Home Blog Page 76

वडिलांच्या अंत्यविधीला येताना कारला अपघात;मूलगा ठार, सून गंभीर जखमी

0

बीड — पुणे येथून ढेकणमोहा ता. बीड येथे वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत असतांना मुलासह सुनेच्या कारला भरधाव टेम्पोने जोराची धडक दिली. या अपघातात पती जागीच ठार झाला असून पत्नी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना काल (दि.३१) शनिवार रोजी सायंकाळी पाथर्डी – शिरूर रोडवर मानुर ता. शिरूरकासार जि. बीड शिवारात घडली.

ढेकणमोहा येथील संतोष मदन थापडे (वय ४०) हे पुण्यातील वाघोली येथे स्थायिक झाले होते. (दि.३१) मे रोजी त्यांचे वडिल मदन आश्रुबा थापडे (वय ७०) रा. ढेकणमोहा यांचे निधन झाल्याने संतोष थापडे व त्यांची पत्नी निता थापडे हे दोघे कार क्र.एम.एच.१४.जी.डी.३१७५ मधुन काल सायंकाळी अहमदनगर-पाथर्डी मार्गे बीड ढेकणमोहाकडे येत होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या आयशर मालगाडी क्र.एम.एच.४६.ई. २०९७ ने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातात संतोष मदन थापडे (वय ४०) यांचा मृत्यु झाला तर निता थापडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मयत संतोष थापडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला . दरम्यान वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत असतांना काळाने मुलावर झडप घातल्याने एकाच कुटूंबातील बाप-लेकांचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

जालना,छ. संभाजीनगर, अंबाजोगाईतून चोरलेल्या 7 मोटार सायकली जप्त

0

बीड — अंबाजोगाई, छ. संभाजीनगर, जालना शहरातून मोटारसायकली चोरी करून विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी मारलेल्या छाप्यात सहा लाख रुपये किमतीच्या सात मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. याबरोबरच आणखी पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधीक्षकांनी जिल्हयामध्ये होणाऱ्या मोटर सायकल चोरीच्या गुन्हयामध्ये वाढ झाल्याने मोटर सायकल चोरीचे गुन्हे जास्तीत जास्त उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने शर्थीचे प्रयत्न सुरु केले होते. दिनांक 30 मे ला पोलीस हवालदार भागवत शेलार यांना माहीती मिळाली की , अंबाजोगाई शहरातुन चोरी गेलेल्या गाडया तळेगांव शिवारामध्ये घरामध्ये विक्रीसाठी ठेवल्या असुन त्याची डिल होणार आहे. या बातमीवरुन स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोउनि सिध्देश्वर मुरकुटे व पथकाने तळेगाव येथे छापा मारला असता, आरोपी शेख ईलियास शेख गफार, वय 25 वर्ष, रा तळेगांव ता.जि बीड. हा चोरीच्या गाडयासह मिळाला.आरोपीकडुन एकुण 07 मोटार सायकली तपासकामी जप्त केल्या.त्या मोटार सायकली अंबाजोगाई, जालना, छत्रपती संभाजीनगर येथुन चोरल्याचे आरोपीने सांगीतले.आरोपीकडे मिळुन आलेल्या मोटार सायकलींचे वर्णन खालीलप्रमाणे
अ.क्र प्रकार व कंपणी रंग चेसीस नंबर दाखल गुन्हे
01 होडा ड्रिम युगा काळया रंगाची ME4JC558AEGT27030 अंबाजोगाई शहर 179/2024 कलम 379 भा.दं.वि
02 हिरो स्प्लेंडर प्लस काळी सिल्वर पट्टा MBLHAR087J5F00402 अंबाजोगाई शहर 298/2023 कलम 379 भा.दं.वि
03 हिरो HF DELUXE सिल्वर रंगाची MBLHAR206H5D01035 तालुका जालना 147/2025 क 303(2) BNS
04 हिरो HF DELUXE लाल रंगाची MHLHAR209JGF14166 बेगमपुरा छ.संभाजीनगर 56/2025 क 303(2) BNS
05 हिरो सिबी शाईन काळी लाल सिल्वर पट्टा ME4JC65AKJ7218187 बेगमपुरा छ.संभाजीनगर 61/2025 क 303(2) BNS
06 होंडा सिबी शाईन काळया रंगाची ME4JC653HG7013628 अभिलेख मिळुन आला नाही
07 होंडा सिबी शाईन काळया रंगाची ME4JC36JDD7390939 अभिलेख मिळुन आला नाही.
आरोपीकडुन एकुण 05 चोरीचे गुन्हे उघडकीस आले.असा एकुण 07 मोटार सायकली किं.अं 6,00,000/- मुद्देमाल जप्त केला आहे. वर मिळुन आलेल्या मोटार सायकली मुळ मालकांनी संबधीत पोलीस ठाणेशी संपर्क साधुन घेवुन जाव्यात.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके, यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मान शेख, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा बीड, पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर मुरकुटे, पोलीस हवालदार भागवत शेलार, विकास राठोड, दिपक खांडेकर, राहुल शिंदे, नितीन वडमारे, विकी सुरवसे, सुनिल राठोड, मच्छिद्र बीडकर यांनी केलेली आहे.

छत्रपती मल्टीस्टेटने केली फसवणूक; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

बीड — मल्टीस्टेट बँकांनी गुंतवणूकदारांच्या कोट्यावधीला केलेल्या फसवणुकीच सत्र कायम आहे. गेवराईच्या छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बीड शाखेने ठेवीदाराची 27 लाख 16 हजार 329 रुपयांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आप्पाराव नरहरी उबाळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सोसायटीचे चेअरमन संतोष भंडारी यांनी व्याजदराचे आमिष दाखवून पैशाची गुंतवणूक करायला लावली. 13 टक्के व्याजदर ठरवून फिक्स डिपॉझिट तसेच खात्यावर जमा असलेले माझ्यासह साक्षीदाराची एकूण 27 लाख 16 हजार 329 रुपयांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी आप्पाराव उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभव शहाणे संतोष बसवंत भंडारी उपाध्यक्ष आरती संतोष भंडारी संचालक विठ्ठल पांडुरंग रुचके राजू सतीश काळे लक्ष्मण रतन पवार बाबासाहेब आसाराम दाभाडे किरण अरुण तौर आणि प्रवीण प्रल्हाद मुळे या नऊ जणांविरोधात कलम 420 406 409 34 भादवि कलम 3,4 एम पी आय डी अधिनियम 1999 प्रमाणे बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय कुमावत करत आहे.

सावकारी जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; मृत्यूपूर्वी एसपींना लिहिली चिठ्ठी

0

बीड — सावकारी जाचाला शेतकऱ्यानंतर आता व्यापारी बळी पडला आहे.
सावकाराच्या त्रासाला कंटाळून चक्क पाटोद्याच्या एका व्यापाऱ्यानेच आपलं जीवन संपवल्याची घटना . आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी एका व्यापाऱ्याने खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले.त्या कर्जाची सहा पटीने परतफेड सुद्धा केली. मात्र सावकराला आणखी पैसे हवे होते. त्यामुळे सावकार व्यापाऱ्याला दमदाटी आणि धमक्या देत होता. सावकाराचा जाच सहन करण्यापलीकडे गेल्याने व्यापाऱ्यानं आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी व्यापाऱ्यानं बीडचे पोली अधीक्षक नवनीत काँवत यांना चिठ्ठी लिहिली. त्यानंतर व्यापाऱ्यानं गळफास घेतला. संजय कांकरिया, असं आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. संजय कांकरिया यांनी एका खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. दरम्यान व्यापाऱ्याच्या आत्महत्येमुळे बीड जिल्ह्यातील खळबळ उडालीय.

व्यापाऱ्यानं आत्महत्या करण्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. आर्थिक विवंचनेतून त्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. कर्जाची सहा पट रक्कम सुद्धा त्यांनी परतफेड देखील केली. मात्र सावकारांची नजर त्यांच्या जमिनीवर होती. त्यामुळे आणखीन पैसे हवे असल्यानं सावकार कांकरिया यांच्यामागे पैसाचा तगादा लावत होता.पैसे दिले नाही तर चटके देऊन तुझ्यासह तुझ्या कुटुंबाला जिवंत मारू, अशी धमकी दिली होती.या धमकीमूळे व होणाऱी मानसिक छळवणूक संजय कांकरिया यांना सहन झाली नाही. वाढलेला जाच पाहून कांकरिया यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनाच चिठ्ठी लिहीली. मी किती वेळा फिरलो, तरी न्याय मिळत नाही. माझ्या मरणाला जबाबदार कोण?” अशा शब्दांत व्यापाऱ्याने आपली निराशा व्यक्त केली. शेवटी
शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.संजय कांकरिया यांनी अमृत भोसले आणि दीपक साळुंके या दोघांकडून व्याजाने पैसे घेतले होते. कांकरिया यांनी या दोघांना सहा पट पैसे परत केले होते, तरीही यांनी पैशाचा तगादा लावला. चटके देऊन जीवे मारण्याची धमकी अमृत भोसले आणि दीपक साळुंके यांनी संजय कांकरिया यांना दिली होती. त्यानंतर संजय कांकरिया यांनी आत्महत्या केली.या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अमृत भोसले, दीपक साळुंके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे.

बीड:उच्चभ्रू वस्तीतील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश!

0

बीड — जालना रोडवरील बँक कॉलनी मध्ये पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय पीडित महिलेची सुटका केली या प्रकरणी तीन जणांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दोघांना अटक करुन तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. शकुंतला सुरेश राऊत वय40 वर्ष, रा. फ्लॅट नं. 02, राम अंश अपार्टमेंट, इंडिया बँक कॉलनी, बीड, महेश मोहनराव चांदणे वय 33 वर्ष, रा. गया नगर, बीड व मुमताज नासिर शेख रा. गेवराई या तिघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जालना रोडवरील इंडिया बॅंक कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये वेश्‍या व्यवसाय सुरु असल्याची माहिती, अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्होगाडे यांना मिळाली. त्यांनी पथकासह छापा टाकला असला एका महिलेच्या माध्यमातून परराज्यातील महिलेकडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद (कोलकत्ता) येथील पिडीतेची कारवाईत सुटका करण्यात आली. पोलिसांनी शकुंतला राऊत, महेश चांदणे व मुमताज नासिर शेख या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शकुंतला राऊत हिच्या भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात होता. मुमताज शेख महिलांची व्यवस्था करत असे, तर दलाल महेश चांदणे त्याच्या रिक्षातून महिलांची ने-आण करीत असे, ही बाब कारवाईत समोर आली.पोलिसांनी शकुंतला राऊत व महेश चांदणे यांना अटक केली. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात पूर्वीही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत कारवाया झालेल्या आहेत.
कारवाईत वर्षा व्हगाडे, संजय सुरवसे, अशोक शिंदे, प्रदीप येवले, अनिता माने, मनीषा खरमाटे यांचा सहभाग हेाता.

बंटेवाड करणार एलसीबी चा बेडा पार; अनेकांची खांदेपालट ,आणखी बदल्या होणार !

0

बीड — ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पीआय मारुती खेडकर बीड ग्रामीण ठाण्याचा कारभार पाहणार आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी आज आदेश जारी केले. आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.
उस्मान शेख यांची लातूरला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर एसबी च्या प्रमुख पदाची बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय शिवाजी बंटेवाड यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेची घडी व्यवस्थित बसवावी लागणार आहे. वाढती गुन्हेगारी रोखणं त्यांच्यापुढे आव्हान राहणार आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याची रिक्त झालेल्या जागेवर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे मारुती खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर किशोर पवार हे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा कारभार पाहणार आहेत. शरद जोगदंड अंबाजोगाईला वर्षा शिंदे वडवणी, महादेव ढाकणे दिंद्रुड, मनोज निलंगेकर तलवाड्याला, प्रवीण जाधव शिरूर का., अमोल केदार एसपी रीडर तर आदिनाथ भडके अंभोरा पोलीस ठाण्याला बदलून गेले आहेत. पी आय विनोद घोळवे सायबर क्राईम ला एपीआय गणेश धोक्रट डीएसबी, राजेंद्र घुगे अंबाजोगाई शहर, संतोष जंजाळ पाटोदा, रत्नाकर गुळवे एटीबी, पीएसआय भारत बर्डे युसुफ वडगावला, शफिक सय्यद एस डी पी ओ रीडर बीड, आनंद शिंदे अंबाजोगाई शहर ला बदलून गेले आहेत. याबरोबरच आणखी फेर बदल पोलीस दलात होणार आहेत.

अंबाजोगाई: बस स्थानकात प्रवाशाला बसने चिरडले

0

अंबाजोगाई — बस स्थानकावर सकाळी भीषण अपघात घडला .दुसऱ्या बसमध्ये चढत असताना बाजूला उभ्या असलेल्या एका बस ने प्रवाशाला चिरडले आहे .या अपघातात प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.
अंकुश मोरे असे मृत प्रवाशाचे नाव आहे.दुसऱ्या बस मध्ये चढताना बाजूने आलेल्या बसने प्रवाशाला चिरडले आहे .यात प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे.ही दुर्घटना बस स्थानकाच्या आवारात सकाळी घडली .अंकुश मोरे हे दुसऱ्या बस मध्ये चढत असताना शेजारी उभ्या असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस प्रवाशाच्या अंगावरून गेली .या अपघातात अंकुश मोरे या प्रवासाचा जागीच मृत्यू झाला .या प्रकारामुळे काही काळ बस स्थानकावर मोठी खळबळ उडाली होती . चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशाचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे

बीड शहरात पूर परिस्थिती उद्भवू नये यासाठी उपाययोजना करा — आ. क्षीरसागर

0
बीड — यावर्षी पावसाळ्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड शहराच्या जवळच असलेले बिंदुसरा धरण जवळपास ८० टक्के भरले आहे. पावसाळपूर्वी अतिवृष्टीमुळेच धरण ८० टक्के भरले आहे तर येत्या पावसाळ्यात पावसाची आवक वाढल्यानंतर बिंदुसरा नदीला पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
                बीड शहरातून बिंदुसरा आणि करपरा या दोन नद्या वाहतात. यावर्षी मान्सूनपूर्व अतिवृष्टी जोरदार झाली आहे. त्यामुळे पावसाळ्याअगोदरच बीड शहरातील दोन्ही नद्यांना पाणी आले आहे. तसेच बीड शहराला लागून असलेल्या पाली येथील बिंदुसरा धरण प्रकल्पही, जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार ८० टक्के क्षमतेने भरले आहे. मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळेच ८० टक्के भरलेले धरण आगामी पावसाळा काळात होणारा पाऊस आणि पाण्याची आवक यामुळे साहजिकच आणखी जास्त प्रमाणात भरले जाणार आहे. त्यामुळे बीड शहरातून वाहणार्‍या बिंदुसरा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन पूर परिस्थितीबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
 
पूल कम बंधाऱ्याच्या कामाची गती वाढविण्याच्या सूचना
बीड शहरातील बार्शी रोडवरील बिंदुसरा नदीपात्रात पूल कम बंधार्‍याचे काम सुरू आहे. पाणीपातळीत वाढ होण्याअगोदर हे काम ठराविक स्तराच्या पुढे असणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या कामाच्या गती पेक्षा अधिक गतीने हे काम होणे गरजेचे आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी गुरुवारी (दि.२९) रोजी सदरील कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गती वाढविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला केल्या.

बल्लाळच अरेबियन ज्वेलर्स चा भल्लाळ देव; गुंतवणूकदारांचा घेतला जीव

0

बीड — परप्रांतीय शहरात येतो, पोलिसांच्या नाकावर टिच्चून गंडवण्याचा गोरख धंदा वाजत गाजत चालू करतो. पोलिसांकडे तक्रारी येतात तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शेवटी कोट्यावधी रुपयांचा चुना लावून तो फरार होतो. ही फिल्मी कहानी नाहीतर सत्य हकीकत आहे. या सर्व प्रकारावर पांघरून घालणारे बल्लाळच गुंतवणूकदारांचे भल्लाळ देव बनले आहेत.
पतसंस्थांनी करोडो रुपयाला गंडा घातल्यानंतर अरेबियन ज्वेलर्स च्या नावाखाली जनतेला लुटण्याचा गोरख धंदा सुरू केला गेला. धमाका ऑफर च्या नावाखाली फ्लॅट, चार चाकी गाडी, बुलेट सारख्या गाड्यांच आमीष लोकांना दाखवलं जात होतं. सारासार विचार बुद्धीचा वापर करणारा प्रत्येक जण ही फसवणूक असल्याचं सांगत होता. पण बीड शहर पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं. साडेचार हजार रुपये नोंदणी फीस घेऊन अडीच हजाराहून अधिक सभासद या योजनेमध्ये सहभागी करून घेतले. दर महिन्यासाठी लकी ड्रॉ च्या नावाखाली पैसे जमा केले जायचे. दोन-तीन कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठांच्या हस्ते बक्षीसांच वितरण केलं. दरम्यान याच वेळी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाप्रमुख तथा ठेवीदार संघर्ष कृती समितीचे प्रा. सचिन उबाळे यांनी पोलिसांनी जनतेला गंडवणाऱ्या या महाभागाला आळा घालावा अशी मागणी निवेदन देऊन केली. नेहमीच्या सवयीने बल्लाळांची “लाळ“इथे देखील टपकली. त्यांनी कारवाई केलीच नाही. इतकच नाही तर शॉप ॲक्टच लायसन घेऊन हा गोरख धंदा उभा केला होता याची शहानिशा करण्याची देखील तसदी घेतली नाही. गोरगरिबांना लुटतोय लुटू द्या; या प्रकारात बल्लाळ यांनी स्वतःचा फायदा बघितला त्यात गोरगरीब मात्र बुके कंगाल झाला. “माया” आणि “काया” यासाठी वाटेल ते ऽऽ! असं म्हणणाऱ्या माणसाकडून जनतेचे भलं होईल, गुन्हेगारीला आळा बसेल अशी अपेक्षा तरी कशी धरणार ?
बरं ही जनतेची लूटमार सुरू असताना काही संपादक म्हणवून घेत विश्वाचे नायक असल्याचे सिद्ध करणाऱ्यांनी अरेबियन ज्वेलर्स विरोधात तक्रार करणाऱ्या प्रा. सचिन उबाळे यांच्यावरच चिखल फेक करत. बिल बिल करून सोडलं होतं. त्यावेळी बल्लाळ देवाची बाजू देखील घेण्यात आली होती. हे वास्तव नाकारून कसं चालेल? मीडिया मॅनेजमेंट करण्यात देखील अनेकांचा सहभाग होता. खूप मोठ् रॅकेट बंगाली बाबू ने सक्रिय केलं होतं. अनेकांनी अरेबियन ज्वेलर्स च्या नावाखाली फसवणूक होत असल्याचे वृत्त देखील दिले होते. त्यामध्ये “सह्याद्री माझा” ने देखील पोलिसांच्या निदर्शनास येण्यासाठी पोलिसांवर टीका केली होती. मात्र त्याकडे देखील बल्लाळानी सवयीप्रमाणे दुर्लक्ष केलं.
बरं विशेष बाब म्हणजे एका ज्वेलर्स‌ मालकाला अरेबियन ज्वेलर्स चा मेहबूब रहमान या बंगाली बाबुने धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत वठला नाही म्हणून या ज्वेलर्स मालकाने फसवणूक झाल्याची तक्रार दोन अडीच महिन्यापूर्वी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. यावर देखील बल्लाळ देवाने कुठलीच कारवाई केली नाही. जिल्ह्यात आयजी येणार म्हटल्यानंतर दुकानावर जाऊन चौकशी करावी याची उपरती झाली.बल्लाळानी दोन महिने फसवणूक करणाऱ्या बंगाली बाबुला पळून जाण्यासाठी वेळ दिला. तो पळून जाण्यात यशस्वी झाला. बीडच्या जनतेला गंडा घालून पळालेला हा बंगाली बाबू खरंच स्वतःच्या संसाराला हा पैसा वापरणार आहे का? की त्या पैशाचा वापर इतर समाजविघातक कृत्यासाठी वापरणार? हे येणारा काळच ठरवणार आहे. काहीही असो बंगाली बाबुला पळून जाण्यास पुरेसा वेळ बल्लाळांनी दिल्यामुळे बीडच्या गोरगरिबांच्या लेखी ते भल्लाळ देव बनले आहेत.

एसपी साहेब कानाखालचा अधिकारी देण्याऐवजी एलसीबीला हवा खमका माणूस; कावळा कारभारी # दरबारी व्हायला नको!

0

बीड –निवडणुकाच्या तोंडावर राज्यातील पोलीस विभागाच्या बदल्या सुरु झाल्यानंतर बीडमधील एलसीबीचे उस्मान शेख यांची लातूरला बदली करण्यात आली. त्यांच्या जागी कोण हा प्रश्न अनेकांना पडला असताना आता एलसीबीला एसपी साहेब आपल्या कानाखाली राहणारा आणि स्वभावाने अतिशय शांत असणाऱ्या माणसाच्या शोधात असल्याची माहिती मिळत आहे. पण या अधिकाऱ्याच्या निवडीनंतर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळणार हे मात्र निश्चित आहे.

दरम्यान सध्या आयजी साहेब आणि एसपी यांच्यामध्ये बदल्याचे खलबते सुरु झाले असून थोडयावेळात नाव अंतिम होणार आहे.

एलसीबीत घनशाम पाळवदे यांच्यानंतर गुन्हेगारांना जरब बसावी अश्या एकाही अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही हे वास्तव आहे. आता पोलीस अधिक्षक खमक्या अधिकाऱ्याला या ठिकाणी नियुक्ती देतील असे वाटतं असताना एका दुसऱ्याच अधिकाऱ्याचे नाव आघाडीवर असल्याचे कळते.
बीडमध्ये जेंव्हा जाळपोळीची घटना घडली तेंव्हा सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.लोक घराबाहेर येताना भीत होते. यावेळी गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले. त्यावेळी काही पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वात पाहिले जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांचा ताफा पाहुन पळ काढला होता.एखाद्या मॅरेथॉन स्पर्धेला लाजवेल असं चित्र त्यावेळी निर्माण झालं होतं. पार्श्वभागाला पाय लावून पळणारे पोलीस अधिकारी बीडकरांनी इतिहासात पहिल्यांदाच पाहिले होते. पाय लावून पळणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आता एलसीबी साठी आघाडीवर घेतले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ढीला ढाला माणूस या पदावर बसवून बळीचा बकरा बनवण्याची खेळी खेळली जात आहे. ज्या पद्धतीने पोलीस अधीक्षकांनी आपली प्रतिमा जिल्ह्यात बनवली आहे. त्या प्रतिमेला मात्र ढिल्ल्या माणसामुळे तडा जायला देखील वेळ लागणार नाही.बीडमध्ये आधीच कायदा आणि व्यवस्था अस्तित्वात नसल्याच्या चर्चा आहेत.
उस्मान शेख यांची कारकीर्द देखील वांझोटीच राहिली हे वास्तव आहे. या जागेवर आता कानाखालचा माणूस पाहिजे म्हणून मेरिटच्या अधिकाऱ्यांना डावलंण्यात येणार असेल तर ते पोलीस दलासाठी चिंतेची बाब आहे. एलसीबीत आतापर्यंत वशिलेबाजी आणि लाळ घोटेपणावरच नियुक्त्या मिळाल्या होत्या. आता कुठे राजकीय पाठबळ नसणारे आणि आपल्या कामात अव्व्ल असणाऱ्या सामान्य अधिकाऱ्याला एलसीबीचे अधुरे स्वप्न पूर्ण होईल असे वाटतं असताना एसपी साहेब भ्रमनिरास करतायत की काय असे वाटू लागले आहे. शेवटी घटक प्रमुखांनीच अधिकारी निवडायचे असतात पण ते निवडताना जिल्ह्यात अप्पर पोलीस अधिक्षक यांची बदली, डीवायएसपी यांची बदली आणि ते स्वतः नवीन असताना कायदा योग्य हाताळणाऱ्या माणसाची निवड ही करणे महत्वाचे आहे. नाही तर कावळ्याच्या हाती दिला दरबार….! अशी स्थिती व्हायला वेळ लागणार नाही.