बीड — एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे पहिला नवरदेव लग्न लागल्यानंतर मंडपातून पळून जाताच दुसऱ्या सोबत विवाह लावल्याचा खळबळ जनक प्रकार बीड शहरातील शाहूनगर भागात उघडकीस आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील तेरा वर्षीय मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाली. मात्र तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिचा विवाह लावण्याचे ठरवले. पहिला विवाह 32 वर्ष मुलासोबत ठरवण्यात आला. तो विवाह झाला. या 32 वर्षीय इसमाला दोन पत्नी आहेत. दोघीही सध्या नांदत नसल्याची माहिती मिळाली आहे. या लग्नाची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली. येत असल्याचे पाहताच त्याने तिथून पळ काढला. या नंतर लागलीच दुसरा नवरदेव लग्नासाठी बोलविण्यात आला आणि त्याच्यासोबत या तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावला गेला. याची माहिती प्रशासनाला मिळताच, पळून जात असताना पोलिसांनी रस्त्यावर अडवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान बालविवाहाची माहिती मिळाली यावेळी पाेलिसांना सांगितले. पाचवीच्या वर्गातील मुलीचे दोन विवाह झाल्याचे समोर आले. परंतु, यात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य केले नाही. टोलवाटोलवी केली. अशाने बालविवाह कसे थांबतील असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
बीड:अल्पवयीन मुलीचा एकाच दिवसात दोनदा विवाह;गून्हा दाखल
एस डी एम कार्यालयाचा खेळच न्यारा; खाजगी माणसांच्या हातात कारभार सारा
बीड — महसूल मधील महत्वाचा विभाग असलेलं उपविभागीय कार्यालय खाजगी माणसांच्या विळख्यात सापडले असून शासकिय नियमांचं ताळतंत्र बिघडलं आहे.पैशांचा खेळ खेळून सगळा मेळ बसवला जात असल्याने जनतेवर मात्र अन्याय होत आहे.
उपविभागीय कार्यालयात खाजगी मंडळी खूर्च्यावर कूंडली मारून बसली असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.परिणामी 2022 ते मे 2025 पर्यंत एसटी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र कोणत्या कागदपत्राधारे वाटप करण्यात आले ते किती वाटप करण्यात आले हे गूलदस्त्यात आहे. याच जात प्रमाणपत्र वाटपाचा कारभार देखील खाजगी इसम स्वतःच्या सेतू सुविधा केंद्रातून पाहत आहे.विचारणा करणार कुणीच नाही लगाम सगळा हातात म्हटल्यावर तो न्याय कारभार कसा करणार? आर्थिक गणित मांडून सगळे खेळ खेळले जात आहेत.तीच स्थिती धरणग्रस्त प्रमाणपत्राची आहे. भूसंपादन विभागाचा कारभार देखील रिटायर्ड कर्मचाऱ्याकडे देण्यात आलेला आहे.बर तो हे काम एकटा पहात नाही तर त्यानेही हाताखाली स्वतःचा माणूस सोबत घेतला आहे.यापूर्वी बीड जिल्ह्यातील धरणग्रस्त प्रमाणपत्र घोटाळा राज्यात गाजलेला असताना पून्हा याच घोटाळ्यांना खतपाणी खाजगी इसमामार्फत घातले जात आहे. “अनवणे अन अक्कडबाज” असलेल्या व्यक्तीने धरणग्रस्त प्रमाणपत्र नियमबाह्य पद्धतीने वाटपाचा धडाका लावला आहे. या प्रमाणपत्राचा भाव देखील लाखावर रुपये असल्याच सांगितलं जाऊ लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा कारभार सांभाळणारा कारभारी इतरही काम करताना दिसू लागला आहे.रेकॉर्ड रुमची देखील तीच परिस्थिती आहे. खाजगी व्यक्तीचे भूत “पिंपळा”वर बसून “पिंगळ” गीत गाऊन
गोरगरिबांच्या मानगुटी मोडताना दिसत आहे. याचाही तोरा मोठा आहे. भरमसाठ पैसा भेटत आहे परिणामी त्यानेही खाजगी इसम सोबत कामाला घेतला आहे.महत्त्वाची कागदपत्र जर खाजगी इसमाच्या ताब्यात अवैध पद्धतीने दिली जात असतील तर जनतेच्या गोरगरिबांच्या हिता आड येणारी ही बाब आहे. एकंदरच उपविभागीय कार्यालयाचा कारभार म्हणजे खाजगी इसम कारभारी आणि घाण दरबारी असं म्हणत कविता करण्याची वेळ आली आहे.या सगळ्या नकट्या कारभारावर जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन अंकुश लावणार का?असा प्रश्न विचारला जात आहे.
माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे यांचे निधन
बीड — बीडचे तात्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कमलाकर साहेबराव आंधळे यांचे काल बुधवार दि.11 जून 2025 रोजी संध्याकाळी 8 वाजता पुणे येथील हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 65 वर्षाचे होते.
त्यांच्या पार्थिवावर आज दि.12 जून रोजी बीड शहरातील अंकुशनगर येथील अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वच क्षेत्रातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांच्या निधनाने चौसाळा परिसरात शोककळा पसरली. डॉ.कमलाकर आंधळे यांनी चौसाळा परिसरातील जनतेची आरोग्यसेवा केली. ते हिंगणी खुर्द चे सुपुत्र होते. मोठ्या पदावर काम करत असताना देखील त्यांचे चौसाळा परिसरातील प्रत्येकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते.
दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा कपिल कमलाकर आंधळे, मुलगी कल्याणी अरविंद घुगे, जावई आयआरएस अरविंद घुगे बंधू डॉ.सुधाकर साहेबराव आंधळे, मेहुणे प्रवीण रावसाहेब मिसाळ यांच्यासह सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्या दुःखात “सह्याद्री माझा” परिवार सहभागी आहे.
दारू महागली ; देशी 80 रुपये तर इतर ब्रँड 360 रुपयावर
मुंबई — महाराष्ट्रातील मद्य प्रेमींसाठी धक्कादायक बातमी आली आहे. यापुढे दारू महाग मिळणार आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दिड टक्याने वाढ झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14 हजार कोटींचा महसूल वाढणार आहे. राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे.
उत्पादन शुल्क विभागाने मद्याचे दर वाढवले आहेत. 180 मिली मद्य किरकोळ विक्रीची किंमत वाढली आहे. देशी मद्य 80 रुपये, महाराष्ट्र मेड लिकर 148 रुपये, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य 205 रुपये तर, विदेशी मद्याचे प्रिमीयम ब्रॅण्डची किंमत 360 रुपये इतकी झाली आहे. मद्य शुल्कवाढीसह सोबतच सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.
पॉवरग्रीड व साखर कारखान्यातील साहीत्य चोरणारी टोळी पकडली
बीड — शेपवाडी येथील पावर ग्रिड मधील ॲल्युमिनियम तसेच वैद्यनाथ साखर कारखान्यातील पितळी साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीच्या मूसक्या बांधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
पोलीस अधीक्षक बीड यांनी बीड जिल्हयामध्ये चोरीच्या घटना होत असल्याने चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर दाखल गुन्हयातील मौजे शेपवाडी येथील पॉवरग्रीड येथील 12.95,000/- किमतीचे अॅल्युमिनीयमचे साहीत्य चोरीस गेलेले होते व परळी वैजनाथ येथील साखर कारखाण्यामधील 60,000/-किमतीचे पितळी साहित्य चोरी गेले होते. या गुन्हयांचा तांत्रिक विश्लेषण व समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, आरोपी शेख जावेद शेख हबीब व त्याचे साथीदार तसेच बंडू लक्ष्मण जोगदंड व त्याचे साथीदार या दोन्ही टोळयांनी चोरले आहे. त्या टोळी मधील आरोपी परळी येथे आहेत त्यावरुन तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी पो. उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या टिमला आरोपी शोधात परळी येथे रवाना केले. तेथे जावुन टिमने आरोपीचा शोध घेतला असता मोठ्या शिताफीने यातील आरोपी शेख जावेद हबीब, वय 39 वर्ष, रा. बरकत नगर परळी बंडु लक्ष्मण जोगदंड, वय 50 वर्ष, रा. रुमना जवळा ता. गंगाखेड, जि. परभणी ह.मु शिवाजीनगर परळी ,विजय नारायण जोगदंड, वय 42 वर्ष, रा. भिमनगर परळी, शेख अब्दुल रौफ ईस्माईल, वय 45 वर्ष, रा. जुना रेल्वे स्टेशन परळी प्रेम रावसाहेब वाघमारे, वय 19 वर्ष, रा. नागसेननगर परळी ,संतोष सोपान कांबळे, वय 30 वर्ष, रा मिलींदनगर परळी. यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांचे ताब्यात देण्यात आले त्याच्या कडुन पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर व परळी ग्रामीण असे चोरीचे दोन गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. यातील चोरीस गेलेले अॅल्युमिनीयम साहीत्य कोणास विकले, कोणाकडे आहे याचा संयुक्तरित्या शोध पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर व स्थानिक गुन्हे शाखा बीड हे घेत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, सुशांत सुतळे, पोलीस उपनिरीक्षक,पो.ह. मारोती कांबळे, विकास राठोड, विष्णु सानप, नितीन वडमारे व सचिन आंधळे, विको सुरवसे यांनी केली आहे.
वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; पिडीता पाच महिन्याची गर्भवती
माजलगाव — लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोट दुखू लागल्याने तरुणीची तपासणी केली त्यावेळी पीडिता 5 महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले आहे.ही घटना मे महिन्यात उघडकीस आली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव सुनील अलजेंडे आहे. पीडित तरुणी ही सुमारे 20 वर्षांची असून, तिची ओळख सुनील अलझेंडे या तरुणाशी झाली होती. दोघांची मैत्री वाढू लागली आणि त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. सुरवातीला त्याने तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले म्हणून तरुणीने त्याला विरोध केला नाही. मात्र नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला.
मे महिन्यात तरुणीला सतत पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिच्या आई- वडिलांनी तिला माजलगाव येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. यावेळी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ती सुमारे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. हे ऐकून कुटुंबीयांवर आभाळ कोसळलं.या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सुनील अलझेंडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड : आदित्य जीवने यांची बदली;मुरूगनंथम् एम. नवे सीईओ
बीड — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुरूगनंथम् एम. हे जिल्हा परिषद चा कारभार पाहणार आहेत.
जि प चे सीईओ आदित्य जीवने यांची वीज वितरण कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदी छ. संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनंथम एम हे बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आले आहेत. याबरोबरच नितीन पाटील हे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तपदा वरून महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कारभार पाहणार आहे . एबी धुळाज यांची कापूस उत्पादक विपणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून ओबीसी बहुजन कल्याण विभाग मंत्रालय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.लहू माळी व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई यांना आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बाबासाहेब बेलदार अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग यांना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.मिन्नू पी.एम. सहायक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मानसी सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची महापालिका आयुक्त, लातूर महानगरपालिका, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
केज कळंब रस्त्यावर पेटलेल्या बसने अखेर बळी घेतलाच
मोटार सायकल अपघातात एक ठार
केज — केज – कळंब महामार्गावर प्रवाशांना घेऊन जाणारी बस दुपारी अचानक पेटली. ही जळालेली बस रस्त्यावर उभी असलेली अचानक दिसल्यामुळे मोटार सायकल स्वाराचा ताबा सुटला यात मोटार सायकल वरून जाणारे दोघे रस्त्यावर पडले. त्याचवेळी ट्रकने या दोघांना फरपटत नेले यात एक जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी साडेतीन च्या सुमारास केस हून कळंब कडे जाणारी बस क्र.एम एच 11/ बी एल 9374 ने अचानक पेट घेतला. यातील 22 प्रवासी सुखरूप बाहेर पडू शकले. ही पेटलेली बस विझवल्या नंतर रस्त्याच्या कडेला तशीच राहिली. परिणामी रात्री आठच्या सुमारास माळेवाडी (ता.केज)येथील गणेश कल्याण हाके व अशोक बबन हाके मोटार सायकल क्र.एम एच 44) ए बी- 6234 ने प्रवास करत होते. अचानक समोर उभी असलेली जळालेली बस दिसल्याने मोटार सायकल स्वाराचा ताबा सुटला गेला. मोटर सायकलसह दोघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी कळंब कडून केजकडे जात असलेल्या ट्रकने एम एच- 10 /एस- 7916 मोटार सायकल सह दोघांना शंभर ते दीडशे फुट फरपटत नेले. यामध्ये गणेश हाके तसेच अशोक हाके हे दोघेही गंभीर जखमी झाले.या दोघांना तातडीने केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र अशोक बबन हाके याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
निवडणुका येताच लोकहिताचा पुळका ग्रामीण रस्त्यासाठी धरणे आंदोलन
बीड — जि.प. पंचायत समिती निवडणुका तोंडावर येताच लोकांच्या प्रश्नाची आठवण पुढार्यांना येऊ लागली आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आज
नाळवंडी, पालीसह इतर जिल्हा परिषद गटातील ग्रामीण रस्त्यांची कामे आ.संदीप क्षीरसागर यांनी अडविल्याचा आरोप करत अनेक गावच्या सरपंच, पदाधिकाऱ्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन केले.
हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, नाळवंडीचे सरपंच ॲड.राजेंद्र राऊत, भाजपचे जिल्हा सचिव शांतीनाथ डोरले यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. यावेळी विधानसभा निवडणूक झाल्यापासून गायब झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, युवा नेते महेश धांडे, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.लक्ष्मण जाधव, महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.सतीश शिंदे, भाऊसाहेब डावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे बीड तालुकाध्यक्ष नंदकुमार कुटे, पंचायत समितीचे माजी सदस्य उत्तरेश्वर सोनवणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुमित कोळपे, अरुण लांडे, प्रदीप गायकवाड, सरपंच धनेश्वर खेत्रे, दत्ता जाधव, रोहित जाधव, सिद्धार्थ जाधव, राजाभाऊ नवले, लकी कंडेरे, राजू टाक, सुमंत राऊत, नामदेव म्हेत्रे, सखाराम राऊत, सचिन उनवणे यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.ॲड.राजेंद्र राऊत यांनी म्हटले की, आ.संदीप क्षीरसागर यांच्या दबावतंत्रामुळे अधिकारी रस्त्याचे मार्क आऊट देत नसून रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे आमदारांसह अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करत असल्याचे सांगितले. बीड तालुक्यातील नाळवंडी, पालीसह इतर जिल्हा परिषद गटातील नाळवंडी ते मौज व्ही.आर.क्र. २४३ काळेगाव हवेली ते लमाण तांडा रस्ता व्ही.आर. ३५४, ओडीआर ५० ते मानकुरवाडी रस्ता व्ही.आर. ३७, पाली ते वरवटी इजिमा १२७, पाली ते वरवटी इजिमा १२७ यांसह इतर अनेक रस्ते सुधारणा अंतर्गत कामे आहेत. सदर रस्ते हे जिल्हा नियोजनमधून सन २०२४ या वर्षामध्ये मंजूर आहेत. सदर रस्त्याचे कार्यारंभ आदेश ६ महिन्यांपूर्वी झालेले आहेत. या रस्त्याचे काम सन २०२४ मध्ये जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर झाले असून, डिसेंबर २०२४ मध्ये कामाचे कार्यारंभ आदेश निघाले आहेत. मात्र, बीडमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता, उपअभियंत्यांकडून अद्यापही कामाचे मार्कआऊट देण्यात आलेले नाहीत. आ.संदीप क्षीरसागर यांना ज्या भागातून अल्प मतदान झाले, त्या त्या भागातील कामे थांबवण्यात येत असल्याचा आरोप सरपंच ॲड.राऊत यांनी केला आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक विकासकामात खोडा घातला, परंतु यापुढे त्यांची मनमानी सहन केली जाणार नाही, त्यांच्याविरोधात वेळोवेळी आवाज उठविला जाईल, असा इशाराही ॲड.राऊत यांनी दिला आहे. दरम्यान, मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना देण्यात आले. यावेळी बीड तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध
वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेतली जात नाही. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले, असे सांगत आंदोलकांनी प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला. धरणे आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.
रास्ता रोकोचा इशारा कायम
आजच्या आंदोलनातूनही प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर सोमवार, १६ जून रोजी जरुड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सरपंच ॲड.राजेंद्र राऊत यांनी दिला आहे. जबाबदार अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहेपर्यंत रास्ता रोको मागे घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काम रखडल्याने ग्रामस्थ हैराण
सदरील रस्ता रहदारीचा असून, काम रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ मार्कआऊट करून काम सुरू करण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या आंदोलनाची प्रत पालकमंत्री ना.अजित पवार, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांना देण्यात आली आहे.
उपळीत पोलिसांचा छापा, 400 किलो गो मांस जप्त
बीड — वडवणी पोलीस ठाणे हद्दीतील उपळी या गावात गोवंशांची कत्तल केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारून 400 किलो गोमांस जप्त केले असून आरोपीला जेरबंद केले आहे.
उपळी या गावात एक इसम गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करीत असल्याची गोपनीय माहिती वडवणी प्रभारी वर्षा व्हगाडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला असता तेथे फिरोज सिकंदर कुरेशी वय 35 वर्ष, राहणार उपळी हा त्याचे घरामध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तल करताना मिळून आला. पोलिसांनी घटना स्थळावरून 80 हजार रुपये किमतीचे 400 किलो वजनाचे गोवंश जनावरांचे मांस, लोखंडी सुरे व लाकडी ओंडका जप्त केला. सध्या आरोपी अटकेत असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विष्णू जायभाये करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांचे मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे, पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड, संदीप चव्हाण, पोलीस अंमलदार विष्णू खरात, किरण इरमले, वसंत करे यांनी केली











