Home Blog Page 55

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात मृत्यू

0

केज (बीड) — केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाटाजवळ घडली. या घटनेमुळे महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

🚨 कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार राकेश गिड्डे हे आज सकाळी आपल्या कारने प्रवास करत होते. रेणापूरजवळील पिंपळ फाट्यावर त्यांच्या कारवरचा अचानक ताबा सुटला आणि वाहन पलटी झाले.कारने 2 ते 3 वेळा पलटी मारली. या भीषण अपघातामध्ये
गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला
अपघातावेळी ते कारमध्ये एकटेच होते
अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

🚓 पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
तहसीलदार राकेश गिड्डे हे अभ्यासू, संवेदनशील आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जात होते.सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले
महसूल विभागातील गुंतागुंतीच्या समस्या मार्गी लावल्या अल्पावधीतच लोकांमध्ये लोकप्रिय
त्यांच्या अचानक जाण्याने प्रशासनात हळहळ व्यक्त होत आहे. “प्रशासन चालवणारा एक संवेदनशील माणूस गेला…” अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्रात ACB ची मोठी कारवाई! 6.63 कोटींची मालमत्ता जप्तीची तयारी; 208 भ्रष्ट अधिकारी अजूनही सेवेत”

0

मुंबई — महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरोधात मोठी मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने राज्य सरकारकडे तीन महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये आरोपी लोकसेवकांची तब्बल 6.63 कोटींची मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे.

📍 कोणत्या विभागांवर कारवाई?

या कारवाईत तीन महत्त्वाचे शासकीय विभाग समाविष्ट आहेत:
जलसंपदा विभाग – 2.82 कोटींची मालमत्ता
सार्वजनिक बांधकाम विभाग – 2.48 कोटी
नगर विकास विभाग – 1.32 कोटी
यामध्ये सर्वाधिक मालमत्ता जलसंपदा विभागातील अधिकाऱ्याची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

📊 पुणे आघाडीवर, संभाजीनगरमध्येही प्रकरण
ACB च्या आकडेवारीनुसार:

सर्वाधिक प्रकरणे पुणे येथे (2 प्रकरणे)
एक प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथे
⚠️ 208 अधिकारी अद्याप निलंबित नाहीत!
धक्कादायक बाब म्हणजे:208 अधिकारी भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आरोपी असूनही अद्याप सेवेत हे अधिकारी 20 वेगवेगळ्या विभागांमधील आहेत

अधिकारी वर्गनिहाय आकडे:

🕳️.    वर्ग-1 : 39 अधिकारी
🕳️.      वर्ग-2 : 41 अधिकारी
🕳️.     वर्ग-3 : 117 अधिकारी
🕳️.   वर्ग-4 : 11 अधिकारी

🏙️ कोणत्या जिल्ह्यात जास्त कारवाई होण्याची शक्यता?

ठाणे – 44
मुंबई – 43
छत्रपती संभाजीनगर – 29
नाशिक – 24
पुणे – 23
अमरावती – 17
नागपूर – 17
नांदेड – 17 (टीप: आकडेवारीत सुधारणा शक्य)

🏢 कोणते विभाग आघाडीवर?
भ्रष्टाचार असूनही निलंबन न झालेल्या अधिकाऱ्यांचे विभाग:

शिक्षण/क्रीडा – 49
महानगरपालिका/नगरविकास – 34
महसूल/नोंदणी/भूमी अभिलेख – 26
पोलीस/कारागृह/होमगार्ड – 26
ग्रामविकास – 14
⏳ काही प्रकरणे 2014 पासून प्रलंबित!
काही भ्रष्टाचार प्रकरणे 2014 पासून प्रलंबित असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पैठण उजव्या कालव्यासाठी मोठा निर्णय! उन्हाळ्यात 4 पाणी पाळ्या मंजूर – शेतकऱ्यांना दिलासा

0

पैठण – जायकवाडी धरण परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उन्हाळी हंगामासाठी चार पाणी पाळ्या मंजूर करण्यात आल्या आहेत.

या बैठकीत विजयसिंह पंडित यांनी पैठण उजव्या कालव्यासाठी महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या होत्या. त्यानुसार मार्च ते जून या कालावधीत दर 20 दिवसांनी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचीही समस्या कमी होणार असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बैठकीत कालव्याच्या अस्तरीकरणामुळे पाणी बचत होत असल्याने अतिरिक्त पाणी पाळ्यांची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच कालव्याच्या दुरुस्ती, बॅरेज पुनर्भरण, वितरण प्रणाली सुधारणा यांसारख्या अनेक मागण्या मांडण्यात आल्या.
याशिवाय सिंदफणा नदीवरील बॅरेज, कालव्यावरील पूल, तसेच विविध ठिकाणी एस्केप (नियामक छेद) बांधण्यासंदर्भातही प्रस्ताव ठेवण्यात आले. मंत्री विखे पाटील यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली.

बीडमध्ये छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी आ. संदीप क्षीरसागर आग्रही

0

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदन

बीड — शहरातील बायपास रोडवरील महालक्ष्मी चौक येथे असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुसज्ज स्मारक उभारावे, अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

बीड शहरातून जाणाऱ्या सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे शहरात गर्दी होऊ नये म्हणून खजाना बावडी ते रामनगर असा बायपास रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, या बायपासवर शहरात प्रवेशासाठी आवश्यक असलेले उड्डाणपूल नसल्याने वारंवार अपघात होत होते. तसेच काही ठिकाणी स्लीप रोड नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या समस्यांवर उपाय म्हणून आ. संदीप क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे संबंधित ठिकाणी उड्डाणपूल व स्लीप रोडचे काम सध्या सुरू झाले आहे. या कामासाठी त्यांनी शासन, प्रशासन तसेच माजी आ. सय्यद सलीम यांच्या सहकार्याने औरंगाबाद उच्च न्यायालय येथे याचिकाही दाखल केली होती.
दरम्यान, आता महालक्ष्मी चौकातील पुतळ्याची उंची वाढवून आधुनिक आणि भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे. आ. क्षीरसागर यांनी यापूर्वीही अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. हे स्मारक उभारले गेल्यास बीड शहराच्या वैभवात मोठी भर पडणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

🎓 NEP 2020 Update: 2026 पासून 4 वर्षांची पदवी अनिवार्य? विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल

0

मुंबई — राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026–27 पासून चार वर्षांची ऑनर्स पदवी (Honours Degree) आणि संशोधनासह ऑनर्स (Honours with Research) अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहेत. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

📌 असे होणार बदल ?

आतापर्यंत 3 वर्षांची डिग्री (BA, BSc, BCom) होती.आता विद्यार्थ्यांना 4 वर्षांचा पर्याय मिळणार,चौथ्या वर्षात:ऑनर्स पदवी
किंवा संशोधनासह ऑनर्स मिळणार

🏫 कॉलेजांसाठी नवे नियम ( college rules NEP 2020 Maharashtra)

फक्त 3 वर्षांचे कोर्स असलेल्या कॉलेजांना चौथे वर्ष सुरू करण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल
Post Graduation (PG) असलेल्या कॉलेजांना थेट ऑनर्स सुरू करता येईल
PhD केंद्र असलेल्या कॉलेजांना Research कोर्स सुरू करता येईल

📚 अभ्यासक्रमात काय असणार? ( NEP 2020 syllabus details)

नवीन 4 वर्षांच्या कोर्समध्ये:
🕳️.  मुख्य विषय (Major Subject)
🕳️.  इतर विषय (Multidisciplinary)
🕳️. Skill Development Courses
I🕳️.   Internship / Training
🕳️     Project Work
म्हणजेच फक्त थिअरी नाही, तर स्किल आणि प्रॅक्टिकलवर भर असेल.

📊 क्रेडिट सिस्टम (credit system NEP 2020 India)

🕳️4 वर्षांसाठी 160–176 Credits पूर्ण करावे लागतील
🕳️Internship अनिवार्य
Research कोर्ससाठी:
Project / Thesis करावा लागेल

💻 ऑनलाइन शिक्षण (SWAYAM courses India)

अभ्यासक्रमातील 40% भाग SWAYAM द्वारे ऑनलाइन शिकता येणार आहे.
🔄 विद्यार्थ्यांसाठी फायदा ( benefits of NEP 2020)
🕳️.  Multiple Entry & Exit System
मध्येच ब्रेक घेतला तरी नुकसान नाही
🕳️.  Academic Bank of Credits (ABC) मुळे क्रेडिट सेव्ह होणार
🕳️. पुढे Masters / PhD करणे सोपे

⚠️ लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

⭐चौथे वर्ष सर्व कॉलेजमध्ये लगेच सुरू होणार नाही
⭐चांगल्या सुविधा आणि शिक्षक असलेल्या कॉलेजांनाच परवानगी
⭐प्रवेश मेरिट आणि आरक्षणानुसार होईल
NEP 2020 मुळे शिक्षण पद्धतीत मोठा बदल होणार असून विद्यार्थ्यांना आता जास्त ज्ञान, कौशल्य आणि संशोधनाच्या संधी मिळणार आहेत. भविष्यात करिअरसाठी हा बदल खूप फायदेशीर ठरणार आहे.

बेपत्ता मुलीचा तपास करत होते… घरी येताच पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

0

बीड — शहरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ३५ वर्षीय पोलीस अंमलदार बाळकृष्ण जायभाये यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस दलात आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

🚨 नेमके काय घडले ?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण जायभाये हे ६ एप्रिल रोजी एका बेपत्ता मुलीच्या तपासासाठी पुण्याला गेले होते. ७ एप्रिल रोजी रात्री उशिरा ते घरी परतले आणि काही तासांतच ही दुर्दैवी घटना घडली.मध्यरात्री सुमारे २ वाजता ही घटना घडल्याचा अंदाज आहे घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याच्या लोखंडी गजाला दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले.
घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावलेली असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले.

 घटनास्थळावरील संशयास्पद बाबी

घटनास्थळी आढळलेल्या काही गोष्टींमुळे या प्रकरणाबाबत विविध चर्चा सुरू आहेत:
🕳️  दरवाजाजवळ एक बॅट आढळली
🕳️  जिन्याजवळ दोन पायऱ्याचा (स्टूल) सापडला
🕳️   मृतावस्थेत एक पाय जमिनीवर तर दुसरा वाकड्या अवस्थेत

या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर नेमके काय घडले याचा तपास सुरू आहे.

👮‍♂️ तपासाला वेग

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
शवविच्छेदनानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या कामाच्या ताणामुळे केली गेली की व्यक्तिगत काही कारण आहे पोलिसांकडून सर्व अंगांनी याची चौकशी केली जात आहे.
पोलीस दलात शोककळा
बाळकृष्ण जायभाये यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

अंबाजोगाईत भीषण अपघात: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; बँक अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू”

0

अंबाजोगाई — शहरात बुधवारी सकाळी रिंग रोडवर भीषण अपघात घडला असून एका बँक अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

🚨 कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन टाक (रा. उजनी) हे सकाळी दुचाकीवरून कामासाठी निघाले होते. तथागत चौकाजवळ रिंग रोडवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.अपघात इतका भीषण होता की सुदर्शन टाक यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला
आसपासच्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली

👮 पोलिसांची तातडीची कारवाई

अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पंचनामा पूर्ण करून मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला
पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे

🏦 बँक परिवारात शोककळा

घटनेची माहिती मिळताच दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष अॅड. मकरंद पत्की, संचालक व अधिकारी रुग्णालयात दाखल झाले.
सुदर्शन टाक हे त्यांच्या शांत व मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखले जात होते
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बँक परिवार आणि अंबाजोगाई शहरात शोककळा पसरली आहे.

बीड:जिल्ह्यात ACB ची मोठी कारवाई: तलाठी व ग्रामसेवक लाच घेताना रंगेहाथ अटक”

0

बीड — जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी मोठी कारवाई करत भ्रष्टाचाराविरुद्ध जोरदार संदेश दिला. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तलाठी आणि ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली. या कारवाईमुळे महसूल व ग्रामविकास प्रशासनात खळबळ उडाली आहे.

🟠 पहिली कारवाई: केज तालुक्यात तलाठी जाळ्यात

केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) परमेश्वर अभिमान जाधव (वय ४७) याला ९ हजार रुपयांची लाच घेताना ACB ने पकडले.
तक्रारदाराच्या वारस नोंदी सातबाऱ्यावर करण्यासाठी जाधवने ३५ हजार रुपयांची मागणी केली होती त्यापैकी ९ हजार रुपये आगाऊ घेताना तो रंगेहाथ सापडला उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यावर घेण्याचे ठरले होते विशेष बाब म्हणजे, जाधव हा माजी सैनिक असून फक्त ६ महिन्यांपूर्वीच सेवेत रुजू झाला होता ही कारवाई उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या पथकाने केली

🟠 दुसरी कारवाई: परळी तालुक्यात ग्रामसेवक अटक

परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे ग्रामसेवक दशरथ देविदासराव गोरे याला ५०० रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. विहीर बांधकामाच्या बिलावर सही करण्यासाठी १,००० रुपयांची मागणी केली होती.पंचायत समिती परिसरात मागणी करुन आपल्या खासगी कार्यालयात  ५०० रु लाच स्वीकारली
पोलीस निरीक्षक कवडे आणि त्यांच्या पथकाने कारवाई करत गोरेला पकडले

🚨 प्रशासनाला मोठा धक्का

या दोन कारवायांमुळे जिल्ह्यातील महसूल आणि ग्रामविकास विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. नागरिकांनी लाचलुचपत विरोधात पुढे येण्याची गरज अधोरेखित झाली आहे

महावितरणचा मोठा निर्णय: IPO ला मंजुरी; कृषी वीजेसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन

0

मुंबई – राज्यातील वीज वितरण व्यवस्थेत मोठा बदल करत Maharashtra State Electricity Distribution Company Limited (महावितरण) ची आर्थिक पुनर्रचना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महावितरणचा IPO आणण्यास आणि दोन स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली.


⚡ दोन स्वतंत्र कंपन्यांमधून वीज वितरण
या निर्णयानुसार राज्यातील वीज वितरण व्यवसाय दोन भागांत विभागला जाणार आहे:
कृषी ग्राहकांसाठी: MSEB Solar Agro Power Limited (एमएसएपीएल)
बिगर कृषी ग्राहकांसाठी: महावितरण (औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती)
👉 यामुळे प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र व्यवस्थापन आणि पारदर्शकता वाढणार आहे.
💰 महावितरणचा IPO येणार
महावितरणला भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी IPO (Initial Public Offering) आणण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
IPO मध्ये Fresh Issue + Offer For Sale (OFS) असेल विस्तारासाठी भांडवल उभारणी स्मार्ट मीटरिंग, डिजिटल वितरण, हरित ऊर्जा गुंतवणूक वाढणार

📉 कर्जाचा बोजा कमी करण्याचा निर्णय
महावितरणवर सुमारे ₹32,679 कोटींचे कर्ज आहे.

👉 हे कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार 15 वर्षांच्या मुदतीचे रोखे (Bonds) जारी करणार आहे.
👉 यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.

🌱 कृषी क्षेत्राला मोठा फायदा

नवीन एमएसएपीएल कंपनीद्वारे:
शेतकऱ्यांना दिवसा आणि अखंडित वीज पुरवठा
सौर ऊर्जेवर आधारित कृषी व्यवस्था
सिंचनासाठी स्थिर वीज उपलब्ध
🏭 औद्योगिक व घरगुती ग्राहकांना दिलासा
औद्योगिक ग्राहकांना स्थिर वीज
दरवाढीवरील ताण कमी
डिजिटल बिलिंग व ग्राहक सेवा सुधारणा
हरित ऊर्जा वापराला चालना

मान्सून 2026 धोक्यात? ‘एल निनो’चा इशारा; यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता

0

मुंबई – देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल दिसत असून पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कायम आहे. यामुळे यंदाचा मान्सून कसा असेल याबाबत चिंता वाढली आहे. खाजगी हवामान संस्था Skymet Weather च्या ताज्या अहवालानुसार 2026 चा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

🌧️ ‘एल निनो’चा धोका वाढला

अहवालानुसार यंदा El Niño मान्सूनच्या सुरुवातीलाच सक्रिय होण्याची शक्यता आहे. हा प्रभाव शरद ऋतूत अधिक तीव्र होऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम पावसावर होणार आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण घटू शकते.

🌊 IOD मुळे काहीसा दिलासा?

मान्सूनवर Indian Ocean Dipole (IOD) चा देखील प्रभाव असतो.
सकारात्मक IOD असल्यास एल निनोचा परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो
मात्र हंगामाच्या शेवटी पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता कायम

📉 कोणत्या भागात कमी पाऊस?

मध्य आणि पश्चिम भारत: कमी पावसाची शक्यता
Punjab, Haryana, Rajasthan: ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कमी पाऊस
पूर्व व ईशान्य भारत: तुलनेने चांगला पाऊस

📊 स्कायमेटचा अंदाज (Probability)

40% – सरासरीपेक्षा कमी पाऊस
30% – दुष्काळसदृश्य परिस्थिती

🗓️ महिनानुसार पावसाचा अंदाज

जून: सरासरी किंवा थोडा जास्त
जुलै: सरासरी किंवा कमी
ऑगस्ट: कमी पाऊस (60% शक्यता)
सप्टेंबर: सरासरीपेक्षा कमी
👉 यावरून स्पष्ट होते की मान्सूनची सुरुवात चांगली होईल, पण पुढे पाऊस अनियमित राहू शकतो.