आपल्याही व्यवसायाकडे लक्ष द्यावं हे त्यांना का कळत नसेल? शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे म्हणे त्यांना? त्यासाठी कागदाची चिठोरी एस पी साहेब तुम्हाला पाठवली पण बरं झालं तुम्ही त्याला केराची टोपली दाखवली. नाहीतर काय? कंपन्यांच संरक्षण महत्त्वाचं की असल्या फुटकळ गोष्टीकडे लक्ष देत वेळ घालवायचा? हे का कळालं नसेल? डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकरांना? अहो शेवटी कंपन्या अर्थचक्राला गती देतात म्हणूनच तर सर्व कर्मचाऱ्यांना पोटभर खायला मिळते. ही बाब ते का विसरतात हे त्यांनाच ठाऊक? शेवटी शेतकऱ्यांच योगदानच काय? एस पी साहेब…! तुम्ही कंपन्यांच संरक्षण करण्याचं फर्मान काढलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना जाग आली. तुमच्याच फर्मानाची रि ओढत त्यांनी देखील नव फरमान काढलं. शेवटी असं शेतकऱ्यांना कोंडीत पकडायची रणनीती आखायला बुद्धिवंत, कर्तव्यदक्षच चौकीदार असावा लागतो. याची प्रचिती येऊन देखील शेतकरी अधिकाराची न्यायाची भाषा करून कंपन्यांना वेठीस धरण्याचं काम करताहेत हे सशक्त रजाकारी जमान्याला अशोभनीय नाही काय? जिथे जिथे कंपन्यांचं काम आहे त्या त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर एकदाचा “वामना’ सारखा पाय द्या? बळीराजा पाताळात गेला हे पुरानातच नव्हतं तर सध्याही हेच सुरू आहे हे दाखवून द्या? तुमच्या कर्तव्यदक्षतेची चांगलीच दहशत या मुजोर शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे एवढंच…..!

फेरफार प्रलंबित, लिंबागणेशचा मंडळ अधिकारी डरफे निलंबीत

0

बीड — फेरफार प्रलंबित ठेवत शासकीय कामकाजाकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून लिंबागणेशचे मंडळ अधिकारी अशोक गोरख डरफे यांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी शासन सेवेतून निलंबीत केले आहे.

गेवराई येथे प्रलंबित फेरफारबाबत 5 मार्च रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रलंबित फेरफार संबंधि प्रत्येक महसूल मंडळाचा आढावा घेण्यात आला यावेळी बीड तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या लिंबागणेशचे मंडळ अधिकारी अशोक डरफे यांनी 56 फेरफार प्रलंबित ठेवल्याचे दिसून आले. सदरील प्रलंबित फेरफार बाबत डरफे यांना विचारणा केली असता त्यांनी मोघम उत्तर दिले. लिंबागणेश येथील प्रलंबित फेरफारची संख्या जास्त असल्याने अशोक डरफे यांना बैठकामध्ये वारंवार सूचना देऊनही त्यांनी 56 फेरफार प्रलंबित ठेवले.

शासकीय कामकाजात अक्ष्यम दुर्लक्ष, कर्तव्यात सचोटी न ठेवता गंभीर स्वरुपाची बाब आहे. हे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979, चा नियम 3 नुसार गैरवर्तन ठरते. अशोक डरफे यांच्या गैरवर्तनाचे गांभीर्य विचारात घेऊन 5 मार्च रोजी पासून निलंबीत करण्यात आले आहे. या संबंधीचा आदेश जिल्हाधिकारी पाठक यांनी दिला आहे. निलंबन कालावधीत परळी तहसील हे मुख्यालय देण्यात आले असून सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच अशोक डरफे यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीचा प्रस्तावित करण्यात आला आहे.

पवनचक्की कंपन्यांना सरकारचे अभय;  दडपशाहीमुळे पिडीत शेतकऱ्यांना वाली कोण?

0

बीड —  पवनचक्की कंपन्यांना काही समाजकंटकांकडुन त्रास दिला जात असल्याची तक्रार ४६ पवनऊर्जा कंपन्यांची संघटना असलेल्या “विपा” ने केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना केली आहे.

त्या अनुषंगाने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी बीड यांना पत्र पाठवून कंपन्यांना त्रास देणारांचा बंदोबस्त करावा असे लेखी आदेश दिले आहेत. पवनचक्की कंपन्यांना त्रास देणारे, खंडणीखोर यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी मकोका अंतर्गत कारवाई व्हायला हवी याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. याचे स्वागतच आहे मात्र याचवेळी बीड जिल्ह्यातील पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक, दडपशाही, शासनाची दिशाभूल करणे,पोलिस प्रशासनाच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करणे आदी घटना घडत असताना या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाने दि.२१ आक्टोबर २०१३ रोजी पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नियंत्रण समितीचे स्थापना केलेली आहे. या समितींना पवन ऊर्जा प्रकल्पाचे निगडित असलेल्या जमिनीच्या व्यवहारांबाबत कायदेशीर बाबी व अनिश्चितता तपासणे तसेच पवन ऊर्जा प्रकल्पांचे निर्मिती होत असलेल्या जमिनीच्या व्यवहारांमध्ये योग्य व्यवहार व मोबदला मिळत असल्याबाबत खात्री करणे. पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत समितीकडे आलेल्या तक्रारींची चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करणे. जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे. त्याचप्रमाणे शेतजमीन मालक ,शेतकरी आणि ग्रामस्थ आणि प्रकल्प विकासक यांच्यामध्ये समन्वय ठेवून प्रकल्प उभारण्यासाठी व प्रकल्प कार्यरत राहण्यासाठी स्थानिक स्तरावरचे सर्व प्रकारचे सहकार्य करणे. इत्यादी अधिकार दिलेले आहेत पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड आणि पोलीस अधीक्षक बीड हे सदस्य आहेत. त्याचप्रमाणे उपविभागीय स्तरावर सनियंत्रण समितीमध्ये उपविभाग अधिकारी अध्यक्ष तर तहसीलदार सचिव आहेत.
पवन ऊर्जा प्रकल्प संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे जिल्हा प्रशासनाचे जाणीव करून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणात आवश्यक कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.