Home Blog Page 61

बीड येणार रेल्वेच्या नकाशावर; बीड ते अहिल्यानगर मार्गावर “या” दिवशी सुरू होणार रेल्वे

0

मुंबई —  रेल्वेमार्गा पासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे Beed -AhilyaNagar railway गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वे सेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार  Ajit Pawar यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह Sahyadri rest house येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उर्वरित बीड ते परळी वैजनाथ Beed Parli railway या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

बैठकीला महापारेषण  कंपनीचे MAHADISCOM महाव्यवस्थापक संजीव कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे PWD सचिव दशपुते, सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सहसचिव (परिवहन) राजेंद्र होळकर, रेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता विनीत कुमार, रेल्वेच्या पुणे विभागाचे अप्पर विभागीय व्यवस्थापक पद्मसिंह जाधव, मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक मिलिंद हिरवे, मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला, मुख्य अभियंता प्रशांत भेगडे आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी बैठकीत सहभाग घेतला.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, बीड ते परळी वैजनाथ रेल्वे Beed Parli railway मार्गाच्या भूसंपादनाचे. Land acquisition प्रलंबित प्रकरणे बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढून आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी. या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम तातडीने अदा करण्यात यावी. अर्थसंकल्पात मंजूर १५० कोटी रुपये देण्यात यावे. उर्वरित १५० कोटी रुपयांची तरतूद करावी. रेल्वेने आतापर्यंत दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी.

फलटण ते लोणंद faltan- lonand या रेल्वे मार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करावीत. बारामती रेल्वे स्थानकाच्या Baramati railway station कामाला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्या

तसेच कामाला गती देऊन पुढील काळात सुसज्ज रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

असा आहे अहिल्यानगर – बीड – परळी रेल्वे मार्ग

रेल्वे मार्गाची एकूण लांबी २६१.२५ किलोमीटर, जमिनीचे एकूण भूसंपादन १८२२.१६८ हेक्टर, रेल्वे खालील एकूण पूल १३०, रेल्वे वरील पूल ६५, मोठ्या पुलांची संख्या ६५, छोटे पूल ३०२. द्वितीय प्रशासकीय मान्यतेनुसार प्रकल्पाची एकूण किंमत ४८०५.१७ कोटी, प्रकल्पाच्या समप्रमाणात ५०:५० टक्के हिस्सा नुसार केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी हिस्सा २४०२.५९ कोटी.

गाडीची चावी काढल्यावर मित्रानेच केला खून; आरोपी गजाआड

0

बीड — किरकोळ कारणावरून शहरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका तरुणाचा खून झाला. दुचाकीची किल्ली काढून घेतल्याने ती परत दे असे सांगूनही तो देत नसल्याने मित्राने रागाच्या भरात वार करुन हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयित अभिषेक राम गायकवाड यास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरातील आशा टॉकीज परिसरातील तुळजाई चौकात ही घटना घडली. चाकूने वार करुन हल्लेखोर पसार झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजय सुनील काळे वय 25 वर्ष यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विजय काळेचा मृत्यू झाला. शिवाजीनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लगेचच चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीतून संशयित कळल्यावर त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी व मृत हे एकमेकांचे मित्र होते. दारूच्या नशेत हे कृत्य घडल्याचेही सांगितले जात आहे. शिवाजीनगर पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान मित्राच्या छातीत चाकू खुपसून पसार झालेल्या संशयित अभिषेक राम गायकवाड याच्या अटकेसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याची चार पथके स्थापन केली होती. त्यातील दोन पथकांनी रात्रभर शोध घेऊन पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील डोंगरपट्ट्यात दबा धरून बसलेल्या गायकवाडला पोलिसांनी सापळा रचून पकडले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किशोर पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवाजी बंटेवाड, सहाय्यक निरीक्षक विलास मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.

परळीच्या इराणी वस्तीत छापा: पोलिसांनी बारा लाखाचा गांजा जप्त केला

0

परळी — शहरातील इराणी वस्ती येथे छापा police raid टाकून पोलिसांनी ५३ किलो गांजा आणि इतर साहित्य असा एकूण १२ लाख २३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे व संभाजीनगर पोलिसांनी केली.

पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे व संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांना गुप्त खबऱ्या कडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सहकाऱ्यांसह इराणी वस्ती मधील एका घरावर छापा
टाकून झडती घेतली असता यावेळी पोलिसांना छाप्यामध्ये एकूण ५३ किलो १३४ ग्रॅम गांजा किंमत अंदाजे १० लाख ६२ हजार ६८०, ३१ मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, पॅकिंग मशीन, पर्स, डीव्हीआर सिस्टीम, ड्रम ,टब, रिक्षा यासह बारा लाख २३ हजार ६८० रुपयांचा चा मुद्देमाल मिळून आला असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी वसीम ऊर्फ शराबी अक्रम बेग व अक्रम रफीक बेग यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे संभाजीनगर, Sambhaji Nagar police परळी येथे गुरनं १८३/२०२५ एन.डी.पी.एस. क्ट १९८५ चे कलम ८ (क), २०, २२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, रघुनाथ नाचणार, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, रियाज शेख, पवार, स. फौ. थळकरी, सौंदनकर, पठाण, गुट्टे, गायकवाड, गित्ते, पाचपांडे, तांदळे, चव्हाण, घोडके, चव्हाण, डोंबरे, पवार, घुगे, धुमाळ, डोरनाळे, येरडलावार, मोरे, मतीन, मुंडे, सरवदे, मुजमुले, दराडे, जाधव, गुट्टे, भताने, जाधव, सोडगीर, केदार, ढोले क्षीरसागर, मिसाळ, तोटेवार, धनवडे, अन्नमवार, गायसमुद्रे, वडमारे, चाटे, वाघमारे यांनी केली आहे.

नव्या जीआर नुसार कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळवाल?

0

मुंबई —  मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला मोठे यश मिळाले आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आझाद मैदानातील उपोषणाच्या पाचव्या दिवशी, राधाकृष्ण विखे पाटील Radha Krishna vikhe Patil यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने शासनाचा महत्त्वपूर्ण जीआर (शासकीय निर्णय) जारी केला.

या जीआरनुसार, हैदराबाद गॅझेटच्या Hyderabad gadget  आधारे मराठा समाजाला कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. यामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षणाचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुरावे

कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रक्ताच्या नातेवाईकांचा (वडील, चुलते, आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा इ.) कुणबी जातीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. खालील पर्यायांद्वारे पुरावे गोळा करता येऊ शकतात:

शाळेच्या नोंदी: रक्ताच्या नातेवाईकाचा प्राथमिक शाळेतील प्रवेश उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला तपासा. त्यात कुणबी जातीची नोंद आहे का, याची खात्री करा.

कोतवाल बुक/गाव नमुना नं. 14: स्वातंत्र्यपूर्व काळातील जन्म-मृत्यू नोंदी कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. 14 मध्ये उपलब्ध असतात. तहसील कार्यालयात अर्ज करून याची नक्कल मिळवता येते.

महसुली कागदपत्रे: वारस नोंदी (6 ड नोंदी), 7/12 उतारे, 8अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, क. ड. ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक यामध्ये कुणबी जातीचा उल्लेख शोधा.

सर्व्हिस बुक: नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असल्यास, त्यांच्या सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावरील कुणबी जातीची नोंद साक्षांकित उतारा म्हणून वापरता येईल.

आधीचे प्रमाणपत्र: नातेवाईकाने यापूर्वी कुणबी जात प्रमाणपत्र मिळवले असल्यास, त्याचे प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले पडताळणी प्रमाणपत्र पुरावा म्हणून चालेल.

नव्या जीआर नुसार सुलभ प्रक्रिया

नव्या जीआरनुसार, कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. जर पुरावा उपलब्ध नसेल, तर कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र आणि वंशावळ समितीच्या चौकशीद्वारे प्रमाणपत्र मिळवता येईल. यासाठी गावपातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहायक कृषी अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती स्थानिक चौकशी करून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया 90 दिवसांत पूर्ण करेल.

58 लाख नोंदींची प्रसिद्धी

शासनाने आतापर्यंत शोधलेल्या 58 लाख नोंदी सर्व ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना हे कार्य तातडीने पूर्ण करण्यास सांगितले आहे. यामुळे मराठा समाजातील भुधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करणाऱ्यांना कुणबी जातीचा पुरावा मिळवणे सोपे होईल. जर 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी स्थानिक क्षेत्रात राहण्याचा पुरावा नसेल, तर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल, ज्याची सक्षम प्राधिकारी खातरजमा करतील.

संभ्रम दूर, मराठ्यांना दिलासा

मनोज जरांगे Manoj jarange Patilयांनी मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्याने संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, नव्या जीआरमुळे हा संभ्रम दूर झाला आहे. ही प्रक्रिया ओबीसी आरक्षणाच्या चौकटीत बसते आणि मराठा समाजाला कुणबी नोंदींच्या आधारे लाभ मिळवून देण्यासाठी डिझाइन केली आहे. संबंधित विभागांना अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, हा जीआर आंदोलनाच्या परिणामकारकतेसाठी व्यावहारिक पावले उचलणारा आहे.

मराठा समाजासाठी कुणबी जात प्रमाणपत्र cast certificate मिळवणे आता अधिक सोपे आणि पारदर्शक झाले आहे. नव्या जीआरमुळे पुरावे गोळा करण्यापासून ते प्रमाणपत्र मिळवण्यापर्यंतची प्रक्रिया सुटसुटीत झाली आहे. नागरिकांनी तहसील कार्यालय, ग्रामपंचायत आणि समितीशी संपर्क साधून आपले हक्क मिळवावेत.

मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी ! जरांगे पाटलांनी जीआर स्वीकारला भावूक होत सोडले उपोषण

0

मुंबई — मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आले आहे. जरांगे पाटलांनी सरकारने दिलेला जीआर स्वीकारला आहे. यावेळी अभ्यासकांनी काही दुरुस्त्या सांगितल्या आहेत.त्या आरक्षण उपसमितीने स्वीकारल्या आहेत. त्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याची विनंती केली. यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आहे.

जरांगे पाटलांनी सरकारने दिलेला जीआर स्वीकारला आहे. यावेळी अभ्यासकांनी काही दुरुस्त्या सांगितल्या आहेत. त्या आरक्षण उपसमितीने स्वीकारल्या आहेत. त्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याची विनंती केली. यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषण सोडायला यावं, तुमचं आमचं वैर संपलं असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी सरकारपुढे अट ठेवली आहे. तुम्ही या, नका येऊ आमची ही विनंती आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. त्यावर, आपण हे उपोषण आज सोडूया, उपोषण मागे घ्यावं, नंतर आपण मुख्यमंत्र्‍यांसमवेत भेटूया असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.

आमचं म्हणणं एवढचं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित दादा आणि आमच्या मराठ्यांमध्ये एक कटुता आहे, ते जर इथं आले तर ती कटुता संपुष्टात येईल पण ते आले नाहीत तर ही कटुता कायम राहिल, असं म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावलं होतं. मात्र, विखे पाटलांच्या विनंतीनंतर अखेर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.

मंत्रिमंडळ समितीचा प्रमुख मलाच सर्व अधिकार देण्यात आले आहेत, त्यामुळे माझ्यासह मंत्रिमंडळातील सदस्यही आमच्यासोबत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकार राधाकृष्ण विखे पाटील यांनाच दिले आहेत, त्यामुळे आपण उपोषण सोडावं अशी विनंती असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं. त्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना विचारत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते पाणी पिऊन उपोषण सोडलं. तसंच, दमानं गाड्या चालवा म्हणत मुंबईतून आता गावाकडं जायचंय, घरी निघायचं असं आवाहनही केलं.

मराठ्यांसमोर सरकार झुकलं! जरांगे पाटलांच्या ‘या’ मागण्या मान्य

0

मुंबई — मनोज जरांगे पाटलांनी Manoj jarange Patil मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन Maratha protest सुरु केलं होतं. अशातच आज मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव कोकाटे, शिवेंद्रराजे भोसले, उदय सामंत, गोरे यांनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.यावेळी मनोज जरांगे पाटलांनी सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची माहिती दिली. जरांगे पाटलांच्या किती मागण्या मान्य झाल्या आणि कोणत्या अमान्य झाल्या याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पहिली मागणी – हैद्राबाद गॅझेट Hyderabad gadget लागू होणार

मनोज जरांगे पाटलांनी हैद्राबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी केली होती. त्यावर सरकारने निर्णय केला आहे. हैद्राबाद गॅझेटिअरच्या अंमलबजावणीसाठी मान्यता देत आहोत. त्यानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील, कुळातील व्यक्तीचे कुणबी kunbiजातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल, असं सरकारने म्हटलं आहे. थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं ठरलं. हैद्राबाद गॅझेटिअरच्या अंमलबजावणीला परवानगी दिली आहे.

दुसरी मागणी – सातारा संस्थानचे गॅझेटही Satara gadget लागू होणार

जरांगे पाटील म्हणाले की, सातारा संस्थानच्या गॅझेटिअरमध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. सातारा गॅझेटिअर, पुणे औंध गॅझेटिअरच्या आधीन राहून अंमलबजावणी करण्याची आपली मागणी होती. सातारा आणि औंध गॅझेटिअरची कायदेशीर तपासून जलदगतीने निर्णय घेऊ असं सरकारने म्हटलं आहे. मी का म्हटलं. तर त्यात काही कायदेशीर त्रुटी आहेत, असं त्यांनी म्हटलं. त्यांनी 15 दिवसात काम करू असं म्हणाले. राजेसाहेब साक्षीदार आहेत. राजे म्हणाले 15 दिवसात अंमलबजावणी करू. मी म्हटलं 15 दिवस नाही, 1 एक महिन्यात करा. या दोन विषयाची अंमलबजावणी झाली आहे.

तिसरी मागणी – सर्व केसेस मागे घेणार

महाराष्ट्रातील आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याची मागणी होती. काही ठिकाणचे गुन्हे मागे घेतले आहेत. काही गुन्हे कोर्टात आहेत. कोर्टात जाऊन मागे घेऊ असं ते म्हणाले. सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व केसेस मागे घेऊ असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे ही मागणीही मान्य झाली आहे.

चौथी मागणी – बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींना तात्काळ मदत आणि नोकरी देण्याची मागणी केली होती. कुटुंबीयांच्या वारसांना 15 कोटी मदत यापूर्वी दिली आहे. उर्वरीत कुटुंबीयांना एका आठवड्याच्या आत आर्थिक मदत खात्यावर येईल. नोकरी राज्य परिवहन मंडळात नोकरी देऊ असं सरकार म्हणालं आहे. त्यामुळे ही मागणीही मान्य झाली आहे.

पाचवी मागणी – ग्रामपंचायतीत नोंदींचे रेकॉर्ड ठेवणार

58 लाख नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीत लावा अशी जरांगे पाटलांनी मागणी केली होती. ग्रामपंचायतीत लावा म्हणजे लोकं अर्ज करून घेतील. व्हॅलिडीटी आतापर्यंत आता इथून गेल्यावर एक आदेश काढा. 25 हजार दिले तर व्हॅलिडिटी validity दिली जाते. म्हणजे तो मुद्दाम लपवतो. त्यामुळे तुम्ही आदेश द्या. तातडीने देण्यास सांगा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. यावर बोलताना विखे पाटील vikhe Patil म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्याने प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन जेवढे दाखले आहेत, तेवढं अर्ज निकाली काढावे. म्हणजे ते जात समितीकडे पडून राहणार नाही.

सहावी मागणी – कुणबी – मराठा एकच असल्याचा अभ्यास

जरांगे पाटील म्हणाले की, ‘मराठा आणि कुणबी एक आहे हा जीआरGR काढा असं आपण म्हटलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, प्रक्रिया थोडी किचकट आहे. महिनाभराचा वेळ द्या. आधी हे करू. किचकट नाही. हे माहीत आहे. मी म्हटलं महिना नाही दीड महिना घ्या. विखे साहेब म्हणाले, दोन महिना म्हणा. म्हटलं ठिक आहे. दोन महिने घ्या. त्यामुळे आपण त्यांना दोन महिन्याचा वेळ देत आहोत.

सातवी मागणी – सगे सोयऱ्यांचा मुद्दा निकाली काढण्यासाठी वेळ

सगे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर 8 लाख हरकती आल्या होत्या. त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्या आहेत त्यामुळे त्याला वेळ लागेल असं सरकारने म्हटलं आहे.

मराठा आरक्षण: नेमका काय आहे निर्णय? सरकारचा मसुदा अखेर समोर ; वाचा जशाचा तसा निर्णय

0

मुंबई — मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला मोठं यश मिळालं असून सरकारने हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजातील व्यक्तींना गावातील, कुळातील, नातेवाईकांतील व्यक्तींना कुणबी जातीचे दाखले मिळाले असल्यास या दाखल्यांच्या आधारे स्थानिक चौकशी करून इतरांनाही कुणबी जातीचे दाखले देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाचा फायदा मराठवाड्यातील मराठा समाजातील व्यक्तींना होणार असून कुणबी दाखले मिळाल्याने त्यांचा ओबीसीमध्ये समावेश होईल.

सरकारने शासन निर्णय जारी करण्याआधी एक मसुदा तयार केला आणि तो मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना दाखवला. या मसुद्यावर जरांगे पाटील यांनी सहमती दाखवल्याने पुढील काही क्षणांत शासन निर्णय जारी होणार आहे.

सरकारच्या मसुद्यात नेमकं काय म्हटलंय?

१. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २०००.
२. शासन निर्णय, क्र. सीबीसी-१४/२००१/प्र.क्र.२३२/मावक-५, दि.०१ जून, २००४.
३. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २०१२, दि.०१ सप्टेंबर, २०१२
४. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०१८, दि.०३ जुलै, २०१८
५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. मआसु-२०२३/प्र.क्र.०३/१६-क, दि.०७ सप्टेंबर, २०२३.
६. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. मआसु-२०२३/प्र.क्र.०३/१६-क, दि.३१ ऑक्टोबर, २०२३.
७. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. मआसु-२०२३/प्र.क्र.०३/१६-क, दि.०३ नोव्हेंबर, २०२३.
८. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. मआसु-२०२३/प्र.क्र.०३/१६-क, दि. १ डिसेंबर, २०२३.
९. शासन निर्णय, क्र.सीबीसी-२०२४/प्र.क्र.०९/मावक, दि. २५ जानेवारी, २०२४.
१०. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०२४, दि.१८ जुलै, २०२४

प्रस्तावनाः –

१. महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे. मराठवाड्यातील सामाजिक, भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरीत महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून पूर्ण देशात प्रसिध्द आहे.

२. मराठवाड्यात इतिहासकालीन प्रसिध्द अशा सातवाहन राजाने राज्य केलेले आहे. पैठण (प्रतिष्ठाण) ही त्यांची राजधानी होती. यानंतर वाकाटक, चालुक्य, यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केले आहे. देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राजांच्या शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतिक म्हणून आज सुध्दा त्याच दिमाखाने उभा आहे. अशा या अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृध्द वारसा असणारा मराठवाडा दि.१७ सप्टेंबर, १९४८ साली भारतात विलीन झाला. या काळात या संतभूमितून औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, परळी-वैजनाथ, माहूरगड, तुळजापूर, पैठण, आपेगाव, नरसी नामदेव व तेर अशी समृध्द तिर्थक्षेत्रे निर्माण झाली. जगभरात प्रसिध्द असणारे आणि वैविध्यपूर्ण कलाशिल्पाने नटलेले अजिंठा व वेरूळ येथील लेणी आहेत.

३. मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमितून संतश्रेष्ठ नामदेव, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, गोरा कुंभार, जनाबाई. जगमित्र नागा, एकनाथ, सेना न्हावी व जनार्दन स्वामी अशा महनीय संतांनी या भूमिमध्ये सहिष्णूता, भागवत धर्माचा प्रसार, भूतदया, समानतेचा संदेश दिला आहे. तसेच श्री गुरू गोविंद सिंघजी यांची समाधी नांदेड येथे असून त्याठिकाणी शीख धर्मीय मोठ्या प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात. या कारणाने मराठवाड्यात आजसुध्दा सर्व धर्म समभावाची वीण कायम आहे. मराठवाड्यातून मुख्यतः गोदावरी, पूर्णा व मांजरा या नद्या वाहतात. या नद्याने यांतील जनजीवन काही प्रमाणात समृध्द केले आहे. गोदावरी ही महाराष्ट्राची जीवनदायिनी असून मोठ्या प्रमाणात नागरी समूह या नदीच्या तिरावर वसलेला आहे.

४. असा हा मराठवाडा महाराष्ट्रात दि. ०१ नोव्हेंबर, १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि दि.०१ मे, १९६० पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला आहे. तत्कालिन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती. अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पध्दतीमध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते. या संपन्न अशा मराठवाड्यात अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलने सुरू झाली आहेत. त्यासाठी या भागातील कुणबी, कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागातील सदरहू जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने दि.०७ सप्टेंबर, २०२३ रोजी मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये नोंदी शोधण्याकरिता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. समितीने मराठवाड्यातील विविध शासकीय कार्यालयातील उपलब्ध असणारी सर्व प्रकारची कागदपत्रे तपासून आतापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच प्रमाणात नोंदी शोधल्या आहेत. उक्त समितीमार्फत मराठवाड्यात जिल्हानिहाय भेटी/दौरे करून बैठका घेण्यात आल्या. आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅझेट आणि तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी घेण्यात आल्या. आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅझेट आणि तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी याकारणाने समितीने दोन वेळा हैदराबाद येथील पुराभिलेख विभागास आणि महसूल विभागास भेटी देऊन सुमारे ७ हजार पेक्षा अधिकची कागदपत्रे अभ्यासाकरिता प्राप्त करून घेतली आहेत. तसेच, देशाची जनगणना आणि त्याअनुषंगाने तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याकरिता दिल्ली येथील जनगणना कार्यालय आणि त्यांच्या ग्रंथालयास भेट देऊन अधिकची कागदपत्रे उपलब्ध करून घेतली आहेत. याचदरम्यान दिल्ली येथील राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयात भेट देऊन तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वैयक्तिक कागदपत्रे जी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यासाठी उपयोगी ठरतील ती कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही केलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने गेल्या दोन वर्षात सातत्याने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याकरिता मोठ्या प्रमाणात क्षेत्रिय यंत्रणेमार्फत कार्यवाही केलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने आतापर्यंत विविध शिफारशीसह सादर केलेल्या अहवालांमधील सर्व शिफारशी शासनाने स्विकारल्या आहेत व याआधारे विविध विभागामार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे. यापुढेही सदर समितीने दिलेल्या अहवालांवर योग्य कार्यवाही केली जाणार आहे.

५. तथापि, मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी-मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्रे मिळण्याकरिता हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीस हैदराबाद, सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निदेशित करण्यात आले असून, त्याकरिता उक्त समितीस दि.३१ डिसेंबर, २०२५ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने हैदराबाद व दिल्ली येथे दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील पाच जिल्ह्यांची (औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड व उस्मानाबाद) माहिती प्राप्त करून घेतली आहे व सदरहू कागदपत्रांचा अभ्यास करण्यात येत आहे. तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाई, त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता. या कागदपत्रांमध्ये /गॅझेटिअरमध्ये (सन १९२१ व सन १९३१) कुणबी/कापू अशा नोंदी आहेत. यापुर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० च्या कलम १८ च्या पोट कलम १ मध्ये आणि नियम, २०१२ च्या नियम ४ मधील उप-नियम (२) मधील खंड (च) मध्ये (च) नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरिता अधिसूचना प्रसिध्द करण्यात आलेली आहे. मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०२४, दि.१८ जुलै, २०२४ अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, मराठा समाजास कुणबी, कुणबी-मराठा, मराठा कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यास उपयोग झालेला आहे. आता, मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी, याकरिता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-
संदर्भाधीन वाचा क्र.१ व क्र. ३ अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत कार्यपध्दती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करुन सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गावपातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहेः –

समिती सदस्यः
१. ग्राम महसूल अधिकारी
२. ग्रामपंचायत अधिकारी
३. सहायक कृषी अधिकारी
मराठा समाजातील भुधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दि.१३.१०.१९६७ पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे.
या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील / कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील/कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास, तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गावपातळीवरील स्थानिक समिती, वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील.

मराठा आंदोलन : न्यायालयाची नाराजी;मुंबई मोकळी करण्याचे आदेश ,उद्या पुन्हा सुनावणी

0

मुंबई — सुरू असलेले मराठा आंदोलन Maratha protest हाताबाहेर गेलं आहे, आता कोणालाही मुंबईत Mumbai येऊ देऊ नका, असे शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने High court नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच उद्या दुपारपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 5 हजार लोकांना अटी शर्तींच्या आधारे राहून सरकार पुन्हा परवानगी द्यायची असल्यास देऊ शकते, अशीही सूचना न्यायालयाने सरकारला दिली. पण ही परवानगी दिल्यानंतर नियम आणि अटींचे पालन करावेच लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानात Azad maidanसुरू असलेल्या मराठा आरक्षण Maratha protest आंदोलनाविरुद्ध उच्च न्यायालयात High court याचिका दाखल केली आहे. मनोज जरांगे आणि वीरेंद्र पाटील यांनी आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मी 29 तारखेला तक्रार दिली, आझाद मैदानाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना परिस्थिती जाणीव करून दिली. लेखी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला. पण, पोलिसांनी कारवाई केली नाही, असे गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात म्हटले. तसेच, आज राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सुरू आहे, असेही सदावर्तेंनी म्हटले.

दरम्यान आंदोलकांकडून देखील आज उच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आली असून कैलास खांडबहाले यांच्याकडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे, जरांगे पाटील Manoj jarange Patil यांच्या आंदोलनाला यापुढे परवानगी मिळणार की नाही हे पाहावे लागेल. दरम्यान उद्या, मंगळवारी दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, मुंबईसह संपूर्ण उच्च न्यायालय परिसराला घेराव घालण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या गाड्या अडवण्यात आल्या आहेत, त्यांना उच्च न्यायालयात येण्यापासून अडवण्यात आल्याचे न्यायमूर्तींकडून स्वतः सांगण्यात आले. तसेच, मुंबईत अजून आंदोलनकर्ते येत आहेत, त्यांना कसं अडवणार, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

एमी फाऊंडेशनने दाखल केलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात सांगण्यात आले. तर, आंदोलकांनी मुंबई अडवून ठेवली असल्याचा दावा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्रीकांत अडाते हेही उच्च न्यायालयात उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयात मनोज जरांगे पाटील यांचा अर्ज वाचून दाखवला. या अर्जाच्या सुरुवातीलाच आमरण उपोषणाचा उल्लेख आहे. मात्र, नियमात आमरण उपोषणाला परवानगी नसल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली आहे. अर्जाच्या खाली जरांगे पाटील यांची सही असल्याचं तुम्ही सांगू शकता का? मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे का? अशीही विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. गेल्या सुनावणीत नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

दुसरीकडे आंदोलन करण्यास परवानगी नाही, परवानगी फक्त एका दिवसासाठी देण्यात आली होती, अशी बाजू राज्य सरकारने मांडली. आंदोलकांकडून लिहून देताना सगळ्या अटी पाळण्यात येतील असं मान्य केलं होतं, त्याआधारे परवानगी देण्यात आली होती अशी माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात दिली. न्यायालयाने नियमात राहून आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, त्यानुसार परवानगी देण्यात आली होती. आझाद मैदान हे आंदोलनासाठी आरक्षित आहे. मात्र, त्याव्यतिरिक्त कुठेही आंदोलन करण्यास परवानगी नाही, असेही सरकारने म्हटले आहे.

गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं पोलिसांसाठी देखील कठीण आहे. तरी आम्ही समतोल पाळण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही. शनिवारी आणि रविवारी आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही, केवळ 5 हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली होती. राज्य सरकारने दिलेल्या परवानगीवर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, ध्वनिक्षेपकांच्या वापरला विनापरवाना वापरण्यास परवानगी दिली नाही, आंदोलनाला केवळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अटी शर्ती पाळून परवानगी मागितली होती, म्हणून त्यांना परवानगी देण्यात आली होती. त्यातही, 5000 लोकांचा जमाव असेल आणि 1500 वाहन असतील, असे सांगण्यात आले होते. तुम्ही सगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याचे राज्य सरकारने वेळोवेळी जरांगे पाटील यांना सांगितलं. बैलगाड्या चालवल्या जात आहेत, शहर एक खेळाचं मैदान झालं आहे, अशी माहिती राज्य सरकारने दिली. आंदोलक सगळीकडे आहेत, फ्लोरा फाऊंटनमध्ये आहेत, सीएसएमटी स्थानकात आंदोलक आहेत, असे म्हणत राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात फोटोही दाखवण्यात आले. त्यामुळे, याचा काय तोडगा काढणार अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली होती.

पोलिसाचे कुटुंब शेतात गेले चोरट्यांनी घर फोडले

0

आष्टी — घराला कुलूप लावून पोलिसाचं कुटुंब शेतात गेलं. याचा फायदा घेत चोरट्यांनी घर फोडल्याची घटना अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी घडली आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील केळ येथील मच्छिंद्र साधू दळवी हे शेतकरी असून मुलगा गणेश दळवी हे मुंबई येथे पोलिस दलात कार्यरत आहे. दळवी हे शनिवारी सकाळी कुटुंबासह शेतात काम करत असताना दुपारच्या दरम्यान चोरट्यांनी घरी कोणी नाही . या संधीचा फायदा घेत घरफोडी केली. कपाटातून अंदाजे दहा ते बारा तोळे सोन्याची चोरी केल्याचे उघडकीस आले. अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथक,ठसे तज्ज्ञ, फोरेन्सिक पथक,स्थानिक गुन्हे शाखा,अंभोरा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
ठाणे हद्दीतील रोडलगत वस्ती असलेले व गाव परिसरातील लोकांनी शेती कामे करताना घराला कुलूप न लावता एक व्यक्ती घरी ठेवावी. सीसीटीव्ही लावावेत. जेणे करून अशा घटनांना आळा बसेल. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी केले आहे.

मूर्ख बनवतो तो नेता मोठा होतो — नितीन गडकरी

0

नागपूर — आज लोकांना सर्वाधिक मूर्ख बनवू शकतो तो सर्वाधिक चांगला नेता ठरतो. बोलणे सोपे, करणे कठीण आहे. मी त्याची वेळोवेळी अनुभूती घेतो. मी ज्या क्षेत्रात काम करतो, तेथे मनापासून खरे बोलण्याची मनाई आहे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी सध्याच्या राजकारणावर politics भाष्य केले.
अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्हातर्फे भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी Chakradhar Swami यांच्या 805 व्या अवतरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुरेश भट सभागृहात ते बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले की, येथे हौसे, गवसे, नवसे सारेच आहेत. मात्र भगवान कृष्णाने लिहून ठेवले आहे की, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी शॉर्टकट आहेत. शॉर्टकटने माणूस लवकर पुढे जातो. नियम तोडून रस्ता क्रॉस करायचा असेल तर सिग्नल मोडून पुढे जावे लागते. मात्र, शॉर्टकट तुमचे करिअर career शॉर्ट करतो, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी एकप्रकारे विरोधकांना दिला. कथनी आणि करणीत अंतर नको, मी खोटे बोलणार नाही आश्वासन देणार नाही. मला कोणी मते दिली नाही तरी चालेल. मी खोटे आश्वासन देणार नाही. जे मनात असेल तेच तोंडात असेल. पटलं तर पटलं नाही पटलं तर नाही पटलं. चर्चा केल्याशिवाय मी आश्वासन देणार नाही असेही सांगितले.
भगवान चक्रधर स्वामी Chakradhar Swami यांच्या जीवन चरित्रावर life biographyगडकरी यांनी यावेळी भर दिला. महान व्यक्तींच्या विचारातून आपण प्रभावित होऊन आपल्या जीवनात काम करतो. आपले दोष कमी करणे ही निरंतर प्रक्रिया आहे. जीवनमूल्य काय आहे ते आकाशातून पडले नाही. धार्मिक ग्रंथ, प्रवचनातून आलेले आहेत. माणसात आणि दगडात फरक आहे. दगडात बदल होत नाही. दगडावर कितीही तबला पेटी वाजवली तरी काही उपयोग होत नाही. दगडाला कधीच आनंद होत नाही. व्रतस्थ जीवन जगणे सोपे नाही.

आमदार, खासदाराचा पोरगा खासदार, मंत्र्याच्या पोटातून मंत्री, काही कार्यकर्ते म्हणतात आम्ही काय करावे, मी म्हणतो घंटा निवडणूक चिन्ह घ्या आणि वाजवा, सर्व पक्षात हेच सुरू आहे. कोणाचा मुलगा असावे हे चुकीचे नाही. मात्र जनतेने निवड केली पाहिजे. सामाजिक व्यवस्थेत बदल करावेत. शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. भूतकाळातील इतिहास, वर्तमानातील अनुभव आणि भविष्याचा वेध घेत तंत्रज्ञानातून एकत्रितपणे पुढे जाण्याची गरज व्यक्त केली.
सरकार कुठल्याही पार्टीचे असो, मंत्र्यांच्या गळ्यात हार घालत जा आणि काम करून घेत जा, मात्र आपल्या पंथ,संप्रदायात त्यांना दिसू देऊ नका, धर्मकारण, राजकारण, समाजकारण दूर ठेवले पाहिजे.आम्ही जिथे घुसलो तिथे आग लावल्याशिवाय राहत नाही. गादीसाठी झगडे, मग कमिशन नेमतो आणि नंतर स्टे देतो. शेवटी राजा नाही धर्म श्रेष्ठ या वास्तवाकडे लक्ष वेधले. डिजिटल स्वरूपात लीळाचरित्र परदेशी पोहोचले पाहिजे असे आवाहन केले. आधुनिकीकरण आणि पाश्चातीकरण या दोन गोष्टीत फरक आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ नये असेही सांगितले.