Home Blog Page 56

अवकाळी पावसाचा फटका: शेतकऱ्यांसाठी 128.65 कोटींचा दिलासा; थेट खात्यात जमा होणार मदत

0

मुंबई – राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संकटात सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने १२८ कोटी ६५ लाख रुपयांच्या मदतनिधीला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी या निर्णयाची घोषणा करत मदत तातडीने वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.

🌾 संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा

गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, मका, गहू, ज्वारी यांसारख्या पिकांसह केळी व पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
“हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असताना शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी ही मदत दिली जात आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

📊 किती शेतकऱ्यांना मिळणार मदत?

राज्यातील नुकसान लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने मदत वाटप होणार आहे:
ऑक्टोबर–डिसेंबर 2025: 1.80 लाख शेतकरी लाभार्थी
जानेवारी–मार्च 2026: 2.33 लाख शेतकरी बाधित (पंचनामे सुरू)
एप्रिल 2026: 1.94 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

🏠 केवळ पिकेच नाही, घर व जनावरांनाही मदत

या नैसर्गिक आपत्तीत अनेक ठिकाणी घरे कोसळली असून जनावरांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित कुटुंबांना सर्वसमावेशक आर्थिक मदत दिली जाणार आहे.

💳 DBT द्वारे थेट खात्यात जमा

मदत वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होईल आणि मध्यस्थ टाळले जातील.

कोणाला दोष देऊ नका, द्वेष करू नका” नियती सर्वांचा हिशोब करते” – धनंजय मुंडे यांचे बडेवाडीत विधान 

0

पाथर्डी  – कोणी आपल्यावर दोष ठेवला किंवा द्वेष केला तरी आपण मात्र कोणाला दोष देऊ नये आणि कुणाचाही द्वेष करू नये, कारण नियती सर्वांचा हिशोब योग्य प्रकारे करत असते, असे विचार माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

नारळी सप्ताह निमित्त धनंजय मुंडे नतमस्तक होताना
नारळी सप्ताहाला धनंजय मुंडे यांची भेट

श्रीक्षेत्र भगवानगड यांच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथे आयोजित अखंड नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते.
भगवानगड ही भक्ती, शक्ती आणि विश्वासाची परंपरा जपणारी पवित्र भूमी आहे. लाखो ऊसतोड कामगार आपल्या उत्पन्नातून देणगी देऊन या गडाची परंपरा टिकवून ठेवतात. संत भगवान बाबांनी घालून दिलेली ऐश्वर्यसंपन्नतेची परंपरा आजही कायम राखली जात असून, सध्याचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली ती अधिक बळकट होत असल्याचे मुंडे यांनी नमूद केले.

भगवानगड हे ऊर्जा आणि प्रेरणेचे केंद्र असून, येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सकारात्मक ऊर्जा मिळते, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास महंत कृष्णा महाराज शास्त्री, राधाताई सानप, खासदार निलेश लंके, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार बाळासाहेब आजबे, ॲड. प्रताप ढाकणे, प्रा. लक्ष्मण हाके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी बडेवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांनी धनंजय मुंडे यांची भव्य मिरवणूक काढून फुलांची उधळण करत उत्स्फूर्त स्वागत केले.

📍 उमापूर येथे नारायणगडालाही भेट

दरम्यान, बडेवाडी येथे जाण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील उमापूर येथे श्रीक्षेत्र नारायणगडाच्या नारळी सप्ताह सांगता कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी महंत शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Custodial Death Case: 9 पोलिसांना एकाचवेळी फाशी; देश हादरवणाऱ्या प्रकरणात मोठा निकाल

0

मदुराई (तामिळनाडू) —  देशभरात खळबळ उडवणाऱ्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात ऐतिहासिक निकाल देत मदुराई प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय यांनी तब्बल 9 पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना भारतात पहिल्यांदाच घडली असून पोलीस अत्याचाराविरोधातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.

📌 काय आहे प्रकरण?

2020 मध्ये तूतीकोरिन (थुथुकुडी) जिल्हा येथील साथनकुलम पोलीस ठाण्यात लॉकडाऊनदरम्यान पी. जयराज (51) आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स (31) यांना अटक करण्यात आली होती. दुकान उघडे ठेवल्याचा आरोप करत त्यांना ताब्यात घेतले गेले होते.
मात्र, पोलीस कोठडीत त्यांच्यावर अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप झाला. गंभीर जखमांमुळे काही दिवसांतच दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

🔍 तपास आणि पुरावे

या प्रकरणाचा तपास नंतर केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) कडे सोपवण्यात आला. तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या—
पोलिसांकडून मारहाणीचे पुरावे,स्टेशनमधील रक्ताचे डाग, CCTV फुटेज हटवण्याचा प्रयत्न,
महिला कॉन्स्टेबलची महत्त्वाची साक्ष

⚖️ न्यायालयाचा निर्णय

सहा वर्षांच्या सुनावणीनंतर मार्च 2026 मध्ये सर्व आरोपी दोषी ठरले. अखेर 6 एप्रिल 2026 रोजी न्यायालयाने हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट करत नऊ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने हे प्रकरण “पोलीस अत्याचाराचे गंभीर उदाहरण” असल्याचे नमूद केले आणि कठोर शिक्षा देत ठोस संदेश दिला.

🔗अशी आहेत आरोपींची नावे 

पोलीस कोठडीत दोघांचा मृत्यू झाल्या प्रकरणात तपास सुरू असताना एका पोलिस उपनिरीक्षकाचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला.पो.निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक पी. रघु गणेश, के. बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल एस. मुरुगन, ए. समिदुराई आणि कॉन्स्टेबल एम. मुथुराज, एस. चेल्लादुराई, एक्स. थॉमस फ्रान्सिस आणि एस. वेलुमुथू अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

🇮🇳 देशभरात प्रतिक्रिया

या निकालाचे मानवाधिकार संघटनांकडून स्वागत करण्यात आले असून, कोठडीतील मृत्यूंविरोधात मोठी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

खाद्यतेलाच्या किंमतीत 30% उसळी; शेंगदाणा तेल ₹175 वर, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

0

जळगाव —  गेल्या पाच ते सहा महिन्यांत खाद्यतेलांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होत आहे. विशेषतः शेंगदाणा, सूर्यफूल आणि पामतेलाच्या दरात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याने मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांवर आर्थिक ताण वाढला आहे.
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे आयात खर्च वाढून भारतातील स्थानिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. सध्या शेंगदाणा तेलाचा दर प्रतिलिटर ₹175 पर्यंत पोहोचला आहे.

📊 सध्याचे बाजारभाव (15 किलो डबा)

सोयाबीन तेल – ₹2,670
सूर्यफूल तेल – ₹3,018
शेंगदाणा तेल – ₹2,880
📈 किमतीतील वाढ (लिटरमागे)
शेंगदाणा तेल: ₹148 ➝ ₹175 (20-25% वाढ)
सूर्यफूल तेल: ₹130 ➝ ₹185 (सुमारे 30% वाढ)
पाम तेल: ₹117 ➝ ₹160 (25-30% वाढ)

🔍 दरवाढीची मुख्य कारणे

🕳️. पश्चिम आशियातील युद्धामुळे पुरवठा                   साखळी विस्कळीत
🕳️.  आयात खर्चात 8 ते 25% वाढ
🕳️.  भारताची 60% गरज आयातीवर अवलंबून
🕳️.    डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण
वाहतूक खर्चात वाढ
🕳️.   साठेबाजी व बाजारातील अनिश्चितता

⚠️ सामान्यांवर परिणाम

घरगुती खर्चाचे बजेट बिघडले
हॉटेल व खाद्य व्यवसायात दरवाढ
तळकट पदार्थांचे सेवन कमी
ग्राहकांकडून खर्च नियंत्रणाचे प्रयत्न

🔮 पुढील अंदाज

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुधारल्यास दर स्थिर होऊ शकतात. मात्र युद्धस्थिती कायम राहिल्यास खाद्यतेलाचे दर उच्च पातळीवरच राहण्याची शक्यता आहे.

1252 शाळांची मान्यता रद्द; शिक्षकांचे भविष्य धोक्यात, शासनाचा मोठा निर्णय

0

वारंवार अपात्र ठरलेल्या शाळांवर सरकारची कारवाई; 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत

मुंबई —  महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेत राज्यातील 1252 शाळा आणि 827 तुकड्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो शिक्षकांचे भविष्य अधांतरी झाले आहे.
सन 2000 मध्ये कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळालेल्या जवळपास 6 हजार शाळांपैकी अनेक शाळांचे मूल्यांकन करण्यात आले होते. यामध्ये काही शाळांनी टप्पा अनुदान मिळवले, मात्र वारंवार अपात्र ठरणाऱ्या 1252 शाळांवर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्णयानुसार, या शाळांना आता स्वयं-अर्थसहाय्यित तत्त्वावर नव्याने मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा, संबंधित शाळा कायमस्वरूपी बंद केल्या जाणार आहेत.

📅 महत्त्वाची तारीख:

1 एप्रिल 2026 पासून कारवाई लागू
30 एप्रिल 2026 अंतिम मुदत अर्जासाठी
तसेच, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
शासनाच्या नियमांनुसार, सलग 3 वर्षे मूल्यांकनात अपात्र ठरणाऱ्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

📊 विभागनिहाय आकडेवारी

प्राथमिक शाळा – 433 (33 तुकड्या)
माध्यमिक शाळा – 324 (412 तुकड्या)
उच्च माध्यमिक शाळा – 505 (382 तुकड्या)
एकूण.     –    1252 शाळा (827 तुकड्या)

अंबाजोगाईत धक्कादायक घटना; निवासी डॉक्टरची आत्महत्या, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

0

अंबाजोगाई (बीड) – स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शिक्षण घेणाऱ्या एका निवासी डॉक्टरने भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत डॉक्टरचे नाव डॉ. मंदार दाभाडे असे असून ते चनई परिसरातील रोहिदास नगर भागात भाड्याच्या घरात राहत होते. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने संशय आल्यावर ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
डॉ. दाभाडे हे पदव्युत्तर शिक्षण घेत असून रुग्णालयातील कामात सक्रिय होते. त्यामुळे एक होतकरू डॉक्टरने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार कामाचा ताण, वैयक्तिक कारण किंवा इतर काही कारणांचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे रुग्णालयातील सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दिल्ली विधानसभेची सुरक्षा भंग; व्हीआयपी गेट तोडून कारची घुसखोरी, पोलिसांचा तपास सुरू

0

Delhi security lapse: कडेकोट सुरक्षेतही कारची एंट्री; ५ मिनिटांचा थरार, आरोपी फरार

नवी दिल्ली — राजधानीत मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली असून दिल्ली विधानसभा परिसरात एका अज्ञात कारने थेट व्हीआयपी गेट तोडून प्रवेश केला. या घटनेमुळे Delhi Assembly security breach आणि Assembly car intrusion या मुद्द्यांवर चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास गेट क्रमांक २ जवळ एक पांढऱ्या रंगाची कार उभी होती. काही क्षणांतच चालकाने अचानक वेग घेत गेटला जोरदार धडक दिली आणि थेट विधानसभेच्या आवारात प्रवेश केला. मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

🚨 ५ मिनिटांचा थरार, चालक फरार

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार जवळपास पाच मिनिटे आवारात फिरत होती. या दरम्यान नागरिकांनी आणि रिक्षाचालकांनी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. धक्कादायक बाब म्हणजे, जाण्यापूर्वी चालकाने आवारात एक फुलांचा गुच्छ ठेवला.

🔍 पोलीस तपास सुरू

या प्रकरणाची नोंद दिल्ली पोलीस यांनी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, कारवर उत्तर प्रदेशचा नोंदणी क्रमांक असल्याचे समोर आले आहे.
घटनेनंतर शहरभर नाकाबंदी करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे. अत्यंत कडेकोट सुरक्षा असलेल्या विधानसभेत अशी घुसखोरी कशी झाली, याबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे. हा प्रकार Delhi security lapse म्हणून पाहिला जात आहे. विधानसभेसारख्या संवेदनशील ठिकाणी झालेल्या या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

परळी बायपास रस्ता बंद; रेल्वे कामामुळे शहरात वाहतुकीचा ताण वाढणार

0

परळी —  परळी शहरासाठी महत्त्वाचा असलेला परळी बायपास रस्ता बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून रविवार (ता. 5) पासून हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. रेल्वे रुळ टाकणे व पुलाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे Parli traffic update आणि Parli railway project सध्या चर्चेत आले आहेत.


परळी–बीड–अहिल्यानगर रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून परळी रेल्वे स्थानक ते टोकवाडी दरम्यान अनेक महिन्यांपासून काम सुरू आहे. टोकवाडी–ब्रह्मवाडी–जिरेवाडी–कन्हेरवाडी या गावालगतच्या वळण रस्त्यावर (बायपास) खोदकाम करून रेल्वे रुळ टाकणे आणि पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे road closure Parli अंतर्गत हा मार्ग बंद केला जात आहे.
प्रशासनाकडून या निर्णयाची माहिती देणारे फलक संबंधित मार्गावर लावण्यात आले असून, पुढील काही दिवस हे काम सुरू राहणार आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

🚧 मुख्य रस्त्यांवर वाढणार ताण

बायपास बंद झाल्यामुळे परळी शहरातील मुख्य मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ताण पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी चौक, रेल्वे उड्डाणपूल, एक मिनार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिजामाता चौक आणि कन्हेरवाडी या प्रमुख मार्गांवर वाहने वळवली जाणार आहेत.
लातूर, पुणे, अंबाजोगाई तसेच परभणी, नांदेड, गंगाखेड, बीड, माजलगाव या भागातून येणारी सर्व वाहने आता शहरातूनच मार्गक्रमण करणार आहेत. त्यामुळे traffic congestion Parli वाढण्याची शक्यता आहे.

🚨 प्रशासनासमोर आव्हान

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाला ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. रस्त्याच्या कडेला उभी राहणारी वाहने व अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा करण्याची गरज आहे. यामुळे वाहतुकीचे नियोजन सुलभ होऊन नागरिकांची गैरसोय कमी होण्यास मदत होईल.

कांवत साहेब एवढी तरी शिफारस करा; अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीच्या अटकेची राजे गोसावींना विनंती करा

0

बीड — नेकनूरच्या ठाणेदाराचा छेऽऽ। राजेंचा कारभार मोगलाईला साजेसा सुरू आहे.वेगवेगळ्या धंद्यामधून राजेंच्या व्यक्तिगत खजिन्यात दररोज भर पडत आहे. हे कमी की काय म्हणून लेकीबाळींच्या अब्रूवर हात घालणारांना देखील अभय दान देऊन त्यातूनही खजिन्यात कशी भर पडेल याची काळजी घेतली जात आहे. अपहरण झालेल्या 14 वर्षाच्या पीडितेचे कुटुंब असा आरोप करत आहेत. कांवत साहेब “त्या” पिडीत बापाला न्याय देण्याची शिफारस तरी तुम्ही करा आरोपीच्या अटकेची विनंती तरी करा अशी पीडित कुटुंब आंदोलन करून अर्त हाक देऊ लागलं आहे.

नेकनूर संस्थानच्या सिंहासनावर चंद्रकांत राजे गोसावी विराजमान झाल्यापासून प्रचंड भरभराटीला हे राज्य येऊ लागला आहे. मटका जुगार, दारू, गांजा, यासारख्या अनेकविध उद्योग धंद्यांमधून राजेंच्या खजिन्यात दररोज भर पडत आहे. त्यामुळे राज्याचा नावलौकिक वाढलेला आहे. मोगलाईच्या सुवर्णकाळाला कुठेही कमी पडणार नाही म्हणून त्यांनी आता लेकीबाळींना पळवून घेऊन जाणाऱ्या कडून देखील खजिन्यात भर कशी पडेल यावर जोर दिला जात आहे. नेकनूर राज्याच्या हद्दीतून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण एका महाभागाने केलं.याचं गाऱ्हाण पीडित कुटुंबांने चंद्रकांत गोसावी राजेंच्या दरबारात मांडलं. अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा सुरज पंजाब झोडगे याचं नाव देखील सांगितलं. या घटनेला दीड महिन्यांचा कालावधी उलटला पण अपहरण करणाऱ्या व्यक्तीला राजाश्रय देऊन राजेंनी खजिन्यात भरला असा आरोप पीडित कुटुंबाने केला. दरबारात मांडलेल्या गाऱ्हाण्याचा आवाज सिंहासनाधिश्वरा पर्यंत पोहोचलाच नाही. याच दरबारात ला सचिन मुरूमकर नावाचा दरबारी देखील पळवून घेऊन जाणारा च्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. या सगळ्या घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी बीडचा दरबार मुख्य समजून व्यथा मांडली.पण कोण कुणाचा मांडलिक हे न कळाल्यामुळे पीडित कुटुंबाची दिशाभूल झाली. त्यांनी बीडच्या दरबारात तपास न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याची जाहीर केलं.मात्र स्वतंत्र राजाच्या कारभाराला लगाम घालणार कोण? हे मात्र पीडित कुटुंब विसरलं. मांडलिक असलेल्या दरबारातूनही न्याय न मिळाल्यामुळे शेवटी कुटुंबाने 5 एप्रिल रोजी ठरल्याप्रमाणे आंदोलन केलं. पुन्हा आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला आश्वासनाचं पान पुसलं गेल. दीड महिन्यापासून अपहरण झालेल्या 14 वर्षाच्या मुलीचा ठावठिकाणा नाही. आरोपीला राजाश्रय मिळतो आहे. आदेश देणं तुम्हाला शक्य नसलं तरी कमीत कमी नवनीत कांवत साहेब चंद्रकांत राजे गोसावींना पीडित कुटुंबाला
न्याय देण्याची अर्जव विनंती तरी करा अशी मागणी होऊ लागली आहे.
आज नेकनुर संस्थानच्या राज दरबाराबाहेर ठिय्या देणाऱ्यांमध्ये पीडित मुलीचे नातेवाईक, सामान्य नागरिक, शिवशाही ऊसतोड कामगार संघटनेचे बाळासाहेब मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा पर्दाफाश; ACB चा सापळा, अधिकाऱ्याला ६.३७ लाखांसह अटक

0
मुंबई — राज्यातील प्रशासनात पुन्हा एकदा मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण उघडकीस आले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने मोठी कारवाई करत अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला ६ लाख ३७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेमुळे Maharashtra corruption news पुन्हा चर्चेत आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निधी मंजूर करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर ACB ने सापळा रचत खारघर परिसरात ही कारवाई केली. या कारवाईमुळे ACB trap Maharashtra पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
याआधीही काही दिवसांपूर्वी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात २५ हजारांची लाच घेतल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा राज्यभर गाजला होता.
🔍 सरकारवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, अर्थ व नियोजन विभाग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत येत असल्याने या घटनेनंतर प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यातील मंत्रालयात लाचखोरीच्या घटना वारंवार समोर येत असल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. ACB च्या कारवाईमुळे भ्रष्टाचार उघडकीस येत असला तरी अशा घटनांमुळे नागरिकांचा विश्वास कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.