Home Blog Page 44

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा:साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

0

बीड — मैंदा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मारलेल्या छाप्यात साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून ही कारवाई पिंपळनेर पोलिसांनी केली आहे ‌

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळनेर पोलिसांना ​ मैंदा शिवारात, मैंदा फाटा ते गाडीउतार तांडा रोडच्या उजव्या बाजूला विटभट्टीजवळ लिंबाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत काही इसम बेकायदेशीररित्या ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत व खेळवत आहेत अशी गुप्त माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे, पोलीस अंमलदार वैजिनाथ चंद्रकांत मगर यांच्या फिर्यादीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घूगे,आणि पोलीस उपनिरीक्षक अर्जुन गोलवाल यांच्या पथकाने सायंकाळी साडेचार वाजता अचानक छापा टाकला.छाप्यादरम्यान, पाच इसम गोलाकारात बसलेले आणि जुगार खेळताना आढळून आले.
​ यावेळी ​सुभाष गोपिनाथ चव्हाण वय ४० वर्षे,
​गंपु गुंडीबा कसबे वय ६० वर्षे,
​दिलीप शिवाजी घोरड वय ३२ वर्षे,
​हनुमंत रामभाऊ लोकरे वय ३८ वर्षे,
​शिवाजी रंगनाथ कसबे वय ५५ वर्षे
सर्व रा. मैंदा, ता. जि. बीड. अशी जुगार खेळणाऱ्या आरोपींची नाव आहे.​ यावेळी पोलिसांनी रक्कम, मोबाईल, आणि पाच मोटारसायकली (हिरो स्प्लेंडर पल्स, बजाज डिस्कव्हर, बजाज बॉक्सर, बजाज प्लॅटीना) असा एकूण ३ लाख ४९ हजार ४७० रुपयांचा  मुद्देमाल  जप्त करण्यात आला .या आरोपींविरुद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार बंदी कायदा प्रमाणे कायदेशीर फिर्याद नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस स्टेशन करत आहे.
सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपोअ सचिन पांडकर, उपविपोअ हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक मधुसूदन घूगे, पो उप नी गोलवाल, पोलीस अंमलदार शेळके, गरजे, मगर, ढाकणे पठाण, विघ्ने, तावरे यांनी केली आहे.

डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरण: कवडगाव ग्रामस्थ आक्रमक; पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, उडी मारण्याचा प्रयत्न

0

ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे नी खाली उतरवले

बीड — फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा एसआयटी मार्फत तपास व्हावा या मागणीसाठी महिला डॉक्टर यांच्या कवडगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी आज सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी वडवणी तालुक्यात गेल्या असता, त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून आंदोलकांना खाली उतरण्याचे आवाहन केले. आपल्या गावात नाही तर
फलटणला जाऊन आपण तिथे बोलू. ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, त्यांना त्रास झाला पाहिजे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. बीडच्या वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरच्या गावातील नागरिकांकडून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू करण्यात आले. त्यात आंदोलनादरम्यान आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी पाण्याच्या टाकीवरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. आमची लेक गेली तरी यांना जाग येत नाही.. तिला न्याय मिळत नाही, हे प्रशासन येत नाही असे
म्हणत संतप्त प्रतिक्रिया दिलीतुम्ही सगळे मला सोबत हवे आहात. त्यामुळे आता तुमची मोठी बहीण सांगते म्हणून खाली उतरा, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी आंदोलकांना केले. इथे दुखवटा आहे. त्यात आणखी कुणाला मानसिक त्रास नको. आपल्या गावात नाही, तर त्यांच्या तिथे जाऊन आपल्याला काय ते बोलायचे आहे. आपल्याच माणसांना पुन्हा पुन्हा मानसिक त्रास देण्यात काय अर्थ आहे ? ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, त्यांना त्रास झाला पाहिजे. आपल्याच लोकांना त्रास होऊन उपयोग नाही, त्यामुळे तुम्ही खाली या, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी आंदोलकांना केले. यानंतर सर्व आंदोलक खाली उतरले.देत आंदोलनकाने उडी मारण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर त्यांनी अंगावर पेट्रोल ओतुन घेण्याचा प्रयत्न केला. अखेर इतर आंदोलकांनी आणि गावकऱ्यांनी त्यांना वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, याचवेळी सुषमा अंधारे पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्या असता, आधी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांना खाली येण्याचे आवाहन केले. सुसाईड नोटमधील नमूद लोक चौकशीच्या कक्षेत आणली नाहीत, तर आपण तीन नोव्हेंबरला फलटणला जायचे आहे. तेव्हा तुम्ही सगळे मला सोबत हवे आहात. त्यामुळे आता तुमची मोठी बहीण सांगते म्हणून खाली उतरा, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी आंदोलकांना केले. इथे दुखवटा आहे. त्यात आणखी कुणाला मानसिक त्रास नको. आपल्या गावात नाही, तर त्यांच्या तिथे जाऊन आपल्याला काय ते बोलायचे आहे. आपल्याच माणसांना पुन्हा पुन्हा मानसिक त्रास देण्यात काय अर्थ आहे ? ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, त्यांना त्रास झाला पाहिजे. आपल्याच लोकांना त्रास होऊन उपयोग नाही, त्यामुळे तुम्ही खाली या, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी आंदोलकांना केले. यानंतर सर्व आंदोलक खाली उतरले.

बनसारोळा उपकेंद्रात अपहार; वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल

0

केज  — तालुक्यातील बनसारोळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या इस्थळ उपकेंद्रातील शासकीय निधी १ लाख १६ हजार ६९४ रुपयांचाअपहार केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि आयडीबीआय बँकेच्या शाखा अधिकाऱ्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक शिवाजी गवळी यांच्या फिर्यादीनंतर करण्यात आली.

फिर्यादीनुसार, उपकेंद्र ईस्थळच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून १,१६,६९४ रुपये निधी जून २०२४ मध्ये आयडीबीआय बँक, शाखा बनसारोळा येथील खात्यावर जमा झाला होता. सदर निधी काढण्यासाठी सरपंच आणि अधिकृत सिग्नेटरी यांची संयुक्त सही आवश्यक होती. मात्र आरोग्य सेविका मनिषा पानसरे यांनी या खात्यातील निधी परस्पर काढल्याचे बँक स्टेटमेंटवरून स्पष्ट झाले.

चौकशीदरम्यान असे आढळले की, आरोग्य सेविका पानसरे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. एजाजुद्दीन कमरुद्दीन मोमीन यांच्या सांगण्यावरून व शाखा अधिकाऱ्याच्या संगनमताने बँकेतून रक्कम काढली. बँकेकडूनही याबाबत पुष्टी मिळाली असून पानसरे यांना निधी काढण्याचा कोणताही अधिकार नव्हता, तरीही त्यांनी बेकायदेशीरपणे पैसे काढून शासनाची फसवणूक केली असल्याचे तपासादरम्यान सिद्ध झाले आहे. या प्रकारात आरोग्य सेविका मनिषा पानसरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एजाजुद्दीन मोमीन आणि बनसारोळा आयडीबीआय बँक शाखाधिकारी या तिघांनी संगनमताने शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे.

या तिघांविरुद्ध फसवणूक व शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गवळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषद, बीड यांनीही संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

पाली मधील कॅनरा बँकेवर धाडसी दरोडा; 18 लाखाची रोकड लंपास

0

बीड — तालुक्यातील पाली येथील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कॅनरा बँकेच्या शाखेच्या इमारतीची भिंत चोरट्यांनी फोडली. आत शिरलेल्या चोरट्यांनी गॅस कटरने मुख्य लॉकर उघडून आतमधील तब्बल १८ लाख ३६ हजार २०० रुपयांची रक्कम लंपास केली. गुरुवारी दि.३० ऑक्टो. पहाटे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सकाळी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

धाडसी चोरीची घटना घडली ते ठिकाण धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहरपासून अवघ्या १० कि.मी.अंतरावर आहे. गुरुवारी पहाटे या बॅँकेजवळ आलेल्या चोरट्यांनी बॅँकेची रेकी केल्याचा अंदाज वर्तवला जात असून त्यांनी बॅँकेच्या पाठीमागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. कसलाही आवाज होवू नये या हेतूने गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे मुख्य लॉकर तोडले आणि आतील 18 लाख 36 हजार दोनशे रुपयाची रोकड लंपास केली. दरम्यान सकाळी हा धाडसी चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर बॅँक अधिकाऱ्यांसह पोलीसही चोरट्यांच्या या चोरीच्या या पध्दतीने चक्रावून गेले. दरम्यान ठसे तज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. ही घटना बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत घडली असून या ठिकाणी पोलिसांची दररोज रात्री ते पहाटेपर्यंत गस्त असते; मात्र पोलिसांची नजर चूकवून चोरट्यांनी लाखोंची रक्कम लंपास केल्याने खळबळ उडाली. आता या प्रकरणात  संध्याकाळपर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

राहुल गांधींचा डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद, न्यायाच्या लढाईत मी तुमच्या पाठीशी

0

बीडमध्ये बीएसएनएल टॉवर वर चढून आंदोलन

बीड — लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पीडित मुलीची आई व मुंडे कुटुंबातील लोकांशी फोनवरून संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. घाबरु नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारवर दबाव आणेल, असे आश्वासन त्यांनी दिले. राहुल गांधी यांनी संपदाच्या कुटुंबियांकडून व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून या प्रकरणाची संपूर्ण माहितीही घेतली.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बीड जिल्ह्यातील कवडगाव येथे जाऊन फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.याभेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर चुकीचे कामे करण्यासाठी प्रचंड दबाव आणला जात होता, त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला. नाईक निंबाळकर यांच्या गुंडगिरीच्या अनेक घटना प्रकाशात आल्या आहेत. या घटनेतील कळस म्हणजे चौकशी करण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना जाहिर क्लिन चिट देऊन टाकली हे संताप आणणारे आहे. या प्रकरणाची चौकशी फलटण बाहेर करावी, उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी असून काँग्रेस पक्ष मात्र गप्प बसणार नसून डॉ. संपदा मुंडेला न्याय मिळवूण देण्यासाठी रस्त्यावर उतरेल. दिल्लीत कालच युवक काँग्रेसने आंदोलन केले आहे. महिला काँग्रेसही याप्रकरणी राज्यभर आंदोलन करेल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, या प्रकरणी महिला आयोगाची भूमिकाही संताप आणणारी असून पीडित कुटुंबाला भेटून त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी होती पण त्यांनी आधी पोलीसांची भेट घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. महिला आयोगाने महिलांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन काम करणे गरजेचे आहे पण त्यांनी तसे न करता पोलिसांची वकिली केली. डॉ. संपदा मुंडे ज्या समाजाची आहे त्या समाजातील एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही. बीड जिल्ह्यात मध्यंतरी काही घटना झाल्या त्यावेळी येथील सत्ताधारी पक्षाचे एक आमदार दररोज प्रसार माध्यमासमोर येऊन भूमिका मांडत होते, आज ते गप्प आहेत. पंकजा मुंडे गप्प आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा दबाव झुगारून बोलले पाहिजे. मुंबईतील एक सामाजिक कार्यकर्त्या अनेक विषयावर आक्रमक भूमिका घेत असतात त्यांनीही या विषयावर मौन बाळगलेले आहे. नारायण गड व भगवान गडाला आमचे साकडं आहे की त्यांनी या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी पुढे यावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी म्हटले आहे.

बीडमध्ये बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन

डॉ.संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी माऊली शिरसाठ,केशवतात्या तांदळे, मोहन आघाव यांनी बीड शहरात टॉवरवर चढून आज आंदोलन केले.बीडमध्ये डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी आणि रणजित निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच रुपाली चाकणकर यांच्याकडून महिला आयोगाचा राजीनामा घ्यावा यासाठी आपण दोनशे फूटाच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले असे आंदोलकाचे म्हणणे होते.

शेतकरी आत्महत्यांची दखल न्यायालय घेत नाही, पण शेतकरी रस्त्यावर उतरलेला जमत नाही — बच्चू कडू

0

न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकरी आंदोलनावर ठाम

नागपूर — शेतकरी आंदोलनाची स्वत:हून दखल घेत न्यायालयाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशानंतरही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे.. पोलिसांनी न्यायालयाचे आदेश घेऊन आंदोलनस्थळी धाव घेतली, पण आंदोलकांचा विरोध पाहता त्यांना आदेशासह परत जावे लागले.यावेळी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

त्यांनी सांगितले की, “आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतो, रस्ते मोकळे करतो, पण आमची व्यवस्था तुरुंगात करा.” त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा न्यायालय सरकारला आदेश देत नाही, पण शेतकरी एक दिवस रस्त्यावर उतरले तर तात्काळ आदेश दिले जातात. या दुहेरी निकषाबद्दल त्यांनी आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस तैनात केले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच सुमारे २२ विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा तसेच राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही होते. नागपूर-वर्धा मार्गावरील पांजरा येथील कापूस संशोधन केंद्राजवळ शेकडो आंदोलक काल रात्रीभर मुक्काम ठोकत आणि आज ठिय्या देऊन शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले. त्यामुळे आज दिवसभर नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.

आज सकाळी काही आंदोलक रेल्वे रुळांवर उतरले आणि रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर टायर जाळत निषेध व्यक्त केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, राज्य सरकारने राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि पकंज भोयर हे आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले आहे. काही आंदोलकांनी आसपासच्या शेतात, मोकळ्या जागेत तसेच एनएचएआयतर्फे विकसित केलेल्या ऑक्सीजन-बर्ड पार्कमध्ये प्रवेश करून तेथे ठिय्या दिला आहे. काही शेतकरी विश्रांती घेत असताना, इतरांनी मागण्यांवर ठाम भूमिका कायम ठेवली आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांनी आज नागपूरात मोठे रेल्वे रोको आंदोलन सुरू केले आहे. समर्थकांनी सकाळपासून रेल्वे ट्रॅकवर उतरून घोषणाबाजी केली असून संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी २२ मागण्यांसाठी हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगारांना नोकरीच्या संधी, अपंग, विधवा आणि वृद्धांना नियमित अनुदान, तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणा यांचा समावेश आहे.आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, सरकारकडून वारंवार आश्वासन मिळूनही ठोस निर्णय होत नसल्याने त्यांनी ‘रास्ता रोको’ आणि आता ‘रेल्वे रोको’ आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी २१ तासांसाठी राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला होता. या पार्श्वभूमीवर नागपूर आणि आसपासच्या भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. प्रशासन आणि रेल्वे विभागाने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज उग्र वळण मिळाले आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी आज सकाळी समृद्धी महामार्गावर आक्रमक पवित्रा घेत टायर, लाकूड आणि ज्वलनशील साहित्य जाळत आंदोलन छेडले. त्यामुळे दिवसभर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

चौसाळा:स्टेट बँकेसमोर रखडलेल्या पीक कर्जासाठी बाळासाहेब मोरे पाटील यांचे अमरण उपोषण

0

चौसाळा —  येथील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेमध्ये चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून खरीपाच्या पिकासाठी पीक कर्जाची मागणी केलेली आहे. परंतु सध्या खरिपाच्या पिकांची काढणी झाली तरी शेकडो शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळालेले नसल्याने शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील हे २९ ऑक्टोबर बुधवार रोजी अमरण उपोषणाला बसले होते.
शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी याबाबत १४ ऑक्टोबर रोजी जिल्हा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय कार्यालय बीड, जिल्हा व्यवस्थापक अग्रणी बँक बीड व शाखा अधिकारी भारतीय स्टेट बँक चौसाळा तालुका बीड जिल्हा बीड यांना २९ ऑक्टोंबर रोजी अमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन दिले होते. यावर वरील निवेदनाची तात्काळ दखल घेऊन जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी यांनी चौसाळा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखा अधिकारी यांना १५ ऑक्टोबर रोजी लेखी पत्र दिले होते. परंतु सदरील शाखा अधिकारी फनिकेश्वर कुंडा यांनी दखल न घेतल्याने बाळासाहेब मोरे पाटील हे चौसाळा येथील भारतीय स्टेट बँकेच्या समोर २९ ऑक्टोबर बुधवार रोजी उपोषणाला बसले होते.
यावेळी चौसाळा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी फनिकेश्वर कुंडा व फिल्ड ऑफिसर यांनी आंदोलन कर्ते बाळासाहेब मोरे पाटील यांच्याशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. व उर्वरित कर्ज प्रस्ताव पंधरा दिवसात निकाली काढण्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर शिवशक्ती भीमशक्ती मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी उपोषण तात्पुरते मागे घेतले असून पंधरा दिवसात बँकेत कर्ज प्रस्ताव दाखल केलेल्या शेवटच्या शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे पीक कर्ज वाटप न केल्यास पुन्हा बँकेच्या दारात अमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदरील आमरण उपोषणावेळी चौसाळा येथील राकाॅ ( शरद पवार ) गटाचे सतीश जोगदंड यांनी भेट दिली त्यांच्यासह परिसरातील शेतकरी पिंपळगाव घाटचे उपसरपंच संतोष तेलप, चंद्रकांत नाईकवाडे, प्रकाश गिरी, विशाल तेलप, सचिन तेलप, पांडुरंग आंधळे पाटील, सचिन शिंदे, अजिनाथ नाईकवाडे, बाळासाहेब सोनवणे, ज्ञानेश्वर नाईकवाडे पाटील, पंजाब नाईकवाडे, भीमराव शिंदे, व्यंकट चव्हाण, दत्तात्रय नागरगोजे आदी शेतकरी उपस्थित होते.

कवडगावात सशस्त्र दरोडा; अकरा लाखाचा मुद्देमाल चोरला

0

वडवणी — तालुक्यातील कवडगाव येथे बबनराव धुराजी मांजरे यांच्या घरावर काल मंगळवारी 28 ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून चाकूचा धाक दाखवत घरातील नगदी रक्कम व सोन्याच्या दागिने असे ११ लाख २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बबनराव मांजरे यांच्या कवडगाव येथील घरावर काल दि. २८ ऑक्टोबर मंगळवार रोजी अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला मांजरे यांच्या पत्नीला उठवून चाकूचा धाक दाखवत तु येथेच थांब असे म्हणूनच आमच्या घरातील ईतर दरवाज्याना बाहेरून कडी लावून परत माझ्या पत्नीच्या रूम मध्ये येऊन माझ्या पत्नीला म्हणाले की, पैसे व सोने कोठे ठेवले आहेत तेव्हा माझी पत्नी म्हणाली की, कपाटाची चावी माझ्या कडे नाही.अस म्हणताच त्यांनी लोखंडाच्या गजाने कपाटाचे लॉक तोडले व त्यातील रोख रक्कम चाळीस हजार रुपये काढून घेतले व बाजुला असलेल्या लोखंडी पेटी मध्ये कपडे व स्टिल डबा यामध्ये मुलांचे लग्नासाठी ठेवलेले एक लाख रुपयांचे सोने व १५ हजार रुपये तसेच इतर रोख रक्कम व सोन्याचे दागिने असे एकुण सोने ८३हजाय ८००रूपये रोख रक्कम २ लाख९०हजार रुपये असा एकूण ११लाख२०हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला अशा आशयाची बबन मांजरे यांनी वडवणी पोलीस स्टेशनला दिलेले फिर्यादीवरून अज्ञात पाच ते सहा दरोडेखोऱ्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि वर्षा व्हगाडे मॅडम या करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डॉ.संपदा मुंडे प्रकरणातील दोषींना कठोर शासन करून मुंडे कुटुंबाला न्याय द्या – आ.संदीप क्षीरसागर

0

उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन दिले निवेदन

मुंबई  — बीड  जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कन्या डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

बीड जिल्ह्यातील मौजे कोठरबन येथील रहिवासी असलेल्या व फलटण येथे कार्यरत असणाऱ्या डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली आहे.
आ.संदीप क्षीरसागर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, शिव-फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रगतशील महाराष्ट्र राज्यामध्ये एक महिला डॉक्टर आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलते या सारखे दुर्दैव नाही.फलटण येथील पोलिस प्रशासन व आरोग्य प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून स्व.डॉ.संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. यामुळे बीड जिल्ह्यात गंभीर पडसाद उमटले आहेत.
ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. डॉ.संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करून मुंडे कुटुंबाला न्याय देण्याची मागणी बीड विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवारांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

अवकाळी चा फटका; पाच जिल्ह्यातील 40 मंडळात अतिवृष्टी

0

बीड. —  मराठवाड्यात पुन्हा पावसाने हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. थोडं फार हाताशी आलेलं सोयाबीन काढणी करून शेतात पडलेला आहे त्याची नासाडी होऊ लागली आहे ‌ फळ पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रब्बी पेरणी लांबणीवर पडू लागली आहे गेल्या २४ तासांत विशेषतः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी या पाच जिल्ह्यातील ४० मंडळांत अतिवृष्टीची झाली आहे. लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोरोळ मंडळात सर्वाधिक १६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पुढील दोन दिवसात धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघरमध्ये गुरुवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव मंडळात, जालना जिल्ह्याच्या जालना तालुक्यातील विरेगाव, परतूर तालुक्यातील परतूर मंडळात अतिवृष्टी झाली आहे. बीड जिल्ह्याच्या अंबोजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई, लोखंडी, घाटनांदूर, बर्दापूर, केज तालुक्यातील होळ, बनसारोळा, परळी तालुक्यातील परळी, नागपूर, लातूर जिल्ह्याच्या लातूर तालुक्याच्या लातूर, बाभळगाव, कासारखेडा मंडळात, अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर, खंडाळी, किनगाव, अंधोरी, निलंगा तालुक्यातील निलंगा, निटूर, औराद, कासार बालकुंदा, अंबुलगा, हलगरा, भातांगळी मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

उदगीर तालुक्याच्या मोघा, हेर, तोंडार, झरी, रेणापूर तालुक्याच्या रेणापूर, पोहरेगाव, पानगाव, कारेपूर, पळशी, देवणी तालुक्यातील देवणी, बोरोळ, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हिसमाबाद, परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील माखणी, पिंपळदरी मंडळात अतिवृष्टी झाली आहे.लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले. तर रब्बी पेरणीही खोळंबली आहे. येथील नदी, नाल्यांना पूर येऊन, नदीकाठच्या शेतपिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.