Home Blog Page 60

प्रवासी म्हणून दोघे गाडीत बसले; चालकावर चाकू हल्ला करून लुटले

0

केज — प्रवाशी म्हणून कार मध्ये बसलेल्या दोघांनी ड्रायवरच्या गाळ्यातील अडीच तोळे सोन्याची चैन हिसकावून घेत रोख ५ हजार रु. घेऊन ड्रायव्हरच्या गळ्यावर व मानेवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, ऋषीकेश अंबादास उत्तेकर वय (२६ वर्षे) हा टॅक्सी ड्रायव्हर त्याची मारूती डिझायर ही कार क्र. (एम एच- १२/एस एफ- ६७८६) उबेर कंपनीला नोंदणी केलेली आहे. दि. ६ सप्टेंबर रोजी पाहटे ४:०० वा. च्या सुमारास ऋषिकेश उतेकर हा त्याच्या गाडीत पुणे जिल्ह्यातील चाकण येथून दोन प्रवाशांना घेऊन बीड जिल्ह्यात अंबाजोगाईकडे येत होता.
पहाटे ४:०० च्या सुमारास केज मांजरसुंबा महामार्ग क्र ५४८- डी वरील केज तालुक्यातील बरड फाटा येथील एच पी पेट्रोल पंपा जवळ आले असता त्याच गाडीतील पाठीमागील सिटवर बसलेल्या प्रवाशांपैकी एकाने अचानक पाठी मागून ड्रायव्हर ऋषिकेश उतेकर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढली. या अचानक झालेल्या घटनेने याने ऋषिकेश उतेकर याने गाडीचे ब्रेक मारुन थांबविली. मात्र तेवढ्या वेळेत त्याच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची चेन तोडून घेतली. ड्रायव्हर ऋषिकेश उतेकर याने गाडी थांबवून आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या पैकी एकाने चाकुने ड्रायव्हर ऋषिकेश उतेकर याच्या डोळ्यावर, चेहऱ्यावर, मानेवर वार केले. तसेच गाडीत ठेवलेले पाच हजार रुपये काढून घेतले आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.त्या नंतर ऋषिकेश उतेकर याला ॲम्ब्युलन्सने नेकनुर येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ऋषिकेश उतेकर यांच्या तक्रारी वरून दोन अज्ञात प्रवाशा विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर हे तपास करीत आहेत.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगावच्या परिवाराला आ.धनंजय मुंडे कडून एक लाखाची मदत

0

स्व. नितीन चव्हाण यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची मुंडेंनी स्वीकारली जबाबदारी

राज्य शासनाकडून मदत मिळण्यासाठी करणार पाठपुरावा

अंबाजोगाई — अंबाजोगाई ambajogai तालुक्यातील सुगाव येथील मराठा समाजातील तरुण नितीन माणिकराव चव्हाण यांनी 30 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली होती; माजी मंत्री तथा परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी आज स्वर्गीय नितीन चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान nath pratishthan या सामाजिक संस्थेच्या वतीने श्री मुंडे यांनी मयत नितीन चव्हाण यांच्या कुटुंबियांना तातडीची एक लाख रुपयांची मदत केली असून, स्व नितीन चव्हाण यांना दोन मुली आहेत, त्या दोन्हीही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची  Responsibility for education  जबाबदारी देखील धनंजय मुंडे यांनी स्वीकारली असल्याचे यावेळी कुटुंबियांना सांगितले.

दरम्यान मराठा आरक्षणासाठी Maratha reservation आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या मराठा सेवकांना राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली असून, स्व. नितीन चव्हाण यांच्याही कुटुंबीयांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

या प्रसंगी धनंजय मुंडे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP जिल्हाध्यक्ष  ॲड राजेश्वर आबा चव्हाण, तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, बबन लोमटे, आबा पांडे, विलास बापू मोरे, अजित गरड, रणजित लोमटे, प्रवीण जगताप, गुणवंत आगळे, उपसरपंच गणी भाई, नामदेव शिंदे यांसह पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते.

वृक्ष लागवडीचे जिल्हाधिकाऱ्यांचे कागदी घोडे; कारागृह अधीक्षक मात्र मोठ-मोठी वृक्ष तोडे; हे तर जनतेच्या पैशावर दरोडे

0

बीड — “विवेक”च हरवलेल्या जिल्हा प्रशासनाचा “गाढव गोंधळ” अन् इव्हेंट चा सुकाळातून पालकमंत्र्यांचा पाठीवरून हात फिरवून घेण्याची स्टंटबाजी होत असली तरी वास्तव चित्र मात्र भीषण बनू लागले आहे. हरित बीड अभियानाच्या नावाखाली जिल्हाधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये वृक्ष लागवडीची नोंद करून घेतली. त्यातली किती झाड आज जगली आहेत हा मोठा प्रश्नच आहे. म्हणून कारागृह अधीक्षकांनी देखील कर्तबगारीचा टेंभा लावला. एकीकडे गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे जिल्हा कारागृहातील मोठमोठ्या झाडांची गरज नसताना कत्तल करून ती नजर चुकवून लंपास करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मात्र अधिकाऱ्या विरोधात संतप्त भावना निर्माण होऊ लागल्या आहेत.


जिल्हा प्रशासनाचे कामकाज विवेकाने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र इव्हेंट ची कीड बीड जिल्ह्याला पोखरू लागली आहे. वृक्ष लागवडीच्या रेकॉर्डची स्टंटबाजी महिन्याच्या आतच नागडी झाली. कागदी घोडे नाचले असले तरी लावलेली झाड जगली नसल्याने तो घोडे नाच ऐवजी गाढवाचा गोंधळ असल्याच चित्र निर्माण झालं.”विवेक”च हरवला की गोंधळ कशाचा होतोय याचा सारासार विचारच केला जात नाही. हे कमी की काय म्हणून कारागृह परिसरातील झाडांची कत्तल करण्यात आली. ही बाब जनतेच्या लक्षात आली नाही. कारण कारागृह परिसर वर्जित क्षेत्र म्हणून मानलं जातं. पण गणेश विसर्जनाच्या धामधुमीत प्रशासनासह जनता असताना नेमका याचाच फायदा उचलत कारागृह प्रशासन असेल किंवा वृक्षतोड करणारा असेल यांनी संगणमताने लाकडाचे ट्रक भरून लंपास करण्याचा प्रयत्न केला. ही बाब वृक्षप्रेमींच्या लक्षात येताच त्यांनी हे ट्रक पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये “एक पेड मां के नाम” मोहीम सुरू केली. या मोहिमेला कारागृह प्रशासनाने हरताळ फासली तर जिल्हाधिकाऱ्यांनी इव्हेंटची स्टंटबाजी केली. हे खरं जरी असलं तरी पंतप्रधानांची मोहीम म्हणून का होईना तिचा मान राखून प्रशासकीय कार्यालय परिसरात वृक्ष लागवड होणं गरजेचं होतं.
मात्र शासकीय कार्यालयातच वृक्षतोड होत असेल तर हे दुर्दैव आणि गंभीर आहे. जिल्ह्यात जंगल क्षेत्राची घनता केवळ २.५ टक्के असून पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक असलेली ३३ टक्के घनता गाठणे दूरचे स्वप्न ठरत आहे. जिल्हा कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.याच्याच निषेधार्थ उद्या सोमवारी जिल्हा कारागृह कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येणार असून प्रशासनाने तातडीने संबंधितांवर कारवाई न केल्यास आंदोलन उग्र होईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी दिला आहे.

मेहुण्याने अल्पवयीन मेहुणीचा केला विनयभंग

0

केज — पत्नीशी जमत नसल्याने ती माहेरी गेली यावेळी सासऱ्याच्या घरात शिरून अल्पवयीन मेहुणीचा तरुणाने विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात घडली.याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

केज तालुक्यातील एका गावातील तरुणाची पत्नी ही आपसात पटत नसल्याने माहेरी राहते. त्याच्या गावापासून जवळच असलेल्या सासुरवाडीत जाऊन संबंधित तरुणाने सासू सासरे घराबाहेर झोपल्याची संधी साधून घरात एकटीच झोपलेल्या अल्पवयीन मेव्हणीचा घरात घुसून विनयभंग केला. पीडित मेव्हणीने आरडाओरडा करण्याची धमकी देताच संबंधित तरुणाने हा प्रकार कोणाला सांगितल्यास गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देत घरातून निघून गेला. त्यानंतर सासू सासऱ्याने त्याच्या घरी जाऊन जाब विचारला असता त्यांना

संबंधित जावई व त्याच्या आईने खोटे आरोप करू नका, असे म्हणत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार पीडित मुलीच्या आईने दिल्यावरून जावई व त्याच्या आई विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्याची हत्या की आत्महत्या? तलावात आढळला मृतदेह

0

वडवणी — तालुक्यातील चिखलबीड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या देठेवाडी तलावात एक मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली होती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह तलावाच्या बाहेर काढला असता ओळख पटली असून वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे डॉ. शुभम यादव यांचा मृतदेह असल्याची ओळख पटली आहे.

वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे डॉ. शुभम बालकनाथ यादव (रा. देवळा ता. अंबाजोगाई) हल्ली मुक्काम बीड हे एक दिवसापासून बेपत्ता होते. बेपत्ता असल्याची तक्रार डॉ. यादव यांचे वडील बालकनाथ यादव यांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास देटेवाडी तलावात डॉ. शुभम बालकनाथ यादव यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मानसिक ताणवाखाली येऊन आत्महत्याचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. ही घटना शनिवार दि.6 सप्टेंबर रोजी रात्री 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने वडवणी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या suicide का केली ? कशामुळे केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वडवणी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास वडवणी पोलीस करत आहेत. गेल्या पंधरा दिवसात वडवणी vadavani तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याने अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.

‘धनंजय मुंडेंनी मजा करावी, राजकारण करावं, पण मराठ्यांच्या नादाला लागू नये’!

0

छत्रपती संभाजी नगर — मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांनी पुन्हा एकदा आमदार धनंजय मुंडे Dhananjay Munde यांना इशारा दिला आहे. बीड Beed जिल्ह्यात पोलीसांना आडनाव न लावण्याचा नियम केल्यावरून धनंजय मुंडे यांनी कुठे आहे सामाजिक समता?अशी उद्विग्न भावना व्यक्त केली होती. तसेच शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठ्यांनीच साजरी करायची का? महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठीच उभे केले होते का? अठरा पगड जातीसाठी उभं केलं होतं, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती.

यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना माध्यमांनी प्रश्न विचारला तेव्हा, धनंजय मुंडे यांच्यावर बोलणे म्हणजे वर्ष वाया जाणे आहे. ते बोलायच्या कामाचे नाही. त्यांनी तिकडे मजा करावी, राजकारण करा, पण मराठ्यांच्या वाट्याला गेल्यास मात्र सुट्टी नाही, अशा शब्दात इशारा दिला. मराठा आरक्षणाचा लढा आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख sarpanch Santosh Deshmukh अपहरण आणि हत्या murder प्रकरणापासून मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात संघर्ष सुरू आहे. या वादाला मराठा विरुद्ध ओबीसी Maratha/ OBC असाही रंग दिला गेला.मनोज जरांगे पाटील आणि भाजपाचे आमदार सुरेश धस Suresh Dhas यांनी राज्यभरात काढलेल्या न्याय सभांमुळेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे मंत्रीपद गेल्याचे बोलले जाते. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात Azad maidan पाच दिवस बेमुदत उपोषण करत सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले. मराठा आरक्षणा संदर्भात जरांगे पाटील यांनी केलेल्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य करत त्याचे अध्यादेश काढले, अंमलबजावणीही सुरू केली. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये पुन्हा एकदा जिल्ह्यातील सामाजिक वातावरणावर भाष्य करताना मराठा समाजावर निशाणा साधला. याकडे मनोज जरांगे पाटील यांचे लक्ष वेधले असता त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बोलणे म्हणजे वेळ वाया घालवणे असल्याचा टोला लगावला. शिवाय त्यांनी त्यांचे राजकारण करावे, मजा करावी पण मराठ्यांच्या वाट्याला जावू नये, नसता त्यांना सुट्टी देणार नाही, याचा पुनरुच्चार केला.आम्ही आरक्षण मिळवले आहे, सगळा समाज खूश आहे. त्यामुळे आता मरावाडा, पश्चिम महाराष्ट्र असा कुठलाही दौरा काढणार नाही. माझे मराठा समाज बांधवांनाही आवाहन आहे की, त्यांनी हार, फुलं, पुष्पगुच्छ, शाल यावर वायफळ खर्च करू नये. त्याऐवजी गरीबांना मदत करू, मला फक्त घरातले कुंकू लावले तरी चालेल, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केले. आम्ही आरक्षण मिळवले आहे. जीआर निघाला ही छोटी गोष्ट नाही.

मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढा, कल्याण होईल तुमचं, असा सल्ला त्यांनी ओबीसींच्या नेत्यांना दिला. आम्हाला आरक्षण मिळाले त्यामुळे आता लढायला काय बाकी आहे? सरकारने शब्द दिलाय, सुधारित जीआर काढणार. इथ आल्यास तुम्हाला काय अडचणी येतात. तुम्ही जीआर कितीही चांगला काढा, अडचणी येतात. सुधारित जीआर काढावाच लागतो. जीआर काढल्यास बदल करावा लागतो, असे म्हणत त्यांनी जीआरवर टीका करणाऱ्यांना खडसावले.

जनावरं चोरांची टोळी एलसीबीकडून जेरबंद;दोन वाहनं हस्तगत

0

बीड –जिल्ह्यातील जनावरे चोरणाऱ्या टोळीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पाच जनावरे व दोन वाहने हस्तगत केली आहेत. या कारवाईत एकूण चार गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन आरोपी फरार आहेत.
पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांच्या आदेशानुसार बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासमोहीम हाती घेतली होती.दिनांक ३ सप्टेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे गांधीनगर, बीड येथील नितीन संजय जाधव याला ताब्यात घेण्यात आले.त्याच्या घरातून तीन चोरीची जनावरे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने कुंभारवाडी परिसरातून जनावरे चोरल्याची कबुली दिली. त्याच्याविरोधात पोलीस ठाणे शिरुर गुन्हे दाखल झाले आहेत.
त्यानंतर गांधीनगर येथूनच दीपक चंदु गुंजाळ यासही अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून दोन जनावरे आणि चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. त्याच्याविरोधात पोलीस ठाणे गेवराई गुन्हा दाखल झाला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक काँवत,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे, महिला हवालदार स्वाती मुंडे व चालक सिद्धेश्वर मांजरे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.या कारवाईमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून जनावरे चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.

माजी जि.प.सदस्य नारायण शिंदेचा आव भोळा, शिक्षकेवर बलात्कार केला त्याने वर्ष सोळा

0

बीड — गेवराईच्या माजी पं.स. सभापती पतीच्या विरोधात ग्रामसेविकेवर gram sevika बलात्कार rape केल्याचा गुन्हा दाखल होऊन महिनाही झाला नाही तोच बालाघाटावरचा Balaghat राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता NCP असलेल्या माजी जि.प सदस्य नारायण शिंदे वर देखील शिक्षिकेची कोट्यावधी रुपयाची फसवणूक fraud करून बलात्कार  केल्याचा गुन्हा दाखल rape case झाल्याने खळबळ माजली आहे.
गेवराई पंचायत समितीच्या माजी सभापतीचा पती दीपक सुरवसे याने महिला ग्रामसेविकेला नोकरीवरून काढण्याची धमकी देत बलात्कार केला. याप्रकरणी संभाजीनगर Sambhaji Nagar police मध्ये दीपक सुरवसेवर गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. नेकनूर जि प सर्कलचे neknoor z.p. circle माजी सदस्य नारायण शिंदे याने देखील महिला शिक्षिकेला कोट्यावधीचा गंडा घालत सोळा वर्ष बलात्कार करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. नारायण शिंदे हा बालाघाटावरचं बडं प्रस्थ मानल्या जात.बीड येथील शिवाजी नगर पोलिस Shivaji Nagar police ठाण्यात नारायण शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, नारायण शिंदे याने 2006 पासून ते 2022 पर्यंत लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. याचबरोबर ‘घर घेऊन देतो’, म्हणत तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक fraud केल्याचाही आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे.महिला शिक्षिकेनं या त्रासाला कंटाळून बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याच तक्रारीवरुन नारायण शिंदे याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 376, 376 (2) (एन), 406, 506 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी नारायण शिंदे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, घटनेचा तपास बीड येथील शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

कामगार कायद्यात बदल; बारा तास करावे लागणार काम

0

मुंबई — महायुती सरकारने कामगार कायद्यात मोठा बदल केला आहे. बुधवारी  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत cabinet meeting कारखाने अधिनियम १९४८ आणि आस्थापन अधिनियमात सुधारणा मंजूर करण्यात आल्या.या बदलानुसार, आता कारखान्यातील कामगारांना दिवसाला ९ ऐवजी थेट १२ तास काम करावे लागणार आहे. तर दुकाने आणि आस्थापनांमधील कामाचे तास ९ वरून १० तासांपर्यंत वाढवले आहेत.

या निर्णयामुळे औद्योगिक क्षेत्राला industrial area जास्तीच्या मागणीच्या काळात कामगारांच्या workers कमतरतेचा प्रश्न सुटेल, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र, कामगार संघटनांनी  labour union याला तीव्र विरोध दर्शवला असून, हा निर्णय श्रमिकांच्या आरोग्यासाठी व जीवनमानासाठी घातक ठरणार असल्याची टीका केली आहे.

सरकारचे म्हणणे आहे की वाढीव वेळेसाठी काम करणाऱ्या कामगारांना वेतनाच्या दुप्पट दराने मोबदला मिळणार आहे. यामुळे बेकायदेशीररीत्या काम करून घेण्यावर आळा बसेल. ओव्हरटाईमची overtime मर्यादा वाढवली गेल्याने कामगारांना कायदेशीर संरक्षण मिळेल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. (Maharashtra Labour Law Change)

तसेच, कामगारांना विश्रांतीसाठी ब्रेकमध्ये बदल करण्यात आले असून, आधीचा ५ तास ३० मिनिटांऐवजी आता ६ तास ३० मिनिटांनी विश्रांती मिळणार आहे. ही सुधारणा फक्त २० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांवर लागू होणार आहे. २० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनांना नोंदी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती राहणार नाही, मात्र सूचनापत्र देणे आवश्यक असेल.

कामगार संघटनांचे म्हणणे आहे की सरकारने हा निर्णय उद्योगपतींच्या दबावाखाली घेतला असून, कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष केले आहे. १२ तासांची शिफ्ट हा निर्णय प्रत्यक्षात आरोग्याला अपायकारक आणि कौटुंबिक आयुष्य विस्कळीत करणारा ठरेल, असा आरोप करण्यात येतो आहे.

महत्त्वाचे म्हणजे, नव्या नियमांनुसारही कारखान्यातील कामगारांसाठी आठवड्याची ४८ तासांची मर्यादा कायम राहील. म्हणजेच एका आठवड्यात सरासरी ८ तासच काम बंधनकारक असेल. जर एखाद्या दिवशी कामगाराने १२ तास काम केले, तर त्याला ओव्हरटाईमचा मोबदला द्यावा लागेल. याशिवाय, त्याला एक बदली रजा देणेही आवश्यक असेल.

मराठा आरक्षण: जीआर मधील शब्दांच्या बुडबुड्याने राज्यात घमासान

0

मुंबई — मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी सुलभता येण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला. यामध्ये सरकारने आरक्षण कसं द्यायचं, हे सांगितलं आहे.प्रत्यक्षात मात्र शासन निर्णयामधील शब्दनिवड, शब्दरचना; यामुळे गोंधळ निर्माण झाला असून या जीआरचे अनेक अर्थ निघत आहेत.
शासन निर्णयानुसार, जो अर्जदार मराठा व्यक्ती आहे त्याच्याकडे जर जमिनीचे पुरावे नसतील तर नातेवाईकांमध्ये ज्याला हे प्रमाणपत्र certificate मिळालेलं आहे त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र affidavit घेतलं; तर कुणबी kunbi म्हणून जात प्रमाणपत्र मिळेल. मात्र तो नातेवाईक मातृसत्ताक Matriarchy पद्धतीतून आलेला की पितृसत्ताक, Patriarchal याची स्पष्टता शासन निर्णयामध्ये नाही.

शासन निर्णयात शब्द रचनाच अशी ?

मराठा समाजातील भुधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दि.१३.१०.१९६७ पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील/कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील/कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र affidavit देण्यास ते तयार असल्यास, तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गावपातळीवरील स्थानिक समिती, वंशावळ Pedigreeसमितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील.

ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्यांचं काय ?

सदरील शासन निर्णयानुसार, जे भूमीहीन आहेत किंवा शेतमजूर आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यात आलेली आहे. परंतु ज्यांच्याकडे जमिनी आहेत पण कुणबी नोंदी नाहीत, त्यांचं काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. असे शेतकरी ज्यांच्या शेतीशी संबंधित कागदपत्रांवर एक तर मराठा जातीचा उल्लेख आहे किंवा कुठलाही उल्लेख नाही, त्या मराठ्यांना कुणबी kunbi प्रमाणपत्र कसं मिळेल, हे जीआरमध्ये नमूद केलेलं नाही.