Home Blog Page 83

चिकन विक्रीचा वाद, अल्पवयीन मुलाला उचलून आदळलं, जागेवरच मृत्यू!

0

बीड — चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केज शहरातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेतील आरोपीही अल्पवयीन आहे. रेहान कुरेशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीचा शोध घेतला जात आहे.
चिकन विक्रीच्या वादातून एका अल्पवयीन मुलाला त्याच्याच शेजारी चिकन विक्रीचे दुकान असलेल्या मुलाने उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना केज मध्ये घडली असून रेहान कुरेशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अल्पवयीन आहे.तर याचा पोलिस अधिक तपास करत आहेत.चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान अल्पवयीन आरोपीचा शोध केज पोलिस घेत आहेत. केज शहरात चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. रेहान कुरेशी नावाच्या अल्पवयीन मुलाचं दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाशी वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि आरोपीने रागाच्या भरात रेहानला उचलून थेट सिमेंटच्या नाल्यावर आपटलं. डोक्याला गंभीर मार लागल्याने रेहानचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचा शोध घेतला जात आहे.

जिल्हाधिकारी दावणीला; काय करायचय ते करा गाडे च्या माजाने पा”ठका”चे पितळ उघडे ✒️भाग –5

0

बीड — चौसाळा परिसरात टी ई क्यू ग्रीन पावर कंपनी टॉवर लाईन वरून तार ओढण्याचं काम करत आहे. यावेळी मावेजा मिळावा यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांना कंपनीच्या गाडे नावाच्या कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्याकडे जा काय वाकडं करायचं ते करा आशा संतप्त भाषेत उत्तर देऊन जिल्हाधिकारी दावणीला बांधला असल्याचं सांगितलं. या प्रकाराने मात्र शेतकरी हक्का बक्का झाले असून गाडेच्या या मग्रूर भाषेने पा”ठका“चे पितळ उघडे पडले असून सह्याद्री “माझा“ने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या व्यथांवर, अविनाशी सत्यानाशी वृत्तीने शेतकरी ठकवला जातो आहे याला पुष्टी मिळाली आहे.


चौसाळा जवळील हिंगणी बु. येथे टी इ क्यू कंपनीने टॉवर उभारणी करून वीजवहन करण्यासाठी तारा ओढण्याच काम पूर्ण केलं. यामध्ये बाधित झालेल्या जवळपास वीस बावीस शेतकऱ्यांना सुरुवातीला पीक नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम कंपनीने दिली होती. मात्र बाधित क्षेत्राचा मावेजा 3 हजार रुपये मीटरने तसेच ज्या शेतामध्ये टॉवर उभारणी केली आहे. त्यांना प्रति टॉवर पाच लाख रुपये देण्याचे कंपनीने कबूल केले. हेच पैसे मिळावेत यासाठी धुळे सोलापूर महामार्गावर चौसाळाजवळ कंपनीचे काम सुरू असताना शेतकऱ्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे तेथे भेट घेतली. बऱ्याचश्या शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण केलं. मावेजा ही दिला. मात्र दोन शेतकऱ्यांना 15 – 15 वर्षापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आंबा, चिंच यासारख्या फळझाडांचा मावेजा सरकारी निकषाप्रमाणे मिळावा अशी मागणी सुरुवातीपासून करण्यात येत होती. प्रत्येक वेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला गोड बोलून पान पुसली. मात्र आज कंपनी कर्मचाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला. तो नुसता समोर आला नाही तर जिल्हाधिकारी अविनाश पाठक कंपनीच्या खिशात खेडवळ भाषेत सांगायचं तर कसे दावणीला बांधल्या गेले आहेत हे सत्य उघडकीस आलं. गाडे नावाच्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने रागाच्या भरात का होईना पा”ठका“ची पोल खोलली. उरली सुरली सुद्धा इज्जत धुळी ला मिळाली
गाडे नावाच्या कर्मचाऱ्याने मग्रूरीत शेतकऱ्यांना काय करायचं ते करा? जिल्हाधिकारी आमचं काहीच करू शकत नाहीत असे शब्द वापरल्यामुळे उपस्थित शेतकरी हक्का बक्का झाले. पाठक साहेबांनी इतक्या मोठ्या पदावर बसलेले असताना एवढी छी थू करून घ्यायला नको होती. आशा भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. काहींनी तर पट्टी गोळा केली असती तर कोट्यावधी रुपये पाठक साहेबांना देता आले असते. पण कंपनीची भाड खायची गरज काय होती? आशा भावना देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

कंपनी सोबतच्या जांगडगुत्त्यात पा”ठक” अडकले; भीतीने कर्मचाऱ्यांचे मोबाईल तपासू लागले!✒️भाग -4

0

बीड — पवन ऊर्जा सौर ऊर्जा कंपन्यांच्या पायावर अविनाश पाठक यांनी आपल्या पूर्ण निष्ठा वाहिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचं एवढंच धोरण पा”ठकां”नी अवलंबलेलं आहे. मात्र हे प्रकरण प्रसार माध्यमांनी लावून धरल्यामुळे त्यांची झोप हराम झाली आहे. ते एवढे धास्तावले आहेत की स्वतःच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल तपासत असल्याची चर्चा दबक्या आवाजात होऊ लागली आहे.
पवन ऊर्जा कंपनीच्या जांगडगुत्त्यात जिल्हाधिकारी अविनाश पाठक पुरते अडकले आहेत. शेतकऱ्यांची बाजू घ्यावी तर कंपन्यांच्या पायी निष्ठा वाहिल्यामुळे आलेला मिंधेपणामूळे मानसिक स्वास्थ्य हरवत चालल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी खाजगीत सांगू लागले आहेत. कंपन्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावताना पा”ठकां”नी केलेली मदत. या मदतीमुळे शेतकऱ्यांचे तळतळाट माध्यमांची ओरड यामुळे एखादा कर्मचारी केबिनमध्ये येताच त्याच्यावर कारण नसताना खेकसने, अंगावर धावून जाणे असे प्रकार त्यांच्याकडून घडू लागले आहेत. ज्या शेतकऱ्याने साहेब तुम्ही कंपनीचे दलाल आहात का? असा प्रश्न विचारला होता. तोच शेतकरी कैफियत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेला असता त्याला देखील या परिस्थितीचा सामना करावा लागला. याची रंगीत चर्चा चौसाळा परिसरात होऊ लागली आहे. कहर म्हणजे कहर म्हणजे स्वतःच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा भरवसा पा”ठका”ना वाटेनासा झाला आहे. काम घेऊन आलेल्या रोज सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल तपासण्याचे काम देखील ते सध्या करू लागले आहेत. “सह्याद्री माझा”शी नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने आपली आपबीती सांगितली. यातून जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खाजगी जीवन देखील पा”ठकां”च्या मोबाईल तपासणीमुळे धोक्यात येऊ लागले आहे. एकंदरच कर्मचाऱ्यांमध्ये हा विषय थट्टामस्करीचा बनत चालला आहे.

जमीन एकाची अन् पिक विमा काढला दुसऱ्यांनीच; चौघां विरुद्ध गुन्हा दाखल

0

परळी — दुसऱ्याच्या जमिनीवर तिसऱ्यानेच पीक विमा काढून फसवणुकीचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी पांगरीतील एका शेतकऱ्याने तक्रार दिली असून परळीतील दोन मल्टी सर्व्हिसेस चालक आणि २ शेतकरी अशा चौघांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांगरी शिवारातील गट नं ३९ मध्ये शेतकरी अंगद गणपतराव मुंडे यांनी जमीन आहे. त्यांनी २०२२, २०२३ मध्ये सोयाबीन पिकाचा सात एकर तीन गुंठे जमिनीचा पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरला होता. त्यानंतर काही दिवसांनी पांगरी येथे पीक विमा कंपनीचे अधिकारी आले. अंगद मुंडे यांना भेटून पीक विमा दोनदा का भरला, अशी चौकशी केली. तेव्हा त्यांनी पीक विमान दोनदा भरला नसल्याचे स्पष्ट केले. अंगद मुंडे यांनी चौकशी केली असता गट क्रमांक ३९ मधून मधुकर भगवानराव भारती (रा. लिंबुटा) यांनी देखील पीक विमा भरल्याचे पुढे आले. त्यानंतर अंगद मुंडे यांनी कृषी अधिकाऱ्यांकडून विम्याबाबत माहिती घेतली असता भलताच प्रकार पुढे आला. पांगरीतील रवींद्र दामोदर मुंडे यांनी त्यांच्या जलालपूर येथील आसावरी मल्टी सर्व्हिसेस येथून जुलै ते सप्टेंबर २०२३ दरम्यान पीकविमा भरला होता. त्यामुळे अंगद मुंडे यांचा विमा रद्द करण्यात आला. त्यामुळे त्यांना पीक विम्याचा ९२ हजारांचा चेक मिळालाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अंगद यांनी परळी शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला. ईन पांगरीत पीक विम्याच्या फसवणुकीचा आणखी एक प्रकार पुढे आला आहे. यामध्ये गावातील शेतकरी अशोक किसनराव मुंडे यांच्या गट क्रमांक ७६ या शेतात धनराज उत्तम चौधर यांनी केदारेश्वर मल्टी सर्व्हिसेसमध्ये कौसाबाई लक्ष्मण राठोड, रा. पांगरी तांडा यांचा पीक विमा भरला. त्यामुळे अशोक मुंडे यांचाही पीक विमा रद्द झाला. असे बोगस प्रकार गावात अनेक शेतकऱ्या बाबतीत घडले असून काहींना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे. परळी पोलिसांत दाखल गुन्ह्यानुसार, मधुकर भगवानराव भारती, रवींद्र दामोदर मुंडे (दोघेही रा. लिंबुटा), धनराज उत्तम चौधर (रा. लोकरवाडी), कौसाबाई लक्ष्मण राठोड (रा. पांगरी तांडा) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेकनूर हादरले : नराधम बापाचा पोटच्या अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार!

0

नेकनूर — जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची नात्याला काळीमा फासणारी खळबळ जनक घटना घडली आहे. ही घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात शुक्रवारी घडली
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एका गावातील दाम्पत्यामध्ये घरगुती कारणावरून वाद निर्माण झाले होते. या वादातून आरोपीची पत्नी पुण्याला निघून गेली होती. तर मुलगी एकटी घरी होती. शुक्रवारी रात्री राहत्या घरातच नराधम पित्याने पोटाच्या मुलीवर अत्याचार केला. सदरील प्रकार हा मुलीची आई पुण्यावरून आल्यानंतर समोर आला. पिडीतेच्या आईने याबाबत आज नेकनूर पोलीस ठाण्यात जावून नराधम पित्या विरोधात तक्रार दाखल केली त्यानुसार आरोपीविरोधात बाल लैगिंक अत्याचार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या नराधाम आरोपी नेकनूर पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेमुळे नेकनूर परिसरात खळबळ उडाली.

कार्यकर्त्याची भाजप कार्यालयासमोरच दिवसाढवळ्या हत्या

0

माजलगाव —  शहरातील भाजप कार्यालयासमोर भर दिवसा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता तथा आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे याचा खून झाला आहे. कोयत्याने त्यांच्यावर सपासप वार करण्यात आले.

नारायण शंकर फपाळ याने भर दिवसा हा खून केला असून, या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतं आहेत.शहरात भर दिवसा ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. हत्या केल्यानंतर नारायण फपाळ हा आरोपी स्वतः पोलिस ठाण्यामध्ये हजर झाला. अनैतिक संबंधाच्या प्रकरणातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.
माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ भर वस्तीत भाजपचं कार्यालय आहे. तिथं कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ही हत्येची घटना घडल्याने दहशत पसरली आहे. बीडमधील शांतता-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे
आरोपि नारायण फपाळ हा रागारागाने आगे यांच्यावर कोयत्याने वार करत होता, त्यावेळी परिसरात दहशत निर्माण झाली होती. काहीशी पळापळ झाली होती. हा सर्व प्रकार काहींनी व्हिडिओमध्ये कैद केला असून, हे व्हिडिओ आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होऊ लागले आहेत.
मयत बाबासाहेब आगे वय 30 वर्ष हे माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य देखील आहेत. भाजपच्या तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय येथे आले होते. त्या कार्यालयाच्या समोरच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी नारायण फपाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. बाबासाहेब आगे समोर येताच, फपाळ याने त्यांच्यावर सपासप वार केले. फपाळ याने माजलगाव शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर होऊन हत्येची माहिती दिली

पाटोदा तहसील कार्यालयात चोरट्याने मारला डल्ला,

0

पाटोदा — येथील तहसील कार्यालयातून चोरट्याने चक्क संगणक लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या  विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चक्क तहसील कार्यालयातूनच ही चोरी झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. सोबतच शासकीय कार्यालयही आता चोरट्यांपासून सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. याबाबत पुढे आलेल्या माहितीनुसार, पाटोदा तहसील कार्यालयातील महसूल विभागातून  संगणकाची चोरी झाली आहे. तहसील प्रशासनाने चोरीचा प्रकार उघड होऊ नये यासाठी प्रयत्न केला. मात्र ही बाब नायब तहसीलदार गणेश दहिफळे यांच्या लक्षात येताच त्यांनी ही तक्रार नोंदवली आहे. यात चोरट्याने हा संगणक लंपास का केला? की कार्यालयातूनच याची चोरी झाली. याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र तहसील कार्यालयच असुरक्षित असल्याचा प्रत्यय या निमित्ताने समोर आला आहे.

पुण्याची पुनरावृत्ती बीडात; प्रसूती झालेल्या माहिलेचा रक्तस्त्रावाने मृत्यू

0

बीड — जिल्हा रुग्णालयात एका 24 वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर तासाभरात रक्तस्रावाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.या प्रकरणामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी सांगितले आहे.

तालुक्यातील अंबिल वडगाव येथील छाया गणेश पांचाळ वय 24 वर्ष ही महिला प्रसूतीसाठी शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांची नॉर्मल प्रसूती होऊन तिने एका मुलाला जन्म दिला.प्रकृतीमुळे नवजात मुलास एसएनसीयू (काचामध्ये) ठेवण्यात आले. प्रसूतीनंतर तासाभरातच महिलेला रक्तस्त्राव सुरू झाला. अति रक्तस्त्रावामुळे पहाटे छाया पांचाळ यांचा मृत्यू झाला. प्रसूतीनंतर बाळ सुखरूप आहे, परंतु छाया यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या प्रकरणी चौकशीसाठी दोन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यांचा अहवाल येताच पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी सांगितले आहे.

शाळकरी मुलाचे अपहरण; एका तासात सुटका आरोपी जेरबंद

0

बीड — पांगरी रोड भागातून एका शाळकरी मुलाचे अपहरण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती मात्र स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी अशोक दुबाले व मुन्ना वाघ यांनी गतीने तपास करत आरोपीला बेड्या ठोकत मुलाची सुखरूप सुटका केली सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली होती.
बीड शहरातील पांगरी रोड भागातून एका 9 वर्षीय मुलाला जगदीश गायकवाड रा. अंबिका चौक,बीड या आरोपीने अपहरण करून पळविले होते.आरोपी बीड बसस्थानकाकडे आला होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी अशोक दुबाले आणि मुन्ना वाघ यांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान अवघ्या तासाभरातच स्थानिक गुन्हे
शाखेने मुलाची सूटका करत मोठी कामगिरी बजावली आहे. सदर मुलाच्या वडिलांना फोन करून आरोपी गायकवाड याने पाच लाखांची मागणी देखील केली होती. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. पोलीस अधिक्षकांनी यात स्वतः लक्ष घालून तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. आरोपी सध्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असून त्याला
शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. पोलीस कर्मचारी दुबाले आणि वाघ यांनी केलेल्या कामगिरीचे सध्या सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे.

पवनचक्की कंपन्यांच्या आर्थिक अनियमिततेचा कळस; पा”ठकां”च्या कारभाराची येतेय किळस ✒️ भाग –3

0

बीड — गाव पातळीवर काम करताना दलाल मध्ये घालत त्यांना भरमसाठ पैसा देणे, तहसीलदार,गिरदावर, तलाठी, पोलीस ठाणे प्रमुख यांच कंपन्यांचं प्रामाणिकपणे काम करणं
गुंडांची टोळी सक्रिय असण,विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेला भरमसाठ दिलेला मोबदला, मावेजा देताना ठेवलेली कमालीची गुप्तता यासारख्या एक ना अनेक बाबी लक्षात घेतल्या तर कंपन्यांच्या आर्थिक अनियमिततेने कळस गाठत नवे प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. पण करणार काय? इथं जिल्हाधिकारी पदावर बसलेल्या अविनाशी पा”ठका”ने शेतकऱ्यांना ठकवण्याचाच जणू चंग बांधला आहे. शेतकरी हा प्रगतीतला अडथळा आहे. असं वातावरण निर्माण करून आपल्या निष्ठा कंपन्यांच्या पायाशी वहात तळवे चाटण्याचा किळसवाणा प्रकार सुरू ठेवला आहे.
पवनचक्की सौर ऊर्जा कंपन्यांच्या आर्थिक मायाजालात दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी अविनाश पा”ठक”च पुरते अडकले. आपली खुर्ची, अधिकार निष्ठा कंपन्यांच्या पायाशी वाहिल्या. परिणामी इंग्रज, मोगल या दोन्ही पूर्वीच्या सत्याधीशांच्या नीतीचा अवलंब करत फोडा,तोडा राज्य करा हे धोरण त्यांनी अवलंबिलं. या मध्ये उणीव राहू नये यासाठी मोगलाई नीतीचा वापर करून शेतकऱ्यावर अत्याचाराला सुरुवात देखील केली. याचीच प्रचिती अंबाजोगाई येथील जवळगाव मध्ये पाहायला मिळाले. सोलार कंपनीला गायरान जमीन देण्यासाठी गायरान धारकांची घर उध्वस्त केली. शेतकऱ्यावर विष पिऊन आत्महत्या करण्याची वेळ आणली. कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती जिल्हा भरात पाहायला मिळू लागली. कंपन्यांनी आर्थिक जोरावर गुंडांच्या टोळ्या निर्माण केल्या त्यातून ग्रामीण भागात दहशतीचं वातावरण तयार केलं. गाव पातळीवर काम करताना गावातला एखादा माणूस आपलासा करायचा त्याला भरमसाठ पैसा पुरवायचा यातून आपला मार्ग सुकर करायचा. मग या दलालाने शेतकऱ्यांच रक्त भरमसाठ पिलं. कंपन्यांनी आशा निर्माण केलेल्या दलालांना पूरून उरत त्यांच्या धमक्यांना भीक न घालणाऱ्या, गुन्हे दाखल करूत आशा धमक्या देणाऱ्या पोलिसांनाही न जूमानणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना भरमसाठ मोबदला दिला.यातून अनेक हजारो शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घालण्याचं काम कंपन्यांच्या दलालांनी केलं. एरवी पोलीस ठाण्यात फोन करून दुर्घटनेची माहिती दिली तर मदतीला न धावणारे पोलीस ठाणे प्रमुख कंपन्यांच्या एका फोनवर बंदोबस्तासाठी कंपन्यानी पैसा भरलेला नसताना देखील पार्श्वभागाला पाय लावत हूजरे गिरी करायला गेलेले पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांनी पोलीस ठाण्यात नेऊन डांबून ठेवण्याचे प्रकार घडले. पोलीस अधीक्षक सामाजिक न्याय अन्यायाची जाणीव ठेवणारे असले तरी एकट्याच्या प्रयत्नाने प्रशासन सुधारणे किती अवघड बनते याची प्रचिती सध्या येत आहे.
जिल्ह्यात भरमसाठ वाळू उपसा सध्या देखील सुरू आहे. अवैध गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याकडे पाहिला जिल्हाधिकाऱ्यांना वेळ नाही. मात्र कंपन्यांची काम सुरळीत व्हावीत यासाठी त्यांच्याकडे भरमसाठ वेळ आहे. रात्रीची झोप घ्यायला देखील त्यांच्याकडे उसंत नाही. जिल्ह्याचा प्रमुख लाळ घोटणारा असेल तर महसूल कर्मचाऱ्यांची वेगळी त-हा कशी असेल? तलाठी, गिरदावर इतकंच नाही तर तहसीलदार देखील कंपन्यांच्या दिमतीला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बसले. एरवी शेतकरी आसमानी संकटात असेल तर त्याची दखल न घेणारी, शासकीय कार्यालयात कधीच हजर नसलेली, सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे डोळे झाक करणारी, वाळू उपसा, गौण खनिज उत्खनन, यात आर्थिक हित पाहणारी ही मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर कंपन्यांसाठी जाते की काय आर्थिक फायदा झाल्याशिवाय थोडीच जाते हे न कळण्या इतकी दूध खुळी जनता नक्कीच नाही. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना भरमसाठ मावेजा देताना कमालीची गुप्तता या कंपन्यांनी पाळली परिणामी खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. अपेक्षित मावेजा गोरगरीब शेतकऱ्यांना मिळाला नाही यातून शेतकरी नागवण्याचं काम कंपन्यांसह पा”ठक” सारख्या वरिष्ठ अधिकार पदावर बसलेल्या दलाल पासून गाव पातळीवर दलालांपर्यंतच्या साखळीने केलं.
कंपन्यांचा प्रकल्प उभारणीचा आकडा करोडो रुपयांमध्ये गेला असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. आर्थिक अनियमितता झालेली असताना यात काळा पैसा किती फिरला याची मोजदाद आता करणार कोण? या आर्थिक अनियमिततेची दखल सनियंत्रण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घेणे अपेक्षित आहे. पण इथे जिल्हाधिकारी पा”ठकां”चा कारभार च बरबटलेला आहे. मग कंपन्यांच्या आर्थिक अनियमिततेची दखल घेणार कोण? एकंदरच शेतकरी नागवला गेला असला तरी व्यवस्थेतले कंपन्यांनी निर्माण केलेले हे घटक मात्र मालामाल झाल्याचं चित्र जिल्ह्यात निर्माण झाला आहे.