Home Blog Page 152

नमिता मुंदडांना पायाभूत विकासासोबतच देवस्थानचा विकास ठरतोय जमेची बाजू

0

बीड — केज मतदार संघाचा सर्वांगीण विकास करताना धार्मिक श्रद्धास्थानांच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आ.नमिता मुंदडा यांनी आणला. त्यामुळे भाविकांमध्ये समाधान तर व्यक्त केले गेलेच शिवाय संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी याचा फायदा होणार आहे. एकंदरच विकासाची गंगोत्री वाहती ठेवल्याने ही निवडणूक नमिता मुंदडा यांच्यासाठी औपचारिकता बनली आहे.

राजकारणा सोबतच मतदारसंघाचा सर्वार्थाने परिपूर्ण विकास करायचा तर धार्मिक श्रद्धा स्थानांचा देखील विचार केला तरच पायाभूत विकासाला चालना मिळते. नेमकं पायाभूत विकासाचीच कास नमिता मुंदडा यांनी आपल्या कार्यकाळात धरली. धार्मिक परंपरेला देखील महत्त्व देत अकरा कोटी रुपयांच्या निधीतून विविध ठिकाणच्या मंदिरांचा विकास करण शक्य झालं. जनतेसाठी वीज, पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देतानाच धार्मिक महत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहिल्याने नमिता मुंदडा यांनी विकासाची नवी ओळख जनतेला करून दिली. मतदारसंघातील देवस्थान विकासासाठी पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत निधी आणला. यामध्ये बालाघाटाचं आराध्य दैवत व वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या नेकनुर येथील बंकट स्वामी संस्थान मंदिरासाठी 70 लाख रुपयांचा किर्तन मंडप, विड्यातील शिवरामपुरी मठ संस्थानासाठी 50 लाखाचा सभामंडप याबरोबरच वरपगाव येथील शिवराम मंदिर मठ संस्थान साठी एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी सभामंडपासाठी मिळवून दिला. आडस परिसरातील आराध्य दैवत आडकेश्वर महादेव मंदिरासाठी 25 लक्ष, हनुमान मंदिरासाठी 25 लक्ष, आवसगाव येथील श्रीराम मंदिरासाठी 50 लक्ष, युसुफ वडगाव येथील श्रीराम मंदिरासाठी 50 लक्ष रुपये, वाघे बाबुळगाव येथील वाघेश्वरी देवी मंदिरासाठी 50 लक्ष रुपये रामेश्वर वाडी (हंगेवाडी) मधील महादेव मंदिरासाठी 25 लक्ष रुपये, सासुराई येथील एकनाथ महाराज समाधी मंदिरासाठी 25 लक्ष रुपयांचा निधी देखील मिळवून दिला. एवढ्यावरच हे काम थांबलं नाही तर नांदूर घाटी येथील तळ्याच्या आई देवस्थान साठी 40 लक्ष रुपये, मौलाली पहाड येथे 50 लक्ष, देवळातील देवीच्या मंदिरासाठी 50 लक्ष रुपये, सनई येथील कोपर नाथ मंदिर पन्नास लक्ष, मा के गावच्या दत्त मंदिरासाठी 50 लक्ष, सोमनाथ महादेव मंदिर बोरगाव येथे 25 लक्ष, नामदेव महाराज मंदिर चिंचोली माळी येथे पन्नास लक्ष, धनेगाव मधील मोसाई देवी मंदिरासाठी 50 लक्ष, केज शहरातील भवानी आई मंदिरासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात यश मिळवलं.
एवढेच नाही तर मुस्लिम व हिंदू श्रद्धास्थान असलेल्या हजरत ख्वाजा महजबोद्दीन दर्गाह साठी 25 लक्ष रुपये, कुंबेफळ येथील सिद्धिविनायक मंदिरासाठी दोन कोटी रुपये याबरोबरच वडमाऊली येथील देवस्थानासाठी दोन कोटी रुपयांचा निधी आपल्या कार्यकाळात मंजूर केला. या निधीमधून अनेक देवस्थान ठिकाणी सभामंडप किचन शेड पालखी हॉल पेव्हर ब्लॉक सुशोभीकरणासारखी काम करण्यात आली किंवा ती सद्यस्थितीत सुरू आहेत.
यामुळे केज मतदार संघ आ.नमिता मुंदडा यांच्यासारखा विकासाची दृष्टी असणार नेतृत्व मिळाल्यामुळे विकास गंगा या मतदारसंघातून वाहण्यास सुरुवात झाली आहे. एकंदरच नमिता मुंदडा यांच्यासाठी केलेली विकास कामच त्यांच्या कर्तुत्वाची साक्ष देत असून कामाच्या माध्यमातून आपोआप प्रचार होऊ लागला आहे. मतदार संघात त्यामुळे नमिता मुंदडा यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी बनत चालली आहे. विकास त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारे ठरत आहे.

व्यापाऱ्यांना भेसळखोर म्हणणाऱ्यांना जागा दाखवा — उदय सामंत

0

बीड  — शेतकरी, व्यापारी, उद्योजकांमुळे महाराष्ट्र प्रगतशील राज्य आहे. महाविकास आघाडीच्या नेत्याने खालच्या पातळीवर जाऊन टीका करत राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना भेसळखोर म्हटले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अशा नेत्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवावी. आम्ही कायम व्यापारी, उद्योजकांचा सन्मान केला. बीडमधील व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांना विधिमंडळात पाठवा, असे आवाहन शिवसेना नेते, उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांनी केले.

महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शहरातील वैष्णव पॅलेस येथे शुक्रवारी (दि.१५) ना.उदय सामंत यांनी व्यापारी संघटनांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर, दिनकर कदम, विलास बडगे, लाडकी बहीण योजना समितीचे बीड विधानसभा अध्यक्ष अमर नाईकवाडे, राणासिंग चव्हाण, राजेंद्र क्षीरसागर, भास्कर जाधव, नानासाहेब काकडे, बबनराव गोरे, युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक अविनाश जाधव, सुमित कोळपे, अजय सुरवसे, सूरज चव्हाण, बीड जिल्हा व्यापारी महासंघ, शहर व तालुका असोसिएशनचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ना.उदय सामंत म्हणाले, माझे व डॉ.योगेश यांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांची निवडणुकीतील घड्याळ ही निशाणी जरी चार नंबरवर असली तरी डॉ.योगेश क्षीरसागर हा उमेदवार एक नंबर आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजकांमुळे महाराष्ट्र प्रगतशील राज्य आहे. महाविकास आघाडीच्या नेत्याने व्यापाऱ्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना भेसळखोर म्हणाला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अशा नेत्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवावी. मी देखील व्यावसायिक आहे, आमचा पारंपारिक व्यवसाय ठेकेदारी आहे. ठेकेदारी करणे चूक नाही, ठेकेदारांकडून वसुली करणे चुकीचे, असाच प्रकार बीडमध्ये घडला आहे, असे म्हणत आ.संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला. समोरचा उमेदवार नेमका कोणत्या पक्षात आहे? हे त्यालाच माहिती नसते. तो कधी म्हणतो शरद पवार, उध्दव ठाकरे तर कधी मनोज जरांगे पाटील यांचे नाव घेतो. आधी त्यांनी एकदा ठरवावे कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची आहे. निवडून आल्यास दंड थोपटून, दादागिरी करून चालत नसते, असेही ते म्हणाले. क्षीरसागर कुटुंबाचे सर्व क्षेत्रात मोठे कार्य आहे. कुटुंबाचा नावलौकिक करण्याऐवजी इथल्या समोरच्या उमेदवाराने नाव घालण्याचा प्रयत्न केला. परंतु जयदत्त क्षीरसागर, डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉ.योगेश क्षीरसागर हे काम करत आहेत. ते विधिमंडळात माझ्यासोबत येणारच आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या सर्वांच्या वतीने मी बीडचे विकासाचे प्रश्न सोडवतो, असा शब्द देतो, मात्र तुम्ही बीडकर डॉ.योगेश यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. बीडमध्ये व्यापार पेठ, एमआयडीसी पाहिली, यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी स्वतःसाठी काही मागितले नाही. तुमच्या प्रश्नांची मांडणी करत होते. अशी प्रश्नांची जाण असलेले डॉ.योगेश क्षीरसागर यांना विधिमंडळात पाठवा. यापूर्वी मी सुद्धा घड्याळाचा उमेदवार होतो. जेवताना, झोपताना, उठताना आपण घड्याळ पाहतो. त्यामुळे घड्याळाला अनन्यसाधारण महत्व आहे, अगदी तसेच महत्त्व बीडचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांना आहे. बीड विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहीण योजनेचा लाभ ९८ हजार महिलांना मिळाला. त्यामुळे आपल्या उमेदवाराला ९८ हजारच्या पुढे मते मोजायची आहेत. त्यामुळे डॉ.योगेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास ना.उदय सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बीडच्या व्यवसायाला गती देणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देऊ — डॉ.योगेश क्षीरसागर

बीडच्या आमदाराने काहीच काम केले नाही म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर त्यांची कायम उदासीनता राहिली. त्यांना व्यवसाय, उद्योग, एमआयडीसीसाठी विशेष काही करता आले नाही. या भागातील रस्ते होणे गरजेचे आहेत. एमआयडीसीतून नाळवंडीकडे जाणारा मुख्य रस्ता नवीन सरकार येताच करून घेतला जाईल. एमआयडीसीमध्ये रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रस्ताव दिलेले आहेत. रिंग रोडचा प्रश्न सोडवायचा आहे. व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी मी विशेष लक्ष देईल. शहरातील व्यवसायाला चालना देण्यासाठी आपण घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावे, असे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.

व्यापारी सुशिक्षित उमेदवाराच्या मागे — भास्कर जाधव

बीड शहर आणि मतदारसंघातील व्यापारी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासारख्या सुशिक्षित उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील. नवीन सरकार महायुतीचे येईल, तेव्हा बीडमध्ये व्यापारी भवन उभारावे, एमआयडीसीत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. व्यवसाय कर रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशा मागण्या जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर जाधव यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केल्या.

एस पी पथकाचा गेवराईत जुगार अड्डयावर छापा,48 लाखांचा मुद्देमाल जप्त‌

0

बीड — पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या पथकाने जुगार्‍यांना मोठा दणका दिला आहे, पोलीस अधीक्षक पथकाचे बाळराजे दराडे यांनी गेवराई परिसरातील हॉटेल तोरणा च्या पाठीमागे उदय पानखडे यांच्या मालकीच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर रात्री पावणे अकराच्या सुमारास छापेमारी केली, यावेळी जुगार खेळताना बाळूनाथ मोहन मोटे, दीपक वामनराव सोनवणे, अमोल दत्तात्रय गांडुळे, श्याम बाबुराव चव्हाण, बाळू पापा राठोड, वचिष्ठ भिमराव ठोसर, कपिल भास्कर मुंजे, ज्ञानेश्‍वर सूर्यकांत लांडगे, पोपट छगन दाभाडे, गणेश गोरख, दावडकर या दहा जणांना पकडले, यावेळी त्यांच्याकडील रोख रकमेसह मोबाईल, गाड्या असा एकूण 48 लाख 18 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले आहेत.

तरुण मित्रांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार-आ.संदीप क्षीरसागर

0

मैंदा व बेलुरा येथे शेकडो कार्यकर्त्यांचा आ.संदीपभैय्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

बीड — विधानसभा निवडणूकीची प्रचार अंतिम टप्प्याकडे सरकत असताना बीड मतदार संघात आ.संदीप क्षीरसागर यांची ताकद आणखी मजबूत झाली आहे. शुक्रवारी (दि.१५) दुपारी बीड मतदारसंघातील मैंदा व बेलुरा येथील युवकांनी मोठ्या संख्येने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला.या सर्वांचे बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि महाविकास आघाडीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांनी स्वागत केले. तसेच आपल्या सर्व युवक, तरुण मित्रांच्या खांद्याला खांद्या लावून मतदारसंघात काम करेल असा शब्द आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिला.

मैंदा व बेलुरा येथील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याशी आ.संदीप क्षीरसागर यांनी संवाद साधला. जेव्हा सर्वसामान्य नागरिक आणि युवक एकजुटीने उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहतो, तेव्हा त्या उमेदवाराचा विजय नक्कीच होतो. युवकांनी आणि नागरिकांनी माझी निवडणूक हातात घेतली आहे. विरोधकांच्या भूलथापांना व अमिषेला बळी न पडता मोठ्या संख्येने दररोज अनेकांचे जाहीर पक्षप्रवेश होत आहेत. आपल्या सर्वांच्या साक्षीने मी बीड मतदारसंघाच्या विकासासाठी आगामी काळात काम करेल असा शब्द आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिला. येथे वीस तारखेला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

यावेळी उत्तरेश्‍वर घुमरे (मा.उपसरपंच), पंजाबराव घुमरे (मा.सरपंच),गोरख घुमरे, अमोल मौंदेकर, अशोक कसबे, महारुद्र घुमरे, गणेश दुकानदार, गणु दादा, पोपट कसबे, परमेश्‍वर नाना घुमरे, लाला घुमरे, गंगाधर बाप्पा घुमरे, प्रदीप कसबे, नंदू राठोड, सतीश भोर, चंदू सगळे, दत्ता पाटील,नितीन घोटे,बळी कसबे, बाप्पा घुमरे, अमोल उपडे, एस.पी.घुमरे, दत्ता मोमीन मेंबर, अभिषेक घुमरे, महेश गडसिंग, दत्ता पाटील घुमरे, कैलास लांडे तसेच पांडुरंग गवते युवा सेना जिल्हाप्रमुख बीड, रामेश्‍वर गवते, बालाजी गवते, ज्ञानेश्‍वर लाटे, संपत ढवळे, कुमार भाऊ गवते, रावसाहेब जिजा गवते, गोपाल गवते, नंदू गवते, दत्ता गवते, बाळू गवते, मच्छिंद्र लाटे, सचिन गवते, विशाल गवते, भाऊसाहेब गवते, महादेव गवते, भारत गवते, गोरख गवते, तुकाराम गवते, पप्पू गवते, बजरंग गवते, अशोक लाटे, दादासाहेब गवते, अजय गवते, ज्ञानेश्वर ढवळे व इतर मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला.

माझ्या जनतेच्या एका-एका मताचा उपयोग बीड मतदारसंघाच्या विकासासाठी करणार

0
पाली,मांजरसुंबा येथील प्रचार बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त दिला विश्वास
बीड  — बीड मतदार संघातील जनता आमच्या पक्षासोबत आणि माझ्यासोबत आहे. जनता हीच खरी आमची ताकद असून विरोधकांच्या अपप्रचाराला सूज्ञ जनता कधीही थारा देणार नाही.बीड मतदार संघातील पाली असो की, बालाघाटावरील चौसाळा परिसर कायम येथील जनता खा.शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत राहिलेली आहे. त्यामुळे विरोधकांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कितीही आरोप केले तरी त्यांना थारा न देता येत्या २० तारखेला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी मला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी द्या.तुमच्या एका-एका मताचा उपयोग मी बीड मतदारसंघाच्या विकासासाठी करणार असल्याचा विश्वास आ. संदीप क्षीरसागर यांनी केले

बीड विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे जात असताना आता मतदारसंघातील गावोगावी बीड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्त्यांसह ठिकठिकाणी मतदार त्यांचे जोरदार स्वागत करत आहेत. गुरुवारी (दि.१४) आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील पाली, मांजरसुंबा या गावांचा दौरा करत कॉर्नर बैठकीत त्यांनी मतदारांना पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला मतदारांनी जोरदार प्रतिसाद देत आम्ही तुमच्या सोबत असल्याचे बोलून दाखवले.
पाली व मांजरसुंबा येथील संवाद बैठकीत बोलताना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, बालाघाटवरील जनता नेहमीच खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या भूमिकेसोबत राहिलेली आहे. जेंव्हा लोक एखाद्या भूमिकेसोबत एकनिष्ठ असतात तेंव्हा नक्कीच इतिहास घडतो. बालाघाटवरील जनता यावेळी नक्की इतिहास घडवतील असा विश्वास आहे.प्रलंबित विकासकामांसाठी सतत पाठपुरावा केला. सर्वांना विश्‍वासात घेवूनच विकासाची कामे पुर्णत्वास नेली. विरोधकांना आता स्वत:कडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते तथ्यहिन आरोप करत आहेत; मात्र माझ्या मतदारसंघातील जनता माझ्या कामाबद्दल समाधानी आहे. मी त्यांचा विश्‍वास कमावलायं,त्यामुळे विरोधकांकडे लक्ष देण्याची गरज नाही.यावेळी त्यांनी गत पाच वर्षात आमदारकीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.आम्ही विकासासाठी काम करतो असे सांगत येत्या २० तारखेला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी मला पुन्हा एकदा तुमचे सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले. सर्वसामान्य माणसाबद्दल कणव असणारे संदीपभैय्या गावी आल्याने मतदारांनी त्यांचे मोठ्या उत्साहात गळ्यात पुष्पहार घालून स्वागत केले. या स्वागताने आ. संदीप क्षीरसागर भारावून गेले.

कापसाच्या शेतातून 21 किलो गांजा जप्त

0

परळी — तालुक्यातील कापूस व तुरीच्या शेतातून पोलिसांनी 21 किलो गांजासह एकाला ताब्यात घेतले. ही कारवाई दि.14 नोव्हेंबर रोजी सकाळी दिंद्रुड व अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या केली.

परळी तालुक्यातील नागपिंपरी येथील शेतकरी विश्वास नामदेव बडे यांनी आपल्या शेतात कापूस व तुरीच्या झाडात गांजाची 32 झाडे लावली होती. गोपनीय माहितीच्या आधारे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक बारगड यांच्या मार्गदर्शनाखाली दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड व अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पडवळ यांनी नागपिंपरी येथे गुरुवारी छापा टाकत 4 लाख 17 हजार 400 रुपयांचा 21 किलो गांजा जप्त करत आरोपी विश्वास बडे यांना ताब्यात घेतले. ही कारवाई बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली दिंद्रुड व अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या पार पडली. जप्त केलेला सर्व माल व आरोपी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना स्वाधीन करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि अण्णाराव खोडेवाड, पो.हे.कॉं.श्रीपती चौरे, पो.कॉं.मुकेश शेळके, आत्माराम चामणर, महेश साळुंखे,पोटे यांनी केली.

निवडणुकांमुळे राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी

0

मुंबई — राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून प्रचारासाठी अवघे 4 दिवस शिल्लक राहिले आहेत. देशातील दिग्गज नेतेही आज महाराष्ट्रात प्रचारसभा घेत असून निवडणूक प्रशासकीय यंत्रणाही मतदानाच्या दिवासाची वाट पाहात तयारीला लागली आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची जबाबदारी बजावण्यात आली आहे. त्यामुळेच, शिक्षक संघटनांकडून मतदानाच्या दोन दिवस अगोदर शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातली शाळांना 18 ते 20 अशी तीन दिवस सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्यामुळे अनेक शाळांना शाळा चालविणे 18 19 आणि 20 नोव्हेंबरला अशक्य असल्याने ज्या शाळांना शाळा भरवणे कठीण आहे, त्या शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाची व संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. त्यामुळे, 18, 19,20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सूचना देण्याच्या राज्य सरकारच्यावतीने शिक्षण आयुक्तांना विनंती पत्राद्वारे देण्यात आलं आहे. निवडणूक कर्तव्यावर अनेक शिक्षक असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाळा या तीन दिवस भरवणे कठीण जात आहे. याशिवाय अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र सुद्धा ठरवण्यात देण्यात आले. या सगळ्याचा विचार करून 18, 19 आणि 20 नोव्हेंबर या तीन दिवशी ज्या शाळांना शाळा भरवणे शक्य नसेल त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पत्रात काय आहे मजकूर

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक18,19 व 20 नोव्हेंबर, 2024 रोजी शाळांना सुट्टी जाहीर
करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, ही विनंती, असे आदेश राज्य सरकारचे उपसचिव तुषार महाजन यांच्या पत्राद्वारे शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत.

डॉ. योगेश क्षीरसागर यांची विजयाकडे वाटचाल

0

बीड — बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे यांची डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये भव्य सभा पार पडली. डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उमेदवारीपासून ते चुलते माजी मंत्री जयदत्तआण्णा यांच्या पाठिंब्यापर्यंत अनेक योगायोग जुळून आले. या काळात मुंडे बहीण भावाचे मिळालेले पाठबळ, कालच्या सभेपूर्वी राष्ट्रवादीतील मिटलेला अंतर्गत कलह यामुळे डॉ.योगेश क्षीरसागर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल दिसत आहे.

अजितदादा पवारांच्या उपस्थितीत अनेक मोठे प्रवेश झाले. यामुळे डॉ.योगेश क्षीरसागर यांची ताकद नक्कीच वाढली आहे. डॉ.योगेश यांना सर्व समाजातून पाठिंबा मिळत आहे. अनेक संघटना देखील त्यांना पाठिंबा देत आहेत. डॉ.योगेश यांच्यासाठी आ.पंकजाताई मुंडे, माजी खा.प्रीतमताई मुंडे, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी देखील सभा घेऊन विजयी करण्याचा निश्चय केला. तसेच, काल खुद्द अजित पवार, धनंजय मुंडे यांनी देखील सभा घेतली. डॉ.योगेश क्षीरसागर यांना मतदारसंघातून जनसामान्य नागरिकांच्या सभा, कॉर्नर बैठका, रॅलीमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विरोधकांमध्ये धाकधूक वाढली आहे. डॉ.योगेश क्षीरसागर आणि डॉ.सारिका क्षीरसागर यांनी मागील एक ते दीड वर्षात बीड मतदारसंघ पिंजून काढला. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामुळेच त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत आहे. डॉ.योगेश क्षीरसागर हे उच्चशिक्षित, सुसंस्कृत, शांत, संयमी, युवा नेतृत्व असल्याने त्यांना नागरिकांच्या समस्यांची जाण आहे. त्यामुळे त्यांना निवडून विधानसभेत पाठवण्याची तयारी बीड मतदारसंघातील मतदारांनी केली असल्याचे चित्र आहे.

असा मिटला राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह

बीडमध्ये सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी योगेश क्षीरसागरांच्या पाठिशी मोठी ताकद उभी केली. सभेपूर्वी धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये एका ठिकाणी बैठक घेतली. त्या बैठकीत सर्व नाराज व्यक्तींची मते जाणून घेतली. या बैठकीला डॉ.योगेश क्षीरसागर हे देखील उपस्थित होते. बैठकीनंतर अजित पवार यांचे आगमन होताच व्यासपीठावर माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, माजी गटनेते फारुक पटेल, ज्येष्ठ नेते मोईन मास्टर, बबनराव गवते, महादेवराव उबाळे, बाळासाहेब गुजर, बरकत पठाण, अलीम पटेल, जीवन घोलप, रामदास सरवदे, संतोष क्षीरसागर, संभाजी काळे, नंदू गवळी, बाळासाहेब धोत्रे, गौरव जावळे, शकीलखान, आक्रम बागवान असे अनेकजण पोहोचले. या सर्वांनी आता योगेश क्षीरसागरांचे काम जोमाने करण्याचा निर्णय अजितदादांच्या उपस्थितीत घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह सध्यातरी मिटल्याचे चित्र आहे.

विकासाच्या मुद्द्यावर नमिता मुंदडांचा जोर; विरोधकांना पडतोय घोर!

0

बीड — राज्यातच नव्हे तर जिल्ह्यात देखील विरोधकावर चिखल फेक करत मतं मागितली जात असताना केज मध्ये मात्र भाजप उमेदवार नमिता मुंदडा विकासाच्या मुद्द्यावर जोर देत असल्याने विरोधकांची मात्र अडचण होत आहे.

दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांच्या पावलावर पाऊल ठेवत विकासाची कास धरण्याचं काम नमिता मुंदडा यांनी केलं आहे. मतदार संघामध्ये राबवलेल्या विकास योजनांच्या जोरावर त्या मतदारांकडे मत मागत आहेत. राज्यात जातीपातीचे एकमेकावर चिखल फेक करत कुरघोडीचे राजकारण करत आहेत. त्यांच्या प्रचारातून विकासाचे मुद्दे गायब झालेले आहेत असा असताना नमिता मुंदडा विकासाच्या मुद्द्यावर मत मागत प्रचार करत आहेत. प्रचारा दरम्यान विकासाचे मुद्दे उपस्थित करत असल्याने जातीय दरी कमी होऊन विकासाची नवी दृष्टी मतदारांना देखील मिळू लागली आहे. प्रचारात विकासाचा पॅटर्न त्यांनी आणल्यामुळे त्यांचा प्रचार मतदारांच्या काळजाचा ठाव घेत आहेत. त्यामुळे विरोधकांची कोंडी होऊन प्रचार नेमका कोणत्या मुद्द्यावर करावा याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने मतदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विरोधकांच्या नाकी नऊ येऊ लागले आहेत. एकंदरच मतदारांच्या वाढत्या समर्थनामुळे विरोधकांची हवा गूल होत असल्याचे चित्र केज मध्ये पाहायला मिळत आहे.

बीड – दगडाने ठेचून तरुणाचा खून

0

बीड — एका 40 वर्षीय तरूणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना शहरातील मोंढा रोडवरील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या रस्त्यावर आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती कळताच शहर पोलीसांनी धाव घेवून पंचनामा केला. या प्रकरणात एका महिलेसह एका पुरूषाला ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.

बीड शहरातील सय्यद मझहर सय्यद अखतर वय 40 वर्ष, रा. मोहम्मदीया कॉलनी, बीड ह.मु. तांदळवाडी ता. बीड या तरूणाचा मृतदेह आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोंढा रोडवरील स्मशानभूमी जवळील रस्त्यावर आढळुन आला. त्या ठिकाणी एक स्कुटी देखील पडलेली होती. जवळच सय्यद मझहर याचा मृतदेह डोके छिन्न-विछिन्न अवस्थेत दिसुन आला. सदरील मृतदेह पोलीसांनी जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असुन या प्रकरणी पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा छडा लावण्याच्या उद्देशाने एका महिलेसह एका पुरूषाला ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. खूनाचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.